Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उर्जेचा वापर...

ब
बाप्पा
Wed, 02/18/2009 - 12:37
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2726 वाचन

💬 प्रतिसाद (7)
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 02/18/2009 - 12:57 नवीन
आपले कार्यालय घरापासुन जवळ असेल तर शक्यतो गाडी चा वापर करु नका चालत जा जास्तित जास्त चाला त्याने आपले ह्यदय मजबुत होईल (शक्य नसल्यास सार्वजनीक वाहनाचा वापर करा) घरात कमी दिव्यांचा वापर करा जास्त TV VCD पाहु नका कमीत कमी भ्रमणधव्नी वापरा अन्न शिजवताना प्रेशर कुकरचा वापर करा ( स्वयपाकाचा गॅस वाचेल ) ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 02/18/2009 - 13:07 नवीन
१ पाणी गॅसवर तापवा/ गॅस गीझर लावा. २ इन्व्हर्टर वापरू नका ३ पुण्याचे आहात. घरी ए सी लावला असेल तर तो काढून कूलर लावा खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 02/18/2009 - 13:16 नवीन
या संदर्भात बरेच काही आहे जे सहज शक्य आहे. वेळे अभावी थोडक्यात काही मुद्दे: करता येण्यासारख्या गोष्टी:
  1. काँप्युटर आणि त्याला लागून असलेली इतर साधने बंद करणे. हल्ली अशा काही एक्स्टेंशन कॉर्ड मिळतात की ज्याला उपकरणे लावली असता केवळ काँप्युटर बंद केला की इतर सर्व उपकरणे (प्रिंटर, फॅक्स, मॉनिटर इत्यादी) आपोआप बंद होतात.
  2. दिवसात सतत काँप्युटरचा वापर होत असल्यास त्यात स्क्रीनसेव्हर ऐवजी ब्लँक स्क्रीन काही मिनटात होईल अशी व्यवस्था करा. त्याने मॉनिटरचे आयुष्यपण वाढू शकते.
  3. सेलफोन वगैरे उपकरणे जेंव्हा चार्जर वरून काढाल तेंव्हा तो चार्जरपण बंद करा नाहीतर उर्जा जळतच राहते.
  4. एसी/कुलर चालू असल्यास खिडक्या/दारे बंद ठेवा.
  5. सोलार हिटींग वगैरे वापरता आले तर अवश्य वापरा. करसवलती पण मिळू शकतात.
  6. काँपॅक्ट फ्ल्युरोसंट बल्बज वापरा.
---- अजून आठवल्यास नंतर लिहीन. करायला अवघड गोष्टः मिपावर कमी वेळ रहा. ;)
  • Log in or register to post comments
अ
अमोल नागपूरकर Wed, 02/18/2009 - 13:19 नवीन
१)तुम्हाला काम नसेल तेव्हा तुमचा पीसी /लैपटोप शट डाऊन करा. तसेच गरज नसेल तेव्हा दिवे, पंखे आनि इतर विजेची उपकरणे बन्द ठेवा. २)तुमच्या एसी चे टेम्प सेटिन्ग २५ अंशान्वर ठेवा. ३) औफिसला जाताना कार पूलीन्ग चा उपयोग करा. ४) सी एफल दिव्यान्चा उपयोग करा.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 02/18/2009 - 13:56 नवीन
सी एफल दिव्यान्चा उपयोग करा ही सूचना सगळीकडे सांगितली जाते. पण तुम्ही ट्यूबलाईट वापरत असाल तर त्याचा फार काही उपयोग नाही. हां मात्र ट्यूबला इलेक्ट्रॉनिक चोक लावऊन घ्या. सामान्यतः खेडेगावात फिलॅमेंट बल्ब लावण्याची पद्धत असते तेथे सी एफ एल ने फरक पडतो. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल नागपूरकर
अ
अमोल नागपूरकर Wed, 02/18/2009 - 13:22 नवीन
ऊर्ज बचतीचे अनेक उपाय Buerau of Energy Efficiency च्या तसेच इतरही साइट्सवर दिलेले आहेत. १. फ्रिजमधून एकदम गॅस (का गैस?)वर किंवा गॅसवरुन फ्रिजमधे असं करु नका. पदार्थ रूम टेंपरेचरला आल्यावर मग गॅसवर किंवा फ्रिजमधे ठेवा. २. मायक्रोवेव्ह अव्हनमधे पदार्थ गरम करण्यापेक्षा गॅस वापरा. ३. लिफ्टऐवजी शक्यतो जिनेच वापरा. शरीरासाठीही ते चांगलंच.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/18/2009 - 13:50 नवीन
http://www.misalpav.com/node/5189#comment-76303 हा धागा आणि तिथे मीही असाच प्रतिसाद दिला होता. :-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल नागपूरकर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा