=))
सही भट... लै भारी !
सिग्नेचरचा सल्ला येवढ्या लवकर मनावर घ्याल असं वाटलंच नव्हतं !
तुम्ही तर दिवसाच चालू झालात का काय B)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
मस्त हो भटोबा,
कंपुबाजीचा चांगलाच अभ्यास दिसतोय , चालु द्यात ...
भारी जमले आहे, एकदम फुल्तु ...!!!
अवांतर : आता कंपुबाजीमुळे तुम्हाला येणार्या प्रतिसादांचे काय (ह्.घ्याच) ;)
---------
( १ नंबरचा कम्पुबाज व अवांतरविर ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
भटो.... मस्त आहे हो कविता.!.
अनेकांना सावधानतेचा इशारा मिळाला असावा!, अशी माफक अपेक्षा आहे! ;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
चला, माझ्या आमच्यावर वार होतात म्हणाय्चे.
जरी आम्ही खमके नसलो तरी.
आम्ही कसले खमके??
आमच्या थोडीच कंपु आहे.
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
हलकीफुलकी कविता आवडली परंतु,
कंपूबाजीची ध्वजा सदोदित
मिसळपाववर उंच धरा रे
या ओळी खटकल्या. मीदेखील चार संस्थळं वावरलो आहे आणि कम्पूबाजी हा प्रकार मला सर्वत्रच पाहायला मिळाला. त्यामुळे एकट्या मिपाचंच नाव घेण्याऐवजी कंपुबाजीच्या संदर्भात मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती..
असो,
मिपाला नावं ठेवणार्यांची काही कमी नाही. वरील ओळीदेखील मिपावरच राहतील..
चालू द्या..
तात्या.
--
स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित!
>>मिपा ऐवजी मराठी आंतरजालाचा उल्लेख आला असता तर कविता अधिक व्यापक वाटली असती..
या मुद्द्याशी सहमत आहे. पण कवीने आंतरजाल इक्वल टु मिपा असा व्यापक दृष्टिकोण ठेउन लिहले असावे असेही मानण्यास जागा आहे. जणु कवीच्या भावविश्वात मिपा सोडुन दुसरे मराठी संस्थळ नसावेच.
तरीही एक कविता म्हणुन एस्टाब्लिश व्हायला तात्यांनी सुचवलेला बदल व्हावा असे वाट्ते.
-
(सहमत)
आंद्या
यात्रीचा आणि तात्यांचा संवाद वाचुन मला मी एक मिपाकर असल्याचा अभिमान वाटला.
असेच चालु राहु द्यात ...
माफक थट्टामस्करी, शाब्दिक चिमटे वगैरे चालते, नव्हे असायलाच हवे. तरच ह्या आभासी दुनयेत मज्जा आहे.
मात्र ह्याचा कधी कडेलोट होऊन कुस्करी होणार नाही ह्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते.
नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात व त्यामुळे मिपावरील वातावरण दिलखुलास व नव्या लेखनाला प्रोत्साहन देणारे राहिले आहे, ह्याचाही आम्हाला अभिमानच आहे.
हे सर्व असेच राहो अशीच सदिच्छा ...!!!
अवांतर : विषयाला सोडुन हा प्रतिसाद आहे खरा पण अगदीच रहावले नाही म्हणुन दिला. ह्याउपर संपादकांची मर्जी ...
------
( अभिमानी मिपाकर )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
नेमके हेच इथे जागरुक आणि हुशार असे सन्मानयीन मिपाकर नेहमीच करत असतात
जागरुकता किंवा संवेदनशीलता प्रत्येकाची वेगळी असते..
एकाला जो मुद्दा गंभीर आणि संवेदनशील वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्याला काहीच वाटणार नाही आणि कदाचित तो वा! वा! छान! छान! असं म्हणून मोकळाही होईल!
चालायचंच!
तात्या.
क वि ता आवडेश रे भटा ... एकदम क्लास .. कवितांच्या कॉलम मधे आम्ही कधी घुसत नाही पण आपल्या कंपुबंधूचं म्हणून पाहिलं ..
अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल!
चालायचंच!
(हळूच चिमडे काढणारा) टार्या
मिसळपाव व्यतिरिक्त आमचा कोठेही आयडी वापरात नाही.
अवांतर : एकाला जो मुद्दा मजेशीर हल्काफुल्का वाटेल त्याबद्दल कदाचित दुसर्याला बराच काही वाटेल आणि कदाचित तो त्याला हिण आणि हिडिस असं म्हणून मोकळाही होईल!
अगदी खरं! आम्ही सहमत आहोत..
अवांतर - परवाच आमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या. अजून आग होते आहे! :)
आपला,
(३८७३ सभासदांना एकत्र आणणारा कंपूबाज!) तात्या.
बजबजपुरी: 278
मी मराठी: 97
ह्याचा इथे काय संबंध? की राजेंनी तुमचं भांडं फोडलं म्हणून हा केविलवाणा प्रयत्न?
गटणे, बाकीच्या संकेतस्थळांची आकडेवारी गोळा करण्यापेक्षा स्वत:ची डागाळलेली इमेज सुधारा जरा.
आयपी ऍड्रेस चोरणे आणि मिपा वरच्या महिला सदस्यांना चावट मेसेज पाठवणे असल्या उद्योगांनी तुमचे खाते एकदा उडालेले आहे. जरा चड्डीत रहायला शिका :D
यात्रीसाहेब आमच्या कंपूमधील असल्याने त्यांना आमचे विचार लगेच समजले. आम्ही मिपा सोडून इतरत्र फार कुठे नसतो. त्यामुळे आंतरजालीय कंपूबाजी म्हटल्यावरही आमच्या डोळ्यापुढे मनोगत, उपक्रम, बजबजपुरी इ. नावे न येता मिपाच आले. असो.
कवीचे भावविश्व हीच कवितेच्या अभिव्यक्तीची मर्यादा आहे असं कोणीतरी म्हटलंच आहे, त्यामुळे आमच्या मर्यादित भावविश्वाची अभिव्यक्ती असलेले हे ४ तोडकेमोडके शब्द तसेच राहातील. बाकी मनात कोणाहीविषयी कोणतेही किल्मिष नाही.
शेवटी डिसक्लेमर टाकूनही ब्लडप्रेशरं वाढायची ती वाढतातच.
स्वत:च्या खिशाला अक्षरश: हजारो रुपयांची चाट लावून झक मारली आणि मिपा काढलं ते मिपावरच मिपाचे आरोप वाचायला! चालायचंच, हा तात्या सगळ्याच मिपाद्वेष्ट्यांना अंगाखांद्यावर खेळवत पुढे जाईल हे निश्चित!
वा वा तात्या, आमची उर्सुला म्हैस आणि तुम्ही, बहुतेक एकाच गावातले,
ती सुद्धा परवा सान्गत होती,
आमच्या अजिबात बोक्याला दूध पाहीजे, म्हणून ती फळायला हो म्हणते..
तोडलंस रे भटा तोडलंस :)
एक नंबर! बाकी तुमच्या काव्यप्रतिभेबद्दल आम्ही पामरानं काय बोलावं?
साक्षात सर्किटकाकांशी काव्य-जुगलबंदी खेळणारे तुम्ही.....
मस्त जमली आहे रे प्रासंगीक कविता.
<तुला अजुन श्रीखंड हवं आहे का? :P >
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
भटोबा लयं भारी !!! :)
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्या व्यक्तीवर राहील.
ते तर आहेच!
आपला,
(जबाबदार!) तात्या.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी