जनातलं, मनातलं

काही ग्राफिटी'ज

Primary tabs

नमस्कार मंडळी पुण्याच्या सकाळ पेपरमधल्या "ग्राफिटी " हा प्रकार तुम्हाला परिचित असेलच. मी काही ग्राफिटी तयार केल्या आहेत, त्या अशा : १. कुठल्याही अवघड गोष्टीच 'बाळंतपण' हे 'जीव' काढणारं असतं २. टोपी घालायला 'डोकं' लागतं. ३. जागतिक मंदीची लाट सध्या ' तेजीत ' आहे.

आवडली.
अजूनही काही चांगल्या सुचतील या शुभेच्छा.
-------------
'सकाळ' पेपरमधले ग्राफिटीकार हे मिपाकर आहेत -- "आपला अभिजीत" हा त्यांचा आय. डी.

गणपा

हेच म्हणतो.

आवांतर :
'सकाळ' पेपरमधले ग्राफिटीकार हे मिपाकर आहेत -- "आपला अभिजीत" हा त्यांचा आय. डी.
अरे वा.. हे माहित नव्हत.

गणपा

राज-निती

'मिसळपाववर' मी नविनच सदस्य आहे. आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद. आपलेही काही साहित्य मिपावर असेल तर जरूर कळवावे. अजून काही ग्राफिटी मी लवकरच देत आहे.
राजनिती.

पक्या

मलाही दुसरी आणि तिसरी आवडली.

अभिज्ञ

ग्राफिटि ला मराठी शब्द काय?

अभिज्ञ.

ग्राफिटि ला मराठी शब्द काय?
गारपीट

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

विंजिनेर

ग्राफिटि ला मराठी शब्द काय?

चिताडणे - जर नकारात्मक अर्थाने वापरायचा असेल तर.
रेखाटणे - जर कलात्मक अर्थाने वापरायचा असेल तर.
--
आक्षरास हासून ये

शिवापा

पुर्वी मराठी अम्रूत मासिकात असल्या ग्राफिट्या यायच्या. त्यांनी त्याला फुलबाज्या शब्द वापरला होता. फुलबाज्या शब्द त्यामानाने बरा वाटतोय मलातरी