Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्हॅलंटाईन डे - गिफ्ट कोणती घ्याल?

प
पिवळा डांबिस
गुरुवार, 02/12/2009 - 06:49
🗣 96 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
38420 वाचन

💬 प्रतिसाद (96)
र
रेवती गुरुवार, 02/12/2009 - 14:30 नवीन
अतिषय ग्रेट प्रतिसाद! खूप खूप भारी! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
न
नाटक्या गुरुवार, 02/12/2009 - 16:54 नवीन
दादुस, लय बेस्ट गिफ्ट दिलास बग. पन फुढे राकील झेवून केलास काय तुज्या आयटम ने ते पन लिव ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
ब
ब्रिटिश Fri, 02/13/2009 - 06:38 नवीन
जल्ला आसल ते राकेल. पन सांगायच आस कं नंतर पिडा काकुसनं सांगतलेल्या सगल्या भेटी दील्ल्या, पन पाच लीटर राकेल फुकट मील्ल्यावर जेवडा आनंद तिला झाल्ता तेवडा आनंद परत कदीच बगीतला नाय. मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
श
श्रीयुत संतोष जोशी Fri, 02/13/2009 - 09:00 नवीन
जबरदस्त ; लै भारी म्हंजे लैच भारी हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश
स
सायली पानसे गुरुवार, 02/12/2009 - 09:03 नवीन
प्रेम असतच ना.... पण एखाद्या दिवशी तुम्हि म्हणता तस एक दिवस खास अधोरेखित करुन साजरा केला तर काहिच बिघडत नाही. भावना व्य़क्त करणे महत्वाचे मग त्या रोज करा किंवा मुहर्त पाहुन... डज नॉट मेक अ डिफरन्स.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 02/12/2009 - 09:22 नवीन
व्हॅलेन्टाईन डे च्या संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत सिंगल माल्ट स्कॉच पिईन आणि मजा करीन! :) अजून काय भेटवस्तु देणार? आमच्यासोबत सुखदु:खाच्या गोष्टी करत घालवलेली एक संध्याकाळ, हीच त्या बाईकरता अनमोल असेल! ;) आपला, (बाई-बाटलीतला) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 02/12/2009 - 09:23 नवीन
.... पतिने आपल्या पत्नीस थोडासा (स्वतः चा मोबाईल आणि लॅपटॉप जवळ नाही किंवा बंद आहे असा) वेळ भेट म्हणून द्यायची कल्पना कशी वाटते ?
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 02/12/2009 - 14:31 नवीन
हि अपेक्षा जरा जास्त आहे असं वाटत नाही का?;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 02/12/2009 - 10:33 नवीन
पत्निस किती वेळ द्यायचा हे त्या पत्निच्या स्वभावावर अवलम्बुन आहे, अस मी नाहि अनुभवी लोक म्हनतात.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/12/2009 - 11:00 नवीन
मी तिला सोडुन देण्याचा निर्णय घेतला आहे...तिला मोकळीक(space) हवी...घे आता हवी तेव्हढी...काय पिडाकाका,ही काय पिडा मागे लागली नेमकी १४ फेबच्या आधी... सुहास..
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 02/12/2009 - 11:00 नवीन
सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/12/2009 - 11:16 नवीन
आता भोगा त्याची फळं!!!! आपण कितीही काळजीपूर्वक कपडे निवडले तरी ते एकतर योग्य कापडाचे नसतात, किंवा त्यांचा साईझ/ रंग/ टेक्श्चर बरोबर नसतं किंवा आपल्याला लेटेस्ट फॅशन म्हणजे काय ते अजिबात माहिती नसते!!!!
काय हाय कि आमच क्वाश्चुम लोकान्ला आवडत नाय तव्हा काय बी झाल तरी कापड घेनार नाय. आन बाकी काय घेन परवडनार नाय? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 02/12/2009 - 14:18 नवीन
किती मजेशीर लिहिलयत पिडाकाका! मनातल्यामनात खुदुखुदू हसत होते मी! धन्य झाले तुमचे सल्ले वाचून! :) रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 02/12/2009 - 14:30 नवीन
पिडाकाका, तुम्ही धन्य आहात :) ज्यांना ज्यांना व्हॅलेंटाईनला त्याच्या साथीला जे काही गिफ्ट द्यायचे असेल त्या बरोबर पिडा का़कांच्या ह्या लेखाची एक प्रिन्ट ही द्यावी .:)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 02/12/2009 - 15:03 नवीन
लेख आवडला काका. ब्रिटीश.... यू रॉक! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 02/12/2009 - 16:32 नवीन
मस्त लेख... (उपयोगी लेख :) ) पण अनेकदा पुरुषाला काय भेट द्यावी याचा निर्णय स्त्रीया घेतात आणि स्त्रीला काय भेट द्यावी हे त्याच पुरुषाला सुचवतात. भारी आहे... -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 02/12/2009 - 17:08 नवीन
एकदम जबरन धागा सुरु केलात! एकेक सल्ले अगदी अनुभवातून उतरलेले दिसले!! :) ह. ह. पु.वा.! =)) ६. फुलं/ गुलाबं: हंऽऽऽ!!!! आपापल्या जबाबदारीवर घेऊन बघायला हरकत नाही!!! तुमची प्रेयसी कोण आहे यावर सगळं अवलंबून आहे. जर नव्याची नवलाई असेल तर खपूनही जाईल!!!! मला मात्र २१ डॉलरचा लालभडक गुलाबाचा गुच्छ घेऊन गेल्यावर, "काय हे! जरा तरी डोकं चालव!! या २१ डॉलरमध्ये किती पापलेटं आली असती माहितीये!!!" असा एका सिकेपीकाकूकडून एकदा अहेर मिळाला होता..... अगदी अगदी! असाच फर्स्टहँड अनुभव आमचाही आहे. एका वॅलेंटाईनला गुलाबाचा गुच्छ आणायचा नुसता प्रस्ताव मांडल्याक्षणी "कशाला हवेत ते एवढे अकरा डॉलर्सचे गुलाब? काहीतरीच तुझं!" अशा शाब्दिक गुच्छाने सत्कार झालेला माझ्या कोवळ्या मनात अजूनही रुतून बसलाय! ;) बाकी बायका ह्या बाबतीत बर्‍याचवेळा दशरथाने कैकयीला दिलेल्या तिसर्‍या वराप्रमाणे वागतात. म्हणजे संवाद असा "ए १४ फेब्रु आलाय." काहीच न कळल्यासारखं "मग?" "अगं असं काय वॅलेंटाईन! काय घ्यायचं?" "हं. बघू. आत्ता नकोय मला काही. पण विचारलंस हे काय कमी आहे?" (हे दुसरं वाक्य म्हणायलाच हवं का? पण नाही त्याशिवाय त्या बायका कसल्या.) "बघ मी विचारलं नाही म्हणतेस आणि विचारलं की घेत नाहीस." "नंतर बघू मी सांगेन". आणि नंतर कोणत्यातरी मोक्याच्या क्षणी एकदम ती मागणी पुढे येते त्यावेळी आपण अडचणीत असलो की मग "बघ मी म्हटलं नव्हतं नंतर मागेन म्हणून आणि तू आता ते घ्यायचं नाही म्हणतोयस!" आपण एकदम गपगार! चतुरंग
  • Log in or register to post comments
च
चित्रादेव गुरुवार, 02/12/2009 - 20:54 नवीन
वॅलेटाइन डे ही पाश्चात्य संस्कृती आहे. छे! हे अश्यानेच आपल्या भारतीय संस्कृतीचे दिवाळे निघतेय. काय गरज आहे असले कॉपी करायची आँ? ह्या असल्या शिं** उचलून घ्यायच्या सवयीनेच देश बोकाळलाय... :) रोज पत्नीशी गोड बोलत जा. तिच्या मनासारखे वागा/द्या. मग काय सगळे दिवस वॅलेनटाइन असेल. (असे सर्व काकवा सांगतात, मी नाही म्हणत). बरे, इथे काय तुम्हाला काय आवडेल द्यायला / घ्यायला / करायला ह्या पर्सनल गोष्टींची चर्चा करण्यासाठी बीबी आहे का? ;)
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 02/12/2009 - 21:18 नवीन
>>वॅलेटाइन डे ही पाश्चात्य संस्कृती आहे. छे! हे अश्यानेच आपल्या भारतीय संस्कृतीचे दिवाळे निघतेय. अहो देवकाकू , तुम्ही ३१ डिसेंबर साजरा करत असालच ना. तो पण आपला नववर्षदिन नाहिये. साजरा केला नाही तरी हॅपी न्यू ईयर अशी विश देतच असाल ना. मग तेव्हा नाही निघत का आपल्या भारतीय संस्कृतीचे दिवाळे? आणि वॅलेटाइन डे साजरा केला म्हणजे काय आपण आपले इतर सणवार , आपली संस्कृती विसरतो की काय? ;)
  • Log in or register to post comments
च
चित्रादेव गुरुवार, 02/12/2009 - 21:05 नवीन
अहो पक्या काका, पचकलात नीट न वाचता? ते स्माइली दिसत नाही का? ;)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/12/2009 - 21:23 नवीन
माफ करा पण, मलाही तुमची प्रतिक्रिया हा विनोद आहे, उपहास आहे की निषेध आहे हे नीटसं समजलं नव्हतं.... नुसत्या स्मायली टाकल्या म्हणजे शब्दांचा परिणाम कमी होत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रादेव
च
चित्रादेव गुरुवार, 02/12/2009 - 21:36 नवीन
पिवळा डँबीस, पहीले म्हणजे इथे नुसते शब्दातून अर्थ व्यतीत(काढले जातात) होतात. ना ओळख ना देख ना आवाजाच टोन व्यतीत होत नाही. तेव्हा सगळेच कठीण असते आणि प्रत्येक जण शब्दाचा काय अर्थ लावतो किंवा लावू शकतो हे सांगणे कठीणच आहे जरी स्माईली वापरल्या तरी. पण स्माईलींचा आतापर्यन्त जसा वापर केला गेलाय त्यावरून तर हाच अर्थ लावण्यात आला की लिहिलेले वाक्य हे कसे घ्यायचे आणि बहुधा त्याच साठी हे इमोट आयकन आहेत ना की ह्याचा टोन कसा आहे. बरोबर ना? कोणाला दुखवायचा हेतू न्हवता पण पक्या ह्यांनी जुन्या/ नवीन चा मुद्दा काढून नंतर स्माईली टकल्या आहेतच ना मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा? तेव्हा मी तरी इथे ही चर्चा थांबवते. मूळ मुद्द्यावर वळलेले बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/12/2009 - 21:43 नवीन
मी पक्या यांच्या प्रतिसादाविषयी काही म्हणत नाहिये... मला तुमच्या मूळ प्रतिक्रियेतील पहिला आणि शेवटचा परिच्छेद हा विनोद, उपहास आणि निषेध यापैकी काय आहे ते विचारायचं होतं.... कृपया सांगाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रादेव
च
चित्रादेव गुरुवार, 02/12/2009 - 22:01 नवीन
आता इथे हे समजावून सांगावे लागतेय.. असो. माझ्या स्माईली टाकून जर तुम्हाला समजले नसेल आणि नुकत्याच दिलेल्या पोस्टचे स्पष्टीकरण कळले नसेल तर लिहिते. सर्वात पहील्या प्रतीसादातील पहीले वाक्य हे निव्वळ विनोदाने लिहिलेय. अशीच एक प्रतीक्रीया एकली होती एका व्यक्तीकडून ह्याच विषयावर म्हणून गमतीत लिहिले. शेवटचे वाक्य हे असेच जरासे उपहासाने लिहिले.. कारण कितपत खाजगी गोष्टी इथे लिहू शकतो आणि हे विचारायचे कारण तसा इथेच 'मनातील गोष्ट वगैरे' उल्लेख वाचला म्हणून. बाकी काही दर्शवायचे न्हवते. आता तुम्ही पण दोन प्रश्णांची उत्तरं द्याल का? कारण तुम्ही माझे पोस्ट हे जाणून / समजावून घेण्यामागे काय हेतू आहे? तुम्ही एवढे अट्टाहास करताहेत की माझ्या पोस्टचा अर्थ जाणून घेण्यात म्हणून मला ही हा एक प्रश्ण आहे पडला आणि दुसरा प्रश्ण हा आहे के ह्या लेखावर फक्त सीरीयसच टीपणी (कमेंटस)अपेक्षीत आहे का? मीच कंटाळले इथे उत्तर देवून.. काय एक साधेसे वाक्य लिहिले स्माईली टाकून नी त्याचा काथ्याकूट चाललाय.... :( (अरे बापरे, पुन्हा मी स्माइली टाकली. आता पुन्हा प्रश्ण येणार का कोणाकडून की ह्याचा अर्थ काय? स्माइलीने शब्दांचे परीणाम बदलले/बदलले नाहीत).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/12/2009 - 22:13 नवीन
सर्वात पहील्या प्रतीसादातील पहीले वाक्य हे निव्वळ विनोदाने लिहिलेय. अशीच एक प्रतीक्रीया एकली होती एका व्यक्तीकडून ह्याच विषयावर म्हणून गमतीत लिहिले. शेवटचे वाक्य हे असेच जरासे उपहासाने लिहिले.. कारण कितपत खाजगी गोष्टी इथे लिहू शकतो आणि हे विचारायचे कारण तसा इथेच 'मनातील गोष्ट वगैरे' उल्लेख वाचला म्हणून. बाकी काही दर्शवायचे न्हवते. ओके. स्पष्टीकरणाबद्दल आभार. आता तुम्ही पण दोन प्रश्णांची उत्तरं द्याल का? जरूर! कारण तुम्ही माझे पोस्ट हे जाणून / समजावून घेण्यामागे काय हेतू आहे? कारण माझ्याच मूळ लिखाणावर हा धागा सुरु झाला आहे. बाकीचे पोस्ट समजले. तुमचा समजला नाही. आपल्या लिखाणावर जर कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली तर ती 'काय' केली हे जाणून घ्यावेसे वाटले. म्हणजे पुढील लिखाणात मला सुधारणा करता येईल हा उद्देश! दुसरा प्रश्ण हा आहे के ह्या लेखावर फक्त सीरीयसच टीपणी (कमेंटस)अपेक्षीत आहे का? मुळीच नाही! इथे कोणत्याही प्रतिक्रियेचं, मग ती सिरियस, विनोदी, अनुकूल, प्रतिकूल कशीही असो, स्वागतच आहे... फक्त लोकांना व्यवस्थित समजली जाणं महत्वाचं, नाही का? असो. माझं शंकानिरसन तुम्ही केलंत त्याबद्दल आभार. होपफुली तुमच्या दोन प्रश्नांना मी दिलेली उत्तरंही समाधानकारक असावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रादेव
च
चित्रादेव गुरुवार, 02/12/2009 - 22:18 नवीन
अच्छा! आवडला हो तुमचा हेतू नी ओवरऑल अप्रोच प्रतीक्रीया जाणून घ्यायचा. असो. आता गाडी मुद्द्याकडे (मूल लिखाणाकडे) वळायला हरकत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 02/12/2009 - 22:35 नवीन
जरूर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रादेव
प
पक्या गुरुवार, 02/12/2009 - 21:17 नवीन
नविन सभासद सदस्यत्व घेऊन १-२ दिवस किंवा काही तासच झाले नसतील तरी लगेच भांडण्याच्या मूड मध्ये का येतात 'देव' जाणे? ;) (ह्.घ्या. हं)
  • Log in or register to post comments
च
चित्रादेव गुरुवार, 02/12/2009 - 21:22 नवीन
हो तेच ना, इथे नवीन जुन्याचा संबध कशाला लावता हो? पण काय आहे ना तुमच्यासारखी जुनी सभासद लोकं, आधी नवीन आहे का सभासद बघून उगीच असे कारण नसताना त्या सभासदाची पोस्ट नीट पणे न वाचता खवचट पणे लिहितो तेव्हा होते असे. असो. तुम्ही पण हलकेच घ्या... :) (तुम्ही पण कधी काळी नवीन होतात ना...)
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 02/12/2009 - 22:24 नवीन
दागिने: ही त्यातल्यातात सेफ भेट!!. ???? अहो पिडाकाका .. असल्या भेटीनं आमचं 'सेफ' डिपौझिट अन'सेफ' होत हो! मागच्या वेळी आम्ही डोक्यावर दगड ठेउन खिसा मोकळा करुन एक लेटेस्ट डिझाईन घेतलं होतं. आता ते जुनं झालं आहे असा कालच किचन मधुन आवाज आला. आता काय पुन्हा डोक्यावर दगड ठेवावा लागणार :S सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
च
चित्रादेव गुरुवार, 02/12/2009 - 22:29 नवीन
मला तर वाटते की ललनांना भेटवस्तूबरोबरच एकदम सुंदर ठीकाणी बीच / आयलंड वर दिवस घालवणे सगळ्यात मस्त. :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 02/13/2009 - 13:27 नवीन
मोठ्या कठीण प्रश्नाला क्यालिफोर्नियापीठासनाधीश श्री.श्री.श्री. पिवळा डांबिसाचार्य १००८ ह्यांनी वाचा फोडली आहे. ह्या गहन प्रश्नावरील त्यांनी सुचवलेले उपायही केवळा अप्रतिम आहेतच. :) ह्यॅ: काय तिच्याआयला, आपल्याला गंभीर वगैरे होणं जमतच नाहीय्ये :( मरुदे, आपलं माणसासारखंच बोलतो. अहो, ही गिफ्ट घेणं म्हणजे काय डोक्याला शॉट्ट असतो राव. पण गेल्या वर्षापासून आम्ही डोकं लढवलंय(!) शॉपींगच्या वेबसाईट्सवर जायचं, त्या मार्केटिंगवाल्या लोकांचं डोकं लय भारी चालतं, त्यांनी मस्त विचार करुन नव्या नव्या गिफ्ट्स शोधलेल्या असतात त्यातलंच खिशाला जे झेपेल ते उचलायचं आणि मस्त गिफ्ट पॅक करुन, एखादं झक्कास ग्रिटींग कार्ड जोडून तिच्या नावावर कुरियर करायला सांगायचं...हां, हे करताना आधी आठवडाभर "काही गिफ्ट नाही आणि काही नाही, आजिबात हे प्रकार मी करणार नाही" असली बडबड करुन गाफील ठेवायला मात्र विसरायचं नाही. :) गेल्या वर्षी मला एक मस्त गिफ्ट सापडलेलं: एक गळ्यात घालायची साखळी+उघडता येण्याजोगं पेंडंट्+एक शिंपला! गडबडलात ना वाचुन? अहो हीच त्या मार्केटिंगवाल्यांची शक्कल :) त्याशिंपल्यात एक मोती बंद करुन ठेवलेला होता. शिंपला उघडायचा, त्यातला मोती काढायचा, पेंडंटमध्ये ठेवायचा आणि ते पेंडंट साखळीत ओऊन तिच्या गळ्यात घालायचं :) बेष्ट आहे की नाही ही आयडीयाची कल्पना? **ह्या वर्षी काय देणार ते आम्ही नाही सांगणार! गम्मत आहे एक!!!!! ;) ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 02/13/2009 - 18:03 नवीन
मस्त गिफ्ट पॅक करुन, एखादं झक्कास ग्रिटींग कार्ड जोडून तिच्या नावावर कुरियर करायला सांगायचं... वर इतक्या लोकांनी कायकाय गिफ्ट द्यायच्या ते सांगितलं... पण स्वतःच्याच बायकोला गिफ्ट "कुरियर" करणारा हा पहिलाच बहाद्दर!!!!! लेका, तू पाठवलेलं एखादं मस्त गिफ्ट बघून बायको इतकी आनंदित होईल की त्या आनंदाच्या भरात कदाचित त्या कुरियरवाल्याचाच मुका घेईल!!!! सांभाळ रे बाबा!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 02/16/2009 - 06:54 नवीन
=)) येकदम डांबिस प्रतिक्रिया!!!!!!!! अहो पण काका, ते कुरियर मी आणि ती ज्यावेळी घरी असु त्याच वेळी मिळेल अश्या पध्दतीने घरपोच करायच्या सुचना देतो मी. म्हणजे ती संध्याकाळपर्यंत रागारागाने फणफण करत बसते आणि आलेलं पार्सल उघडुन पाहिलं की एकदम 'सरप्राऽऽईझ्झ्झ' :) मग काय, एकदम 'आनंदी आनंद गडे...' ;) हाय का ना मी एकदम हुशार? ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
श्रीरंग_जोशी Mon, 02/03/2014 - 18:25 नवीन
व्हलेंटाईन डे जवळ येतोय म्हणून हा लेख वर आणतोय. होऊ दे भेटवस्तूंवर खर्च :-).
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 02/04/2014 - 03:36 नवीन
या २१ डॉलरमध्ये किती पापलेटं आली असती माहितीये!!!" असा एका सिकेपीकाकूकडून एकदा अहेर मिळाला होता.....
पिडांकाका, कोणत्या सिकेपीकाकूंना व्हॅलेंटाईन गिफ्ट दिली होतीत ..?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 02/04/2014 - 07:25 नवीन
जी आता मिसेस पिवळी डांबिसीण आहे, तिला.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
त
त्रिवेणी Tue, 02/04/2014 - 05:18 नवीन
कालच वर्सोली बीचवर जावून आलो, नवरा म्हणाला हेच व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे(14,15 फेबचे सगळीकडे बूकिंग फुल्ल होते).पण त्यादिवसाठी पण काहीतरी गिफ्ट हवेच ना? Image removed.
  • Log in or register to post comments
उ
उपाशी बोका Wed, 02/05/2014 - 05:08 नवीन
पण त्यादिवसाठी पण काहीतरी गिफ्ट हवेच ना?
मग व्हॅलेंटाईनच्या दिवशीपण वर्सोली बीचवर जावून या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
प
प्यारे१ Tue, 02/04/2014 - 08:27 नवीन
काकांचा सल्ला हे सदर मिपावर फार आधीपासून सुरु आहे म्हणा की!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/06/2014 - 06:42 नवीन
वाचनखूण साठवलेली आहे ;)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 02/08/2014 - 20:43 नवीन
१) गर्लफ्रेंडला फोन करुन विचारा तिला वॅलेंटाईन डे ला काय गिफ्ट हवय २) फ्लिपकार्ट ओपन करा , ते गिफ्ट करेदी करा , गर्लफ्रेंडचा पत्ता वगैरे डीटेल्स द्या ३) पेमेन्ट ऑप्शन्स मधे "कॅश ऑन डिल्हीवरी " सिलेक्ट करा . :D
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री Tue, 02/11/2014 - 22:14 नवीन
एक whatsapp वर आलेला मेसेज इथे देत आहे.:) आम्ही( मी आणि आमचं प्यांटवालं) डेज साजरे करत नाही. On this Valentines day take resolution to save the Nature ,Plants & Trees "Avoid Roses Use Diamonds" Lets pass this to all husband... ;) :D
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Tue, 02/05/2019 - 02:58 नवीन
.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/07/2019 - 09:20 नवीन
Gift काही पण चालेल अगदी ऐक गुलाबाच फुल सुधा चालेल . महत्वाचं आहे तुमचं त्या व्यक्ती वर स्वार्थी प्रेम आसू नये . आणि पाहिलं स्वतःच्या मनाला विचार काय अपेक्षा ठेवून आपण प्रेमाचा बाजार मांडतोय . जेवढ्या अपेक्षा आणि स्वार्थ मोठा तेवढीच मोठी गिफ्ट घेणारे आणि देणारे दोघांना हवी आस्ते ,बघा तुम्ही कशात bastay
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 02/08/2019 - 13:31 नवीन
आता मज्जा येणार काका !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा