जे न देखे रवी...

जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं

Primary tabs

कशाला घरं तू नीटनीटकं सजवलं होतं
कुंपणा बाहेरचं जग चिखलानं बरबटलं होतं

का पाहतेस स्वप्न सुखी संसाराचे
कालचं माझं एकीशी नातं जुळलं होतं

का निरुत्तर पत्र धाडतो मी त्या पत्यावर
तीने तर केव्हांच घर बदललं होतं

का स्वातंत्र्याला मी स्वातंत्र म्हणू इथे
इवल्याश्या फुलांना कालचं कुणी खुडलं होतं

जरा हळू बोल असं साऱ्याने बजावलं मला
बजावताना ते किती मोठ्याने किंचाळलं होतं

का जिवापार संभाळ केलास माझ्या हृदयाचा
कालचं मी माझं शरीर भंगारात काढलं होतं

का माझ्यासाठी जमलात तुम्ही स्मशानात वेड्यांनो
जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं

@सनिल पांगे

विसोबा खेचर

का माझ्यासाठी जमलात तुम्ही स्मशानात वेड्यांनो
जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं

वा वा! या ओळी आवडल्या...

तात्या.

छान कविता.
तुमची "आई" वर एक कविता लिहीली होती ती खूप मस्त आहे.
ती इथे क्रुपया द्याल का? कुठे वाचली ती लक्षात नाही.