पाककृती
पोहे-बटाटा प्यटिस
Primary tabs
२ वाट्या पातळ पोहे
२ मोठे बटाटे उकडून किसलेले
४/५ मोठे चमचे आल-लसून ,मिरची-कोथींबीर पेस्ट
पाव छोटा चमचा हळद
मीठ चविनुसार
तळण्यासाठी तेल.
१ . पोहे धुवून घ्यावेत व १/२ ते १ तास तसेच ठेवावेत.
२. चांगले मऊ झाल्यावर त्यात तेल सोडून इतर सर्व साहित्य मिसळावे.
३. मिश्रण एकजीव झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गो़ळे करुन मध्यम आचेवर तेलात तळुन घ्या.
४. टोमॅटो केच अप अथवा ओल्या नारळाच्या चटणी बरोबर खायला द्या.
( मिश्रण एकजीव करताना पाणी अजीबात वापरु नये अन्यथा प्यटिस तेलकट होइल)
वा वा !
तुम्ही आमचा सल्ला मनावर घेतलात आनंद झाला !
बाकी,
चांगले मऊ झाल्यावर त्यात तेल सोडून इतर सर्व साहित्य मिसळावे.
पण नंतर तेलाचे काय करायचे ते तुम्ही सांगितलेच नाही की ओ !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
हेच म्हणतो
करुन बघतो... हे तुम्ही आधी दिलेल्या टामटाच्या सुप बरोबर खाल्ले तर काही त्रास नाही ना?
अवांतर - पोहे-बटाटा प्यँटिस असे चुकुन वाचले होते.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
अहो साहेब निट वाचा ना जरा तेलाच काय करायच ते दिल आहे
अहो तळ्ण्यासाठि काय पाणी वापरणार?
पाकृचा फोटू का नाही दिला?
छान आहे पाकृ. करुन पाहिली.फोटो डकवत आहे.
धन्यवाद
फोटो छान आहे.
वृषालीमेडम, फोटू सारू छे! :)
तात्या.
सोपी आणि झटपट होणारी कृती आहे.
आणखी रेसिपींची वाट पाहात आहे...:)
छान आहे पाकृ. करुन पाहीन.
अप्रतिम लागतं हे !! लग्नाआधी मला केवळ हेच यायचे! :))
http://bhagyashreee.blogspot.com/
आभार.
अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या सूचना फार महत्त्वाच्या असतात :-)
नाहीतरी मी तळण फार कमी करतो. त्यामुळे पदार्थ अती तेलकट होणे, भजी तेलात फुटणे (?हसणे?) असले काही झाले की ते कसे निस्तरायचे? याबद्दल स्वानुभव कामाला येत नाही. तुमची टीप उपयोगी पडेल :-)
छान दिसतायत!
मीही करून पाहीन.
धन्यवाद!
रेवती
मस्तच ! तुमच्या कडे अजुन ही काही झट्पट Recipes आहेत का ? आनंद होईल वाचुन अन करुनही
~ वाहीदा
अरे वा हे पॅटीस नक्की करून पाहिन. :)
धन्यवाद मानसी अशाच झटपट पाककृती आम्हाला देत जा. :)
जाड पोहे वापरले तर चालतील का? माझ्या कडे चुकुन बरेच आलेत ह्या वेलेस.......
चुचु
चालतील तुम्ही चालवले तर जाड पोहे चालतील
पॅटीस आवडले :-)
तुमच्या पाक्रुंचा ऍडीक्ट झालोय . ;-)
अवांतर : आल्याचे प्रमाण इंचात न दिल्याचे पाहून हिरमोड झाला ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.