पाककृती

राजमा

Primary tabs

सहित्य - राजमा १ वाटी (कॅन असतील तर १५ oz चे २ ) २ लहान कांदे - बारिक चिरलेले १ टोमॅटो- बारिक चिरलेला १ चमचा धने-जीरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला १ चमचा तिखट १ चमचा आल-लसूण पेस्ट पाउण वाटी आंबट दही चवीनुसार मीठ २ मोठे चमचे तेल बारीक कापलेली कोथिंबीर फोडणीचे साहित्यः- मोहरी, जिरे, हिंग, हळद, १) राजमा अधल्या दिवशी भिजत घालावा (कॅन असतील तर ही स्टेप टाळावी हे सांगण्याची गरज नाही) २) राजमा दु प्पट पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्यावा ३) कढईमध्ये तेल गरम करुन मोहरी, जिरे घालावे ४) बारिक चिरलेला कांदा फोडणीत टाकावा, गुलाबी होईस्तोवर परतावा, आल-लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट, धने-जीरे पावडर, हळद घालून खमंग परतावे. नंतर त्यात दही घालावे व नीट मीक्स करावे. शेवटी टोमॅटो घालून परत खमंग परतावे. ५) तेल बाजूला सुटले की राजमा घालावा. गरजेनुसार पाणी व मीठ घालावे. १० मिनीटे मंद गॅसवर उकळू द्यावे. कापलेली कोथिंबीर टाकून सजवावे. टीप - राजमा आंबट चांगला लागतो. दही आंबट नसल्यास १ चमचा आमचूर पावडर टाकावी. Image removed.
जागु

मिथिला छान आहे तुझी रेसिपी. मी राजम्यामधे दही ऐवजी कांदा शिजला की त्यावर बारिक चिरलेला टोमॅटो टाकुन स्मॅश करते. आता दही घालुन करेन.

केळ्या

तसेही राजमा रात्रभर भिजून होईपर्यंत उपास सुटलेला असेल.
छानच.मी दही वगळून घोटलेली साय घालतो.मस्त लागते.

मितालि

मस्त कल्पना आहे.. आजच राजमा भिजत घालते :)

विसोबा खेचर

तात्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले..!

पाकृ आणि फोटू सुंदर..! :)

तात्या.

अवलिया

पुनर्जन्म घेवुनी आलो :)
सुंदर........:)

--अवलिया

अवलिया

परमेश्वराची लीला अगाध आहे ....
तोच मारक तोच तारक
तोच रक्षक तोच भक्षक

हर हर महादेव !!!!!

--अवलिया

शाल्मली

फोटो आणि पाकृ. दोन्ही मस्त आहे.
अजून येऊ दे..

--शाल्मली.

मिथिला

सर्व खवय्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :)

गोगलगाय

फोटो अगदी छान. अस वाटतं की चमचा घालावा अन वाढून घ्याव..