पाककृती

चिंचेची कढी

Primary tabs

साहित्य : बुंदिच्या लाडवा एवढी चिंच कांदा, लसुण, मिरची, कोथिंबिर बारिक चिरुन फोडणिसाठी हिंग, हळद, जिर चविपुरते मिठ आणि गुळ कृती : चिंचेमध्ये १ ते १/२ किंवा गरजे एवढे पाणी टाकुन खुळुन घ्यावी. तेल गरम करुन त्यात हिंग, हळद आणि जिर्‍याची फोडणी द्यावी. आता फोडणिवर चिंचेचे पाणी टाकावे व वरुन चिरलेले कांदा, लसुण, मिरची, कोथिंबीर टाकावी नंतर चविपुरते मिठ व गुळ घलावे. फक्त वाफ येइपर्यंत गरम करावे. उकळी यायच्या आधी गॅस बंद करावा. झाली तुमची चिंचेची कढी तयार. सुचना : ह्या कढित जर आंबटपणा कमी आला असेल तर थोडे लिंब पिळावे. ही कढी नॉनव्हेज बरोबर पण छान लागते.
समिधा

नविन प्रकार वाटला करुन बघेन. :)

अभिष्टा

१ ते १/२ काय? कप का? आणि कांदा, लसूण, मिरची फोडणीत नाही का टाकायची? करुन बघितली पाहिजे :-)
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा

जागु

१ ते १/२ काय?
चिंचेच पाणी
आणि लसुण, कांदा, मिरची फोडणीत नाही टाकायची त्याचि कच्चीच चव ह्या कढीत चांगली लागते आणि वासही छान येतो.

अभिष्टा

बरं बरं :-)
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

नाटक्या

बोलाची कढी (आणि बोलाचा भात) माहीत होते, चिंचेची कढी हे प्रकरण जरा वेगळे वाटते आहे.

- नाटक्या

अभिष्टा

ती चिंचेच्या भाताबरोबर घ्यायची. यु नो ! टॅमरिंड करी विथ टॅमरिंड राईस. होक्कीनै गं जागू ;)
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

केदार_जपान

हा खूपच लवकर होणारा, सोपा प्रकार वाटत आहे... ;).आणि चमचमित सुद्धा.
आजच करतो!!

---------------
केदार जोशी

लवंगी

आम्ही पण हि कढी बनवतो.. थोड्या वेगळ्या प्रकारे. मी गुळाएवजी साखर घालते छोटा चमचा.. फोडणीला काळिमिरी ठेचून घालतो.

मृगनयनी

जागु,

मस्त आहे गं.. ही चिन्चेची कढी!

:)

तुझ्याकडुन अजुन पा. कृ. साठी उत्सुक,
-
मृगनयनी.

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||