मी जगतो आहे
💬 प्रतिसाद
(11)
ज
जागु
Mon, 03/09/2009 - 08:17
नवीन
मला हवा आहे गौरव समाजा कडुन,
हवी आहे वहाव्वा झुंडी कडुन..
मी प्रकाशझोतातील सुप्रसिद्ध व्यक्ती बनलो आहे,
गर्दीनी घातलेला मुकुट मला हवा आहे..
म्हणुन......
इतरांना पाहिजे तसा
मी जगणार आहे
छान सत्य.
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Mon, 03/09/2009 - 16:09
नवीन
ही खरच वस्तुस्थिती आहे! खूप मनापासून लिहिली आहे कविता! आवडली.
क्रान्ति
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 03/09/2009 - 16:40
नवीन
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/09/2009 - 16:43
नवीन
कविता (कळली) म्हणून छान आहे, पण अर्थ पटला नाही. कदाचित मला तसं करता येत नाही म्हणूनही असेल.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Mon, 03/09/2009 - 21:06
नवीन
इतरांसाठी जगणे = स्वार्थाभिमुखता असेच मानायचे कारण नाही. लोकानंदासाठी त्यांना हवे तसे वागण्यात काही गैर नसावे, असे वाटते (येथे लोक = तुम्ही स्वतः सोडून सगळे - आई,बाबा,जिवलग मित्र इ. सगळेच असे म्हणायचे आहे) त्यामुळे अदिती म्हणतात तसे कविता चांगली असली, तरी अर्थ पटलाच असे नाही.
(लोकाभिमुख)बेसनलाडू
- Log in or register to post comments
स
सहज
Tue, 03/10/2009 - 04:13
नवीन
असेच काहीसे.
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
Tue, 03/10/2009 - 04:46
नवीन
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! या कवितीच्या निमित्ताने काही विचार झाला हेही नसे थोडके..!!
- Log in or register to post comments
प
पक्या
Mon, 03/09/2009 - 19:37
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 03/10/2009 - 08:45
नवीन
मी जसा आहे तसा कुणी च
स्विकारत नाही मला,
म्हणुनच दुस-यांना पाहिजे तसा..
बनाव लागतं आहे मला...!
हे एकदम सह्ह्ही आहे...
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Tue, 03/10/2009 - 09:08
नवीन
मी जसा आहे तसा कुणी च
स्विकारत नाही मला,
म्हणुनच दुस-यांना पाहिजे तसा..
बनाव लागतं आहे मला...!
एकदम पटेश!
अगदी माझ्या मनातलेच विचार शब्दातीत झालेत असे जाणवले!
"अनामिका"
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Tue, 03/10/2009 - 09:27
नवीन
आपल्या लोकांसाठी हव्वी ती तडजोड आपण करतो कारण आपण त्यांच्यावर अतोनात प्रेम करतो पण समाजाकडुन गौरव हवा म्हणून तडजोड .....(?) पटत नाही काका, अन मी तरी तशी कधीच करणार नाही ...त्यामुळे ही कविता पटत नाही ... अन समजा असे जगत ही असेल कोणी तो घुटन नहीं महेसूस होगी क्या ?? किती घुसमट आहे अश्या जगण्यात ?? घूटी हूईं सांसोंमें जीने को.. जीना कैसे कहेते हो ??
~ वाहीदा
- Log in or register to post comments