जनातलं, मनातलं

होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..

Primary tabs

सर्व मिपाकरांना होळी,रंगपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा.. :) Image removed.
sanjubaba

माणसाना रंगाचे किती वेड असते.....उन्हाळ्यात जेव्हा, इंद्रधनुष्य दिसत नाही तेव्हा , ती स्वत: आपल्या अंगाला रंग फासून
स्वत: च इंद्रधनुष्य होतात.
जीवनात खरा रंग असतो तो दु:खाचा ! या रंगाने रंगलेल्या अवस्थेत जो खळख्ळुन हसू शकतो.....त्याच्यासाठी तर रोजच होळि आहे....................

सर्व मिपाकरांना होळी,रंगपंचमीच्या हार्दिक शुभकामना !

सँडी

सौजन्यः इ-दैनिक पुढारी.

- सँडी

फाल्गुन शुध्द पौर्णिमेला होलिकोत्सव साजरा करण्यात येतो.
होळीचा उत्सव म्हणजे वसंताला वाढवणारा उत्सव !

होळीचा उत्सव फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनावणारा, वसंतातही संयमाची दीक्षा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजावणारा व मानव मनात व मानव समाजात असलेल्या असद्व्रुत्तीना जाळ्ण्याचा सन्देश देणारा उत्सव आहे.