Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहिती

श
श्रेया
गुरुवार, 01/15/2009 - 12:38
🗣 35 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7610 वाचन

💬 प्रतिसाद (35)
अ
अवलिया गुरुवार, 01/15/2009 - 12:44 नवीन
अदर साईड ऑफ मिडनाईट. पुस्तकाचे नावच पुरेसे आहे.....छान आहे. वाचा (अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे ) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग गुरुवार, 01/15/2009 - 15:20 नवीन
नेवतीची अक्षरे-संदीप खरे बराक ओबामा-संजय आवटे हे काही नवीन लिखाण विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मिंटी Fri, 01/16/2009 - 05:32 नवीन
नेवतीची अक्षरे-संदीप खरे विनायक संदिप खरेच्या या पुस्तकाचं नाव नेणिवेची अक्षरे असं आहे. असो. अजुन वाचण्यासारखी पुस्तकं म्हणजे ७० दिवस - पण या पुस्तकाच्या लेखकांचं नाव आत्ता लक्षात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
व
विनायक पाचलग Fri, 01/16/2009 - 05:41 नवीन
गडबडीत टाइपले होते असो छान आहे पुस्तक वाचुन संपले आहे त्याचा व्हिडिओ ही आहे पाहिजे असल्युआस लिंक देतो विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
म
मिंटी Fri, 01/16/2009 - 05:59 नवीन
माफी कसली मागतोस रे.... जाऊ देत सोड.... तुझ्याकडे त्याचा विडियो आहे ना मग मला त्याची लिंक दे ना....प्लिज :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
व
विनायक पाचलग Fri, 01/16/2009 - 06:32 नवीन
http://www.youtube.com/watch?v=YG15gntAfB4 http://www.youtube.com/watch?v=dqLBWaZjeHU&feature=related http://www.youtube.com/watch?v=yU0JrHwJktM&feature=related पाहा आणि उत्तर द्या खरडवही वापरा अतिअवांतर होत चालले आहे विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
स
सुचेल तसं Fri, 01/16/2009 - 11:25 नवीन
७० दिवस: ह्याचा अनुवाद रविंद्र गुर्जरांनी केला आहे. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/15/2009 - 15:33 नवीन
१) चांदोबा २) चंपक ३) ठकठक ४) चाचा चौधरी ५) नागराज ६) पिंकी ह्या वाचनाची गोडी लागत आहे असे वाटले की मग :- १)कुमार २) फास्टर फेणे ३) गोट्या ४) बोक्या सातबंडे |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 01/15/2009 - 18:49 नवीन
याच्या आधी अक्षर ओळख, अंकलिपी, गमभन असे वाचा म्हणजे एकदम जड जाणार नाही. (अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे ) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सोनम गुरुवार, 01/15/2009 - 16:01 नवीन
१.त्या तिघी : अशोक गोडबोले २.भंगलेले देऊळ : ग.त्र्यं.माडखोलकर ३.मृगनयना : ग.त्र्यं.माडखोलकर ४.स्वप्नातील कळ्यानो : भारती मेहता ५. हंटर : मनोहर दातार ६.गुलाबपाणी : डॉ.आशा सावदेकर. Image removed.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 01/15/2009 - 16:06 नवीन
थक्क झालो राव नव्या व वाचनीय पुस्तकांची यादी वाचुन ... अक्षरशः ह्यातले एकही पुस्तक वाचले, चाळले नाही अजुन. छे, फारच बॅकलॉग राहिला आहे बॉ आमचा ... एक विनंती : नुसती पुस्तकाम्ची नावे देण्याऐवजी त्याबद्दल थोडे संक्षेपाने लिहता आल्यास चांगले होईल. तेवढीच आम्हाला मदत होईल नवे पुस्तक विकत घेताना ..! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोनम
स
सोनम गुरुवार, 01/15/2009 - 16:14 नवीन
नुसती पुस्तकाम्ची नावे देण्याऐवजी त्याबद्दल थोडे संक्षेपाने लिहता आल्यास चांगले होईल अहो मग ह्या प्रतिक्रिया थोड्या लांबलचक नाही ना होणार का.? तेवढीच आम्हाला मदत होईल नवे पुस्तक विकत घेताना ..! कल्पना चांगली आहे आम्ही अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करु (फक्त मी आणि बाकीच्याचे माहित नाही) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
विनायक पाचलग गुरुवार, 01/15/2009 - 16:30 नवीन
लिहिणारच आहे माझी दोन्ही पुस्तके कालच वाचुन झाली आणि हो का थांबलोय हे सांगायला नको आपला (लेख टाकु को दा)विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोनम
छ
छोटा डॉन गुरुवार, 01/15/2009 - 16:40 नवीन
>>अहो मग ह्या प्रतिक्रिया थोड्या लांबलचक नाही ना होणार का.? भल्यामोठ्या प्रतिक्रीयांना मिपाकर कधीपासुन घाबरायला लागले ? आम्ही वेगळे काय करतो ... जर अर्थपुर्ण आणि उपयुक्त "मोठ्ठी प्रतिक्रीया" असेल तर कोणीही बोलणार नाही. मेगाबाईट्सच्या काळजीत माहितीचा ओघ थांबवु नका ..! ( बाकी जर कोणी वैतागलेच तर त्याला भल्यामोठ्ठ्या खरडी / व्यनी टाकुन जेरीस आणायची जबाबदारी आमची ) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोनम
आ
आनंदयात्री Fri, 01/16/2009 - 09:46 नवीन
व्यनी आला नाही अजुन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मिंटी Fri, 01/16/2009 - 09:53 नवीन
+१ असंच म्हणते..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
सोनम Sun, 01/25/2009 - 11:34 नवीन
पुस्तकाची माहिती १. कलकी (पत्नीच्या खुनाचा शोध घेणारी अदभुत रम्य कादंबरी) स्वामी विज्ञानानंद किंमत :- १२५/- सारांश :- प्रथमा ह्या महिलाचा खुन होता आणि त्याचा आरोप तिच्या पती(विश्वनाथ) ह्याच्यावर घेतात.आणि त्यानंतर सुरु होते विश्वनाथची कहाणी.आपल्या पत्नीचा खुन करणार्या व्यक्तीच्या शोधासाठी त्याने केलेले प्रयत्न. पुढे काय होते? त्याला न्याय मिळतो का?त्याने सूड घेतला का? ही रोमहर्षक कहाणी स्वामी विज्ञानानंद याच्या गूढ रम्य तरीही ज्ञानरंजक शैलीत लिहिली आहे. २.अर्धीमुर्धी कहाणी (इंदिरा गोस्वामी) अनुवाद :-अर्चना मिरजकर किंमत :- १६०/- सारांश :- सत्तावीस वर्षाच्या या जीवनाच्या तुकड्यात या संवेदनाशील लेखिकेने काय काय अनुभवले आहे! वडिलांचा मृत्यू,त्यानंतर केलेला आत्महत्येचा असफल प्रयत्न्,वैवाहिक जीवनाचा प्रारंभही न करता पुसून टाकलेले पहिले लग्न्,नंतरचा प्रेमविवाह्,जेमतेम दोन वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर पतीचा झालेला अपघाती मृत्यू,नैराश्येचा सुन्न अनुभव्,वृदांवनातील वास्तव्,तेथील अगतिक विधवाच्या हलाखीचे मनाला सटपटून टाकणारे सहानुभवी निरीक्षण्...अनेकविध भावक्षुब्ध अनुभव. अवघ्या सत्तावीस वर्षाच्या जीवनानुभवात जीवनाच्या अनेक पैलूना आंतरिक संवेद्यतेने स्पर्श करणारी ही अर्धीमुर्धी कहाणी.. ३.द अल्केमिस्ट (पाउलो कोएलो) अनुवाद :- नितीन कोत्तापल्ले. किंमत :- १३०/- सारांश :- 'द अल्केमिस्ट'हे वैश्विक पातळीवर गाजलेले एक बहुचर्चित पुस्तक आहे.ही कथा आपणास आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करुन देते.प्रतिके आणि शकुन लक्षात घेऊन स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसे राहावे याचे मार्गदर्शन करणारी ही रंजक अशी बोधपूर्ण कथा आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ट
टारझन गुरुवार, 01/15/2009 - 16:35 नवीन
आहो पुस्तकं विकत घेऊन काय वाचता आहात ? हे पहा ... पुर्ण फुक्कट आहे ... मजा करा लेको ... लेखक .. डिस्क्रिप्शन आणि बरंच काही .. ऑटोमॅटिक कळेल :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/15/2009 - 17:46 नवीन
'केतकी पिवळी पडली', प्राध्यापक वाळींब्यांचं! आपल्या मिपाचे एक मान्यवर सभासद या पुस्तकाचं परीक्षणही टाकू शकतील. (ह. घ्या हे वे. सां. न ल.) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन गुरुवार, 01/15/2009 - 18:17 नवीन
नाही हो ’केतकी पिवळी पडली’ ओळिंब्यांनी नाही तर त.त.कुडचेडकरांनी लिहिले आहे. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अनामिक गुरुवार, 01/15/2009 - 18:54 नवीन
सहमत (आमच्या ह्या प्रतिक्रियेवर आधीच कुणाचे कॉपी राईट्स असतील तर त्यांनी खुश्शाल कोर्टात जावे) अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
छ
छोटा डॉन गुरुवार, 01/15/2009 - 18:55 नवीन
>>सहमत ... ??? कमाल आहे बॉ. असो. ( माझा पुढचा प्रतिसाद पहावा कॄपया आणि कॄपया ह्.घ्या. ) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अनामिक गुरुवार, 01/15/2009 - 18:58 नवीन
