चारोळ्या
💬 प्रतिसाद
(13)
द
दशानन
Mon, 01/26/2009 - 08:20
नवीन
सोनपिवळ्या सकाळी
सारेच मिळवितात हात
घनघोर अन्धारात मात्र
सावलिहि सोडते साथ.
वाह वाह क्या बात है !
सुंदर .. भावार्थ देखील सुंदर व्यक्त होत आहे... आवडली !
२० मिनीटात दोन लेख !
तुम्हाला येथे येउन २० मिनिटे झाली आहेत.. ह्या हिशोबाने एका तासात ३ लेख .... व बारा तासात ३६ लेख !
बापरे !
जरा स्पीड जास्त नाही आहे का :?
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/26/2009 - 08:30
नवीन
अजून येऊ दे !
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 01/26/2009 - 08:44
नवीन
सागराला भरती येते ना
चन्द्राला पाहून
तसच होत मला
तूझ्या विचारात असताना तूला पाहुन
अरे वा! असं का? छान छान! :)
साला, आम्हाला पाहून कुणाला भरती वगैरे काय येत नाय! :)
तात्या.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 01/26/2009 - 08:54
नवीन
साला, आम्हाला पाहून कुणाला भरती वगैरे काय येत नाय!
तुम्हाला पाहून कशी भरती कशी येईल, तात्याऽऽ?
'चंद्रा'ला पाहून येते.
पण इथे तो चंद्र आणि तो सागर. 'दोस्ताना' दिसतोय.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 01/26/2009 - 08:58
नवीन
स्वगत : साला, हा प्रभाकर हलकट आहे! :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/26/2009 - 09:00
नवीन
सहमतीचा प्रतिसाद चुकून इथे पडला आहे. क्षमा असावी ;)
- Log in or register to post comments
द
दशानन
Mon, 01/26/2009 - 09:02
नवीन
सरांसारखंच चुकुन टकलो !
;) आम्हाला बॉ डोळा मारता येतो !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 01/26/2009 - 09:38
नवीन
आलोच होतो तर प्रतिसाद द्यावा म्हणुन दिला
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Mon, 01/26/2009 - 09:04
नवीन
सोनपिवळ्या सकाळी
सारेच मिळवितात हात
घनघोर अन्धारात मात्र
सावलिहि सोडते साथ.
'सकाळी' च्या ठिकाणी 'प्रातःकाळी',
'मिळवितात हात' ऐवजी 'हात मिळवितात'
घनघोर अंधारात 'मात्र' ऐवजी 'किंतु' 'परंतु' जास्त बरे वाटते (मला तरी)
सागराला भरती येते ना
चन्द्राला पाहून
तसच होत मला
तूझ्या विचारात असताना तूला पाहुन
येते भरती सागराला,
पाहून लोभस चंद्राला,
मीही तशीच उचंबळते
विचारांत तुझ्या असताना.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/26/2009 - 09:17
नवीन
>>'सकाळी' च्या ठिकाणी 'प्रातःकाळी',
पेठकर साहेब,
'प्रातःकाळी' हा शब्द जुन्या कवितेत मस्त शोभेल असे वाटते. पण सकाळी हा शब्द चारोळ्याला मला तरी बरा वाटला.
>>'मिळवितात हात' ऐवजी 'हात मिळवितात'
इथे कवयत्रि पुढील ओळींसाठी 'सावलिहि सोडते साथ' याची ती व्यवस्था करत असावी असे वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मानसी मनोजजोशी
Mon, 01/26/2009 - 09:58
नवीन
धन्यवाद
कविता समजून घेउन पेठेकर साहेबाना उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
द
दशानन
Mon, 01/26/2009 - 10:00
नवीन
प्रा. सरांची हातोटी आहे ही !
तुम्ही धन्यवाद करावे असे काहि मोठे काम नाही केले त्यांनी .. हा तर त्याच्या हातचा मळ !
बाकी पुढची कविता कधी टाकताय :)
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 01/26/2009 - 10:02
नवीन
सहमत
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments