Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राष्ट्रीय सण व ध्वज अपमान !

द
दशानन
Tue, 01/27/2009 - 10:03
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5313 वाचन

💬 प्रतिसाद (16)
आ
आनंदयात्री Tue, 01/27/2009 - 10:35 नवीन
लहानपणापासुनची शिकवण झेंड्याला देवत्व देणारी असल्याने ध्वजाचा अपमान सहन होत नाही. पण अमेरिकादी देशातला झेंड्याकडे बघण्याचा व्ह्यु पाहिल्यावर अर्जुन होतो. - आनंदयात्री प्रार्थना प्रमुख शिवाजी सायम्
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 01/27/2009 - 10:50 नवीन
बरोबर आहे पण राज्य घटनेने सुध्दा व वेळो वेळी कोर्टाने सुध्दा तिरंगा व त्याचे अधिकार ह्यावर भाष्य केलेच आहे ना. व ज्या देशाचा राष्ट्र ध्वज आहे तो त्या देशाच्या स्वातत्र्यासाठी लाखो क्रांतीवीरांनी आपले प्राण दिलेले आहेत .. अश्या राष्ट्र ध्वजाबाबत देवत्वाची भावना व्हावी ह्यात नवल काय ? ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
संदीप चित्रे Tue, 01/27/2009 - 22:11 नवीन
आपल्याला झेंड्याचा अपमान अजिबात सहन होत नाही आणि अमेरिकेत झेंड्याच्या डिझाईनची बिकिनीही मिळते !!! एक गोष्ट मात्र अमेरिकेत नक्की दिसते की त्यांची राष्ट्रभावना अतिशय प्रखर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
द
दशानन Wed, 01/28/2009 - 05:39 नवीन
>>>आपल्याला झेंड्याचा अपमान अजिबात सहन होत नाही मला ही होतं नाही त्यामुळेच हा काथ्याकुट चालू केला आहे. काय करता येईल ह्यांचे उत्तर हवे आहे.. दुस-या देशाशी तुलना नको आहे ! मी भारतात आहे व मला भारतीय ध्वजाबद्द्लच काळजी आहे म्हणुन विचारले आहे.. अमेरिकावाले झेंडाची बिकनी करोत अथवा टॉयलेट पेपर मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहि. ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
आ
आचरट कार्टा Tue, 01/27/2009 - 10:49 नवीन
आम्हीही हा प्रयत्न करतो आहोत. गेल्या वर्षी आमचा कॉलेजमधे तयार झालेला ग्रुप (संकल्प ग्रुप) शाळा-शाळांमधे मुलांशी याविषयी बोलला होता. आम्हीच असं नव्हे, अनेक जण हे करताहेत. त्याचा परिणाम म्हणून यंदा निदान आमच्याकडे रत्नागिरीत प्लास्टिकचे झेंडे अत्यंत तुरळक चुकून कुठेतरी दिसले. :) यंदा एक मात्र कहर पाहिला. एका आंतर महाविद्यालयीन महोत्सवात राष्ट्रभक्तिपर गीतावर समुहनृत्य करणार्‍या गटातल्या दोन स्पर्धकांनी जीन्स च्या खिशात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती अडकवल्या होत्या. या भोसडीच्यांना उलटं टांगून XXXXXXXXXXXXXXXXXXX............. X( X( बरं, आयोजक XXXXXXXXXXX राजकीय फुडारी... त्याच्याशी बोललो याबद्दल, तो म्हणाला की पोरं प्रेमाखातर करतायत... अपमानाच्या हेतूमुळे नव्हे. लोकांना चालतंय ना?!! या XXXXXXXXXXXXXXXXXXXX ना काय म्हणाल? ~X( माझ्या ग्रुपचं तर असं मत आहे, की भारतीय ध्वजसंहिता शालेय अभ्यासक्रमामधे समाविष्ट केली जायला हवी. चक्क वेगळा विषय म्हणून. बाकी पासिंगच्या अटींची काय XX घालायची ती घाला, पण या विषयामधे पासिंग किमान ८०-८५% हवं. तर काहीतरी होप्स आहेत. किंवा आणखी एक मार्ग आहे. असले प्रकार करणार्‍यांना आपणच फटकवायचं. तात्विक चर्चेतून वगैरे नव्हे. फिजिकली. जेव्हा जेव्हा शक्य असतं, तेव्हा आम्ही करतो असं. यावर कुणाचा आजवर आक्षेप आलेला नाही. B) _________________________________________ अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 01/27/2009 - 10:55 नवीन
>>कॉलेजमधे तयार झालेला ग्रुप (संकल्प ग्रुप) शाळा-शाळांमधे मुलांशी याविषयी बोलला होता छान ! असेच प्रयत्न चालू ठेवा ! >>राजकीय फुडारी... त्याच्याशी बोललो याबद्दल, तो म्हणाला की पोरं प्रेमाखातर करतायत... त्यांना म्हणवं कोर्टात केस होऊ शकते.... बघ कसे सुतासारखे सरळ होतात.. भिती नाही ना ... अथवा ह्या बद्दल पण कायदा आहे हेच माहीत नाही.... ! >>>> तात्विक चर्चेतून वगैरे नव्हे. फिजिकली. कार्टा तुझे माझे फक्त नावच जुळत नाही तर विचार पण जुळतात असे दिसू लागले आहे मला :) ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आचरट कार्टा
म
मृगनयनी Tue, 01/27/2009 - 11:00 नवीन
राष्ट्रध्वजाचा अपमान, म्हणजे देशाचा अपमान! 'राष्ट्रगीताचा, राष्ट्रध्वजाचा कुठेही, कसाही, कोणाहीकडुन अपमान झाल्यास , त्या व्यक्तीला/ संस्थेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी', असा नवीन कलम राज्यघटनेत ऍड करावा. १. कोणाकडुन चुकुन अपमान घडल्यास प्रत्येकी १००० रू. प्राथमिक दंड आकारला जावा. २. कोणी जाणुन बुजुन अपमान केल्यास प्रत्येकी ३ दिवस अजामीनपात्र- पोलिस कोठडी ची शिक्षा व्हावी. व प्रत्येकी ५००० रू. दंड आकारला जावा. ३. व्यक्तीचे वय जर "७> "असल्यास पालकांकडुन / संबंधितांकडुन ५०० रु. दंड आकारला जावा. इ. इ. इ..... किन्वा तत्सम कलमे ऍड करुन नवीन मसुदा बनवावा आणि त्याची कठोर अम्मलबजावणी व्हावी. जय हिन्द ! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आचरट कार्टा
न
नितिन थत्ते Tue, 01/27/2009 - 11:10 नवीन
ही जी परिस्थिती उद्भवते ती या दोन दिवशी राष्ट्रध्वज लावून आपल्या देशभक्तीचा देखावा करण्याच्या प्रवृत्तीमुळे उद्भवतो. शेवटी देशाशी तसे काही देणे घेणे नसते. देवाच्या जुन्या फोटोचे काय करतात? तेच राष्ट्रध्वजाचे ही करता येईल. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 01/27/2009 - 11:20 नवीन
>>>देवाच्या जुन्या फोटोचे काय करतात? तेच राष्ट्रध्वजाचे ही करता येईल. नाही, त्यासाठी घटने मध्ये काही नियम तयार केले आहे त्यातील सर्वमान्य व सहज करता जोगा खालील नियम. १. कसा नष्ट करा निरुपयोगी ध्वज व्यवस्थीत पध्दतीने पुरणे जमीनीमध्ये / जाळणे (तेल अथवा ऑईल टाकुन जाळू नये.)! When no longer in a fit condition to be used, a flag should be disposed of in a dignified manner, preferably by burning or ground burial ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चापलूस Tue, 01/27/2009 - 11:41 नवीन
ही जी परिस्थिती उद्भवते ती या दोन दिवशी राष्ट्रध्वज लावून आपल्या देशभक्तीचा देखावा करण्याच्या प्रवृत्तीमुळे उद्भवतो. शेवटी देशाशी तसे काही देणे घेणे नसते. देवाच्या जुन्या फोटोचे काय करतात? तेच राष्ट्रध्वजाचे ही करता येईल.
सहमत आहे. झेंडा हे देशभक्तीचे केवळ एक साधन आहे. दरवर्षी इमानइतबारे "ध्वजाचा अपमान, ध्वजाचा अपमान" म्हणून आरडाओरडा करणार्‍यांच्या देशभक्तीविषयी शंका नाही. पण ती बरेचदा ती अस्थानी असते. तर काहीवेळा स्टंटबाजी. माझ्यामते भ्रष्टाचाराला नकार देणे व शक्य झाल्यास त्याचा विरोध करणे ही अधिक जाज्वल्य अशी देशभक्ती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ब
ब्रिटिश Tue, 01/27/2009 - 11:35 नवीन
गाव भिवंडी, जिल्हा ठाणे, या गावात यक थेटर हाय. प्रेक्षकवर्ग मजुर, हमाल. जीत मीलल तीत थूकनार. मालकान रिनोवेशन केल्त. मान्स थुकाची थांबनात. त्यान धा मान्स ठेवली साद्या ड्रेसमदे. कोन थुकला क कानाखाली आवाज काडाची. यक म्हैनाभर केल. आता मान्स न्हाईत.तरी थेटर यकदम सोच्छ. शिस्त आशी लागते. बाकी सगलं ठीक हाय ! मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Tue, 01/27/2009 - 11:47 नवीन
आपल्या कडे तरिही जरा बरं आहे. नाहितर अमेरिकेत किंवा इतर युर्ओपिअन राष्ट्रात ध्वजाचे ब्रेसिअर आणि अंडर्विअर घालणे, किंवा पुरुषांनी बर्मुड्आ आणि ध्वजाचे शर्ट्स घालणं नेहेमीचंच झालंय.. नशिब.. आपल्याकडे अजुन तरी ति वेळ आलेली नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Tue, 01/27/2009 - 13:00 नवीन
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत वगैरे गोष्टी फक्त प्रतीके आहेत. त्यांचा अपमान होतो म्हणून चिडचिड होते. पण राष्ट्रभावना महत्वाची आहे. ती तर कुठेच दिसत नाही. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 01/27/2009 - 14:00 नवीन
सहमत खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
ध
धनंजय Tue, 01/27/2009 - 18:42 नवीन
चिह्नाला काही महत्त्व असते, हे मान्य आहे. पण चिह्नाशी झालेल्या व्यवहाराचा, चिह्नित संकल्पनेशी झालेल्या व्यवहाराशी खूप-खूप गोंधळ करू नये, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
स
संदीप चित्रे Tue, 01/27/2009 - 22:16 नवीन
अमेरिकन्सच्या राष्ट्रभावनेबद्दल मी वर कॉमेंट टाकली आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा