पाककृती
खिचडी भात
Primary tabs

ह्या भाताला फोडणी द्यावी लागत नाही.
साहित्य
२ वाट्या तांदुळ
१/२ वाटी मटारचे दाणे
पाव वाटी कापलेला गाजर
१ चिरलेला टोमॅटो
१ कांदा मोठा
खोबर किसलेल पाव वाटी
कोथिंबीर चिरलेली पाव वाटी
मिरच्या २ मोडुन
१/२ चमचा मसाला तिखट आवडत असल्यास जास्त घ्यावा.
चवि पुरते मिठ, साखर
तेल २ ते ३ चमचे
४ वाट्या पाणी
कृती :
वरिल सर्व साहित्य एकत्र करावे. हाताने निट ढवळावे व गॅसवर ठेवावे. हया खिचडीला चांगला वास येतो. नेहमीच्या पुलावा पेक्षा वेगळी असल्याने परत परत खाविशी वाटते.
टिप :
वरील जिन्नसा मध्ये अजुन कोबी, फरसबी तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालुन करु शकता. अशाच प्रकार वालाची ही खिचडी छान होते.
नीट समजले नाही.
वरील कृतीमध्ये तांदूळ शिजून त्याचा भात की होतो, की शिजवलेला भातच घ्यायचा?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
नाही तांदुळ शिजवायचे नाही. सगळे कच्चे एकत्रच शिजवायचे.
धन्यवाद जागु...पण ही पाकक्रुती करायला किती वेळ लागतो?
कूकर शिवाय भात करायचा म्हणजे जरा जास्त वेळ लागतो का?
------------
केदार जोशी
मी ही खिचडी कुकर मध्येच करते. ३ शिट्या लागतात.
भातासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ लागतो ह्य खिचडी साठी.
खिचडीभाताच्या सुरेख फोटोकडे डोळे भरून पाहात असतांनाच तात्यांचे प्राण गेले होते..
तिरडीवर ठेवलं होतं तरी जणू काही खिचडीभाताच्याच फोटोकडे कौतुकभरल्या डोळ्याने पाहात आहेत असंच वाटत होतं! :)
ज्यांना तेल तूप फारसे खायचे नाही त्यांच्यासाठी छान आहे पाकृ.
फोटू वरून असं वाटत नाहीये की इतकी सोप्पी पाकृ असेल.
रेवती
केदार कुकरमध्ये ३ शिट्या पुरे. आणि कठीण आजीबात नाही खुप सोप्पी आहे.
तीन वर्ष आठ महिने वीस दिवस.
एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या कालावधीचा हा एक मिपातिक विक्रम असावा.
'देर है पर अंधेर नही' या म्हणीचा प्रत्यय आला :-).
बाकी पाककृती आवडली.