डॉनराव.. तुझा प्रतिसाद पाहिला आणि लक्षात आलं... आता मला माझा प्रतिसाद बदलताही येत नाहिये. असो, मला माझं कॉपी राईटवालं वाक्य टाकायची घाई झाली होती... अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
अ
अवलिया गुरुवार, 01/15/2009 - 18:59 नवीन
अति घाई संकटात नेई (अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे ) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
र
रम्या Fri, 01/16/2009 - 10:49 नवीन
अति घाई संकटात नेई "अती घाई मसणात नेई" इति मकरंद अनासपुरे कुठल्याशा शिनेमात! आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
छ
छोटा डॉन गुरुवार, 01/15/2009 - 19:00 नवीन
ठीक आहे बॉस, चलता है...! बाकी आम्हालासुद्धा तुमचे "कॉपीराईतचे वाक्य" लै आवडले पण काय करणार, त्याचा कॉपीराईट असल्यास काय घ्या ? असो. आता बास. ह्यापुढचे अवांतर "उचीत" ठरणार नाही. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
छ
छोटा डॉन गुरुवार, 01/15/2009 - 18:54 नवीन
>>नाही हो ’केतकी पिवळी पडली’ ओळिंब्यांनी नाही तर त.त.कुडचेडकरांनी लिहिले आहे. सॉरी मास्टर, हे पुस्तक "त्.त. कुडचेडकरांनी" लिहलेले नसुन "स. तं. कुडचेडकरांनी" लिहलेले आहे असे आम्हाला आठवते. असो. त्याचे काही विषेश नाही. बाकी आमच्या म्हणण्यानुसार माणसाने जर "जीवनोन्नतीचे सहा सोपान! " ह्याची गरजेपेक्षा जास्त पारायणे केली की तपशिलात अशा ढोबळ चुका घडतात. असो. त्याचेही जास्त काही विषेश नाही. ( कृपया ह्.घ्या. बरे ) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/16/2009 - 05:46 नवीन
चुका दाखवणार्‍या लोकांचे आभार. मला वाटत होतंच ते पुस्तक वाळींब्यांचं नाही, पण हाताशी संदर्भ नसल्यामुळे शोध घेता आला नाही. असो. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत. आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या बौद्धिक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवाद नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मृगनयनी Fri, 01/16/2009 - 05:52 नवीन
बाकी आमच्या म्हणण्यानुसार माणसाने जर "जीवनोन्नतीचे सहा सोपान! " ह्याची गरजेपेक्षा जास्त पारायणे केली की तपशिलात अशा ढोबळ चुका घडतात =)) =)) =)) डॉन जी, ""जीवनोन्नतीचे सहा सोपान!"" हे टंकताना तुमचा खिसा उलटा होउन त्यामधून १०-१२ गोट्या पडल्याचा अवाज आला का? :-? अवान्तर : चहासारख्या उत्तेजक पेयांपासुन दूर राहण्यासाठी कोणत्या व्यसनमुक्ती केन्द्रात नाव नोन्दवावं लागेल ? :-? :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
आ
आनंदयात्री Fri, 01/16/2009 - 09:45 नवीन
>>""जीवनोन्नतीचे सहा सोपान!"" हे टंकताना तुमचा खिसा उलटा होउन त्यामधून १०-१२ गोट्या पडल्याचा अवाज आला का? हे कसे काय रे डॉन्या ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Fri, 01/16/2009 - 09:58 नवीन
जीवनोन्नतीचे सहा सोपान!"" हे टंकताना तुमचा खिसा उलटा होउन त्यामधून १०-१२ गोट्या पडल्याचा अवाज आला का? आनंद जी, "केतकी पिवळी पडली", "जीवनोन्नतीचे सहा सोपान", "जीवनातील समरप्रसंग", "चान्दीच्या वाटीतुन नातवाचे पेढे", "चहा वगैरे उत्तेजक पेये" इ. शब्दसंपदा असलेली पुलं ची एक व्यक्तिरेखा आपणास बहुधा विस्मृत झालेली असावी. असो. प्रस्तुत व्यक्तिरेखा जेव्हा "जीवनोन्नतीचे सहा सोपान!" हे शब्द उच्चारते, तेव्हा ---- खिशातुन एकदम १०-१२ गोट्या खाली पडल्या की काय, असे वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Fri, 01/16/2009 - 10:01 नवीन
ती व्यक्तीरेखा कशी विसरणार मृगनयनीजी ! असो .. प्रश्न डॉनास होता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
स
सखाराम_गटणे™ Fri, 01/16/2009 - 10:09 नवीन
सहमत ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/16/2009 - 11:29 नवीन
मिपावर अशा प्रकारची चर्चा झाली होती. थोड्या वेगळ्या, चाकोरीबाहेरच्या पुस्तकांबद्दल इथे आणि इथे वाचा. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/16/2009 - 20:50 नवीन
अवांतराकरता कृपया खवचा वापर करा..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा