आपल्याला पटते का?
💬 प्रतिसाद
(71)
अ
अवलिया
Tue, 01/27/2009 - 14:37
नवीन
मंगळसुत्र घालणे, पायात जोडवे घालणे, कुंकु लावणे वगैरे वगैरे रुढी, परंपरा, संस्कृती इत्यादींचे मानदंड म्हणुन समजल्या जाणा-या गोष्टी सात आठशे वर्षांपुर्वी (फक्त) प्रचारात आल्या. त्यांची कारणे काही विशिष्ट आक्रमणे होती.
बाकी, त्याच्या पुर्वीचे बायकांचेच फक्त पोशाख कसे असत येवढेच जरी समजले तर लो वेस्ट जीन्सला नाके मुरडणा-या नातवंडे पतवंडे असलेल्या ब्रम्हचारी संस्कृतीरक्षकांची गळणारी लाळ संपुर्ण भारतात महापुर आणेल.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 01/27/2009 - 14:25
नवीन
यक्दम म्हापूर येल र बाबा.
इस्पेसल लाळेरी लागतील.
काय बी असो.नौ वारी लय भारी
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 01/27/2009 - 14:57
नवीन
विना वारी त्या हुन भारी
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 01/27/2009 - 15:12
नवीन
बिछ्डे सभी बारी बारी
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Wed, 01/28/2009 - 08:07
नवीन
आमच्या मते मंगळसूत्र घालावं किंवा घालू नये हा त्या त्या बाईचा वैयक्तिक मामला आहे.
बाय द वे, तुम्ही घालता ना मगळसूत्र? मग झालं तर!
(की लग्न व्हायचंय अजून?)
आपला,
(अविवाहीत!) तात्या. ;)
- Log in or register to post comments
म
मधु मलुष्टे ज्…
Wed, 01/28/2009 - 08:11
नवीन
(अविवाहीत!) हे ठळक ;)
--मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.
- Log in or register to post comments
द
दशानन
Wed, 01/28/2009 - 08:12
नवीन
बरोबर, ह्यात चर्चा करण्यासारखं काहीच नाही.
बाकी आम्हाला कोणी सुत्र घातले नाही घातले काहीच फरक पडत नाहि.. आम्ही बी सिंगल !
*******
येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो !
काय तरी सापडले तर टंकतोच.
- Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद
Wed, 01/28/2009 - 08:26
नवीन
आमच्या मते मंगळसूत्र घालावं किंवा घालू नये हा त्या त्या बाईचा वैयक्तिक मामला आहे.
एकदम सहमत....
आजच्या तरुण पिढीने बदल घडवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण जतन केले पाहिजे
नुसतं मंगळसुत्र घातलं,जोडवी घातली,कपाळाला कुंकु लावलं..म्हणजे आपण संस्कॄती जपतो असे म्हणता येणार नाही...
-स्मिता श्रीपाद
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Wed, 01/28/2009 - 09:08
नवीन
जुने विचार बदलले पाहिजेत हे मान्य पण आज काही लग्न झालेल्या बायका मंगळसुञ घालत नाही हेच चिञ T.V मध्ये पुरस्कार वितरणाच्या वेळी दिसते काळाबरोबर बदल केला पाहिजे पण मंगळसुत्र न घालणे हे पटत नाही
याबाबत थोडा अवांतर प्रतिसाद
स्व. विजय साळसकर यांच्या पत्नीला २६ जानेवारीला विजय साळसकर यांना दिलेला मरणोत्तर पुरस्कार स्विकारताना पाहिले असताना त्यांनी मंगळ्सुत्र घातलेले होते.
या बदलाचे ही स्वागत आहे !
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 01/28/2009 - 10:38
नवीन
अरे अजुन हा धागा जिवंत आहेच का? असो. चालु द्या...
--अवलिया
काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला?
मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!
- Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक
Wed, 01/28/2009 - 10:58
नवीन
मंगळ असलेल्या बायका सुद्धा मंगळसुञच घालतात
Mandrake - the magician.
- Log in or register to post comments
ए
एकलव्य
Wed, 01/28/2009 - 12:13
नवीन
(बायकांनी नेहमी मंगळ्सूत्र घातले पाहिजे. पण एकवेळ त्यांत थोडे इकडे तिकडे झाले तरी चालेल पण सकाळ संध्याकाळ नवर्याचे पाय आणि पाठ मात्र चेपलीच पाहिजे.)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Wed, 01/28/2009 - 12:14
नवीन
तुम्ही सक्ती करताहात का फक्त दोनाची
- Log in or register to post comments
ए
एकलव्य
Wed, 01/28/2009 - 12:47
नवीन
आम्ही संस्कृतीचे सांगतो आहोत... आणि तेही त्यांच्याच भल्यासाठी. ;)
- Log in or register to post comments
न
नीधप
Fri, 01/30/2009 - 05:20
नवीन
नवर्याच्या उष्ट्या ताटात जेवणे आणि नवरा जेवत असताना पंख्याने वारा घालणे हे कसं विसरलात?
काय तुम्हाला बायकांच्या भल्याची चाडच नाही... :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- Log in or register to post comments
म
माझी दुनिया
Wed, 01/28/2009 - 12:36
नवीन
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
लग्न झाल्यावर मंगळसूत्र घालावं पण आजकाल विवाहित बायका मंगळसूत्र घालताना दिसत नाही,याउलट नवर्याच्या पश्चात त्याच्यावरचे प्रेम किंवा सामाजिक सुरक्षितता म्हणूनही बर्याच बायका मंगळसूत्र वापरताना दिसतात.
त्याप्रकारे टिकलीही (कुंकु ) आजकाल कोणी लावताना दिसत नाही. कुंकवाशी सधवा किंवा विधवा असा भेद असू नये कारण लग्नापूर्वीही कुंकु लावायची रीत होतीच.
संस्कृतीरक्षकाची भूमिका पार पाडायला गेलं तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने ओरड होते.शेवटी कालाय तस्मै नम:म्हणून गप्प बसावे हेच खरे.आपल्याला योग्य वाटेल ते करावे. मी टिकलीही लावते आणि हिरव्या बांगड्या,मंगळसूत्रही घालते.जोडवी मात्र वापरत नाही.
- Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™
Wed, 01/28/2009 - 12:45
नवीन
मी धमाल आणि ऍडीजोशी याच्या तथाकथीत मागास विचारांशी सहमत आहे.
तुम्ही बोलतो, ते अगदी योग्य आहे.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Wed, 01/28/2009 - 12:53
नवीन
पण वर जो भारतीय संस्कृती बद्दल कालवा चालु आहे त्या संस्कृतीमध्ये मंगळसुत्राला काडीचेही महत्व नाही. हे तुम्हाला माहित आहे का?.मंगळसुत्राचा इतिहास तपासुन घ्या.वेदात किंवा प्राचिन ग्रंथात त्याचा उल्लेख नाही आहे.मग ते घाला अगर न घाला त्यामुळे काही समाजाला हानी होत नाही.
वेताळ
- Log in or register to post comments
श
शोनू
Wed, 01/28/2009 - 17:06
नवीन
खुद्द भारतात अनेक राज्यात हिंदू लोकांमधे सुद्धा मंगळसूत्र घालायची पद्धत नाही - काश्मीरात कान (साधारण अंबाड्याच्या समांतर रेषेत ) टोचून त्यातून दोरा ओवून तो अंबाड्यावर / वेणी वर टोचला जात असे. दक्षिण भारतात ताळी नावाचा प्रकार अस्तो सोन्याच्या साखळीत एक पदक असतं - त्या पदकाचं डिझाईन हे गोत्र/ कुटुंब यानुसार ठराविक असतं.
पंजाबी लोकांमधे पूर्वी मंगळसूत्राची पद्धत नसायचीच.
अमेरिकेत सर्वसाधारण विवाहित स्त्री पुरुष डाव्या हाताच्या अनामिकेत अंगठी घालतात. जगात अनेक इतर देश आहेत जिथे विवाहित स्त्री /पुरुषांचा मॅरिटल स्टॅटस हा अशा अंगठ्यांनीच दर्शवला जातो. भारतीय व्यक्तिंनी मंगळसूत्र न घालण्यामुळे ते वागणं अमेरिकन कसं काय होतं बुवा? चायनीझ, किंवा रशियन का नाही ?
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 01/28/2009 - 17:18
नवीन
बाकीचे धागे वाचायचे राहतात
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
- Log in or register to post comments
न
नीधप
गुरुवार, 01/29/2009 - 19:33
नवीन
अजून मंगळसूत्र न घालण्यावरून वादंग चाललाय...
च्यामारी विचारतो कोण तुमच्या इच्छेला वा अनिच्छेला?
जिला घालायचंय ती घालेल मंगळसूत्र आणि जिला घालायचं नाहीये ती नाहीच घालणार. काय वाट्टेल ते करा.
संस्कृतीच्या नावाने गळे काढा नाहीतर स्वतःला सोयीस्कर तत्वज्ञान तयार करून बायांना दुटप्पी दुटप्पी म्हणत बसा.
विचारतो कोण तुम्हाला!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2