Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आताही प्रेम तसेच आहे का?

ध — धनंजय, Wed, 01/28/2009 - 03:57

प्रतिक्रिया द्या
8257 वाचन

💬 प्रतिसाद (26)
ध
धनंजय Wed, 01/28/2009 - 05:31 नवीन
ही कविता साधी गद्यासारखी- बोलगीतासारखी - वाचल्यास छंदाची लय आपोआप येईल लय जुळवण्यासाठी असे - म्हणजे नेहमीप्रमाणे - वाचावे - नवे होते प्रेम् जे । वर्षांपूर्वी काही । सांग् आहे आताही । ते तसेच् का? भेट्.तो रोजच् तुला । सकाळ्-संध्याकाळी । काळीज् प्रत्येक् वेळी । धड्.धड्.ते का? सदाचा तोच् तंटा । भांडून् झाल्यावर्.ती । होतो खालीवर्.ती । जीव् तसाच् का? तुझ्यासाठी झुरत् । नाही पूर्वीसार्.खा । तरी नाही पार्.खा । प्रेमाला मी आहे माझी खात्री । अस्.शील माझ्यासाठी । घट्ट होतात् गाठी । ओढ्.ल्या तरी हे आधी चवथे आणि शेवटचे कडवे होते : नाही. ती रोमांच- । बेसब्.रीची कात्री । नाही - इत्.की खात्री । वाट्.ते मला.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/28/2009 - 06:07 नवीन
पहिल्यापेक्षा छानच आहे. ओढल्या "तरी" वर आक्षेप आहे. गाठी ओढल्या तर घट्टच होतात. मग "तरी" कशाला ? (माफ करा: मी मिसळपावावरील अनेक कवि किरडूंना "सहमत, +१" असे उगाचच म्हणत असतो. लोकभावना सांभाळायला हवी. (वा र लो, असे प्रतिसाद बघा, आणि ठरवा.) काहीही झाले तरी फ्यान-आऊट सांभाळायचा असतोच ना ? पण धनंजयने चोखट असावे असे राहून राहून वाटत असते, त्यामुळे जरा तिखट टिका तुमच्यावर. बाय द वे, ज्यांच्यावर कधी माधी चुकून तिखट टिका केली होती, त्यांनी त्या टिकेवरती घृणा व्यक्त केली. त्यांचे काय हरवले हे त्यांना कळत नाही, हे स्पष्ट आहे.) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
न
नंदन Wed, 01/28/2009 - 04:02 नवीन
आवडली. वाचून 'ती न आर्तता उरांत, स्वप्न ते न लोचनी'ची आठवण होणे अपरिहार्यच. रोमांच- बेसबरीची कात्री म्हणजे नीट समजले नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 01/28/2009 - 04:03 नवीन
बेसबरी = बे-सब्री (उर्दू ? फार्सी ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ध
धनंजय Wed, 01/28/2009 - 04:09 नवीन
सबूर धरता येत नाही - बेसबुरी. बेसबुरी आणि रोमांच या भावनांच्या अतिरेकी ओढाताणीमध्ये नवे प्रेमात पडलेल्याची घालमेल होत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/28/2009 - 04:06 नवीन
भेटतो रोजच तुला सकाळ-संध्याकाळी काळीज प्रत्येकवेळी धडधडते का? चार ओळी माझ्याच आहेत :) प्रेमभावनेची उलघाल लै भारी. आवडली कविता !!! नाही. ती रोमांच- बेसबरीची कात्री नाही - इतकी खात्री वाटते मला. अधोरेखीत शब्दांनी सुंदर कवितेची हानी होते का ? चिंतन चालू आहे :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/28/2009 - 04:10 नवीन
हानी नक्कीच होते. बेसबरी ऐवजी "ब्लॅकबेरी" वापरले, तर प्रेम कमी होण्याची कारणे अचानक कळतात. (मिशेल ओबामा सध्या बराकच्या दोन व्यसनांशी झगडते आहे: मार्लबोरो, आणि ब्लॅकबेरी.) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ध
धनंजय Wed, 01/28/2009 - 04:18 नवीन
काव्यालंकाराच्या दृष्टी हानी झाली असू शकेल, विचार करतो आहे. पण प्रेम कमी झाले नसावे असे वाटते. (कसे मोजावे हे माहीत नाही. खात्री एका पारड्यात आणि रोमांच दुसर्‍या पारड्यात - कुठले पारडे भारी आहे?) प्रेम बदलले नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/28/2009 - 04:27 नवीन
सदाचा तोच तंटा भांडून झाल्यावरती होतो खालीवरती जीव तसाच का? धनंजय, ही वरच्या कडव्यातली संकल्पना भन्नाट आहे. (सदाचा तंटा असूनही, तसाच दरवेळी जीव वरखाली होतो, वगैरे.) फक्त संकल्पनाच नाही तर आता आम्हा उभयंतांच्या परस्परसंबंधाविषयी विचार केल्यास वास्तव आहे, असे दिसते. ह्यानंतर, जे कडवे येते, ते ह्यापेक्षाही भन्नाट असायला हवे. पण ते तसे नाही. (प्राडॉ आणि मी म्हटल्याप्रमाणे.) वर घेऊनच जायचे असल्यास शेवटपर्यंत वर न्या. हे असे रोलर कोस्टरसारखे दणकन आपटू नका. (ता. क. फक्त काव्यालंकाराच्या दृष्टिकोनातून हानी नाही, एकंदरीत साहित्याच्या दृष्टिकोनातून हानी आहे.) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चतुरंग Wed, 01/28/2009 - 04:47 नवीन
धनंजय, कवितेचा विचार उच्चच आहे. पहिल्या ३ कडव्यात तो सहजगत्या वरवर गेलाही आहे. परंतु पहिली ३ कडवी ज्या तर्‍हेने ह्या प्रेमाची, त्यातल्या भांडणांची, जीवांच्या उलघालीची, रोमांच-बेसबरीची स्पंदने दाखवतात तितकेच शेवटचे कडवे एकदम अनपेक्षितपणे कविता पंक्चर करते! (चढत्या भाजणीच्या थ्री कोर्स मील नंतर फक्कड स्वीट डिश डेझर्ट म्हणून येण्याऐवजी अचानक भेळपुरी समोर आली तर कसे वाटेल तसे काहीसे!) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्राजु Wed, 01/28/2009 - 04:54 नवीन
खरंच शेवटच्या कडव्यात एकदम चुकल्यासारखे होते आहे. वरच्या पूर्ण कवितेच्य मानाने हे कडवे खटकते आहे. विचार खूप सुंदर..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 01/28/2009 - 05:32 नवीन
विचाराधीन आहे. थोड्या घाईत कविता लिहायची संपवली. एकदोन दिवस स्व-संपादनाच्या डब्यात ठेवायला हवी होती. शेवटचे कडवे "अब्रप्ट" आहे. कदाचित मला जे म्हणायचे आहे, ते म्हणायला त्याहून अधिक जागा देणे आवश्यक आहे. ***बदल केला आहे***
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 01/28/2009 - 05:10 नवीन
प्रस्तुत कवितेच्या कवीबद्दल आदर आहे ; म्हणूनच कविता माझ्यापर्यंत पोचलेली नसलली तरी त्याबद्दल बोलण्याचा प्रमाद करत आहे. कविता ही वृत्त्तात नीटशी बांधली गेलेली नाही. म्हणजे केवळ तांत्रिकदृष्ट्याच बांधली गेली आहे हे कवीच्या दुसर्‍या पोस्ट मधे स्पष्ट होते. कवितेच्या अभिव्यक्तीशी , शैलीशी , नादाशी , तिच्यातल्या (अभावाने असणार्‍या) अंतर्गत तालाशी व्यक्तिशः मला कुठेही तादात्म्यभाव साधता आला नाही. रही बात आशयाची. हां, इथे थोडे नावीन्य आहे. स्नेहभावातली अपरिचयादवज्ञा , "तेहि नो दिवसा: गता:"च्या जातीची हुरहूर, या सगळ्यातला जो अनामिक, अव्यक्त असा भाव आहे त्याला वाचा फोडण्याचा हा प्रयत्न समजू शकतो. पण ... एकूण बांधणीच्या एकात्मतेअभावी , द बेबी वॉज डीओए. असो. कवीच्या ठायी असणार्‍या अंगभूत समजूतदारपणापायीच इतकी तीव्र प्रतिक्रिया लिहिण्याचा प्रमाद करत आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 01/28/2009 - 05:56 नवीन
असा आहे : (एम पी ३ दुवा) (वृत्त काटेकोरपणे बांधले आहे असे मला वाटते.) (येथे चिकटवलेले विजेट का बरे दिसत नाही?) Get this widget | Track details | eSnips Social DNA
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/28/2009 - 11:07 नवीन
धनंजय, काव्यवाचनातल्या मैफीलीत एखादी सुंदर कविता गोड आवाजात ऐकायला जशी मजा येते, तोच आनंद आपल्या कवितेने आणि आवाजाने दिला. ( अवांतर : वर एका प्रतिसादात सर्किट म्हणतो त्या प्रमाणे..कविता आवडली, सहमत आहे, किंवा +१, असे म्हणून कवितेला दाद देऊन पुढे जाता येते. पण जे वाटलं ते तुम्हाला नाही बोलणार तर कोणाशी बोलणार, म्हणून तो प्रपंच. बाकी, येऊ दे अशाच सुंदर कविता ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विसोबा खेचर Wed, 01/28/2009 - 07:55 नवीन
हम्म! बरी वाटली कविता. तितकिशी खास नाही.. तात्या.
  • Log in or register to post comments
र
रामदास Wed, 01/28/2009 - 08:37 नवीन
मी चौथे कडवे असे वाचून पाहीले तुझ्यासाठी झुरत नाही पूर्वीसारखा तरी नाही पारखा प्रेमाला मी. आहे माझी खात्री पाचवे आहे असेच वाचले.खात्रीच्या पुनरुच्चाराने मजा आली. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 01/28/2009 - 08:47 नवीन
एकाच कवितेवर बर्‍याच जणांनी खात्री केल्याने आता ते तितके पवित्र वाटत नाही. जाउ दे नवी कविता येउ दे लवकर. धनंजय टच नाही वाटला कवितेत. :-( बाकी अमेरिकेतले प्रेम एका वर्षात खात्री द्यायला सांख्यिकी शास्त्री काय म्हणतात? ;-)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 01/28/2009 - 12:32 नवीन
कल्पना सुंदर मांडणी ठाकठीक. शेबटच्या कडव्यातली कल्पना चांगली. ताणले तर तुटते..पण (दोरीला गाठ असेल तर) गाठ मात्र ताणल्याने घट्ट होत जाते असा अर्थ नीट शब्दबद्ध झाला असे वाटले नाही. पुलेशु -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/28/2009 - 18:42 नवीन
कविता तिच्याजागी ठीकच आहे, छान आहे परंतु तर धन्याशेठसारख्या जिनीयसकडून इतक्या सामान्य वकुबाची कविता अपेक्षित नव्हती. हीच कविता मी किंवा अन्य कुणा कामचलाऊ कवीने केली असती तर गोष्ट वेगळी होती! :) आपला, (घन्याशेठचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 01/28/2009 - 20:52 नवीन
यात नक्की काय सामान्य वाटले? असो. छान कविता. कवितावाचनही आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/29/2009 - 03:34 नवीन
>>यात नक्की काय सामान्य वाटले? तात्या, कोणतीच कविता सामान्य नसते असे वाटते ! मात्र काही वाचकांना ती सामान्य वाटू शकते तर काहींना उच्च ! ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर बरे वाइट अवलंबून असते (मेलो आता ) :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/29/2009 - 03:40 नवीन
मात्र काही वाचकांना ती सामान्य वाटू शकते तर काहींना उच्च ! करेक्ट! किंवा आपण असंही म्हणू शकता की माझ्यासारख्या सामान्य वाचकांना सामान्य वाटू शकते आणि असामान्य वाचकांना असामान्य वाटू शकते! ;) आपला, (सामान्य!) तात्या. ज्याच्या त्याच्या डोक्याच्या आकारावर बरे वाइट अवलंबून असते (मेलो आता ) हा हा हा! :) आपला, (आकाराने मोठ्या परंतु मठ्ठ डोक्याचा अरसिक) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/29/2009 - 03:42 नवीन
यात नक्की काय सामान्य वाटले? ते सांगता येणार नाही. परंतु त्यातले सामान्यपण जाणवले मात्र जरूर! कवितावाचनही आवडले. सहमत. धन्याच्या वाचनात छान नाट्यमयता असते.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
र
रामदास गुरुवार, 01/29/2009 - 04:44 नवीन
मला मात्र एक वेगळेच गाणे आठवले. विषयांतर झाल्यास माफी असावी. Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 01/29/2009 - 04:54 नवीन
अर्थात "बदलले तरी ते वेगळे प्रेमच आहे," अशा काही आशयाची माझी कविता आहे. "अंतरीच्या गूढ गर्भी"मध्ये मात्र निराश परिस्थितीचे काळजाला हात घालणारे वर्णन केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा