गाण्याचे शिक्षक फ़ार रंगेल दिसतात....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
कविता आवडली रामदास
>> तिय्या घेउन येउ समेवर
नंतर
ठेवणीतली अनवट सरगम
>> तुला म्हणजे समज कशी
बिलकूल नाही राणी.
आधी तानपुर्याची
मोकळी करावी लागते गवसणी.
या ओळीतर खासच आहेत.
प्रणयाकरता वापरलेले संगीताचे रूपक आवडले. गाण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांना फोर्प्ले , रतिक्रीडेकरता उपयोजिणे रंगतदार. विशेष म्हणजे , स्त्रीच्या भूमिकेतून लिहिलेल्या या प्रकारच्या कविता विशेष नजाकतीच्या .( 'परि सारे हलक्याने ; आड येते रीत !')
प्रश्न : तंबोर्याची जवार काढणे म्हणजे काय ?
प्रश्न : तंबोर्याची जवार काढणे म्हणजे काय ?
कृपया आमचा हा लेख वाचा. त्यातील एक लहानसा उतारा -
त्याकरता तानपुर्याची घोडी कानसेने, पॉलिश पेपरने एका विशिष्ठ पद्धतीने घासावी लागते. ह्यालाच तानपुर्याची 'जवार काढणे' असे म्हणतात. हे अत्यंत कठीण काम आहे. ही जवार अतिशय सुपरफाईन पद्धतीने काढावी लागते. त्यामुळे दोरा तारेतून आत सरकवल्यावर घोडीच्या मध्यभागी एका विशिष्ठ ठिकाणी अडतो आणि बरोब्बर त्याच जागेवर तार छेडली असता घोडीतून गोलाकार, गोळीबंद असा टणकार उत्पन्न होतो. हा दोरा घोडीच्या एका ठराविक जागी असतांनाच तानपुर्यातून सुरेल व मोकळा टणकार ऐकू येतो. ह्यालाच "जवारी लागली" असे म्हणतात.
एकंदरीत रामदासभाऊंना गवसण्यांतून तंबोरे मोकळे करण्याची आणि त्यांच्या जवार्या काढण्याची बरीच हौस/आवड दिसते आहे! :)
तात्या.
तुला म्हणजे समज कशी
बिलकूल नाही राणी.
आधी तानपुर्याची
मोकळी करावी लागते गवसणी.
सुभानल्ला!!
मस्त कल्पना!!
(स्वगतः यांचं वेलेंटाईन परत घरी आलेलं दिसतंय!!!!)
:)
माझिया प्रियाला प्रीत कळेना,,,,,,
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी