Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गिरणी कामगार देशोधडीला लागण्यामागे जबाबदार कोण?

घ
घाशीराम कोतवाल १.२
Tue, 03/17/2009 - 06:10
🗣 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
13660 वाचन

💬 प्रतिसाद (20)
M
mamuvinod Tue, 03/17/2009 - 07:03 नवीन
अगोदर तुमचे मत काय आहे ते आम्हाला सा॑गा व मग आम्हाला विचारा;कसे?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 03/17/2009 - 07:11 नवीन
कोतवाल साहेब तुमचे आणी आमचे काहि वैर नाहिये पण एक गोष्ट खटकली म्हणुन मुद्दाम लिहित आहे. आपल्या लेखातील काहि भाग हा महाराष्ट्र टाईम्स च्या एका लेखातुन जशाच्या तसा उचलला गेला आहे, परंतु त्यासाठी आपण मटा चे सौजन्य मान्य केल्याचे कुठेच दिसत नाही, असे का ? दुसर्‍याची विद्वत्ता स्वतःच्या नावावर का खपवायची हो ? लेखनचौर्याचा महाविरोधक ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mamuvinod
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 03/17/2009 - 07:19 नवीन
मला फक्त विचार मांडायचे होते ते मी मांडले फक्त लेखातला काहि भाग समान आहे आपण लिन्क दिल्या बद्दल धन्यवाद आणी चुकुन मी लिन्क द्यायची राहिल्या बद्दल माफि असावी ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 03/17/2009 - 07:16 नवीन
आज ह्या मुंबईतुन गिरणी कामगार देशोधडीला लागण्यासाठी डॉ दत्ता सामंत सर्व मिल मालक तेव्हडेच राज्य सरकार ही जबाबदार आहे मुंबईतील गिरण्या बंद झाल्यावर बेरोजगारी वाढली रिकाम्या हाताला काम नव्हते मग उदय झाला मराठी भाईचा ह्या गिरणी कामगारांची मुले मग बनली भाई कारण रिकाम्या हाताला काम नव्हते हिंदीत एक म्हण आहे खाली दिमाग शैतान का घर होता है ! याच प्रमाणे घरी खायचे वांदे झाले होते मग हि मुल तथागीत भाईच्या सापळ्यात अलगद अडकली कारण त्यामुळे त्यांच्या घरचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता लोक त्यांना वचकुन राहात होत त्यांचा रुबाब दरारा वाढला मग सुरु झाले टोळी युध्द मग गलोगली रक्ताचे पाट वाहु लागले हि पोर किड्या मुग्यांसारखी मरु लागली एक तर पोलिसांच्या गोळी ने किंवा विरुध्द टोळी कडुन बळी पडले आज हे तथाकित भाई डॉन एक तर देशाबाहेर आहेत किंवा राजकारणात आहेत पण मेले बिचारे गिरणी कामगारांची पोर ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mamuvinod
च
चिरोटा Tue, 03/17/2009 - 07:25 नवीन
लोकशाही वगैरे असली तरी राज्य सरकारने वेळिच परिस्थिती आटोक्यात आणायला पाहिजे होती. मात्र त्यावेळी राज्य आणि केन्द्रात अस्लेल्ल्या लोकाना सम्प मोडणे राजकिय द्रुष्ट्या फायद्याचे होते.त्यावेळचे मुख्यमन्त्री (भोसले की अन्तुले) आणि इन्दिरा गान्धी ह्याना सामन्त प्रभावि आणि डोइजड होतिल ही भिती होती.म्हणुन सामन्त कोन्ग्रेस मध्ये असुनपण राज्य आणि केन्द्र सरकारने काहिच केले नाही.दत्ता सामन्त ह्यन्च्या कामगार आघाडीने पण जास्तच ताणुन धरले.'गिरणी कामगारान्शिवाय मुम्बै चालु शकत नाही' ही गुर्मी त्याना होती. गिरणी मालकाना जास्त जबाब्दार धरता येणार नाही.जमीन त्यान्ची,त्या जमिनीला आलेले सोन्याचे भाव आणी डबघाइला आलेला धन्दा ह्यामुळे त्यानाही गत्यन्तर नव्हते.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 03/17/2009 - 07:35 नवीन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, बोनस रक्कम वाढवून मिळणे अवघड असून संप मागे घेण्याचे आवाहन करताच कामगारांनी नाराजी व्यक्त करून मैदान सोडले वर म्हटल्या प्रमाणे जर संप तेंव्हाच मागे घेतला असता तर , पुढील समस्या निर्माणच झाल्या नसत्या . अशा परीस्थीतीत स्वतः कामगार कीतपत दोषी ?
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 03/17/2009 - 07:41 नवीन
तेव्हा शिवसेना नुकतीच वयात आली होति आणी गिरणी कामगार सेना हि बालक होति त्यातल्या त्यात कामगारांचा लाल बावट्या वर भयंकर विश्वास होता आणी त्यांना वाटले होते कि ह्यांच्या मुळे तरी बोनस आणी पगार वाढ मिळेल म्हनुन पन त्यां बिचार्‍यांना काय माहित कि हा संप त्यांना किति महाग पडेल अहो ह्यांच्या नेत्याचा खुन पडला मुंबईतल्या गिरिण्या बंद झाल्या तरी अधीक्रुतरित्या अजुनही हा संप मिटलेला नाही ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
प
प्रदीप Tue, 03/17/2009 - 07:53 नवीन
कामगारांचा लाल बावट्या वर भयंकर विश्वास होता आणी त्यांना वाटले होते कि ह्यांच्या मुळे तरी बोनस आणी पगार वाढ मिळेल
ह्यात लाल बावटा कुठे आला? सामंताच्या 'कामगार आघाडी'चा व लाल बावट्याचा काहीही संबंध नाही. लाल बावटा हे कम्युनिस्ट पार्ट्या अथवा अगदीच झाले तर शे. का. प. ह्यांच्या युनियन्सच्या संदर्भात वापरतात. जे भगवे अथवा हिरवे नाही, ते लाल असे तर नाही ना आपणाला म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
च
चिरोटा Tue, 03/17/2009 - 08:04 नवीन
आज भारत अमेरिकेच्या मान्डीला मान्डी लावुन त्यान्च्या हो त हो मिसळतो.त्यावेळी रशिया असायचा.६० आणि ७०च्या दशकात परळ्चे दळवी बिल्डिन्ग म्हणजे लाल भाइन्चा अड्डा होता.जवळ्पास सर्व युनियन्स लाल भाइन्कडे होती.त्यावर मात करण्यासाठी कोन्ग्रेसने शिव सेनेला लाल भाइन्वर सोडले.सेनेने मराठी/अमराठी मुद्दा वापरुन युनियन्स फोडायचे प्रयत्न केले कधी सरळ हल्ले करुन तर कधी धमक्या वापरुन.सामन्त लाल भाइ नव्हेत्.ते कोन्ग्रेस मध्ये होते. नन्तर विश्वास उडाल्यावर ते त्यातुन बाहेर पडले.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 03/17/2009 - 08:12 नवीन
भेन्डीबाजार साहेब हे मला माहित नव्हते आपण दिलेल्या माहिति बद्दल आभारी आहे ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
स
सुनील Tue, 03/17/2009 - 09:36 नवीन
अशीच चर्चा पूर्वी झालेली आहे. कृपया हा लेख आणि त्यावर मी दिलेली ही प्रतिक्रिया वाचा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 03/17/2009 - 10:49 नवीन
बँग ऑन स्पॉट आहे. ह्यापुढे काहीही अधिक लिहीण्यासारखे नाही. सर्व काही जे यायचे ते ह्या प्रतिक्रियेत अचूक आलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
विकास Tue, 03/17/2009 - 19:26 नवीन
>>>बँग ऑन स्पॉट आहे. ह्यापुढे काहीही अधिक लिहीण्यासारखे नाही. सर्व काही जे यायचे ते ह्या प्रतिक्रियेत अचूक आलेले आहे. अगदी हेच म्हणावेसे वाटले. बाकी दत्ता सामंत आणि लाल बावट्याचा काहीच संबंध नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. जाता जाता... मॅसॅचुसेट्स राज्य (बॉस्टन राजधानी) आणि आसपासचा परीसर (ज्याला न्यू इंग्लंड म्हणतात) तेथे पण अशाच अनेक गिरण्या होत्या. मात्र कालांतराने त्या या ना त्या कारणाने हलवून आधी अमेरिकेतच दक्षिणेकडील राज्यात गेल्या, नंतर त्या आता बर्‍याचशा अजून खाली मेक्सिकोत गेल्या आहेत. त्याची कारणे पण स्थानिक अर्थव्यवस्था हीच होती. मात्र येथे असले संप करून फ्सवून झाले नाही कारण उद्योजकांनी त्यांच्या उद्योगाला योग्य निर्णय घेताना कुणाचा तरी (दत्ता सामंतसारख्यांच्या) उपयोग करून पाठीत सुरा खुपसण्याचा उद्योग केला नाही. आज हा भाग कापड गिरण्या आणि इतर कारखान्यांच्या बाबतीत अगदीच मर्यादीत झाला आहे आणि सेवा, आरोग्य, शिक्षण आणि बौद्धीक क्षेत्रात आघाडीवर आहे. असे बदल घडत असतात ते प्रत्येकाला त्या वेळेस समजतीलच अथवा पचतीलच अशातला भाग नसतो. पण ते पारदर्शीपणे झाले तर समाजासाठी चांगले ठरते. तसेच नवीन अर्थव्यवस्थेसाठी मिळवून घेणे हे कठीण असले तरी काम करणे हे सर्वांनाच महत्वाचे ठरते. त्यावेळेस ज्या अनेक चुका घडल्या त्यातील एक चूक होती: वृत्तपत्र, बुद्धीवादी आणि राजकारण्यांनी दाखवलेली "राष्ट्रीयकरणाची" वेडी आशा...ते हवे तसे घडले नाही आणि घडणार नव्हतेच कारण उद्योजकांना तेथून हलायचे होते हे निश्चितच होते. काल गिरणी कामगारांच्या बाबतीत झाले तसेच आज कॉलसेंटर्सच्या आणि इतर अनेक आयटी संबंधी उद्योगांच्या बाबतीत... गिरणी संपात मराठी माणूस भरडला गेला म्हणून एक वास्तव ओरडा होतो. म्हणूनच "गिरणी कामगार देशोधडीला लागण्यामागे जबाबदार कोण?" या ऐवजी त्यातून आपण एक समाज म्हणून काही शिकलो अथवा शिकणार आहोत का? हा आजचा जास्त प्रश्न आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
सुनील Wed, 03/18/2009 - 08:21 नवीन
बँग ऑन स्पॉट आहे. ह्यापुढे काहीही अधिक लिहीण्यासारखे नाही. सर्व काही जे यायचे ते ह्या प्रतिक्रियेत अचूक आलेले आहे. धन्यवाद! कृषिप्रधान अर्थव्यवस्थेतून औद्योगिक अर्थव्यवस्था आणि औद्योगिक अर्थव्यववस्थेतून सेवाक्षेत्रीय अर्थव्यवस्था ह्या चढत्या पायर्‍या आहेत. हे जेवढे राष्ट्राबाबत खरे आहे तितकेच शहराबाबतदेखिल. विकास यांनी न्यू इंग्लंडचे उदाहरण दिले आहेच अगदी तसेच ते लंडनबाबतही घडले. अगदी पद्धतशीरपणे तेथील कारखाने हलवले गेले. पण हे झाले अत्यंत पारदर्शीपणे, लोकजागृती करून. मुंबईही त्याच मार्गाने जात आहे पण इथे पारदर्शीपणाचा अभाव, सवंग घोषणा करून सस्ती लोकप्रियता मिळवणार्‍यांचा सुळसुळाट. गिरणी संपात मराठी माणूस भरडला गेला म्हणून एक वास्तव ओरडा होतो. म्हणूनच "गिरणी कामगार देशोधडीला लागण्यामागे जबाबदार कोण?" या ऐवजी त्यातून आपण एक समाज म्हणून काही शिकलो अथवा शिकणार आहोत का? हा आजचा जास्त प्रश्न आहे असे वाटते. सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
संदीप चित्रे Wed, 03/18/2009 - 20:58 नवीन
अगदी योग्य प्रतिक्रिया सुनील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
अ
अन्या दातार Tue, 03/17/2009 - 15:50 नवीन
कुठलीही गोष्ट जास्त ताणली की तुटते. डॉ. दत्ता सामंतांनी जेवढे ताणले तेवढ्याच त्वेषाने गिरणीमालकांनीही मुद्दा ताणला. सरकारची निष्क्रियता ही अचंबित करणारी आहे (त्यामागे गिरणीमालकच असतील हे सांगायला ज्योतिषाची गरज नको)
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 03/18/2009 - 07:53 नवीन
काल गिरणी कामगारांच्या बाबतीत झाले तसेच आज कॉलसेंटर्सच्या आणि इतर अनेक आयटी संबंधी उद्योगांच्या बाबतीत...
हे सध्या होतच आहे.बर्याच कम्पन्यानी आय्.टी कर्मचारी कपात चालु केली आहे.एकदम खुप कर्मचारी काढुन हन्गामा होण्यापेक्षा कम्पन्या आठवड्याला थोडे थोडे कर्मचारी काढतात्.शिवाय 'आम्हाला अजुनपण योग्य माणसे मिळत नाहीत' असेही म्हणतात.सुदैवाने इन्टरनेट् वगैरे क्रान्ती झाल्याने स्वत:चा विकास करण्यास भरपुर वाव आहे.परन्तु स्पर्धा पण खुप आहे.आज तुम्ही केवळ तुम्च्या आजुबाजुच्याच नाही तर तुमच्या क्षेत्रातल्या जगभरच्या लोकान्शी स्पर्धा करत असता.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 03/18/2009 - 23:26 नवीन
आमच्या इथे पूर्वी कस्टमर सर्विस/ कॉल सेंटर म्हटले की भारतीय असायचे. अभिमान वाटायचा. पण आताशी या सेवा श्रीलंका, ईजिप्त, कंबोडिया इत्यादि. इथून घेण्याचा कल दिसतो आहे... भारतापेक्षा ते जास्त स्वस्त पडतं असं कारण दिलं जातं. खरं काय ते देव जाणे.... वरील मूळ लेखात गिरणी मालक, डॉ. सामंत आणि राज्य सरकार यांना संभाव्य दोषी म्हणून लिहिले आहे. पण खुद्द संप करणार्‍या गिरणी कामगारांचं काय? त्यांचा यात थोडादेखील दोष नाही काय? हे पटायला जरा अवघड वाटतं, कुणी जाणकार यावर प्रकाश टाकू शकेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
व
विकास गुरुवार, 03/19/2009 - 04:10 नवीन
वरील मूळ लेखात गिरणी मालक, डॉ. सामंत आणि राज्य सरकार यांना संभाव्य दोषी म्हणून लिहिले आहे. पण खुद्द संप करणार्‍या गिरणी कामगारांचं काय? त्यांचा यात थोडादेखील दोष नाही काय? हे पटायला जरा अवघड वाटतं, कुणी जाणकार यावर प्रकाश टाकू शकेल काय? (सर्वप्रथम, मी जाणकार वगैरे नाही आणि "आहे" असा अजिबात गोड गैरसमज नाही! थोड्याफार माहीती आणि वाचनावर आधारीत. तेंव्हा चु.भू.समजून घ्यावी!) कामगारांचा थोडाफार दोष आहे असे नक्कीच म्हणता येईल. मात्र तसे म्हणताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात असे वाटते: तत्कालीन कामगारांची ह्या संबधातील व्यावहारीक समजशक्ती. तत्कालीन म्हणायचे कारण इतकेच की तेंव्हा तसे म्हणाल तर जीवन साधे असल्याने "आपण बरं आपलं काम बरं" म्हणत गुण्यागोविंदाने जगताना वाईट हेतूंचे विश्लेषण वगैरे करणे हे त्यांना जमले असेलच असे नाही. कुठेतरी पैसे वाढतील अशी वेडी आशा लागली असेल तर त्यात नवल नाही. ती कुणालाही लागते. कामगार युनियनच्या गुंडगिरीला तोंड देण्याची ताकद एकट्यादुकट्यात नसते आणि सामुहीक येण्याची हिंमत होत नाही. हे काही केवळ कामगारांनाच लागू नाही. मात्र नंतर यावरून धडा घेतला तो पुणेकर कामगारांनी. टेल्कोमधे असाच एक नवीन दत्ता सामंत - मला वाटते - त्याचे नाव काहीतरी नायर असे होते, तो झाला. त्याने पण बेमुदत संप चालू केला. सुरवातीस त्याला आशेने आणि भितीने कामगारांनी पाठींबा दिला. पण नंतर प्रकरण हाताबाहेर जात आहे असे लक्षात आल्यावर त्याला चोप देऊन बाहेर काढले आणि टेल्कोची ताळेबंदी थांबवली. संप न करता थोडाफार मध्यम मार्ग काढण्यात दत्ताजी साळवी यांनी चालू केलेली भारतीय कामगार सेना आणि दत्तोपंत ठेंगंडींनी चालू केलेला भारतीय मजदूर संघ (भामस) यशस्वी ठरले. एका माहीतीप्रमाणे आज भामस भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/19/2009 - 15:47 नवीन
थॅन्क्यू, विकास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा