पाककृती

गरमा-गरम कुर्मा (फोटोसह)

Primary tabs

साहित्य
१. फ्लॉवर- १ वाटी
२. बटाटा - १
३. गा़जर - १
४. टोमॉटो - २
५. कांदा - २
६. अलं-लसूण पेस्ट - एक चमचा
७.गरम मसला
तेल, मीठ, तिखट, कोथिंबीर इ.

गरम मसाला - एक चमचा धने, अर्ध चमचा जिरे, २/३ मिरी, २ लवंगा, दालचीनी तुकडा, सुक खोबरं छोटा तुकडा
आणि एक चमचा तीळ+खसखस इ. तेल न घालता हलके परतुन घ्या.
कृती :
१. कांदा, टोमॉटो आणि गरम मसाला याची एकत्र पेस्ट करुन घ्या.
२. तेल गरम झाल्यावर तिखट आणि वरील पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता.
३. बारीक चिरलेले फ्लॉवर, बटाटा आणि गाजर वरील मिश्रणात घालून शिजवा.
४. चवीनूसार मीठ घालून तयार कुर्म्यावर कोथींबीर घालून गरमा-गरम सर्व करा.

हा कुर्मा, पुरी/पोळी किंवा भाता बरोबर छान लागतो.

चकली

कुर्म्याचे छायाचित्र दिसत नाहीये..

पण, रेसिपीबद्द्ल धन्यवाद!

चकली
http://chakali.blogspot.com

समिधा

छायाचित्र असते तर जास्ती आवडले असते. रेसिपी आवडली

समिधा

छायाचित्र असते तर जास्ती आवडले असते. रेसिपी आवडली
चुकुन २ दा प्रकाशित करा वर क्लिक झाले.

२ दा प्रकाशित करा

अशी काही नविन सुविधा सुरू केली आहे का? मला दिसली नाही.

ज्योति

कुरमा मस्तच आहे. यात घरचा काळा मसाला घातला तर चालेल का? की चवीत फरक पडेल?

चकली

काळा मसाला कुरमा भाजी साठी मला फारसा आवडत नाही. पण काळा मसाला + ओले खोबरे मुळे बदलेली चव कुरमा भाजी साठी नाही.

चकली
http://chakali.blogspot.com

अनंत छंदी

चित्र का नाही पाककृतीचं? पुरीची पाकृ द्या की तेवढच इन्स्टंट कुर्मापुरी खाल्याचं समाधान.

रेवती

कुर्म्याच्या कृतीबद्दल धन्यवाद!
चित्र दिसले असते तर पाकृची चव आणखी वाढली असती, असो.
वाटणाच्या मसाल्यात थोडी बडीशेप घातली तर चव छान येते असे ऐकले आहे.
रेवती

विसोबा खेचर

आम्ही बिगर फोटूंच्या पाककृतींना प्रतिसाद देणे बंद केले आहे...

क्षमस्व...

तात्या.

दशानन

>चित्र का नाही पाककृतीचं? पुरीची पाकृ द्या की तेवढच इन्स्टंट कुर्मापुरी खाल्याचं समाधान

+१ हेच म्हणतो !

कोणी शिर्रकुर्मा कसा करावा ह्या बद्द्ल माहीती देऊ शकेल का :?

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

ज्योति

मला वाटते तुम्ही शिरकुर्मा खाल्लेलाच बरा.

कोणी शिर्रकुर्मा कसा करावा ह्या बद्द्ल माहीती देऊ शकेल का
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
मंडळ आपले आभारी आहे.......

शंकरराव

कोणी शिर्रकुर्मा कसा करावा ह्या बद्द्ल माहीती देऊ शकेल का
जनाबे अली हम भी शौकीन है शिर्रकुर्मा के
शंकरकुर्मावाले (घराची स्वीट्स)

विसोबा खेचर

फोटू टाकल्याबद्दल धन्यवाद..

लै भारी पाकृ! ! जियो..! :)

तात्या.

अनंत छंदी

तोंडाला पाणी सुटल्याचे दर्शविणारी स्मायली आहे का?
तात्या कृपया मागणीचा विचार करा.
:)

चतुरंग

=P~ कुर्मा बघून हाय रे कर्मा असं वाटतंय! =P~

चतुरंग

लिखाळ

वा !
पाकृ आणि चित्र दोन्ही मस्त.

लवकरंच करुन पाहिले पाहिजे..
-- लिखाळ.