Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्हॅलंटाईन डे - गिफ्ट कोणती घ्याल?

प
पिवळा डांबिस
गुरुवार, 02/12/2009 - 06:49
🗣 96 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
38420 वाचन

💬 प्रतिसाद (96)
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 02/12/2009 - 06:56 नवीन
प्रेयसी कशी आहे त्यावर भेटवस्तु अवलंबुन आहे. थोडे फार रुसवे फुगवे चालणारच.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/12/2009 - 07:20 नवीन
थोडे फार रुसवे फुगवे चालणारच. तुम्ही सध्या फक्त तुमची ती गाजरं संपवा.... एकदा "कुर्यात शुभमंगलं" झालं ना कि मग पुन्हा इथे येऊन तुमचे अनुभव लिहा.... बायकांच्या रुसव्या-फुगव्याला तुम्ही "थोडेफार" म्हणताय म्हणजेच तुम्हाला याचा अनुभव नाहिये!!!!! अनुभवी, पिडां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
व
विनायक प्रभू गुरुवार, 02/12/2009 - 07:27 नवीन
असु दे, असु दे. एकदा मिक्सरची वारी झाल्याशिवाय नाय कळायचे हो पिडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 02/12/2009 - 07:28 नवीन
म्हणजे नंतर कळतं/कळेल का? अनुभवी लोकांनीच मतप्रदर्शन करावे अशी आगाऊ आणि उद्धट विनंती! ;-) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू गुरुवार, 02/12/2009 - 07:31 नवीन
कॅश द्यायची प्रश्न मिटतो. त्याना हवे ते घ्यायला स्वातंत्र्य. उगाच आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडुन परत बोलणी खावी कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/12/2009 - 07:45 नवीन
कॅश? भलतेच धाडसी बुवा तुम्ही!!!! "कॅश द्यायला मला काय ** समजलास?" असे ऐकावे लागले तर हो? नको रे बुवा, ह्या समुपदेशक लोकांना ते ठीक आहे, आपल्याला उगाच (खरोखरचा!) जोडा खावा लागायचा!!!!! मित्रांनो, या मास्तरापासुन जरा सांभाळूनच हो!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू गुरुवार, 02/12/2009 - 07:51 नवीन
एकदम वॅलीड पॉइंट. न झेपणारी मोहीम हातात घेउ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/12/2009 - 07:52 नवीन
सहा टक्के रेट आहे सध्या. कुठल्याही ब्लूचिप पेक्षा जास्त ! आहात कुठे ? -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विंजिनेर गुरुवार, 02/12/2009 - 09:10 नवीन
गिफ्ट प्रेयसी ला द्यायचे आहे. शेअर बाजारतल्या एजंट मित्राला नाही. बायकांच्या मते ट्रेझरी बॉण्ड्स आणि रोख रक्कम एकाच (रूक्ष/भावनाशून्य)विभागात येतात. त्यातल्या त्यात फुले+दागिने+ फक्त तिच्या साठी/भोवती घालवलेली एखादी संध्याकाळ हे सर्वात बेष्ट आहे (बायकोचा वाढदिवस एकदा(च !) विसरल्यामुळे कोट्यावधी शिव्या खाल्लेला) विंजिनेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
द
दशानन गुरुवार, 02/12/2009 - 14:31 नवीन
सहमत. ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
द
दशानन Fri, 02/13/2009 - 02:59 नवीन
>>>एकदा मिक्सरची वारी झाल्याशिवाय नाय कळायचे हो पिडा. =)) =)) =)) देवा साष्टांग नमस्कार. भिरभिर फिरलो उन्हातानात मी ! चकरा मारल्या अनंत मी ! तुला पाहण्यासाठी... यमालाही थोपवलं मी ! पण आता बाय-बाय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
र
रेवती गुरुवार, 02/12/2009 - 14:22 नवीन
सखारामा, तू आधी लग्न कर बाबा! तुझं लग्न झालं की बर्‍याच जणांना हायसं वाटणारे. तुला रुसव्याफुगव्यतलं काही कळत नाही म्हणजे कित्ती सुखी माणूस आहेस. नाही रे एवढं सुखी बघवत लोकांना!;) (प्रतिसाद ह. घे पण लग्न करायचं मनावर घे.) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
य
योगी९०० गुरुवार, 02/12/2009 - 06:58 नवीन
व्हॅलेंटाईन डे लाच माझ्या लाडक्या लेकीचा वाढदिवस आहे. तिच्यासाठी काय भेटवस्तू घेऊ? खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर गुरुवार, 02/12/2009 - 06:58 नवीन
पण थोडं उशीराच आलं. आता आम्ही शेवटच्या मुद्याच्या शेवटच्या भाकीताचा अनुभव घेत आहोत!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/12/2009 - 07:09 नवीन
*
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/12/2009 - 07:09 नवीन
आमचं इस्पेशल गिफ्ट आमच्या खव मधे दिसेल त्या दिवशी !!! :) मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/12/2009 - 07:16 नवीन
अहो मदनबाण, तुमचे वेडेवाकडे फोटो छापू नका हो!!!! ते आम्हालाही बघावे लागतात!!!! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण गुरुवार, 02/12/2009 - 07:23 नवीन
नाही हो काका शुभ्रा आणि तिला दिलेल खास गिफ्टच तुम्हाला तिथं,, त्या दिवशी दिसले !!! :) मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/12/2009 - 07:27 नवीन
मला वाटलं कि तुम्हीपण त्या टारूसारखे काय (दंडातल्या!!) बेटकुळ्या वगैरे दाखवणारे तुमचे बनियनमधले फोटू टाकताय की काय!!!!! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 02/04/2014 - 08:04 नवीन
आमचं इस्पेशल गिफ्ट आमच्या खव मधे दिसेल त्या दिवशी !!! छ्या... पूर्वी सारखे फोटो, व्हिडीयो आता खव मधे लावता येत नाही, शिवाय खरड आली ते सुद्धा कळत नाही. मी तर खरडवही वापरणे जवळपास बंदच केले आहे. काही उपाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 02/12/2009 - 07:16 नवीन
बायकांनी आपण कितीही स्मार्ट आहोत असं दाखवलं तरी खड्यांमध्ये श्रेष्ठ्-कनिष्ट ठरवण्याची अक्कल देवाने त्यांच्यात घातलेलीच नाहिये! म्हणूनच बर्‍याच दगडांचीही सुस्वरुप मुलींशी लग्नं होतात का? ;-) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/12/2009 - 07:23 नवीन
म्हणूनच बर्‍याच दगडांचीही सुस्वरुप मुलींशी लग्नं होतात का? मग यात त्या सुस्वरूप (?) बायका स्मार्ट की ते दगड जास्त स्मार्ट? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 02/12/2009 - 07:26 नवीन
म्हणूनच बर्‍याच दगडांचीही सुस्वरुप मुलींशी लग्नं होतात का? मग यात त्या सुस्वरूप (?) बायका स्मार्ट की ते दगड जास्त स्मार्ट? अर्थातच दगड! "बायकांना दगडांची पारख नसतेच ना?" तुमच्या याच म्हणण्याला मी अनुमोदन देत आहे! ;-) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/12/2009 - 07:30 नवीन
इथे काकूने मला एक टप्पल मारल्यामुळे माझा हा प्रतिसाद काढुन टाकण्यात आलेला आहे...... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रेवती गुरुवार, 02/12/2009 - 14:24 नवीन
मस्तच गं अदिती! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 02/12/2009 - 14:39 नवीन
रेवतीताई, मग या वेळेचा व्हॅलंटाईन एकदम "ब्रिटीश" पद्धतीने का, का एकदम "धूमधडाक्यात"? ;-) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 02/12/2009 - 14:51 नवीन
बघूयात. हवी ती वस्तू (गरजेप्रमाणे) नेहमीच मागितल्याबरोबर मिळत असते...... म्हणजे मीच विकत घेऊन येते, मग आता वेगळं असं काय करायचं? तसं सहा वर्षांपूर्वी नवर्‍यानं भरपूर बर्फात ड्राइव्ह करत मला न्यू जर्सीला चाट खायला नेलं होतं ते आठवतं. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विनायक प्रभू गुरुवार, 02/12/2009 - 07:17 नवीन
डांबिसा
  • Log in or register to post comments
न
नीधप गुरुवार, 02/12/2009 - 07:51 नवीन
>>२. तिला कविता/ लेख/ कथा वगैरे देऊ नका. << आम्हाला भेटून १२ वर्षे आणि लग्न होउन ६ वर्षे झालीत तरी मला नवर्‍याने लेख किंवा कविता माझ्यासाठी लिहिलेली दिली तर प्रचंड आनंद होईल. खरंच. >>४. आपल्या प्रियतमेला कपडे घेऊ नका. आपल्या प्रियतमेला आवडतील असे कपडे घेणारा पुरूष अजून तरी जन्माला आलेला नाही. << माझ्या नवर्‍याचा कपड्यातला चॉईस हल्ली सुधारलाय आणि मी एखादा कपडा महाग म्हणून आवडला तरी ठेवून दिल्यावर तोच माझ्या मागे लागतो घे घे म्हणून तेव्हा अजिबातच हरकत नाही कपडा घेण्यात. >>५.अत्तरं, इसेन्शियल ऑईल्स, बाथसेंन्टस मुळीच घेऊ नका!! कारण ते जरी कितीही महाग आणि दुर्मिळ असले तरी, "मला माहितीये तुझ्या मनात काय आहे ते!!!! तुला दुसरं काही सुचतच नाही का रे?" हा प्रश्न येणार....<< हा प्रश्न अजिबात येणार नाही.. ही भेट आवडेल.. अगदी मनातल्या गोष्टीसकट... :) श्या पिडाकाका अगदीच चुकलात.. युजिए के नामपे बट्टा!!! :) असो.. मलातरी एकतर्फी भेटीची आयड्या आवडत नाही. तेव्हा मी पण नवर्‍यासाठी काहीतरी घेणार.. एनी सजेशन्स? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
ग
गंधमादन गुरुवार, 02/12/2009 - 07:55 नवीन
>>एनी सजेशन्स? गोड बोला एक दिवस .. पुरे होईल बिचार्‍याला तेवढेच. (हि सजेशन सर्व बायकांना बरका .. व्यक्तिगत घेउ नका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/12/2009 - 08:03 नवीन
मलातरी एकतर्फी भेटीची आयड्या आवडत नाही. तेव्हा मी पण नवर्‍यासाठी काहीतरी घेणार.. काही विकत घेऊन देण्यापेक्षा, मनापासुनच्या प्रेमाचे चार शब्द जास्त मोलाचे होतात. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
न
नीधप गुरुवार, 02/12/2009 - 08:37 नवीन
समस्त स्त्रीवर्ग कधीही प्रेमाने बोलत नाही वागत नाही असा तुमचा गैरसमज आहे की मी वागत नाही असा गैरसमज आहे? काही असला तरी तो गैरसमजच बरंका.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/12/2009 - 08:40 नवीन
गैरसमज होतो आहे. मी फक्त 'प्रेमाच्या शब्दांची' महती विशद करून सांगितली आहे. व्यक्तिगत आरोप केलेला नाही. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
ए
एक Fri, 02/13/2009 - 07:16 नवीन
"..हा प्रश्न अजिबात येणार नाही.. ही भेट आवडेल.. अगदी मनातल्या गोष्टीसकट".." अहो असं जर आमच्या बायकोने धाडसीपणे बोलून दाखवलं ना तर "ती भेट" सगळ्यात झकास वाटेल.. प्रत्येकवेळी "मनकवड्याचा रोल" करून आणि ड्रायव्हरसीट वर बसण्याचा आम्हालापण कंटाळा येतो. एखाद्या लाँग ड्राईव्ह वर बायकोने ड्रायव्हींग करण्याचापण उत्साह आणि उत्सुकता दाखवावी. आमच्यालेखी ती खरी मौल्यवान भेट, बाकिच्या मटेरियल गिफ्ट्स ईंमटेरियल ;) मी तर एक लाल रिबीन मलाच गुंडाळून प्रेझेंट करणार आहे. नाहीतरी प्रत्येक गिफ्ट "चीप गिफ्ट" म्हणून हिणवलं जातच यावेळी थोडे पैसेतरी वाचतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
श
शिप्रा Fri, 02/13/2009 - 07:28 नवीन
>>मी तर एक लाल रिबीन मलाच गुंडाळून प्रेझेंट करणार आहे. नाहीतरी प्रत्येक गिफ्ट "चीप गिफ्ट" म्हणून हिणवलं जातच : D यावेळेस पण तेच एकायची तयारी ठेवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
ए
एक Fri, 02/13/2009 - 07:37 नवीन
म्हणूनच लिहिलं ना..की यावेळी पैसेतरी वाचवतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिप्रा
न
नीधप Mon, 02/16/2009 - 07:02 नवीन
>>अहो असं जर आमच्या बायकोने धाडसीपणे बोलून दाखवलं ना तर "ती भेट" सगळ्यात झकास वाटेल..<< दोघांच्यात सुसंवाद असेल तर हे घडणं काही अवघड नाही. आणि सुसंवाद ही दोघांची जबाबदारी आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
व
विनायक प्रभू गुरुवार, 02/12/2009 - 08:12 नवीन
मोजुन चारच बर का? पुढच्या चार साठी एक वर्ष वाट बघायला लावायची. वाईट सवय लावायची नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/12/2009 - 08:15 नवीन
क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/12/2009 - 08:31 नवीन
'व्यक्त' किंवा 'अव्यक्त'.... प्रेम असणे ही भावनाच सुखकर असते. 'अव्यक्त' प्रेमाला 'व्यक्त' करण्याच्या धडपडीत 'भेटवस्तू' च्या कुबड्या वापराव्या लागल्या तर व्यक्त प्रेमालाही 'गौणत्त्व' प्राप्त होते. 'भेटवस्तू' देऊच नये असे मी म्हणत नाही. पण 'व्हॅलेंटाइन डे' सारखा वर्षातला एखादा दिवस निवडून तो 'साजरा' करावयाच्या मानसिक बंधनातून आपण एखादी 'भेटवस्तू' खरेदी करतो तेंव्हा प्रेमभावनेपेक्षा त्या दिवसाला, भेटवस्तूला आपण अकारण जास्त महत्त्व देत आहोत असे मला वाटते. 'भेटवस्तू' कधीही द्या. 'ए हा बघ तुझ्या साठी शर्ट आणलाय.' 'तुझं अक्षर सुंदर आहे, हे घे पेन माझ्याकडून तुला भेट' 'हा बघ तुझ्या साठी गजरा आणलाय. मला माहिती आहे तू गजरा घालत नाहीस. पण घे, आवडला म्हणून घेतला, नुसता वास घेतलास तरी चालेल.' 'अरे, ही बघ तुला आवडतात म्हणून भजी आणली आहेत.' 'आज काही काम करू नकोस. आज मस्त पैकी नाटक पाहू आणि कुठेतरी झकासपैकी पावभाजी खाऊ.' ह्या सर्व 'भेटवस्तू' प्रेम व्यक्त करतात. त्यांना 'व्हेलेंटाइन डे' चा मुहूर्त लागत नाही. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 02/12/2009 - 08:38 नवीन
"आज उशीर खरंच झाला कारण मी तुला कोणता केक आवडेल यावर विचार करत होते", असं म्हणता म्हणता गाजराचा केक त्याच्या हातात दिल्यावर त्याच्या चेहेर्‍यावरचा आनंद बघण्यासाठी मी (आणि तोपण) वर्षातल्या चार दिवसांची, दिवाळीची वाट बघत बसत नाही. (चार दिवस: व्हॅलंटाईन डे, लग्नाचा, त्याचा आणि माझा वाढदिवस) काका, तुमच्याशी १००% सहमत. आनंद साजरा करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मुहूर्ताची वाट बघायची कशाला? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
न
नीधप गुरुवार, 02/12/2009 - 08:40 नवीन
पण हे तर असतंच.. चालूच असतं असं. एखाद्या दिवशी खास अधोरेखित करून साजरं करायचं म्हणलं तर कुठे बिघडलं? तसं तर पाडव्यालाच का ओवाळायचं? रक्षाबंधनालाच का राखी बांधायची? गुरूपौर्णिमेलाच का गुरूंना स्मरायचं/ पुजायचं? असंही म्हणता येईल ना? पण त्या त्या भावनेचे प्रतिक म्हणून तो तो एक दिवस आहे. इतकंच - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/12/2009 - 09:01 नवीन
पाडव्यालाच का ओवाळायचं? रक्षाबंधनालाच का राखी बांधायची? गुरूपौर्णिमेलाच का गुरूंना स्मरायचं/ पुजायचं? अगदी हेच माझे मत आहे. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
प
पक्या गुरुवार, 02/12/2009 - 20:54 नवीन
पेठकर काका , तुम्ही म्हणताय ते खर्‍या नात्यात वर्षभर चालूच असते. नीधप ने म्हटल्याप्रमणे मुद्दाम अधोरेखित करून एखादा दिवस साजरा केला तर काय बिघडलं ? तेवढीच मौज मजा , आनंद , प्रेम व्यक्त करण्याची अजून एक संधी मिळते. अव्यक्त प्रेम ही काही वेळेस व्यक्त करण्याची गरज असते. आणि ते भेटवस्तू देउन व्यक्त केले तर छानच वाटते. आणि भेटवस्तू म्हणजे नेहमी महागडीच वस्तू घेतली पाहिजे असे क।ही नसते. तुम्ही वर उल्लेख केलेले आहेतच...गजरा, आवडीची डिश वगैरे . आणि त्यातूनही वर्षाकाठी कधीतरी एखाद्या डे चे निमित्त साधून विश लिस्ट वरची घेतली महागडी भेटवस्तू तर काय बिघडते त्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Fri, 02/13/2009 - 10:54 नवीन
पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना....! दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
ब
ब्रिटिश गुरुवार, 02/12/2009 - 08:57 नवीन
दादुस लय ऊशीर जाला रं. मना आटवतय १४ फेबुरवारीला माज्या आयटमला मीनी रेशनच्या लायनीत प्रपोज केल्ता. आनी होकार आल्यावर पाच लीटर राकेल गिफ्ट मदी दिल्ला वता. मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/12/2009 - 09:01 नवीन
संपलो...! आपला, (ब्रिटिशचा जबरदस्त फ्यॅन!) तात्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
व
विनायक प्रभू गुरुवार, 02/12/2009 - 09:04 नवीन
च्यामारी. अख्खा धडा एका वाक्यात उडवतो हा बाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
श
शंकरराव गुरुवार, 02/12/2009 - 11:19 नवीन
जबरदस्त =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 02/12/2009 - 11:23 नवीन
दादुस तु ग्रेट हाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा