पाककृती

मुखवास

Primary tabs

जलजिराच्या गोळ्या. साहित्य:१टे स्पून काळी मिरी, १००ग्रॅम विलायची, ५०ग्रॅम दालचिनी, ५० , १/२टे. स्पून काळे मीठ, ३टे स्पून आमचूर पावडर, १टे स्पून सुन्ठ्पावडर, १/२टे. स्पून हिन्ग, २टे. स्पून साधे मीठ, ५टे. स्पून पिठीसाखर कृती :काळी मिरी,विलायची,दालचिनी, लवन्ग भाजून पावडर करुन घेणे. सगळे साहित्य मिसळून परत एकदा मिक्सर फिरवा. सगळे एका बाऊल मधे घेऊन गुलाबपाणी घालून गोळ्या बनवा. बडीशेप साहित्य: अर्धा किलो मोठी बडीशेप्,दोन टे.स्पून मीठ,एक टे.स्पून हळ्द्,लिन्बू टूटीफ्रुटी,बडीशेप गोळ्या, किसलेले खोबरे कृती: गार पाण्यात हळ्द, मीठ, लिन्बू कालवा. ते पाणी बडीशेपेला लावा. ३-४ तास उन्हात ठेवा व नन्तर बारीक गॅसवर भाजून बाकीचे साहित्य मिसळा.
समिधा

छान आहे, जलजिराच्या गोळ्या जास्ती आवडल्या. पटकन बनवता येतिल. या सगळ्या बरोबर त्या चिंचेच्या गोळ्या बनवतात त्याची पण कृती येत असल्यास दे.
;;)

चकली

मुखवास च्या पाकृ वाचनात येत नाहीत. अशा वेगळ्या पाकृ दिल्याबद्द्ल धन्यवाद!

चकली
http://chakali.blogspot.com

मस्तच. लहानपणी असलं खूप खाल्लंय.

अवांतरः एक ४-५ किले इकडे पाठवून द्या.

बिपिन कार्यकर्ते

अवलिया

एक ४-५ किले इकडे पाठवून द्या.

किले? किले कशाला बुवा?

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.