Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खेळ दोन ओळींचा - ४

र — राघव, गुरुवार, 03/05/2009 - 10:56

प्रतिक्रिया द्या
10302 वाचन

💬 प्रतिसाद (66)
अ
अवलिया गुरुवार, 03/05/2009 - 11:05 नवीन
असुनी होकार, ओठात शब्द येत नाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! --अवलिया
  • Log in or register to post comments
न
नीधप गुरुवार, 03/05/2009 - 11:16 नवीन
कुण्या अस्तुरीची काया उगी हरखून जाई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 03/05/2009 - 11:32 नवीन
वाहवा!! खूपच छान :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/05/2009 - 11:49 नवीन
ए१... सुंदर जमलीये ओळ... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
न
नीधप गुरुवार, 03/05/2009 - 11:51 नवीन
ओहो.. धन्स मुमुक्षु, धन्स बिका! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मदनबाण गुरुवार, 03/05/2009 - 11:16 नवीन
सुर कानी पडताच भान हरपुन जाई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/05/2009 - 11:17 नवीन
सुंदर धागा.. अभिनंदन मुमुक्षूराव! तात्या.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 03/05/2009 - 11:37 नवीन
छान चाललंय! एक प्रयत्न माझाही - वेडावते मन, काया थरारून जाई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! तात्या, मन:पुर्वक धन्यवाद. :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 03/05/2009 - 11:48 नवीन
तुझ्या आठवणीने सुगंध बहरला अंगणामध्ये... मनातील कुपी मध्ये बहरला ... गंध प्रेमाचा अरे , कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 03/05/2009 - 11:42 नवीन
राधा म्हणे पुरे आता, वेळ कसा जाई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 03/05/2009 - 11:53 नवीन
सहजरावांना वेळ घालवायची चिंता पडली? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/05/2009 - 11:47 नवीन
उत्तम धागा, मुमुक्षा.... जमतंय का बघतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 03/05/2009 - 11:57 नवीन
तुझ्या श्याम रंगी कशी रंगले गं बाई कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 03/05/2009 - 12:03 नवीन
सांजभूल राधिकेला, व्याकुळल्या गायी कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही -घा.भ.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 03/05/2009 - 12:05 नवीन
खूपच छान! :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
न
नीधप गुरुवार, 03/05/2009 - 12:11 नवीन
वा... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 03/05/2009 - 15:09 नवीन
सुंदर!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
र
राघव गुरुवार, 03/05/2009 - 12:04 नवीन
अरे वा.. छान जमलंय.. येऊ देत अजुन! :) माझा आणखी एक प्रयत्न - जीवनाची रुक्ष वाट उमलत जाई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 03/05/2009 - 12:13 नवीन
गोपिकांच्या मनामध्ये येते काहीबाही कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही
  • Log in or register to post comments
न
नीधप गुरुवार, 03/05/2009 - 12:13 नवीन
मनी रूजे सूर, घुमे चांदणे या देही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
झ
झेल्या गुरुवार, 03/05/2009 - 12:16 नवीन
मोरपिसे सूर दिशा-दिशांत भरुन दाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 03/05/2009 - 12:20 नवीन
मोकाट सुटला दाहि दिशेने वारा.. मन मारते उतुंग भारारी आकाशी.. बासरीच्या सुरां बरोबर.. दिशेने दाहि कृष्णा तुझ्या बासरीला बंध कसा नाही ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 03/05/2009 - 12:20 नवीन
मीही एक प्रयत्न करते.. नादावलेल्या जिवाला नुरे भान काही, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 03/05/2009 - 12:23 नवीन
मस्त.. हाच भाव आणण्यासाठी कधीचा मी प्रयत्न करत होतो.. पण नाही जमले! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
न
नीधप गुरुवार, 03/05/2009 - 12:27 नवीन
वा!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 03/05/2009 - 12:25 नवीन
धन्यवाद मुमुक्षुजी..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 03/05/2009 - 12:27 नवीन
नादखुळी झाली राधा, नुरे भान काही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! --अवलिया
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 03/05/2009 - 12:29 नवीन
क्लास जमलंय! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ज
जयवी गुरुवार, 03/05/2009 - 12:46 नवीन
क्या बात है !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
दशानन गुरुवार, 03/05/2009 - 12:28 नवीन
तळमळतो जिव माझा सुरांमुळे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
म
मिंटी गुरुवार, 03/05/2009 - 12:33 नवीन
माझाही एक प्रयत्न : धडधडत्या उराला एक हुरहुर लावी कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! - अमृता अमित
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 03/05/2009 - 12:34 नवीन
माझ्या मनात हीच भावना होती पण मला ती शब्दात पकडताच आली नाही त्यामुळे... कुठे दाहि दिशेचा वारा... तळमळ ह्या शब्दात भरकटत राहिलो =)) सुंदर मिंटे ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी
स
सहज गुरुवार, 03/05/2009 - 12:36 नवीन
पेंद्या, राधा दोघांपैकी एकही कटत नाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 03/05/2009 - 13:04 नवीन
क्षणी कोण्या झाली राधा सुरांपायी वेडी कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments
S
sanjubaba गुरुवार, 03/05/2009 - 13:05 नवीन
भान सुटे,बंध तुटे मन तुझ्यात गुंतून राही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! ओढ लावी, वेड लावी जीव तळमळत राही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! बेबन्द होई, बेधुंद होई सुचे न मज काही....... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 03/05/2009 - 13:31 नवीन
छान.. जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही...... ही ओळ सुंदर! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjubaba
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/05/2009 - 16:26 नवीन
जाउ कशी, राहू कशी घरी वाट सारे पाही...... कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjubaba
झ
झेल्या गुरुवार, 03/05/2009 - 13:06 नवीन
सूर सृजन अंत जणू काल हा प्रवाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 03/05/2009 - 13:24 नवीन
अवांतरः - कृष्ण बासरीवर काय वाजवत असेल? १) बोल राधा बोल २) काहीतरी मेज्जर क्लासिकल ३) पीलू, खमाजासारखं काहीतरी उपशास्त्रीय ४) की पुलंच्या 'आमची वटवट' मधला कृष्ण वाजवतो तसा सरकारी कानडा?
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 03/05/2009 - 17:25 नवीन
>>अवांतरः - कृष्ण बासरीवर काय वाजवत असेल?<< हिरो सिनेमातली जॅकी श्रॉफ वाजवतो ती धून ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
च
चतुरंग गुरुवार, 03/05/2009 - 17:46 नवीन
http://www.youtube.com/watch?v=4dQwkLgkEvw (सावधगिरीची सूचना - ७.५२ पासून पुढे बघा आधीचा तद्दम हिंदी फिल्मी भाग बघितलात तर धून येईपर्यंत चिडचिड झालेली असेल! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ गुरुवार, 03/05/2009 - 17:53 नवीन
हीच ती धून.. आहे की नाही भारी :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
द
दत्ता काळे गुरुवार, 03/05/2009 - 13:24 नवीन
सूर फिरे अंतरात दिशा दाही दाही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही ! जुना बाळकराम
  • Log in or register to post comments
स
सँडी गुरुवार, 03/05/2009 - 13:37 नवीन
मन बावरे माझे आता आतुर होई कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही !
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 03/05/2009 - 13:39 नवीन
बासरीचा सुर.. निघतो माझ्या श्वासातून ही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 03/05/2009 - 13:45 नवीन
गात्र वेणु गात्र सूर अधरी तव राही कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही -घा.भ.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 03/05/2009 - 13:58 नवीन
माझा आणखी एक प्रयत्न - ओथंबिले गात्र, जीव कासावीस होई.. कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 03/05/2009 - 14:01 नवीन
तुझ्या बासरीमुळे जडला छंद मला सुरांचा कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
उ
उर्मिला०० गुरुवार, 03/05/2009 - 14:14 नवीन
:) सूर तो आर्ततेचा मज अंतरंगी न्हेई, कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा गुरुवार, 03/05/2009 - 14:33 नवीन
हरपले भान बहरली काया मंत्रमुग्ध मन होई. अरे कृष्णा, तुझ्या बासरीला बंध कसा नाही!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा