साहीत्य :
१ मोठा कांदा, टोमॅटो प्युरी,
८-१० काजु, मटार, पनीर ,
आलं-लसूण पेस्ट, जीरे
हळद, तिखट, मीठ, तमालपत्र,कसुरी मेथी, दालचिनी पुड
कृती :
प्रथम पनीरचे तुकडे करून बटर मधे शॅलो फ्राय करणे..
काजु पाण्यात वाफवून त्यांची पेस्ट करणे..
कांदा तेलात परतून त्याची प्युरी करणे.
( मी तेलात न परतता केली. कधी कधी कडूसर चव येते म्हणून आधी परतून घ्यावा.. )
एकीकडे बटर चांगले तापवून त्यात जीरे,हळद, तिखट, तमालपत्र घालावे..
नंतर कांद्याची प्युरी,आलं-लसूण पेस्ट घालून जरा वेळ परतणे.
टोमॅटो प्युरी आणि काजुची पेस्ट मिसळणे.
जेव्हढी दाट ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात पाणी घालून उकळी आणणे.
मटार, दालचिनी पूड, कसूरी मेथी मिसळणे.
मी थोडी वेलदोड्याची पूडही घालते. स्वाद मस्त येतो!
सर्वात शेवटी पनीर मिक्स करणे..
मग काय .. पोळी,नान किंवा भाताबरोबर मिटक्या मारत खाणे!! :)
मटार म्हणजे वाटाणा ...
पण वाटाणा पनीर ऐकायला छान नाही वाटत म्हणून उत्तरेची डिश जशीच्या तशी नावासकट आपल्याकडे आली :)
बाकी मटर पनीर माझी पण आवडती भाजी आहे.... भाजी फोटोवरुनच कळते की एकदम चविष्ट झाली असणार...
पाककृतीसकट फोटो दिल्याबद्दल धन्यवाद भाग्यश्री... आता या आठवड्यात आमच्या घरी मटर पनीर नक्की होणार :)
तशी मला सगळ्यात जास्त आवडते ती व्हेज कोल्हापुरी. त्याची पाककृती पण देता आली तर छान होईन.....
इकडे बंगळूरात तेवढी टेस्टी भाजी नाही मिळत., पण मिसळपावच्या पाककृतींची माझी बायको भक्त असल्याने थोडीफार चैन होते :)
पण चविष्ट भाजी तयार करण्यासाठी प्रमाण एकदम योग्यच लागते असे म्हणतात.
पुण्यातही अनेक हॉटेलांत मी ही भाजी चाखली आहे. पण खूप कमी ठिकाणी उत्कृष्ट आणि चवदार व्हेज कोल्हापुरी मिळाली
बालगंधर्वच्यासमोर गंधर्व मधे , जंगली महाराज रस्त्यावर पांचाली व कामत आणि बाजीराव रस्त्यावरच्या गणराज हॉटेलात चांगली मिळाली... बाकी बर्याच ठिकाणी तेवढी टेस्टी नाही मिळाली...
अवांतरः भाग्यश्री , ब्लॉग छान आहे पण इथे केलेले लेखन तिथेही टाकत जा... इथली मटर पनीर तिथे नाही दिसली :)
तुमच्या कार्यक्षेत्रातील गोष्ट मी तुम्हाला काय सांगणार :)
अहो भाग्यश्री, माझा हेतू असा होता की तुम्हीही व्हेज कोल्हापुरी घरी करुन बघावी... हॉटेलापेक्षा घरची व्हेज कोल्हापुरी छान असते... एवढेच म्हणायचे होते ...
मला तरी नाही जाणवला.. मी कच्चेच घेऊन प्युरी केली आहे. परंतू असे वाचले आहे की कच्चा घेतला की कांदा कडूसर लागतो.. जाणकारच सांगतील.. :)
काजु तसेच घेतले तर चवीत नाही पडणार फरक,परंतू दाताखाली येतात छोटे तुकडे..
>>खपलो, गचकलो, टपकलो!
बरे झाले खपलास ते, एक मात्र बरे आहे नुसते फोटो बघुन तु गचकत असशील तर मग नेहमी तुझ्या खव मध्ये पाककृतीचे फोटो दाखवुन तुला टपकवण्यात तुला मदत करेन. ;)
भाग्यश्री,
फोटो आणि पाककृती मस्तच. :)
कांदा तेलात परतुन घेऊन मग बारीक केल्यावर कांद्याचा उग्र वास त्या ग्रेव्हीला येत नाही म्हणुन.
कारण येथे यु.एस. मध्ये कांदे मिळतात त्यात ओलसरपणा जास्त असतो ऍज कम्पेअर टु इंडिया त्यामुळे. येथे कांदाच्यी पेस्ट करताना तो तेलात परतलेलाच बरा असे मला वाटते. :)
शितल, असे कारण आहे का? बरे झाले सांगितलेस!
सूर्य टोमॅटो प्युरीनी तो रंग येतोच! किंचित फुड कलरही टाकता येईल..
वेताळ, माहीत नाही. पण करायला काय हरकत आहे! मी बर्याचदा असंच काहीतरी करून, त्याला वेगळं नाव देऊन वाहवा मिळवते! :))
बाकी सर्वांचे खूप धन्यवाद! जे इहलोक सोडून गेले त्यांना मटर पनीर खाऊन मोक्ष मिळाला असावा अशी आशा करते..:)
वा !
आपली आवडती डिश !
* मटार की मटर :?
मटर पनीर हा शब्द योग्य आहे.
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
ह्म्म.. मी तिथेच अडखळले होते.. मराठी मधे मटार म्हणतात असे वाटल्याने मटार लिहीले..
http://bhagyashreee.blogspot.com/
मटार म्हणजे वाटाणा ...
पण वाटाणा पनीर ऐकायला छान नाही वाटत म्हणून उत्तरेची डिश जशीच्या तशी नावासकट आपल्याकडे आली :)
बाकी मटर पनीर माझी पण आवडती भाजी आहे.... भाजी फोटोवरुनच कळते की एकदम चविष्ट झाली असणार...
पाककृतीसकट फोटो दिल्याबद्दल धन्यवाद भाग्यश्री... आता या आठवड्यात आमच्या घरी मटर पनीर नक्की होणार :)
तशी मला सगळ्यात जास्त आवडते ती व्हेज कोल्हापुरी. त्याची पाककृती पण देता आली तर छान होईन.....
इकडे बंगळूरात तेवढी टेस्टी भाजी नाही मिळत., पण मिसळपावच्या पाककृतींची माझी बायको भक्त असल्याने थोडीफार चैन होते :)
(चविष्ट भोजनाचा भोक्ता) सागर
मी कधी केली नाहीए अजुन... मीही नवीनच स्वैपाकी झाले आहे हो!
करून पाहीन, चांगली झाली तर नक्की देईन...
http://bhagyashreee.blogspot.com/
पण चविष्ट भाजी तयार करण्यासाठी प्रमाण एकदम योग्यच लागते असे म्हणतात.
पुण्यातही अनेक हॉटेलांत मी ही भाजी चाखली आहे. पण खूप कमी ठिकाणी उत्कृष्ट आणि चवदार व्हेज कोल्हापुरी मिळाली
बालगंधर्वच्यासमोर गंधर्व मधे , जंगली महाराज रस्त्यावर पांचाली व कामत आणि बाजीराव रस्त्यावरच्या गणराज हॉटेलात चांगली मिळाली... बाकी बर्याच ठिकाणी तेवढी टेस्टी नाही मिळाली...
अवांतरः भाग्यश्री , ब्लॉग छान आहे पण इथे केलेले लेखन तिथेही टाकत जा... इथली मटर पनीर तिथे नाही दिसली :)
अहो, मला व्हेज कोल्हापूरी माहीतीय! फक्त घरी नाही केली..
धन्यवाद ब्लॉगवरील कमेंट्स साठी... तिथले बरेच इथे नसते, व इथले तिथे ! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
तुमच्या कार्यक्षेत्रातील गोष्ट मी तुम्हाला काय सांगणार :)
अहो भाग्यश्री, माझा हेतू असा होता की तुम्हीही व्हेज कोल्हापुरी घरी करुन बघावी... हॉटेलापेक्षा घरची व्हेज कोल्हापुरी छान असते... एवढेच म्हणायचे होते ...
चू.भू.देणे घेणे :)
तिथले बरेच इथे नसते, व इथले तिथे
हे बाकी छान.. दोन्हीकडे नाविन्य ;)
मटार आणि वाटाणा यात फरक नसतो? मला आत्तापर्यंत वाटायचा.
फोटो मस्त आलाय.
पाकृ.पण झकास आहे. बघुन लगेच करावी वाटली ,उद्या काय करायच हा प्रश्न सोडवलास. ;;)
नाहीतरी विचारच करत होते उद्या कुठली भाजी करु म्हणुन :?
चेहेर्यावर एक समाधान, तृप्री आणि,
म टार प नी र...!
असं काहीसं अडखळत अडखळत पुटपुटतच तात्यासाहेबांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली! :)
भाग्यश्री, सुंदर पाकृ. तेरा लाख लाख शुक्रिया! जियो..!
तात्या.
फोटो आणि पाकृ सुंदर आहे!!
छानच पाकृ.आणि फोटो आहेत. मटार पनीर लवकरच करुन पहाते.
वा खुपच छान आहे ग तुझी रेसिपी. मी नक्कीच करुन बघेन.
कांदा आणि काजू कच्चे मिक्सर मध्ये वाटून तेल सुटेपर्यन्त परतले तर चवीत फरक पड्तो का?
मला तरी नाही जाणवला.. मी कच्चेच घेऊन प्युरी केली आहे. परंतू असे वाचले आहे की कच्चा घेतला की कांदा कडूसर लागतो.. जाणकारच सांगतील.. :)
काजु तसेच घेतले तर चवीत नाही पडणार फरक,परंतू दाताखाली येतात छोटे तुकडे..
http://bhagyashreee.blogspot.com/
सुंदर रेसिपी. . .
आताच जेवन करुन बसलो .. पुन्हा भुक लागली .
(भुक्या) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला (आणी पनीर खायला ) आम्ही केव्हाही तयार असतो. >:)
सकाळी सकाळी कसले जीवघेणे फोटु टाकताहो
गरमा गरम तंदुरी रोटीचा तुकडा फोटुत बुडवुन तोंडात टाकायचा मोह होतोय.
फोटु आणि रेसिपी एकदम आवडेश..
व्वा मस्तच! पाकृ छानच.
फोटो एकदम सह्ही आलाय. लग्गेच करून खावेसे वाटतेय..
अजूनही अश्याच पाकृ. टाका लवकर. :)
--शाल्मली.
खपलो, गचकलो, टपकलो!
>>खपलो, गचकलो, टपकलो!
बरे झाले खपलास ते, एक मात्र बरे आहे नुसते फोटो बघुन तु गचकत असशील तर मग नेहमी तुझ्या खव मध्ये पाककृतीचे फोटो दाखवुन तुला टपकवण्यात तुला मदत करेन. ;)
उद्याच करून बघते गं!
असे छान फोटू टाकून त्रास देऊ नये.
लोकांना भाजी करे पर्यंत वेळ द्यावा!
रेवती
जर ह्यात फ्लॉवर व इतर एक दोन भाज्या टाकल्यातर मिक्सव्हेज तयार होईल काय?
वेताळ
भाग्यश्री,
फोटो आणि पाककृती मस्तच. :)
कांदा तेलात परतुन घेऊन मग बारीक केल्यावर कांद्याचा उग्र वास त्या ग्रेव्हीला येत नाही म्हणुन.
कारण येथे यु.एस. मध्ये कांदे मिळतात त्यात ओलसरपणा जास्त असतो ऍज कम्पेअर टु इंडिया त्यामुळे. येथे कांदाच्यी पेस्ट करताना तो तेलात परतलेलाच बरा असे मला वाटते. :)
फोटो आणि पाककृती छान. फोटो बघून छान झालीय भाजी ते कळतेच!
चकली
http://chakali.blogspot.com
मस्त फोटो.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
वा सहीच दिसतोय फोटो. आज दोन घास जास्तच जाणार पोटात :)
हवा तो रंग येण्यासाठी काही खास करावे लागते का?