भारतीय संगीत आणि ऑस्कर
💬 प्रतिसाद
(53)
व
विसोबा खेचर
Mon, 03/02/2009 - 10:00
नवीन
रेहमान भारतीय आहे आणि कुठल्याही भारतीय व्यक्तिला निदान संगीत क्षेत्राकरता तरी कोणत्याही परदेशी पुरस्काराची आवश्यकता नाही! त्यांनी आमच्या माणसाला संगीत क्षेत्राकरता पुरस्कार द्यावा ही त्यांची लायकी नाही आणि आमची माणसं किंवा आमचं संगीत कुठल्याही परदेशी पुरस्काराचं मौताज नाही..!
असो.. बाकी प्रत्येकाची मतं!
तात्या.
- Log in or register to post comments
म
मैत्र
Mon, 03/02/2009 - 10:24
नवीन
रेहमान गुलजार पोकुट्टी यांनी त्या चित्रपटासाठी काम केलं ते नेहमीच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि त्यांच्या उपजत आणि घडवलेल्या प्रतिभेनुसार ते चांगलं केलं. ते करताना याला ऑस्कर मिळावं किंवा मिळेल असा विचार नसावा बहुधा.
हा योगायोग आहे की तिघांना एकदम ऑस्कर मिळालं किंवा जसं काही जण म्हणत आहेत त्याप्रमाणे अमेरिकन किंवा पाश्चात्य भांडवलशाहीचं कारस्थान आहे भारताची बाजारपेठ मिळवण्याचं.
या वर्षाची चांगली कलाकृती म्हणून तो चित्रपट स्पर्धेत गेला आणि त्यांनी चक्क आठ पुरस्कार मिळवले.
यात कोण कोणत्या पुरस्कारासाठी मोहताज होतं किंवा हे नसते मिळाले म्हणून कोण लहान ठरणार होतं किंवा प्रचंड मोठे झाले आहेत? ...........
अवांतर: त्यांनी आमच्या माणसाला संगीत क्षेत्राकरता पुरस्कार द्यावा ही त्यांची लायकी नाही
असं का?
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 03/02/2009 - 12:13
नवीन
किंवा जसं काही जण म्हणत आहेत त्याप्रमाणे अमेरिकन किंवा पाश्चात्य भांडवलशाहीचं कारस्थान आहे भारताची बाजारपेठ मिळवण्याचं.
सहमत आहे...
अवांतर: त्यांनी आमच्या माणसाला संगीत क्षेत्राकरता पुरस्कार द्यावा ही त्यांची लायकी नाही
असं का?
हे आमचं वैयक्तिक मत आहे..
आपला,
(अमेरिकाद्वेष्टा) तात्या.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2