Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रजासत्ताक दिन

न
नितिन थत्ते
Sun, 01/25/2009 - 18:32
🗣 18 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8851 वाचन

💬 प्रतिसाद (18)
व
विसोबा खेचर Sun, 01/25/2009 - 20:18 नवीन
गेली ६० वर्ष चाललेला लोकशाहीचा तमाशा पाहतोच आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 01/25/2009 - 20:27 नवीन
दरवर्षी हा देखावा होत आहे याचा अर्थ सर्वांना माहीत असायला हवे की नक्की की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय आणि तो २६ जानेवारीस कसा काय आला हे देखील माहीत असायला हवे. रस्त्यावर हा प्रश्न विचारून सर्व्हे करायला हवा, म्हणजे कळेल. (न्युयॉर्क शहरात एकदा तत्कालीन प्रसिद्धी पावलेली परराष्ट्रमंत्री मॅडलीन आलब्राईट आणि मॅडोनाचे फोटो दाखवून नावे विचारली. अर्थात मॅडोना जास्त माहीत होती! :-) ) कधीकाळी वाचल्याचे आठवते की तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी २६ जानेवारीस (चुकून, तरी देखील) स्वतंत्रता दिन म्हणले होते. असो.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/26/2009 - 10:40 नवीन
प्रजासत्ताक म्हणजे डेमॉक्रसी ? गणतंत्र म्हणजे डेमोटेक ? स्वतंत्रता दिन म्हणजे लिबर्टी डे, एवढे कळते, पण बाकी दोन दिनांविषयी जरा कन्फ्युजन अहे. (विकासला भारताविषयई जबरा माहिती आहे, त्यामुळे त्याच्याकडून ही इन्फॉर्मेशन मिळेल ही अपेक्षा:-) अर्थात डे कुठलाही असो, अक्षयकुमार आणि ऐश्वर्याला ला पद्मष्री मिळाल्याच जबरा आनंद आहे. त्यामुळे गणतंत्र असो किंवा प्रजासत्ताक, दिन हा आमच्या फेवरीट याक्टरला अवार्ड देण्याचा हे नक्की. (ओ, स्वारी ! हरभजन च्या चुट्टीवर आणखी एक अवार्ड ! कूल !) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ध
धनंजय Sun, 01/25/2009 - 21:29 नवीन
कैक वेळा माणूस चांगला आहे म्हणून आपण आपल्याला धोरणे मान्य नसलेल्या पक्षाला मत देतो. कधी धोरण चांगले म्हणून वाईट माणूस निवडतो. कधी माणूस चांगला म्हणून वाईट पक्ष निवडतो. ... (येथे कोणी गठ्ठ्याने मतदान करतात म्हणून शोक करण्याचे कारण नाही. ठाण्याच्या मतमोजणीत डोंबिवलीची मते मोजणीस येतात तेव्हा चित्र पालटते. गठ्ठ्याने मते सगळेच देतात.)
विशेष सहमती.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 01/26/2009 - 06:06 नवीन
कोण काय करतं हे महत्वाचे नाही आपण काय करतो हे महत्वाचे आहे.. ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
क
कशिद Mon, 01/26/2009 - 08:03 नवीन
प्रजासतक दिनाच्या हार्दिक सुभेचा ... भारतीय सविधान न मुले आपल्याला जे विविध अधिकार अणि स्वरक्षण मिळाले आही तो हा दिवस ...हा दिवस चिरायु हो अशी गणरयाच्या चरनी प्राथना . वन्दे मातरम.. (सविधान व देश प्रेमी) अक्षय
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 01/26/2009 - 08:12 नवीन
ते छापाचं का असेना पण आज मला माझ्या शर्टाच्या खिश्याला झेंडा लावायला आवडतं. आज सकाळी ध्वजवंदन करायला आवडतं. आता हा प्रतिसाद देतानां बाहेर जे देशभक्तीपर गाणी वाजताहेत ती सुध्दा गेली अनेक वर्षे आठवतात. शाळेत असतांना आपल्या शाळेचं संचलन गावात चांगलं दिसावं म्हणून भांडून घोष आणल्याच्या आणि गावभर चालणार्‍या मिरवणूकीत बाहेर शिकलेल्या घोष रचना वाजवायला आवडायचं. दमून भागून शाळेत परत यायचं आणि खाऊ खायचा. मजा असायची. कुणी कुठलीही घोषणा दिली की हात वर करून 'जय' किंवा 'चिरायू होवो' ची आरोळी ठोकायची. :) पुढे जाऊन प्रजासत्ताक, गणतंत्र या शब्दांचे अर्थ कळायला लागले. मग जाणवलं की हा दिवस किती महत्वाचा. माझी पिढी किती भाग्यवान ते ! (नागरीक) नीलकांत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/26/2009 - 08:24 नवीन
>>मला माझ्या शर्टाच्या खिश्याला झेंडा लावायला आवडतं. आज सकाळी ध्वजवंदन करायला आवडतं. आता हा प्रतिसाद देतानां बाहेर जे देशभक्तीपर गाणी वाजताहेत ती सुध्दा गेली अनेक वर्षे आठवतात / आवडतात. >>पुढे जाऊन प्रजासत्ताक, गणतंत्र या शब्दांचे अर्थ कळायला लागले. मग जाणवलं की हा दिवस किती महत्वाचा. माझी पिढी किती भाग्यवान ते ! अगदी सहमत आहे !!! नीलकांत काय आठवणी दिल्या शाळेच्या...शाळेत झेंडावंदनाच्या आदल्या दिवशी पताका चिटकवणे, शाळेतला वर्षानुवर्ष पीटीला तोच बॅड आणि तेच हात करायला मजा यायची. आता महाविद्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला असतो. कधी-कधी मुले देशभक्तीपर गीते गातात. मजा करतात. आम्हीही त्यात असतो , पण फिझीकली. मन मात्र शाळेतच रमते ! -दिलीप बिरुटे (शाळेतला )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
द
दशानन Mon, 01/26/2009 - 08:25 नवीन
१००% सहमत. च्या मायला इकडं दिल्ली ला काय बी मज्जा नाय राव एक परेड सोडली तर... ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
संजीव नाईक Mon, 01/26/2009 - 08:45 नवीन
" अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्र्च भाषसे | गतासूनगतासूंश्र्च नानुशोचत्नि पण्डिता: || १९ || श्रीमद् भगवद् गीता अध्याय २ " संजीव नाईक
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 01/26/2009 - 08:58 नवीन
>>अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्र्च भाषसे | गतासूनगतासूंश्र्च नानुशोचत्नि पण्डिता: || सहमत आहे ! पण काय अर्थ आहे हो याचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक
न
नितिन थत्ते Mon, 01/26/2009 - 09:29 नवीन
ज्याचा विचार करू नये त्याचा विचार करीत आहेस आणि वर युक्तिवाद करीत आहेस. पंडित लोक आल्या गेल्याचा विचार करीत नाहीत. आणि मी लिहिले आहे त्याचा माझे अवयव कंप पावत आहेत आणि तोंडाला कोरड पडली आहे. असा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नितिन थत्ते Mon, 01/26/2009 - 09:25 नवीन
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यते असा विषादयोग तर आला नाही ना? त्यामुळे या भानगडीत पडायच्या ऐवजी तो विचार करणेच चुकीचे असे सुचवताय की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक
द
दशानन Mon, 01/26/2009 - 09:28 नवीन
मायला ! अरे तुम्हा विद्वानांना साधी सोपी मराठी येत नाही का ? की उगाच कुठ पण आपली पाजळायची तलवार ? कोणी भला मोठा प्रतिसाद इग्रजी मध्ये लिहतो तर कोणी संस्कृत मध्ये... तुम्हालाच कळाले म्हणजे झाले असे नाही राव ! आम्हाला बी कळू द्या जरा.. का लिहता तुम्ही ते ! डोक्यावरुन जाऊ नका... नाय तर पार व्हाल ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक
न
नितिन थत्ते Mon, 01/26/2009 - 09:32 नवीन
अर्थ वर लिहिला आहे. मराठीतच लिहीन. कोणीतरी संस्कृत लिहिले म्हणून संस्कृतात उत्तर दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
क
कलंत्री Mon, 01/26/2009 - 15:32 नवीन
स्वातंत्र्यदिवस आणि गणतंत्रदिन शाळेत साजरा करण्याची पद्धत ज्या कोणाच्या डोक्यातुन आली असेल त्याला १०० दण्डवत घातलेच पाहिजे. लहानपणी त्या कवायती, मिरवणुका, घोषणा इत्यादींचा माहौल विसरणे जवळजवळ अशक्यच आहे. सध्या मात्र शाळा असे संमेलने, दिवस टाळण्याच्या मागे आहे असे कळते. कालाय तस्मो नमः
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 01/26/2009 - 15:58 नवीन
मी माझ्या ऑफिसच्या भिंतीवर भारताचा तिरंगा डकवून साजरा करतोय! विजयी विश्वतिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा!! जयहिंद! चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 01/26/2009 - 20:16 नवीन
झेंडावंदन,घोषपथक आणि कवायत भारी असे... काही अवांतर आठवणी ::झेंडावंदनानंतर आमचेच संस्थाचालक दर वर्षी तीच तीच गोष्ट सांगत असत....दिव्य माईक आणि स्पीकर्समुळे ती अजिबात ऐकू येत नसे... माईकच्या मोठ्या शिट्ट्या वाजत राहत... दूर अंतरावरून तो खादीधारी इसम नुसतेच तोंड हलवताना दिसे आणि जाम कंटाळा येई... आपल्याला गाता येतं असं समजणार्‍या काही शिक्षिका पाच सात पोरं पोरी हाताशी घेऊन गाऊ लागत...मग मैदानावर खाली बसलेली सर्व मुले एकमेकांना खडे वगैरे मारून स्वत:चे मनोरंजन करत असत... काही मुले पळून जायचे मार्ग शोधत असत... काही जण नंतर वाटल्या जाणार्‍या बिस्किटांच्या पुड्यांवर लक्ष ठेवून असत... झेंडावंदन संपल्यानंतर मात्र मला उरलेल्या सर्व सोपस्कारांचा वैताग येत असे... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा