अनुवाद हवा आहे....
💬 प्रतिसाद
(12)
झ
झेल्या
Fri, 02/27/2009 - 12:03
नवीन
पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री शक्तिमान की जय..(हो)! :)
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
- Log in or register to post comments
न
नरेश_
Fri, 02/27/2009 - 12:22
नवीन
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Fri, 02/27/2009 - 12:29
नवीन
>>the savior of the poor,<<
गो ब्राहमण प्रतिपालक या शब्दांमध्ये गाय आणि ब्राह्मण हे दोन महत्त्वाचे संकेत आहेत असे मला वाटते. गाय हा भारतीय संकृतीतला पवित्र पशू जो या भूमीवरील राहणीमान-व्यवसाय यांकडे निर्देश करतो तसेच ब्राह्मण हा संकेत अध्यात्मविद्या-तत्त्वज्ञान यांचा संकेत असावा. भारतभूमीवरील शतकांच्या प्रौढ नागरी संस्कृतीमध्ये झालेल्या विकासाबद्दलचे ते संकेत शब्द असावेत. 'उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया' या मध्ये धामधूम सरुन शांतता काळ आला आणि नागरी समाजजीवनामध्ये पोक्तपणा आल्यावर जो विचार-कला यांना अवसर मिळतो त्यासाठी अनुकूल काळ आला असेही अभिप्रेत असावे. मोघलांनी इथल्या स्थानिक संस्कृतीवर-जीवनमानावर-श्रद्धा निष्ठांवर आक्रमण केले होते हे लक्षांत घेणे गरजेचे आहे असे वाटते. त्यामुळे गोब्राह्मण प्रतिपालक या शब्दांमध्ये दीन-दुबळ्यांचा रक्षक अशी रॉबिनहुड प्रतिमा अपेक्षित नसून भारतभूमीवरील जीवनपद्धतीचे रक्षण करणारा अशी कल्पना अभिप्रेत असावी. याला धर्म हा शब्द योजला तरी चालेल यात आज 'हिंदू'शब्दाला चिकटलेली धार्मीक प्रभा मला अपेक्षित नाही. इंग्रजीतला रिलिजन आणि धर्म या दोन कल्पना भिन्न वाटतात त्यामुळे सेव्हॉयर ऑफ रिलिजन हे सुद्धा काही ठीक होणार नाही. हेरिटेज-कल्चर किंवा अजून एखादा चपखल शब्द....
>>the royal seat holder<<
राज्याभिषेक होण्यामागे जनतेची मान्यता आणि आसपासच्या सर्व राज्यांची मान्यता गृहित असते. सिंहासनाधीश्वरमध्ये ती मन्यता मला दिसते. सिंहासन पुंडाईच्या जोरावर बळकावणे आणि अभिषिक्त राजा बनणे यात फरक दिसतो. रॉयल सीट होल्डर मध्ये मला तो मान दिसला नाही. इंग्रजीच्या कच्च्या ज्ञानामुळे सुद्धा तसे असेल. पण एखादा चपखल शब्द अभिषिक्त राजासाठी असेल तर तो उत्तम.
शब्दयोजना कोठल्या दिशेने असावी याबद्दल काही लिहावेसे वाटले म्हणून लिहिले. इंग्रजीवर प्रभुत्व नसल्याने इंग्रजी शब्द सुचवता आला नाही.
आपला प्रयत्न चांगलाच आहे. शुभेच्छा !
-- लिखाळ.
- Log in or register to post comments
श
शक्तिमान
Fri, 02/27/2009 - 12:56
नवीन
आपले मुद्दे पटले..
प्रत्येक शब्दाला अनेक सूक्ष्म छटा असतात याचा येथे प्रत्यय येतो.
पुराणातील गोष्टींमध्ये साधू,ब्राह्मण हे स्वसंरक्षणात दुबळे दाखवलेले असल्याने poor हा शब्द मी त्याअर्थी वापरला होता, तर सिंहासना-धीश्वर चा ढोबळ अनुवाद The Royal Seat - Holder असा केला होता.
- चपखल शब्दांच्या शोधात.. शक्तिमान..
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Fri, 02/27/2009 - 13:00
नवीन
आताच सुभाष यांनी लिहिलेला लेख वाचला. जदुनाथ सरकारांचे वाक्य त्यांनी उधृत केले आहे. त्यात कोरोनेशन ऑफ शिवाजी असे म्हटले आहे. तो शब्द राज्याभिषेक झालेल्या राजासाठी वापरत असावेत असे वाटले.
अमोल नागपुरकरांनी खालच्या प्रतिसादात सुद्धा तोच शब्द सुचवला आहे.
-- लिखाळ.
- Log in or register to post comments
अ
अमोल नागपूरकर
Fri, 02/27/2009 - 12:32
नवीन
the coronated emperor हा शब्द कसा वाटतो ?
- Log in or register to post comments
J
JayGanesh
Fri, 02/27/2009 - 12:35
नवीन
"प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, गोब्राह्मण प्रतिपालक, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छ्त्रपति शिवाजी महाराज की जय!"
याचा इंग्रजी रुपांतर खाली दिलेला आहे.
''PAUD PRATAP PURANDAR, KSHATIYA KULAVANTAS, GOBRAHMAN PRATIPALAK, SIHANADHISHWAR, MAHARAJDHIRAJ CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY''
जय शिवाजी.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 02/27/2009 - 12:42
नवीन
=)) =)) =))
~X( ~X(
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 02/27/2009 - 13:17
नवीन
भाषातंर ,आवडले.
वेताळ
- Log in or register to post comments
त
तिमा
Fri, 02/27/2009 - 13:34
नवीन
आवो पन् ह्ये विंग्रजी कशापायी कराया लागलाय वो, आपला राजा मराठीतच शोभून दिसतोय बगा.
- Log in or register to post comments
श
शक्तिमान
Fri, 02/27/2009 - 13:56
नवीन
शिवबाची महती केवळ मराठीत न राहता ती महाराष्ट्राबाहेरील लोकांपर्यंत देखील पोहचावी हा हेतू असल्याने.. हा अनुवाद करावासा वाटला.
- Log in or register to post comments
ख
खुसपट
Fri, 02/27/2009 - 19:14
नवीन
अहो वीर, इंग्रजी भाषिकांना छत्रपतींची महत्ता / बिरुदावलि समजून घ्यायची असेल तर त्यांना मराठी शिकू द्या. उद्या झुलू किंवा स्वाहिली भाषेत आफ्रिकन बांधवांना ते समजावे म्हणून भाषांतर करायला जाणार आहात का? स्वतःची कुवत ओळखून एखाद्या विषयाला हात घालावा. काय? उगिच उचलली जीभ लावली टाळ्याला ?
खुसपटराव
- Log in or register to post comments