पाककृती
गोभी मांचुरियन
Primary tabs
साहित्य मांचुरियनसाठी
कोबी १/२ कि
कॉर्न फ्लावर २ मध्य्म वाट्या
आलं लसुण मिरची पेस्ट हवी तेवढी.
मीठ चवीपुरते.
मैंदा २ मोठे चमचे.
तळ्ण्या पुरते तेल.
ग्रेव्ही
तेल १चमचा.
टोमॅटो सॉस ४ मोठे चमचे.
रेड चिली सॉस २ मोठे चमचे.
सोया सॉस १ मोठे चमचे.
कृती :-
कोबी मोठा चिरुन मिक्सर मधून बारिक करावा. त्यामधे मैदा व मावेल तेवठा कॉर्न फ्लावर घाला.
आलं लसुण मिरची पेस्ट हवी तेवढी टाका. मीठ घालून भजीच्या पीठापे़क्षा जरा घट्ट भिजवून छोटी
भजी तळावी.(गॅसला अग्नी लावून म्हणजे पेटवून)
ग्रेव्ही (ग्रेव्ही साठी गॅस मोठा करुनच करावे )
तेल गरम करुन त्यात आलं लसुण मिरची पेस्ट १ चमचा टाका. नंतर टोमॅटो सॉस ४ मोठे चमचे
रेड चिली सॉस २ मोठे चमचे सोया सॉस १ मोठे चमचे घाला. एका वाटीत थोडे पाणी घेवून
त्यात थोडे कॉर्न फ्लावर घालून त्याची पेस्ट बनवून ती त्यात घालावी. व थोडेसे पा़णी घाला. जरा उकळ्ले की एका डिशमध्ये तळलेली कोबी ची भजी त्यावर तयार केलेली गरम गरम ग्रेव्ही व बारीक उभा चिरलेला कोबी घालुन खायला तयार.
आम्ही बिनफोटूच्या पाकृंना प्रत्तिसाद देत नाही..
क्षमस्व!
आपला,
(जिवंत) तात्या.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तात्या तुम्ही पाकृ. बघुन खाली आलात? पण मी मुद्दामच फोटू दिला नाही.
तोंडाला पाणी सुटण्यासाठी आणि लगेचच खावी वाटावी. ~X(
चटपटीत.
नावाप्रमाणेच रेसिपी दिली आहे (चटपटीत ) ... लवकर तात्यांनाच विचारा फोटु कसा ड्कवायचा ते ..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आश्विनी . :) पुढच्या वेळेस केली की नक्की फोटो देईन तो पर्यंत तात्यांना जिवंत रहावे लागेल नाहीतर ते आपले सारखे वर जातात्.त्यांची इच्छा पूर्ण लवकरच करीन.
चटपटीत.