Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रस्त्यावरून चालताना लहान मुलाला रस्त्याच्या बाजूने का ठेवतात?

द
देवदत्त
Tue, 01/06/2009 - 16:55
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2751 वाचन

💬 प्रतिसाद (7)
च
चतुरंग Tue, 01/06/2009 - 17:11 नवीन
त्यातही एक शक्यता अशी वाटते की मुलांना रस्त्यावरुन जाणारी वहाने ही फारच कुतुहलाचा विषय वाटतात त्यामुळे त्यांना रस्त्याकडच्या (वहानांकडच्या) बाजूला रहायचे असते. पदपथाच्या बाजूला राहिली तर त्यांच्या नजरेला हात धरलेल्या व्यक्तीचा अडथळा येतो आणि ती सारखी पुढे किंवा मागे अशी त्या व्यक्तीच्या पायात येतात. सहाजिकच रस्त्याच्या डावीकडून जात असली तर त्यांचा डावा हात धरुन मोठी माणसे चालतात. (किंवा दुसर्‍या बाजूला उलटे). दुसरे असे की मोठ्यांना पदपथावरुन कायकाय (आणि कोणकोण ;)) चालले आहे ह्यात रस असतो! त्यामुळे त्यांचे लक्ष पदपथावर आणि मुलांचे रस्त्यावर अशी ही वरात चाललेली असते. देवदत्त तू म्हणतोस ते बरोबर आहे. असा अनुभव मलाही स्कूटर चालवताना बर्‍याच वेळा आलाय. मी स्वतः खूप गर्दीतून माझ्या लहान मुलाला घेऊन जायचो त्यावेळी त्याला (३-४ वर्षाचा असे पर्यंत) चक्क खांद्यावर बसवून जायचो. चतुरंग
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Tue, 01/06/2009 - 21:20 नवीन
मी देखील हा अनुभव पदोपदी घेतला आहे. नॉर्मली मी बायकाना मुलाना रस्त्याच्या बाजूने नेताना पाहिले आहे. कदाचित जास्त करुन बायकाच मुलाना बाहेर घेउन जातात हे देखिल कारण असू शकते. मात्र जेंव्हा मी हे बघतो तेंव्हा मी आवर्जून थांबतो आणी त्या तायामायांना सांगतो मुलाना आतल्या बाजूला चालवायला. ह्या तायामाया पण तोंडाने पुटपुटत आपली नाराजी व्यक्त करतात, पण पोराना खस् कन आतल्या बाजूला घेऊन हात पलटी करतात!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/07/2009 - 05:47 नवीन
थोडं वेगळं आहे. बरेचसे लोकं तुम्ही जेवढा या गोष्टीचा विचार करताय तेवढा करतच नाहीत. आम्ही जिथे रहातो तिथे अनेक लोकं पाहिले आहेत, पार्किंग लॉटमधून चालताना प्रॅम ढकलणारे, लहान मुलांबरोबर असणारे लोकं हे आपण बागेत चालल्याच्या थाटात चालतात. गाड्या, स्कूटर्स आल्या, त्यांनी आरडाओरडा केला की मग वाकडं तोंड करुन बाजूला होतात आणि नंतर मुलांना बाजूला व्हायला सांगतात. मुलं चार फूट लांबच असतात, ती कधी ऐकतात कधी ऐकत नाहीत. मग आपणच चूक केली आहे अशा थाटात, पार्किंग लॉटमधल्या छोट्या आईलमधून गाडी सांभाळत आणि इतरांचे जीव वाचवत गाडी उभी करायची. रस्त्यावर हे लोकं फार काही वेगळं वागत असतील अशी अपेक्षा नाही. माझं निरीक्षण: या सवयीच्या विपरीत वागणारे लोक म्हणजे एकच जमात, एकटे चालणारे लोकं. ते कायम रस्त्याच्या कडेने, जबाबदारीने चालताना दिसतात. अर्थात हे निरीक्षण बहुसंख्य लोकांसाठीचं आहे. गर्दीच्या रस्त्यातून जाताना मला माझ्या आई-बाबांनी आतल्या बाजूलाच ठेवलं. अधूनमधून याच पार्कींग लॉटमधे एखादे आई-वडील दिसतातही जे मुलांचा हात धरून घेऊन जातात, रस्त्याच्या कडेने चालायचं असं सांगत असतात. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 01/07/2009 - 05:54 नवीन
आपसूकच काय घडत असेल ह्याबद्दलचा तर्क आहे. बर्‍याच गोष्टी नकळत घडत जाऊन अंगवळणी पडत असाव्यात. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/07/2009 - 06:00 नवीन
आपसूकच काय घडत असेल ह्याबद्दलचा तर्क आहे. बर्‍याच गोष्टी नकळत घडत जाऊन अंगवळणी पडत असाव्यात. आपसूक घडणारी ही गोष्ट कधी ना कधी शिकलेली असते. उदा. ही लहान मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांचे पालक जे करायचे तेच करतील. आपल्या रस्त्यांवर एवढी वाहनं आणि तोबा गर्दी फारशी काही जुनी नाही, फारफारतर चार पिढ्या मागची गोष्ट असेल. (जसं समोरच्याला पाय लागला तर स्वतःच्या नकळतच नमस्कार केल्याची कृती होते, याचं मूळ खूप जुनं असावं.) माझा रोख असा होता की वाहनं आली, पण त्याबरोबर चालक आणि पादचार्‍यांना जी शिस्त लागायला हवी त्यात आपण मागे पडलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
परिकथेतील राजकुमार Wed, 01/07/2009 - 09:25 नवीन
अगदि मनातला विषय मांडला आहेत, त्याबद्दल धन्यावाद !! आमच्या येथे शिवाजी रोड सारख्या हमरस्त्यावर हे हमखास दिसणारे दृष्य ! कधी कधी तर मतोश्रींच्या उजव्या हातात मोबाईल, डाव्या हातने लहान मुलाचा हात धरलेला आणी पु.लं. च्या भाषेत सांगायचे म्हणजे तो कार्टा नाहितर कार्टी येणारी जाणारी प्रत्येक गाडी हि आपल्या अंगावरुनच जायला पाहिजे ह्या थाटात रस्त्यावर चालत असते. हा आमचा एका मातोश्रींशी झालेला संवाद :- आम्ही :- ताई, त्याला त्या हाताला धराना, आत्ता सायकलचा धक्का लागला असता त्याला. त्याला पलिकडच्या हाताला धराना. ताई :- मुर्ख आहे तो, त्या हाताला धरले कि मुद्दाम शेण वगैरे दिसले कि त्यात जोरात पाय आपटतो ! संवाद (२) आम्ही :- अरे ए बाळा , ओ काकु त्याला पलिकडच्या हाताला धराना, कसला वाकडा चालतोय तो. काकु :- तो लहान आहे, त्याला नहि कळत. पण देवानी तुम्हाला अक्कल दिलियेना? आणी डोळेपण ? (मग आमच्याकडे निरखुन बघत) डोळे, ते पण चारचार. तुम्हाला नाहि दिसत निट चालवायला ? आम्ही :- भवतेक देवानी आम्हाला ४ डोळे दिलेत तशेच तुम्हाला ही चार चिरंजिव दिलेत का हो ? का कालच विमा काढलाय ह्याचा ? आमचा एक निच मित्र तर अशा पालकांना "सांभाळा पोराला, का नको असताना झालाय ?" असा भर गर्दित प्रश्न विचारतो ! =)) कायम रस्त्याच्या डाव्या बाजुनी सायकल चालवणारा निसर्गप्रेमी |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 01/07/2009 - 13:13 नवीन
यालाच इंग्रजीमधे 'सिव्हिक सेन्स् ' नसणे असे म्हणतात. रेल्वे फलाटावर कुटुंब उभे असताना लहान पोर फलाटाच्या कडेला जाऊन डोकावत असते. आईबापांचे अजिबात लक्ष नसते. हा प्रकार गुजराथी कुटुंबात हमखास बघायला मिळतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा