कॉकटेल - सोमरस संबधी... !
💬 प्रतिसाद
(66)
अ
अवलिया
Mon, 01/26/2009 - 10:41
नवीन
हां यार...
मला पण बरेच दिवसांपासुन हाच प्रश्न होता,..
पण आपण काय ओल्ड मंकच घेतो.. त्यामुळे मिक्सिंग फिक्सिंगचा काही संबंधच नाहि...
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 01/26/2009 - 10:43
नवीन
सोमरस हा प्रकार वेगळा असावा... सोम नावाच्या वनस्पतीला कुटुन वगैरे...
किक नसेल बसत म्हणुन मग मागे पडला...
हल्ली त्याचे पिक पण घेत नाही.
उसच नबर वन... ढिंकचाक
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
द
दशानन
Mon, 01/26/2009 - 10:46
नवीन
सोमरसाचा उल्लेख... दारु संदर्भातच आहे.... कॉलेज कट्टाला आम्ही सोमरस असाच उल्लेख करत असून बॅगपायपरचा त्या काळी.... !
आता लेखाच्या नावातच दारु हा शब्द शोभत नाही त्यामुळे सोमरस !
बाकी,
ओल्ड मंक जबरा !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
स
साती
Mon, 01/26/2009 - 10:54
नवीन
राजसाहेब, तुम्हाला हवी असलेली माहिती या पानावर मिळते का पहा.
साती
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 08/19/2009 - 14:32
नवीन
मग आता १५० लेखा॑बद्दल काय पाजणार आम्हाला ??
सू हा स...
- Log in or register to post comments
ल
लवंगी
Wed, 08/19/2009 - 15:16
नवीन
;)
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 08/19/2009 - 15:27
नवीन
लव॑ग टाकलेल ?
सू हा स...
- Log in or register to post comments
ल
लवंगी
Wed, 08/19/2009 - 16:52
नवीन
लवंगी मिरची टाकलेल
- Log in or register to post comments
न
नीलकांत
Mon, 01/26/2009 - 10:57
नवीन
काय राजेहो,
ह्या विषयावर आधी चर्चा झालीये की ! हे घ्या दूवे -
http://www.misalpav.com/node/3572
http://www.misalpav.com/node/757 ;)
http://www.misalpav.com/node/823
नीलकांत
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Mon, 01/26/2009 - 12:19
नवीन
जमेल ते कॉक्टेल प्या. पण पिल्यावर नाचु नका.'वकार युनुस' होतो.
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 04:47
नवीन
"'वकार युनुस' होतो."
नाय अजून तशी येळ नाय आली !
पण वकार युनुस साठी काही तरी सोय करावी म्हणतो कोप-यात.... मस्त पैकी.... एक वाळु भरलेली टब ठेवतो ;)
* एक दोन सोडले तर कॉकटेल साठी सगळे गडी नवीन आहेत... माहीत नाही कोण कशी रिअएक्शन करेल :D
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Tue, 01/27/2009 - 05:42
नवीन
राजसाहेब, तुम्हाला जर फुल्ल टांगापल्टी व्हायचे असेल व न नाचताच लुढकायचे असेल तर एक कॉकटेल सांगतो ...
ह्याचे काही "ऑथेंटिक" असे स्पेशन नाव नाही, हे एक गावठी ( किंवा गाढवी म्हणुन शकता ) कॉकटेल आहे ...
एक काचेचा मध्यम आकाराचा ग्लास घ्या, चांगल्या प्रतीची सुमारे ९० मिली व्हिस्की घ्या, त्यात तेवढीच अथवा थोडीशी जास्त "स्ट्राँग बिअर " टाका, बर्फाचे २-३ खडे टाका, मस्त पैकी हलवुन "हळुहळु" पित बसा ...
चकणा शक्यतो काहीही नको ...!
सिगारेट ओढणारे असाल तर ग्लास संपला की मगच तिकडे वळा ..!
लै लै लै हाईट म्हणजे माणुस "१ पुर्ण ग्लास" पिऊ शकतो , २ ग्लास पिणे हे खोली/बार गरागरा फिरवायला व त्या महाभागाच्या डोक्यावर शॉट काढायला लै जास्त होते. बडे बडे महारथी "२ ग्लास" पिले के आउट होतात ..!
वि.सु : शिकाऊ , बेताचे पिणारे ह्यांनी ह्याच्या नादी न लागलेले उत्तम ...!
------
छोटा डॉन
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 05:50
नवीन
=))
जबरा !
हा कॉकलेट तर आम्ही लै दा पिला... एकदम टांगा पलटी !
बीयर शक्यतो हार्ड वापरावी.. लै जाम मजा येते.... पण मी फॉस्टर व सिग्नेचर मिक्स करुन ... दोन्-तीन ग्लास आरामात पचवतो... दोन्ही पण तसे माईल्ड !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
स
सुक्या
Tue, 01/27/2009 - 06:20
नवीन
वि.सु : शिकाऊ , बेताचे पिणारे ह्यांनी ह्याच्या नादी न लागलेले उत्तम
खरं म्हणजे हे कॉकटेल मदीरापानात पी. एच. डी. केलेल्या लोकांसाठीच आहे. इतर डीग्री होल्डर लोकांनी हे हातातही घेउ नये. एकदा मी असचं २ ग्लास गाढवी कॉकटेल मारलं होतं अन नंतर एवढा गाढवपना केला होता कि विचारु नका.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
- Log in or register to post comments
न
नीधप
Tue, 01/27/2009 - 05:32
नवीन
वकार युनूस कशानेही होऊ शकतो. कॉकटेलच हवं असं काही नाही.
(कॉकटेलं पिउन मग नाचल्यानेही कधी वकार युनूस न झालेली) नीरजा
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- Log in or register to post comments
स
सुचेल तसं
Mon, 01/26/2009 - 12:24
नवीन
कॉकटेलला मराठीत बहुदा मारामारी म्हणतात.
उदा: चहा आणि कॉफी एकत्र असलेली मारामारी
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Mon, 01/26/2009 - 12:35
नवीन
कारण मराठीत १ रुपायाच्या नाण्याला 'डॉलर' असेही म्हणतात ;)
- टिंग्या
अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
- Log in or register to post comments
स
सुहास..सदेव हसनार्.. (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 01/26/2009 - 12:57
नवीन
१)बियर आणी लि॑बाचे कोणतेही पेय्..ह्याला काहीतरी chandlelight (मराठी नाव नसावे बहुतेक)...चव छान लागते..
२)कुठ्लाही व्होड्का(एक पेग) आणी त्यात "blue curacao"30 मि.ली. ह्याला बहुतेक "ब्लू सी "म्हणतात्...दिसायला आणी चवीला थ॑ड (कूल्)..पण महाग.."blue curacao"हे जरा(नव्हे जास्त)..असेच बरेच आहेत..
३)आणी सगळ्यात मस्त म्हणजे "while rum"(बकार्डी असेल तर उत्तम) त्यात एक लि॑बू पिळायचा आणी thumps -up...थोडस...स्वस्त आणी मस्त
सुहास
जन्मजात तळीराम
- Log in or register to post comments
प
पक्या
Mon, 01/26/2009 - 20:15
नवीन
मार्गारीटा
६ औंस लेमोनेड , ६ औंस करोना बिअर वा कुठलीही लाईट बिअर , ६ औंस स्प्राईट , ४ औंस ट़कीला .
मार्गारीटा मिक्स बाजारात मिळते. ते वापरून करायचे झाल्यास. ३ भाग मार्गारीटा मिक्स , २ भाग टकिला, १ छोट्या लिंबूचा रस .
कॉकटेल शेकर मध्ये घालून चांगले मिक्स करावे. सर्व्ह करताना आईस चे मोठे तुकडे घालावेत. (म्हणजे आईस लगेच न वितळून मार्गारीटा डायल्यूट होणार नाही.) ग्लासच्या कडांना थोडे मीठ लावावे.
(१ औंस = ३० मि.लि.)
समर कूलर :
२ औंस जिन (gin) , ६ औंस सायट्र्स सोडा (साधा सोडा घेतल्यास त्यात थोडा ऑरेंज जूस घालावा) , १ लिंबू
एका उंच ग्लासमध्ये आइस क्युब्स घालावेत. त्यावर लिंबू पिळावे, मग २ औंस जिन ओतावी. उरलेला ग्लास सायट्र्स सोडा ने भरावा.
आयरिश कॉफि:
४० मिलि. आयरिश व्हिस्की, पाणी घालून उकळून घेतलेली कॉफी - २४० मिलि, १ - दीड चमचा, १ मोठा चमचा व्हिप्ड क्रिम.
एका ग्लास मध्ये साखर घालावी. त्यात व्हिस्की घालावी मग कॉफी घालावी. हलवावे. साखर विरघळली की वरुन व्हिप्ड क्रिम घालावे.
- Log in or register to post comments
न
नीधप
Mon, 01/26/2009 - 21:18
नवीन
>>६ औंस लेमोनेड , ६ औंस करोना बिअर वा कुठलीही लाईट बिअर , ६ औंस स्प्राईट , ४ औंस ट़कीला .<<
हे कॉम्बो फारसं काही भलं नाही. बिअर वापरणे हा तर मार्गरिटाचा खासा अपमान आहे. लिंबाच्या ताज्या रसाऐवजी लेमोनेड हा पण मोठ्ठा अपमान. आणि त्यात फिझ वालं पेय.. ? पार वाट लावली रे मार्गारिटाची.....
१ भाग लिंबाचा रस, २ भाग टकिला, १ भाग कुठलीही ऑरेन्ज लिक्योर (ट्रिपल सेक, कुराकाउ किंवा कॉन्ट्रो)
हे सगळ्यात महत्वाचं कॉम्बो.
यापलिकडे या पेयात किसलेला बर्फ आणि फ्लेवरसाठीचे सिरप किंवा फळांचा रस. एवढंच घाला.
नाही त्या गोष्टी घालून मार्गारिटाची वाट लावू नका.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 04:45
नवीन
तुमची ही कॉफी आम्ही पिली आहे... मोझो मध्ये मिळतात अनेक कॉकटेल त्यातलं हे कॉफीच प्रकरण आम्हाला खुप आवडलं होतं !
जाम मजा येते !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
व
वेलदोडा
Tue, 01/27/2009 - 20:14
नवीन
>>आयरिश कॉफि:
४० मिलि. आयरिश व्हिस्की, पाणी घालून उकळून घेतलेली कॉफी - २४० मिलि, १ - दीड चमचा, १ मोठा चमचा व्हिप्ड क्रिम.
आयरिश कॉफि च्या जिन्नसांमध्ये
१ - दीड चमचा साखर लिहायचे विसरलात बहुतेक.
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री
Mon, 01/26/2009 - 19:06
नवीन
मला एकच माहीतीय, ती देते! :)
व्हाईट रम मधे पायनापल ज्युस्,नारळाचे दुध आणि व्हीपिंग क्रीम टाकून पिना कोलाडा करता येते..
हे मी रम न टाकता सुद्धा करते.. व खूप सह्ही लागते!
http://bhagyashreee.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
पक्या
Mon, 01/26/2009 - 19:29
नवीन
>>हे मी रम न टाकता सुद्धा करते..
ह्याला व्हर्जिन पिनाकोलाडा म्हणतात.
अजून असेच एक व्हर्जिन ड्रिंक : ७ - ८ पिकलेल्या स्ट्रॉबेरिज , १५० मिलि पायनॅपल ज्यूस , ४० मिलि नारळाचे घट्ट दूध /क्रिम (नारळाचे पाणी न वापरता काढलेले घट्ट दूध म्हणजे क्रिम होय.) , क्रश्ड आईस...१ कप.
सर्व जिन्नस ब्लेंडर मध्ये चांगले घुसळून घ्यावेत . ग्लास मध्ये ओतून ग्लास वर पायनॅपल ची फोड खोचावी.
बाजारातील तयार पायनॅपल जूस मध्ये साखर असतेच. घरी तयार केल्यास आवडीप्रमाणे साखर घालावी. (पायनॅपल किति आंबट / गोड आहे त्याप्रमाणे ठरवून.)
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री
Mon, 01/26/2009 - 19:45
नवीन
अरे वा.. हाही प्रकार छान दिसतोय.. करून पाहीन..
http://bhagyashreee.blogspot.com/
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 04:42
नवीन
वाह !
हे सोपं आहे करायला व रिस्क कमी... कुणाचा जीव तरी नक्कीच जाणार नाही ... आज करुन स्वतः ट्राय करतो मग शनिवारी पाजतो !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Mon, 01/26/2009 - 19:19
नवीन
आता "प्रेषक: जैनाचं कार्ट" देखील कॉकटेल्स मारायला लागलं!
नाना म्हणतो ते काही खोटं नाही, जगबुडी येणार लवकरच!!!! :S
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 04:43
नवीन
=))
काय पिडा काका ;)
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
न
नीधप
Mon, 01/26/2009 - 21:20
नवीन
मार्गारिटा बरोबरच व्होडका किंवा व्हाइट रम ची काही कॉकटेल्स मी नेहमी करते. पण आत्ता टायपायला वेळ नाहीये. पर्वा सांगते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- Log in or register to post comments
क
कोलबेर
Mon, 01/26/2009 - 21:27
नवीन
मोहिटो:
व्हाईट रम मध्ये पुदिन्याची पाने घालुन लिंबू पिळून त्यात साखर आणि क्लब सोडा किसलेल्या बर्फा सोबत घालून ब्लेंडरमधुन फिरवा.
मार्टीनी :
चांगल्या प्रतीची वोडका (ग्रे गुज) कींवा जीन (बॉम्बे सफायर) ३ भाग आणि १ भाग व्हर्मुथ घालुन बर्फाने भरलेल्या कॉकटेल शेकर मध्ये हलवा. थंडगार मार्टीनी ग्लासात भरा.
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 04:44
नवीन
हा प्रकार पण उत्तम दिसत आहे... करा यला सोपी कृती !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
म
महेंद्र
Tue, 01/27/2009 - 08:06
नवीन
लई एक्स्पर्ट लोक हायती हितं...
बरं झालं इची भैन, अळान्याले बी काइ तरि शिकायले भेटले..
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 01/27/2009 - 08:18
नवीन
च्यामारी
असल्या काकटेलाने काय होते?
छ्या...
फ्रेंच पालिश, व्हाईटनरचे अल्कोहोल अन मोसंबी ज्युस (सुज्ञांणा समजले असेल) एकत्र करायचा अन एका घोटात...
पंजाबात चकणा म्हणुन याच्या बरोबर रोटीला आयोडेक्स लावुन खातात... पी के टुन...
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश
Tue, 01/27/2009 - 09:03
नवीन
आत्ता कूट माज्या लेवल वर आलीत सगली
हे झ्या, ह्यान नशा चडल्यासारकी वाटते.
१) आयोडेक्स सँडवीच - ब्रेडला आयोडेक्स लावुन खाणे (२४ तास नशा)
२) सर्पदंश - म्हैनाभर नशा केली क सर्प मरतात विषबाधा होऊन
३) खोपडी - नवसागर + मिथेनाल + पानी समप्रमाणात (ही नशा यकदाच करता येते. दुसर्यांदा प्यायला तुमी जीवंत नसता)
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
- Log in or register to post comments
स
साखरांबा
Tue, 01/27/2009 - 09:15
नवीन
फेणी+फणसाची अशी आचमनं चालतात. दोन्ही पहिल्या धारची असल्यास मस्त चढतात.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 01/27/2009 - 11:05
नवीन
१.ग्लासात क्रश्ड आईस शिगोशीग भरुन घ्यावा.
२.एक लार्ज व्होडका+कुस्करलेले पुदिना/कोथिंबीर ब्लेंडरमध्ये मिसळून घ्यावे.
३.क्रश्ड आईस भरलेल्या ग्लासात हे मिश्रण ओतावे.
४.आवडत असल्यास वरुन लिंबू पिळावे.
५.ग्लासाच्या कडेवर एक लिंबाची चकती खोचावी.
थोड्याशा स्पायसी स्नॅकसोबत घ्यावी (स्वानुभवः थाई डिशेस ह्यासोबत उत्तम लागतात) किंवा स्नॅक्सशिवायही उत्तम लागते.
- Log in or register to post comments
द
दशानन
Tue, 01/27/2009 - 11:07
नवीन
हे पण लई सोपं हाय करायला... !
व्होडला... स्टॉक मध्ये पण पडला आहे... !
धनु धनु !
मस्त आयडीया..
दोनचार आयडीया गोळा झाले आहेत... बघू कसा धिंगाणा घालता येतो ते !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
- Log in or register to post comments
न
नीधप
Fri, 01/30/2009 - 08:37
नवीन
१. १ पेग व्होडका घेउन त्यात हिरवी मिरची टाकून ठेवावी ५-१० मिनिटे.
मग त्यात सोडा नी पाणी घालावे थोडे थोडेच आणि वरून लिंबू पिळावे. पुदिन्याची पाने गार्निश म्हणून किंवा चुरडून १-२ थेंब रस. झणका जबरदस्त लागतो.
मिरची जास्त वेळ व्होडका मधे मुरवलीत तर जास्त झणका.
मात्र यातला वैधानिक इशारा लक्षात घ्या.. २ पेग वर जाउ नये. नाहीतर सकाळी दुसर्या बाजूने झणका यंजॉय करता येतो.
२. व्होडका + नारळाचे पाणी+ वरती पुदिन्याची पाने.. सुप्परहिट लागते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- Log in or register to post comments
द
दशानन
Fri, 01/30/2009 - 08:42
नवीन
>>मात्र यातला वैधानिक इशारा लक्षात घ्या.. २ पेग वर जाउ नये. नाहीतर सकाळी दुसर्या बाजूने झणका यंजॉय करता येतो.
=))
जबरा इनोद !
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
- Log in or register to post comments
न
नीधप
Fri, 01/30/2009 - 08:45
नवीन
इनोद कसला डोंबलाचा...
खरी माहिती सांगितली.. झणका लागल्यावर सांगाल नीरजाने आधी का नाही सांगितलं म्हणून... :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- Log in or register to post comments
आ
आचरट कार्टा
गुरुवार, 02/05/2009 - 18:31
नवीन
=)) =)) =))
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
- Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ
Fri, 01/30/2009 - 11:01
नवीन
हिंग जिर्याची फोडणी द्यावी व ताक घालून कळण म्हणून प्यावे!
- Log in or register to post comments
र
रामदास
Wed, 01/28/2009 - 04:11
नवीन
दोनचार आयडी गोळा झाले आहेत... बघू कसा धिंगाणा घालता येतो ते !
असे तर म्हणायचे नाही ना ?
- Log in or register to post comments
द
दशानन
Wed, 01/28/2009 - 05:23
नवीन
=))
नाय ओ दिल्ली प्रदेश मी एकटाच आपल्या ताकती वर संभाळत आहे.. अजुन कोणी मिपावर दिल्लीत सापडला नाही आहे..... ;)
* त्यामुळेच तर दुसरा आयडी घेता येत नाही... आमचा आयपि कोणी एडपट पण सांगू शकतो :)
*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Wed, 01/28/2009 - 05:25
नवीन
हल्लीच 'प्रभूकृपेने' त्याच्या मनातल्या शंकांचं समाधान झालं आहे असं तो म्हणालाय ना दिल्ली- ते - दिल्ली मधे! ;)
चतुरंग
- Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक
Wed, 01/28/2009 - 11:07
नवीन
मदीरापानात पी. एच. डी.
P - पीणे
H- हेच
D- ध्येय.
पिल्लकड.
Mandrake - the magician.
- Log in or register to post comments
न
नीधप
Fri, 01/30/2009 - 08:40
नवीन
बियर + सफरचंदाचा रस,
बियर + पीच श्नॅपल्स
चंपाग्ने किंवा व्हाइट वाइन + संत्र्याचा रस. वरती पुदिना पानांचे गार्निश अत्यंत गरजेचे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 02/02/2009 - 06:10
नवीन
काय सांगता काय?
हे... हे... असं चांगलं लागतं? आयला, आयडियाची कल्पना एकदम बेष्ट आहे की :)
येत्या विकांताला हे प्रकरण करुन पहायला हवं.
धन्यवाद नीरजा.
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Fri, 01/30/2009 - 08:55
नवीन
आरारारा ~~~~~
एवढा गोंधळ घालण्यापेक्षा रीतसर खंबा लेके बैठ जानेका ..
सोडा + व्हीस्की = सर्वात जबरी कॉम्बीनेशन !!
उगाच पुदीना ,नारळ ,सफरचंद ......इ.इ.
(बेवडाशिरोमणी)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
- Log in or register to post comments
द
दशानन
Fri, 01/30/2009 - 08:58
नवीन
+१
सर्वात उत्तम प्रतिसाद ... पण मित्रांना वचन दिले आहे म्हणुन हा सगळा ताप सगळ्यांना ;)
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »