Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालचलाऊ गीता

क — क्रान्ति, Wed, 03/11/2009 - 09:11

प्रतिक्रिया द्या
55475 वाचन

💬 प्रतिसाद (57)
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 03/11/2009 - 09:19 नवीन
=)) =)) =)) =)) =)) लहानपणी माझा एक मित्र नेहमी सांगायचा या बद्दल... कधी वाचली नव्हती... झबर्डस्ट!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 03/11/2009 - 09:25 नवीन
ज ह ब ह र्‍या च !! काखे बाटली, हाती ग्लास | चकना मागूनि खाईन खास दार्जुन ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 03/11/2009 - 09:34 नवीन
परा... साक्षात भगवद्गीतेचे हे विडंबन... ते सुद्धा इतके जुने... म्हणजे सगळ्या विडंबकांसाठी २ चांगल्या गोष्टी... ०१. विडंबनातून भगवद्गीता / व्यास (कोण रे तो फोकलिचा म्हणतोय त्यांना ;) ) सुद्ध सुटले नाहीत. तर बाकिच्यांनी उगाच ओरडू नये... ०२. विडंबनाला फार जुनी प्रंपरा (शब्द बरोबर लिहिला आहे ना. काय आहे आज हात कापत आहेत जरा) आहे. काय बोल्तो? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Wed, 03/11/2009 - 09:43 नवीन
सहमत सहमत बिपिनभौ ! आयला आमच्या हे लक्षातच आले नाहि की :( अंमळ सध्या आमचे रॉयल स्टॅग उन्हाळ्यामुळे व्हाईट मिश्चीफ झालय त्याचा परिणाम असावा. ह्या आनंदाच्या बातमी बद्दल तुम्हास्नी आमच्याकडुन येक प्याग ! दार्जुन ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विंजिनेर Wed, 03/11/2009 - 10:21 नवीन
(शब्द बरोबर लिहिला आहे ना. काय आहे आज हात कापत आहेत जरा) आहे.
तुम्हाला 'चपखल' म्हणायचे आहे का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 03/11/2009 - 10:26 नवीन
हाहाहा!!! आज काहीही करा सगळं चपखल... एरवी चप्पल.... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
प
प्रकाश घाटपांडे Wed, 03/11/2009 - 10:40 नवीन
शब्द बरोबर लिहिला आहे ना. काय आहे आज हात कापत आहेत जरा)
विडंबनाच्या उतार्‍यावर प्रतिउतारा घ्यावा लागनार अस दिसतय प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
नानबा Wed, 03/11/2009 - 13:34 नवीन
लई भारी...... ;)
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 03/11/2009 - 15:48 नवीन
=)) =)) विडंबन लै झ्यॉक...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 03/11/2009 - 16:48 नवीन
क्रांतीताई, हा खजिना शोधून आम्हा विडंबनपंथीयांसमोर ठेवल्याबद्दल तुमचे आभार मानावे तितुके थोडके!! :) :) विडंबनकलेचा उगम बराच जुना आहे हे ह्यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. साक्षात गीतेचे इतके सुंदर विडंबन करणारे हे उपाध्येबुवा आम्हाला जणू म्हणताहेत "जस्ट डू इट!" ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 03/11/2009 - 16:50 नवीन
साक्षात गीतेचे इतके सुंदर विडंबन करणारे हे उपाध्येबुवा आम्हाला जणू म्हणताहेत "जस्ट डू इट!" + १ सहमत. :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ल
लिखाळ Wed, 03/11/2009 - 16:57 नवीन
फार मस्तं.. एकदम मजेदार :) हे विडंबन साधारण किती साली केले गेले असावे? ज के उपाध्ये कोण..त्यांचे इतर लेखन काय आहे याबद्दल जाणून घ्यावेसे वाटत आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 03/11/2009 - 17:01 नवीन
अगदी लहानपणापासून ज. के. उपाध्यांचं नाव ऐकत आलो आहे. आज वाचनाचा योग आला. त्यांच्या अजूनही काही कविता असतील तर जाणून घ्यायला आवडेल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
च
चतुरंग Wed, 03/11/2009 - 17:06 नवीन
संगीतबद्ध केलेलं आणि आशाताईंनी गायलेलं 'विसरशील खास मला' हे गीत लिहिणारे ज.के.उपाध्ये. http://www.aathavanitli-gani.com/Lists/Lyrics%20Details/J%20K%20Upadhye.htm पण त्यांचे अजूनही साहित्य नक्कीच असावे. अधिक माहिती आवडेलच. (त्यांनी विडंबने मूळ नावानीच केली की टोपणनावाने?) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
संदीप चित्रे Wed, 03/11/2009 - 16:57 नवीन
हे विडंबन.... आवडलं खूप. धागा दिल्याबद्दल धन्स :)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 03/11/2009 - 17:49 नवीन
जयकृष्ण केशव उपाध्ये {१८८२-१९३७} माझ्याकडे त्यांची उपलब्ध असलेली माहिती अशी आहे - एकीकडे ते परमेश्वरभक्तीची गीते आणि लोकमान्यांसारख्या विभुतींची चरित्रे गाण्यात तल्लिन होतात, तर दुसरीकडे कमालीच्य मिस्किलतेने विनोदी काव्यलेखनातही प्रसन्नपणे रंगून जातात. तल्लख बुद्धिमत्ता आणि सूक्ष्म निरिक्षणशक्ती यामुळे त्यांच्या विनोद्-विडंबनात्मक कवितांना विशेष रंगत चढते. अशा वैशिष्ट्यांमुळेच त्यांचे लेखन मोजके असूनही ते रसिकांच्या लक्षात राहिले आहे. उपाध्ये यांच्या इतर कविता तसेच साहित्य याच्या शोधात मी आहेच. इतरही कुणाला काही मिळाल्यास अवश्य सांगावे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 03/11/2009 - 17:54 नवीन
माहितीबद्दल आभार. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 03/12/2009 - 06:49 नवीन
विडंबन मस्तच. चतुरंग आणि क्रांती, तुमचे दोघांचे अधिक माहितीबद्दल आभार. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
प
प्राजु Wed, 03/11/2009 - 19:01 नवीन
मजा आली वाचून. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 03/11/2009 - 19:12 नवीन
खूप मजेशीर आहे..:) दुसरा अध्याय आहे का?...:)
  • Log in or register to post comments
ट
टिउ Wed, 03/11/2009 - 19:37 नवीन
भारीच! मजेशीर आहे...
कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा? पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया
=))
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 03/12/2009 - 07:05 नवीन
चुकीची माहीती होती म्हणून मीच प्रतिसाद काढून टाकत आहे. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 03/12/2009 - 06:14 नवीन
विडंबनाच्या प्रंपरेबद्दल (बिकांकडून साभार) सगळ्यांनी लिहिलेच आहे वर. त्यात आणखी एक खास बात जाणवते ती म्हणजे गीतेचा मूळ आशय कायम ठेवत विडंबन केलेलंय!! ;;) खूप खूप आभार! राघव
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 05/05/2016 - 08:46 नवीन
त्यामुळेच जास्त भावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
न
नंदन गुरुवार, 03/12/2009 - 06:31 नवीन
विडंबन मस्त आहे. येथे दिल्याबद्दल अनेक आभार.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 03/12/2009 - 08:16 नवीन
मजेशीर विडंबन आहे.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 03/12/2009 - 17:49 नवीन
:H सगळ्या मित्रांना धन्यवाद. खर तर "फोडिले भांडार | धन्याचा हा माल | मी एक हमाल | भारवाही |" अजून काही नवी माहिती किंवा या काव्याच्या पुढील भागाबद्दल माहिती मिळाली तर अवश्य देईन. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sun, 01/13/2013 - 14:04 नवीन
इतरही पामरांनी "या" गीतामृताचा लाभ घ्यावा म्हणून धागा वर आणण्याचा प्रपंच. धन्यवाद पैसातै, खफवर दुवा टाकण्यासाठी.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/13/2013 - 18:10 नवीन
अरे, याचे पुढचे अध्याय कुठे आहेत?
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sun, 01/13/2013 - 22:13 नवीन
एक एक ओळ म्हणजे दारुच कोठार. अशी सुरबाण उडल्यागत उडते प्रत्येक ओळ. हे असल झक्कड विडंबन वर काढल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Sun, 01/13/2013 - 22:25 नवीन
लय भारी....
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 01/14/2013 - 04:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/18/2013 - 15:16 नवीन
अप्रतिम आहे हे ...=)) पुढचे अध्याय आहेत का ?
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 02/18/2013 - 16:59 नवीन
या विडंबनाचे पुढचे अध्याय कवि. ज. के. उपाध्ये यांना लिहायचे होते, पण ते होऊ शकले नाही. मात्र याच रचनेत आणखी दोन चरण आहेत, ते अलिकडेच वाचनात आले. अर्जुनाच्या लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.' यापुढच्या दोन ओव्या अशा आहेत : मग बायका बोंबलती घरी | डोई बोडून करिती खापरी [केशवपन प्रथेचा संदर्भ असावा इथे] चाल चाल कृष्णा माघारी | सोड पिच्छा युद्धाचा अरे, आपण मेल्यावर | घरच्या करतील परद्वार माजेल सारा वर्णसंकर | आहेस कोठे बाबा
  • Log in or register to post comments
न
नानबा Fri, 02/22/2013 - 04:28 नवीन
भन्नाटच... :)) :)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
ज
जेनी... Mon, 02/18/2013 - 16:59 नवीन
तु शतजन्मी मीरा ! क्रांतीच्या आनखी कविता गझला असतिल तर वर आणाल का ?? मज्जा आली वाचुन :D
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Mon, 02/18/2013 - 17:14 नवीन
.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 02/18/2013 - 17:20 नवीन
ही माझी नाही बरं. [मी एक हमाल भारवाही] :D
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 02/18/2013 - 17:30 नवीन
अगं जे असेल ते ... तुझा ब्लॉग शोधला .. मिळाला नाहि. . तु लिहिलेलं बरच वाचायचं असतं .. मग धाग्याची वाट बघत बसावं लागतं :( थोडसच पण उत्क्रुष्ट लिहितेस .. मला आवडतं .. मनापासुन दाद द्याविशी वाटते .. समोर चित्रं उभी रहातात तुझ्या ओळीतुन .. आवडतं मला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
क
क्रान्ति Mon, 02/18/2013 - 17:28 नवीन
ही एक मस्त उपरोधिक रचना मिळाली ज. के. उपाध्ये यांची. कविते! करिन तुला मी ठार ||धृ || पूर्व कवींनी तुज रस पाजुनि मस्त बनविले फार रस बिस आता मम साम्राज्यी काहि न तुज मिळणार .......पदलालित्ये जना भुलविले केले नाना चार भावाची बहु हाव तुला परि अभाव तुज करणार नादातचि रंगुनी गुंगविसि रसिका करिसी गार नाद तुझा तो नष्ट कराया समर्थ मी साचार समृद्ध अर्थे असा मिरविला आजवरी बडिवार अर्थाचा परि लेश यापुढे तुजला नच मिळणार!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 02/18/2013 - 17:32 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 02/21/2013 - 10:08 नवीन
हहपुवा.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 02/21/2013 - 22:39 नवीन
सु-रे-ख!!! कसली अफाट हसले!!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 02/22/2013 - 00:31 नवीन
कृष्ण म्हणे अर्जुना | काढ तंबाखु लाव चुना || त्याविण माझी सुस्ती जाईना || मला वाटायचं कि या ओळी उपाध्यांच्या विडंबनातल्या आहेत. पण तसं नाहि आहे तर. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 02/22/2013 - 01:00 नवीन
हा इतका जुना धागा नजरेतून कसा सुटला कोणास ठाऊक! पण ही कविता आहे असे समजल्यावर अनेक वर्षे शोधत होतो पण मिळाली नव्हती. आता गावाला वळसा घालून झाल्यावर मिळाली! :-)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 02/22/2013 - 14:24 नवीन
तुफान....! अजिबात ओढून ताणून न करता सहजतेनं केलेलं 'बेन्चमार्क' विडंबन!
  • Log in or register to post comments
म
मन१ गुरुवार, 03/28/2013 - 09:10 नवीन
हे विडंबन शोधून दिल्याबद्दल बॅट्याला धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 03/31/2013 - 11:58 नवीन
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !
हाहाहाहा... १९८५ च्या सुमारास या कवितेच्या काही ओळी ऐकल्याचे स्मरत आहे. बहुधा वृत्तपत्रात एक टिकात्मक लेख आला होता, असेही पुसटसे आठवते. कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा? अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही; या ओळी अजूनही आठवणीत आहेत. :)
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Sun, 03/31/2013 - 18:04 नवीन
:D
  • Log in or register to post comments
द
देशपांडे विनायक Sat, 08/03/2013 - 07:12 नवीन
कालच्या पिकनिक मध्ये मित्राने हे विनोद सांगितले १] उपाध्ये त्यांच्या मित्राकडे गेले असताना मित्राने मोलकरणी मार्फत कळवले की तो बाहेर गेला आहे हा मित्र काही दिवसांनी त्यांचे घरी आला तेव्हा उपाध्येनी घरातून ते बाहेर गेल्याचे सांगितले मित्र म्हणाला कमाल करतोस . तू स्वताच बाहेर गेलास असे खोटे का सांगतोस ? उपाध्ये म्हणाले '' मी मित्राच्या मोलकरणीवरही विश्वास ठेवतो आणि तू खुद्द मित्रावर अविश्वास दर्शवतोस ?" २] उपाध्ये यांची गंमत करण्यासाठी त्यांचा मित्र म्हणाला '' काल मुलगी म्हणत होती कुणीतरी पाध्ये मला भेटण्यास आले होते '' '' म्हणजे ऊ तिच्या डोक्यातच राहिलेली दिसते '' उपाधेंचे उत्तर .
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा