इडंबन आवडले...
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
खिडकी होती उघडी सताड
शेजार्यांचा बोकाही कुंपणाच्या पल्याड
आणि
तडतडलेली मोहरी आणते आगळीच खुमारी
दुसर्याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी
दोन्ही मस्तच! आवडलं.
(खुद के साथ बातां : रंगा, परग्रहावरुनही विडंबनात कांपीटीशन येईल असं कधी वाटलं होतं का रे? :W :? )
चतुरंग
मूळ कवितेतल्या काही यमकाच्या चांगल्या जागा जसे गुळमट, चामट वापरुन केलेले विडंबन विडंबनाच्या माझ्या निकषांना बर्यापैकी अनुसरणारे आहे. मूळ कविता, त्यात मांडलेल्या कल्पनांचा ओघ, एका विशिष्ट बिंदूकडे घेऊन जाणारा प्रवाह तसाच शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न आपल्या विडंबनातसुद्धा थोडा बहुत दिसतो. गंडलेल्या पाकाकृती आणि नंतर आलेली तयार जेवणाची मागणी मजेदार वाटली.
अन्नाचा विषय निघाला की मुक्या प्राण्यांची आठवण व्हावी ही आपली संस्कृती. ती या कवितेच्या प्रवाहात एखाद्या पाचूच्या बेटासारखी चमकून उठली आहे. आपली संस्कृती बुडाली नाही किंवा चहाच्या पातेल्यात दूध तापल्याने दूध फाटेल तशी चोथा-पाणी झाली नाही हेच कवयित्रीने आज सिद्ध केले आहे. आपले अभिनंदन.
-- लिखाळ.
परीक्षक संप्रदायात शिरकाव करुन घेऊन वेगवेगळ्या साहित्यप्रकारांवर जाणीवपूर्वक विचारमंथन करुन, आपण ह्या संप्रदायाची धुरा चांगली सांभाळू शकाल ह्याची मिपाकरांना जणू ग्वाहीच देत आहात असे आपल्या गेल्या काही प्रतिसादातून प्रकर्षाने जाणवते!
समीक्षेच्या निमित्ताने पांढर्यावर काळे करण्याचे जे कार्य आपण अंगिकारले आहेत त्याने अनेक कवीकिरडू आणि नवलेखक, नवविडंबक हे तोंड काळे करुन घेतील ह्यात मला तरी शंका वाटत नाही!
तुमच्या समीक्षेत मला वारंवार भडकमकर मास्तरांच्या शिकवणीचा भास होतोय असे जरी असले तरी लवकरच तुम्ही ह्यापासून दूर जाऊन स्वतःची अशी खास लिखाळशैली विकसित कराल हे नक्की!
पुसशु! :)
चतुरंग
जीवनातल्या तोचतोचपणाने कंटाळलेल्या जीवाला साहित्यिक विरंगुळ्याचे चार क्षण देउन जीवनाच्या रहाट गाडग्याला जुंपून घेण्याची नव-उमेद त्यांना मिळावी या सद्हेतूने प्रेरित होऊन केलेला हा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता. असे क्षण देउन आपल्या चेहर्यावर आनंदाच्या दोन-चार रेषा उमटवण्यात जरी मी यशस्वी झालो असेन तरी मी स्वतःला धन्य समजेन. सरस्वतीच्या पायावर वाहिलेली ही शब्दफुले अशीच सुगंधीत राहोत हीच प्रार्थना !
-- लिखाळ.
जीवनातल्या तोचतोचपणाने कंटाळलेल्या जीवाला साहित्यिक विरंगुळ्याचे चार क्षण देउन जीवनाच्या रहाट गाडग्याला जुंपून घेण्याची नव-उमेद त्यांना मिळावी या सद्हेतूने प्रेरित होऊन केलेला हा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता
हुश्या !! :-) कायच्या काय लांब लचक !! कुठेही स्वल्प विराम नाही ?? :?
आदी माऊ ... या साहेबां कडून ईतके छान प्रतिसाद मिळाल्यावर आणखीन काय हवे ?? ;-)
~ वाहीदा
हम्म्, चांगले चालु आहे.
उत्तम विडंबन ...!!!
काय स्वयंपाक करताना केले काय ?
नाही, त्यात फोडणीचा ठसका जाणवतोय ;)
अवांतर : "पुरणाची पोळी .... उर्फ अदितीचा सल्ला" कधी लिहताय ?
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
डान्याशी आणि इतर सर्व मंडळींशी सहमत.
पुविशु!
बाकी आम्हाला काय तिच्याआयला ना काव्यातलं काही कळतं ना स्वयंपाकातलं...बोंबलायला आम्ही काय बोलाणार ह्या कवितेवर????
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
पुरणपोळीचे विडम्बन ?
निखील भौ काय काय पचवायची ताकद आहे तुमच्यात?
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
तू विडंबनप्रांती आल्यापासून धुमाकुळ घालायला लागलीयेस.
नुकताच तू केलेल्या पु.पो. चा फोटू पाहिला.
छान झालीये पोळी पण तुपाच्या फोटूने वजन अंमळ वाढलेच.
वजनवाढीला फाट्यावर मारून कसं चालेल?
हे कवितेचं विडंबन वाटत नसून स्वयंपाकाचं विडंबन वाटतय.
रेवती
माझ्याकडून ब्वॉ पु.वि.शु. उर्फ पुढील विडंबनास शुभेच्छा.
तू सुटलीच आहेस...
>>दुसर्याने बनवलेल्या जेवणाचीतर लज्जतच न्यारी.
हे तर आवडलंच.
पण लिखाळांची प्रतिक्रिया वाचल्यानंतर माझे हातपायच गळाले आहेत. आता यावर आणि कोण काय बोलणार? भडकमकर मास्तरही त्यांच्या शिष्याकडे रिफ्रेशर कोर्ससाठी येतात की काय, अशी मला दाट शंका येते आहे, तिथे आपण कोण बापडे?
(अवांतरः तुला विज्ञानप्रतिभेला एकाएकी हा विडंबन-प्रतिभेचा धुमारा नक्की कधी आणि कसा काय फुटला ते जाणून घेण्याची जिज्ञासा बाळगून आहे. सवडीनं दे हो उत्तर...)
ठीक आहे.
पण कवयित्रीला जीवनाच्या नाट्यमंचावर अजून बरेच काही पदार्थ करून दाखवायचे असल्यामुळे विडंबन हे एका तरल अवस्थेकडे जाता जाता थबकते. पण तरी सुद्धा, विडंबन या प्रकाराचं एकंदर उर्ध्वगामित्व बघितलं तर नविन नविन वाटा चोखाळण्यात आजचे विडंबक यशस्वी ठरत आहेत असे म्हणायला प्रत्यवाय नसावा, किंबहुना तसे म्हणावेच लागेल. प्रस्तुत कवयित्री आणि तिचा हा नविनतम प्रयत्न त्याचाच एक भाग ठरावा. तसेच, मागून आणले असले तरी प्रतिसाद पण बरे मिळाले आहेत. तरी बर्याच रसिकांना विडंबनापेक्षा पुपोच्या आठवणींनी जास्त त्रास झाला हे या विडंबनाचे एक प्रकारे यशच म्हणावे लागेल.
असो. कवयित्रीला पुविशु. आणि पुढच्या वेळी उत्स्फूर्त प्रतिसाद येऊ दे अश्या शुभेच्छा देतो.
बिपिन कार्यकर्ते
विडंबन या प्रकाराचं एकंदर उर्ध्वगामित्व बघितलं तर नविन नविन वाटा चोखाळण्यात आजचे विडंबक यशस्वी ठरत आहेत असे म्हणायला प्रत्यवाय नसावा,
अहो जरा सर्वसामान्यांना समजेल असे बोला साहेब !!
सर्वसामान्य आहात ना? मग साहित्याच्या वाटेला जाऊ नका.
साहीत्य हे सर्वसामान्यासाठी नाही ?? असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?? अहो महामानव , सर्वासाठी कळेल असे लिहावे असेच आम्हा पामराचे म्हणणे आहे ! का उगाच ??? :-)
बोला बोला, बोलून घ्या मला बिचारीला! :-D
असो. प्रतिसाद देणार्या सर्व 'कंपूबाजां'चे, कंपूबाहेरच्यांचे, कंपूतीत, शिरू पहाणार्यांचेच, विडंबन वाचणार्यांचे आणि मुख्य म्हणजे (रडीचा डाव खेळून का होईना, शेवटी प्रतिसाद देणार्या) बिपिन कार्यकर्तेंचे आभार.
त्याशिवाय विडंबन वाचूनही "फाल्तू वाटलं" असं न लिहिणार्या सर्वांचे फारच जास्त आभार. ;-)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी