जनातलं, मनातलं

वाळणताई डे

Primary tabs

[एका चीनी प्रवाशाच्या डायरीतले संदर्भ- त्याने २० व्या शतकात भारतखंडाचा प्रवास केला होता- त्यातील एका प्रसंगाचे हे मराठी भाषांतर] दुनिया झुकती है, झुकानावाला पाहिजे असे संत लखोबा लोखंडे ह्यानी म्हंटले आहेच. मल्टीनॅशनल कंपन्यांनी वात्सायनाच्या भारतदेशाला प्रेम करायला शिकवले. आम्ही *सांस्कृतिक आक्रमण* वगैरे म्हणतात ते हेच असे बरेचदा लोकांना सांगुन पाहिले पण फुकटचे सल्ले लोकांना नको असतात असे सिद्ध झाल्यामुळे ते थांबवले. त्यांनी आम्हाला मोराल पोलिसींग करतोस असे म्हणून एक बेक्कार लूक दिला. मल्टीनॅशनल कंपन्यांनी त्याचे ग्रिटींग कार्डे, इतर वस्तु विकण्यासाठी "वाळणताई डे" (वाळणताई बंगाली आहे) असे पात्र निर्माण केले व तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी १४ फ़ेब्रु अशी तारीख निवडली. ते पात्र वात्सातयनापेक्षा पॉवरबाज झाले. अचानक भारतीय लोकांना प्रेम करण्यासाठी वर्षातला एक दिवस तरी असावा असे वाटु लागले, कारण त्यांना कामात बुडून गेल्यामुळे प्रेमात बुडण्याची आठवणच राहात नाही. [भारतीय लोकांनी लगेच त्यातून चुर्चूरीत विनोद निर्मीती करुन १४ नोव्हेंबर (बाल्दिन) कसा बरोबर ९ महिन्यांनी येतो असे सांगितले.] वाळणताई डे मुळे गुलाबाची फुले खूप विकली जातात आणि त्याचा भारतीय शेतकऱ्यांचा खूप फायदा झाला असे एक कारण पुढे करुन मल्टीनॅशनल कंपन्यांनी व्यापारी व शेतकऱ्यांना कामधंदा दिला. रॊडरोमियो व रोडज्यूली ह्यादिवशी नटुन-थटुन फुलांची व इतर भेटींची देवाण-घेवाण करतात. ह्यामुळे कपडे व्यापारीही खूष असतात असे कळते. [अपूर्ण. डायरीतील पुढची पाने खराब झाली आहेत]
टारझन

टिंग्याला त्रास झाला वाटते =))

सिद्धेश

खूपच त्रास झाला.

आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका |
पित्रुभू: पुण्यभू:श्चैव सः हिन्दु इति एव स्मृतः ||

कपडे व्यापारी खूष असतीलही पण कापड उत्पादक मात्र बिलकूल खूष नाहीत. हल्ली कपड्याचा खप वाढला आहे पण कापडाचा नाही अशी तक्रार करत असतात असे ऐकले.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विसोबा खेचर

भारतीय लोकांनी लगेच त्यातून चुर्चूरीत विनोद निर्मीती करुन १४ नोव्हेंबर (बाल्दिन) कसा बरोबर ९ महिन्यांनी येतो असे सांगितले.

मस्त! :)

अहो चालायचंच! तेवढीच एक दिवस मजा! तसं प्रत्येकजण वर्षभरच प्रेम करत असतो पण एखाद दिवशी जरा प्रेमाच्या नावावर पेश्शल मज्जा करायची, आपल्या आवडत्या स्त्रीला भेटायचं, वगैरे वगैरे..!

तात्या व्हॅलेन्टाईन.