अर्थ अवर
💬 प्रतिसाद
(71)
N
Nile
Mon, 03/28/2011 - 13:12
नवीन
खरंच?
उद्योगधंद्यांने वाचवलेली वीज त्यांच्या सरसरीच वार्षिक वापराच्या ०.०१४१%च असेल. पण त्यामुळे होणारे नुकसान कीती असेल? एक तास कंपनी बंद ठेवणे != एक तासाची वीज बचत. वीज कपाती मुळे मुळातच अनेक छोट्या उद्योगधंद्यांना त्यांचे वर्किंग अवर्स लोड शेडींग नुसार ठेवावे लागतात.
मध्येच एखाद्या फ्लोअरवर १ तास वीज बंद ठेवणे म्हणजे १ तास कंप्युटर बंद ठेवण्याइतके सोपे नाही.
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 03/28/2011 - 13:24
नवीन
एकदा सुचीत करु इच्छीतो की कामधंदे बंद पाडून, नुकसान सोसून सहभागी व्हा हा हेका कधीच नव्हता जरी तसा आभास करायचा कोणी जीवापाड प्रयत्न करत असले तरी.
येथे सहभागी व्हायला ज्यांना शक्य आहे त्यांना सांगीतले आहे व असे अनेक भारतीय आहेत ज्यांना हे शक्य आहे. उद्योगधंद्यात फक्त अवजड उद्योग, मशीनरी इ. नव्हे तर छोटी रेस्टॉरंट, तसेच अन्य कंपन्यातील काही दिवे बंद करता येतील इ. देखील सामील होउ शकतात. सगळेच उद्योगधंदे नुकसानीत जातील हा आरोप बिनबुडाचा आहे हे स्पष्ट झाले आहे. सगळे काम ठप्प होउन नुकसान व्हावे असा हेतू अर्थ अवरचा कधीच नव्हता हे पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.
अर्थअवर पाळल्यामुळे भारताच्या, पर्यावरणाच्या समस्या सुटतील असेही नाही किंवा अत्यंत बिकट होतील असेही नाही.
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 03/28/2011 - 13:30
नवीन
पह्यला प्रतिसाद.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/28/2011 - 12:15
नवीन
१. ज्यांच्याकडे नेहेमीच वीजेची (आणि इतर संसाधनांचीही) उधळपट्टी चालते त्यांच्यासाठी 'अर्थ अवर' हवा का 'हॅव सम सेन्स' हा संदेश हवा? माझ्या मते दुसरा पर्याय.
१.१ (शास्त्रापुरता) एक तास घरातला एक दिवा, पंखा बंद ठेवून किती वीज वाचेल आणि किती वेळ शेतीचे पंप सुरू रहातील?
२. समजा आपल्याकडे पुरेशी ऊर्जा आहे आणि वसुंधरेसाठी आपण एक तासभर वीज वापरली नाही तर त्या वीजेचं नक्की काय होणार? तासाभरापुरती ऊर्जानिर्मिती कमी करता येईल काय? त्याचा खर्च काय होईल? आणि समजा असं करता येत नसेल तर तयार होणार्या वीजेचं काय करायचं?
झगमगाट, नीऑन साईन्स इत्यादींवर जी ऊर्जा जळते त्याचं बिल आपल्या घरात येणार्या बिलापेक्षा बरंच जास्त असतं. आपल्याला स्वस्तात वीज मिळते ती या लोकांनी जास्त पैसे भरल्यामुळे (निदान कागदोपत्री, प्रत्यक्षात काही वेगळं चालत असेलही!). अर्थात वीजेच्या नासाडीचं हे समर्थन नव्हे. पण हीच नीऑन साईन्स बंद केली तर आपल्याला वीजेचं बिल जास्त येऊ शकतं याची फक्त एक नोंद.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Mon, 03/28/2011 - 12:36
नवीन
बहुसंख्य प्रश्नांना वर उत्तर दिले आहेच.
पण काही मुद्द्यांवर अजुन लिहितो ...
ते आपण उर्जा कशापासुन मिळवतो त्यावर डिपेंड आहे.
म्हणजे कसे की आपल्या कर्तुत्वाने आपला देश आपल्याला लागणारी १००% उर्जा ही सुर्या / वारा / टायडल एनर्जी पासुन मिळवतो तर आपल्याला हा 'अर्थ अवर' पाळण्याची गरज नाही.
पण आपण समजा कोळसा जाळुन, डिझेल जाळुन, अणु-उर्जा वापरुन हे मिळवत असु तर विचार कराल की नाही ?
१ तासात वाचलेल्या विजेमुळे वाचलेला कोळसा किंवा डिझेल ह्याचा विदा तुर्तास माझ्याकडे नाही पण बिलिव्ह मी ते दखलघेण्यायोग्य नक्कीच असेल.
बाकी काही जणांचा आक्षेप असा आहे की उर्जा साठवुन ठेवता येत नाही मग ती कशी वाचेल.
सोप्पं आहे, मागणी आणि पुरवठा ह्यांचे जे हार्मोनायझिंग आहे ना त्या कामात ह्या '१ तासात वाचलेल्या उर्जेमुळे' पुरेसा 'बफर फॅक्टर' मिळेल. हे बहुतेक फायदेशीरच नाही का ?
२ गोष्टी आहेत :
१. मी ह्या प्रश्नाकडे 'बिझीनेस' म्हणुन पहात नाही व म्हणुन मी 'रेट्स'ची काळजी करत नाही
२. मला 'निकड' ही जास्त महत्वाची वाटते, न्युऑन साईन्स जरी मला कितीही पैसा मिळवुन देणार असतील तरी उपयुक्ततेच्या बाबतीत माझा ह्या न्युऑन साईन्सना नेहमीच दुय्यम प्रेफरंस असेल. कारण तेच, मी नैतिक मुद्दे बघतो, बिझीनेस नव्हे.
( बाकी हा मुद्दा माझ्या दृष्टीने इथे विसंगत आहे, आपण इथे 'उर्जा वाचवण्याचे' बोलतो आहे न की 'पैसे वाचवणे', असो. )
स्वगत : च्यायला तिकडे १ तासात जेवढी उर्जा मी वाचवली होती ती इथे फुकट टंकण्यात वाया जातेय का काय अशी भिती वाटत आहे ;)
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 03/28/2011 - 12:48
नवीन
असहमत.
१ तासात वाचवलेली वीज म्हणजे
१/२४*३६५=०.०१४१% म्हणजे काहीच नाही.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Mon, 03/28/2011 - 13:03
नवीन
>>१/२४*३६५=०.०१४१% म्हणजे काहीच नाही.
ओके, नसु शकेल.
बाकी तुम्हाला "Statistics are like bikinis. What they reveal is suggestive, but what they conceal is vital" हे माहित असेलच.
असो, आम्हीही उगाच एक आकडेवारी देतो, तुमच्याइतकी परफेक्ट नाय बरं का पण भारताच्या एकुण उर्जा उत्पादनापैकी आपण ५३% उर्जा कोळश्यापासुन, ८% उर्जा नैसर्गिक वायुपासुन आणि ३१% उर्जा ही तेलापासुन मिळवतो.
आणि बरं का, हे जे सोर्सेस आहेत ना ते एक ना एक दिवस संपणार आहेत, बघा बॉ आता तुम्हीच :)
बाकी तुर्तास नक्की किती उर्जा आणि त्यानुसार कोळसा / ऑईल वाचले हे शोधण्याइतका वेळ जरी असला तरी त्याची गरज वाटत नाही, असो.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 03/28/2011 - 13:15
नवीन
हो का, बरं मग असं करा जंगलात जाउन रहा. ह्या कोळसा, वीज वापरुन केलेले कपडे, खाद्य वगैरे वापरु नका. झाडाच्या साली वगैरे वापरा. म्हणजे हे सगळ एका माणसाचं का होईना वाचेल, आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे इटस नॉट अॅज स्मॉल अॅज यु कॅन कन्सिल इन बिकिनी नाही का?
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Mon, 03/28/2011 - 13:29
नवीन
>> बरं मग असं करा जंगलात जाउन रहा.
सल्ल्यासाठी आभार ...
आम्ही जरुर ह्याचा विचार करु, मात्र तुम्हीही काळजी घ्या, आधाशीपणे तुम्ही एक दिवस सगळे संपवुन टाकताल आणि उर्जेअभावी मग तुमची शहरे आणि आमचे जंगल ह्यात काहीच फरक राहणार नाही.
इन दॅट केस तुम्हाला आमची जंगली राहणीमान डिफिकल्ट जाईल बरं का मिश्टर ;)
असो, अनावश्यक फाटेफोड आणि चर्चा ह्याला इथे माझ्याकडुन पुर्णविराम, बाकी चालु द्यात :)
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 03/28/2011 - 13:42
नवीन
आमची काळजी करु नका, तुमच्या सारखे अनेकांनी वापर थांबवला तर आमचे सात जन्मतरी सुखानी जातील. ;-)
त्यामुळे आम्हाला जंगलात यावे लागणार नाही. आणि हो, तोवर आम्ही अजुन स्वच्छ उर्जेचे स्रोत शोधुनही काढु. ते शोधायलाही उर्जा खर्च होते बर्का.. नाही आधीच सांगतो म्हणजे धक्का नसो बसायला..
उदा. सुर्याची उर्जा वापरु.. तेव्हाही तुम्ही यालच म्हणा.. अरे मेल्यांनो तो सुर्य ३ बिलियन वर्षात संपेल वापरुन म्हनुन ओरडत पण असो असो... ;-)
उतरली का सगळी? चला तिकडे कुंदनसेठनी ग्लास भरलेत.. शल्लोक पाठ करु आपण चला..
बा*** भां**.,. आज दिवसभरात ट्यार्पी शिलेदारचा पार कोतवाल झाला राव आमचा.. असो.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Mon, 03/28/2011 - 02:35
नवीन
आमच्या नायजेरियात तर २ - ४ दिवसांनी नियमित ३-४ तास विजपुरवठा होतो. त्यामुळे तसेही आम्ही विजेची बचत करतच असतो.
अजुन खास जर अर्ध्या तासासाठी विजबचत करायची असेल तर आधी मुदलातला विजपुरवठा झाला पाहिजे.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Mon, 03/28/2011 - 07:42
नवीन
ह्या वर्षी पण कँडल लाईट डिनर केलेत का नाही सहज राव?
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 03/28/2011 - 07:58
नवीन
म्हणून तर बोलतोय ना सर! :-)
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 03/28/2011 - 08:09
नवीन
वरील संपूर्ण चर्चा वाचली, थोडे आधीच मत द्यायचे होते पण ते व्यापात राहिले.
सर्वात आधी, मी अर्थ अवर पाळला नाही. मुख्य कारणं दोन,
१. मी नेहमीच काटकसर करतो.
२. त्यावेळेला वीज बंद करुन माझ्या कामकाजाचे नुकसान करणे मला जास्त महागात पडले असते.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की अर्थ अवर या प्रकल्पाचा उद्देश काय आहे? माझ्या मते अर्थ अवरचा उद्देश उर्जा वापराच्या काटकसरीबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस पोहचवणे. त्यामुळे माझ्यासारख्या नेहमी काटकसर करणार्याने अर्थ अवर पाळुन या उद्देशात साध्य असे काही होत नाही.
याउलट याबद्दल मी प्रसार केला, जसे की असा धागा लिहणे, तो पुन्हा वर आणणे, त्यावर चर्चा करणे इ., करणे मात्र महत्त्वाचे आहे.
त्यामुळे, भारतात जिथे पुरेशी उर्जाच मिळत नाही तिथे उर्जाबजतीचा संदेश देणे एकवेळ ठीक पण त्याच तासाला वीज बंद ठेवा असा हट्ट पटत नाही.
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 03/28/2011 - 08:26
नवीन
नाईल तु सर्वात श्रेष्ठ महात्मा आहेस व संस्थळावरचे अन्य सभासद देखील एकसे एक काम करत असतात. आपल्या सगळ्यांचेच तर कार्बन फुटप्रिंट अदृश्य आहे.
एकाच वेळी आपले प्राणांचे मोल देउन स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या स्वातंत्र्य दिले म्हणून त्यांचे आभार मानतो व आपण आपल्या समाजासाठी, पृथ्वी साठी काही करायची वेळ आली की मी अमुक तमुक नेहमीच करतो त्यामुळे मला अमुक तमूक मधून सुटका मिळावी हे कारण देतो.
हरकत नाही. एकतर हे कोणावर सक्तीचे काम नाही आहे. पण कुठल्या चांगल्या कामाला आपली अक्कल हुशारी दाखवुन हिणवणे हे चुकीचे आहे. आपण जगातील सर्व ज्ञान कोळून प्यायलो आहे व प्रत्येक समस्येचे उत्तर व उकल आपल्याकडे आहे ह्या समजुतीत शब्दछल करत रहाणे यामुळे मराठी आंतरजाल प्रचंड प्रकाशीत आहे. येथे 'एक तास बंद' योजना सुरु करायला हवी :-)
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 03/28/2011 - 08:32
नवीन
धन्यवाद, पण मी नाहीए.
मी सुटका मागितलीच नाही. मुळात मला कोणी बंधनात घातलेलंच नाही. मी नेहमीच काटकसर करतो त्यामुळे ह्या एक तास मी पाळला नाही म्हणजे मी पृथ्वीसाठी काही केलं नाही असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. (मी बचत कशी करतो असे मी इथेही अनेकदा इतर धाग्यांवर लिहलेलं आहे)
माझ्या प्रतिसादात कुठे कोणाला हिणवले आहे? (हिणवण्यासाठी मला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, हिणवायचे असेल तर मी ते थेटच करतो.)
अनावश्यक टिप्पणी. प्रसार करु नये, धागा काढु नये असे लिहलेलेच नाही. थंडपणाने प्रतिसाद वाचलेत तर मुद्दे लक्षात येतील असे वाटते. असो.
- Log in or register to post comments
क
कुंदन
Mon, 03/28/2011 - 11:17
नवीन
>>नाईल तु सर्वात श्रेष्ठ महात्मा आहेस
+११
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 03/28/2011 - 13:04
नवीन
१. लाईट बंद ठेवा हो... पण मेणबत्त्या जाळू नका.
एक मेणबत्ती पेटवण्या ऐवजी झिरोचा बल्ब विजेवरच जाळा. अन्यथा ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भरच पडेल. आणि रोगापेक्षा उपाय भरंकर ठरेल. :(
२ अ. अर्थ अवर पाळण्याचा फॉलोअप एरवी ऊर्जेचा अपव्यय करण्याचे टाळून करा. कारने जायच्या ऐवजी स्कूटरने जा, स्कूटरने जायच्या ऐवजी सायकलने जा, सायकलने जायच्या ऐवजी चालत जा.
२ ब. जिममध्ये ट्रेडमिलवर चालायच्या ऐवजी बाहेर चाला. ब्यायामाच्या सायकलला डायनॅमो बसवून थोडी वीज निर्मिती करा.
अवांतर: समजा एखादा जनरेटर १ किलो वॅटचा असेल तो फुल लोडला सुमारे ३ किलोवॅट (औश्णिक) ऊर्जा खर्च करतो. तो बंद न करता (कारण वीज केंद्रातील जनरेटर बंद करणे शक्य नसते) त्यावरचे लोड बंद केले तर तो ३००-४०० वॅट ऊर्जा तरीही जाळत राहील. आणि ही ऊर्जा अर्थ अवरच्या नावाखाली केवळ वाया घालवलेली असेल (शून्य आउटपुट घेऊन) .
- Log in or register to post comments
क
कुंदन
Mon, 03/28/2011 - 13:24
नवीन
व्वा चाचा !!!
अंमळ उशिरा आलात.
सहज तुला साधेच पाणी देतो.
नायल्या तु काय थंड घेणार की गरम ? नाय दोन्ही साठी सारखीच वीज लागते म्हणुन म्हटले.
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 03/28/2011 - 13:27
नवीन
कंजुषी नको, काढा ते विस्कीची बाटली काढा. सहजकाकांना फारच चिंता असेल तर बॉट्म्स अप घेउ, नाहीतर ऑन द रॉक्स आपल्याला चालेल.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Mon, 03/28/2011 - 13:31
नवीन
थत्तेचाचांशी फुल्टु सहमत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2