जनातलं, मनातलं
ही कविता हवी आहे. मिळेल का?
Primary tabs
मित्रांनो,
मला ह्या चार ओळी मिळाल्या आहेत. पूर्ण कविता कोणाकडे आहे का? कवितेच्या ठेवणीवरून 'ग्रेस' यांची असावी असं वाटतयं.
जरा दूर जाती चरायास गाई, पुढे रान नाही हवे तेवढे
तुझ्या स्वप्नबांधावरी सांग आई, कुणी फोडले जोगिणींचे चुडे?
सालो
''जरा दूर जाती चरायास गाई, पुढे रान नाही हवे तेवढे'' चा दुवा आमचे स्नेही धोंडोपंताच्या ब्लॉगवर घेऊन जातो.
ब्लॉगवर धोंडोपंत उवाच म्हणून ज्या काही ओळी दिसतात. त्याच जर आपणास हव्या असलेल्या कवितेच्या ओळी असतील तर त्यांना विचारुन सांगतो...कविता कोणाची आहे ती.
-दिलीप बिरुटे
(मिपावर धोंडोपंताची आठवण करणारा)
त्यांच्या ब्लॉगवर उजवीकडे छायचित्रे आहेत. त्यात खाली गायींच्या चित्राला या ओळी दिल्या आहेत.
ही कविता मिळाली तर येथे लिहा..कविता वाचायला आवडेल.
-- लिखाळ.
बरोबर! तीच कविता हवी आहे. मिळाल्यास आनंद होइल.
सालो
ही कविता कवी ग्रेस यांची असावी , शीर्षक "चुडे". "चंद्रमाधवीचे प्रदेश" या संग्रहात बहुदा मिळावी.
हेच म्हणतो... पण संग्रहाचं नाव नाही आठवत मला ही !
***********************
वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ...
भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा