पाककृती

मुखवास

Primary tabs

ओवा साहित्य : ओवा,मीठ्,लिन्बू, भाजलेली तिळ, खोबरा कीस कृती: ओवा पाण्याने २-३ वेळा धुवून घ्यावा.चाळ्णीवर काढून घ्यावा. ओवा निथळल्यावर कापडावर काढून त्याला मिठ लावून उन्हात चान्गला वाळ्वून घ्यावा. चान्गला वाळला कि कढईत भाजून घ्यावा, भाजतान्ना त्यात लिन्बाचा रस , भाजलेली तीळ, खोबरा कीस घालावा. अवान्तर: नुस्ता ओवा खाल्ला कि तिखट लागतो.वरीलप्रमाणे केला तर त्याचा तिखटपणा खूप कमी होतो. माझी आई हा ओवा खूप छान करते. ***************************************************************** आवळासुपारी साहित्य :आवळे, मिठ,दही, जिरापुड, कृती: आवळे धुवून किसावे.थोड्याशा दह्यात चवीप्रमाणे मीठ व जीरापुड घालून ते आवळ्याच्या किसाला लावावे व किस उन्हात वाळ्त ठेवावा.(यात हिन्गही घालतात पण मग उपासादिवशी खाता नाही येत) कड्क उन्हात वाळ्वल्यास किस काळा नाही पडत.
बाप्पा

वाचुन लहानपण आठवले एकदम. माझी आई पण मुखवास फार छान करते.