Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वयाप्रमाणे बदलत जाणारी मतं

भ
भडकमकर मास्तर
Mon, 03/23/2009 - 12:51
🗣 61 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
35158 वाचन

💬 प्रतिसाद (61)
ख
खटपट्या Tue, 02/25/2014 - 18:18 नवीन
वयाप्रमाणे माझ्यात झालेले बदल (अजून तितकस वय झाल नाही) पहिला जहाल हिंदुत्ववादी होतो - आता बराचसा कमी झालो आहे. पूर्वी देवावर नको तेवढी श्रद्धा - आता संपूर्ण नास्तिक पूर्वी कोणी काय बोलले कि दोन तीन दिवस तोच विचार करत बसायचो - आता "फाट्यावर मारा पुढे चला" --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सही - Nobody is Perfect, I am Nobody.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Tue, 02/25/2014 - 20:31 नवीन
आपल्या मताचा नितांत आदर आहे परंतु कोणी कसा खर्च करावा किंवा कसा वेळ व पैसा घालवावा(काही बाबतीत गुंतवावा)हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी तर संत ज्ञानेश्वरांप्रमाणे म्हणेन हो "जो जे वांछील तो ते लाहो!" पण काही चुकीच्या गोष्टी डोळ्यासमोर घडत असतील तर मात्र त्यांचे नेमके कारण काय आहे हे जाणून घेऊन चुकीच्या प्रथांसाठी कान उघाडणी करायला मागे पुढे पाहणार नाही! सुबोध खरे साहेबांना मनापासून धन्यवाद, खूप छान पद्दत सर्वांसमोर आणली आहे आपण!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 02/26/2014 - 05:16 नवीन
मी विशीत असताना जातीव्यवस्थेवर आधारित आरक्षणाला माझा तीव्र आक्षेप होता आज तो अतितीव्र आक्षेप आहे.नोकरीत आंधळे, लंगडे गतिमंद , विधवांची मुले. विधवा, परित्यक्ता या सारख्या लोकाना आरक्षण असले पाहिजे. शिक्षणात हुशार पण गरीब मुलाना आरक्षण असले पाहिजे मग जात काहीही असो. मी विशीत असताना माझे विचार मुक्त अर्थव्यवस्थेच्या विरोधी होते. त्यावेळी "चाळीशी ओलांडलीस की भाडवलशाहीचे गोडवे आपोपाप गायला लागशील" असे त्यावेळी प्रोढ झालेली माणसे म्हणत. आज मी साठी ओलांडलेली आहे व मुक्त अर्थव्यवस्था हा मोजके फायदे व अगणित तोटे असलेली अर्थव्यवस्था असते हे माझे ठाम मत झाले आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 02/26/2014 - 05:59 नवीन
अवांतर : आधुनिक महाराष्ट्राच्या जाणत्या राजाची मते दररोज बदलत असतात. त्यामुळे त्यांना अधिक परिपक्व म्हणावे काय ?
  • Log in or register to post comments
भ
भाते Wed, 02/26/2014 - 11:08 नवीन
लहानपणापासुन आईबाबांबरोबर देवस्थानाला गेलो कि तिकडे एक गोष्ट आवर्जुन पाहायला मिळायची ती म्हणजे दक्षिणा किंवा जिर्णोद्धार निधी. पुर्वी ऐच्छिक असलेली गणपती वर्गणी ११, २१, ५१, १०१ आणि आता १५१ (ऐच्छिक नाही तर जबरदस्ती) झालेली मी पाहिली आहे. मी नास्तिक नाही आहे. रोज सकाळी घरच्या गणपतीला केलेला माझा नमस्कार देवाला पोहोचतो अशी माझी श्रध्दा आहे. दगडी मुर्तीभोवती देऊळ म्हणुन अनेक मजली इमारत ऊभी करायला पैसे द्यायला मला पटत नाही. माझे वडिल काही संस्थांचे सभासद असल्यामुळे पहिल्यापासुन दरवर्षी त्यांचे वार्षिक अहवाल घरी आलेले मी पाहिले आहेत. ते अहवाल वाचताना माझ्या लक्षात आले की त्या संस्थांचे वर्षभर इतर ऊपक्रम चालु असतात. त्यामुळे गणपती वर्गणी किंवा जिर्णोद्धार निधी देण्यापेक्षा वर्षातुन एकदा तोच पैसा या संस्थांच्या शिष्यवृत्ती निधी, वैद्यकिय मदत निधी, विद्यार्थी मदत निधी, जेष्ठ नागरिक निधी यासारख्या ठिकाणी द्यायला मला मनापासुन आवडते. डॉ. सुबोध खरे यांचे विचार आवडलेही आणि पटलेही.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 02/26/2014 - 16:49 नवीन
कॉलेजात असताना मला आणि माझ्या कॉलेजमधील मित्रांना सोव्हीएट देश तयार करणारा लेनीन मोठा वाटायचा. कारण त्या काळात सोव्हिएट देश म्हणून एक मासिक ऑलमोस्ट फुकट मिळायचे. त्यात रशिया आणि तिथल्या संस्कृती, शेतकरी, कामगार, संशोधन वगैरेवर लिहीलेले असायचे. छान छान फोटो देखील असायचे. पण त्याही पेक्षा आम्हाला आकर्षण असायचे ते सोव्हिएट देश मासिकाच्या कागदाचे. त्या कागदाचे बाण खूप छान होयचे आणि दोन हातांच्या दोन बोटांमधे पकडून उडवल्यास लांबपर्यंत जायचे. त्यामुळे गॅदरींग अथवा इतर तत्सम कार्यक्रमात त्याचा खूप छान उपयोग होयचा. पण जस जसा मोठा झालो तसे असे करणे चूक आहे हे समजू लागले. आणि मग मी लेनीनवादापासून दूर गेलो.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Wed, 02/26/2014 - 17:54 नवीन
देशभक्तीने ओतप्रोत भरलेली गाणी, सिनेमे, नाटके आणि पुस्तके वाचून सैनिक आणि सैन्याविषयी पराकोटीचा आदर होता. आपले भारतीय सैनिक म्हणजे सद्गुणाची खाण आणि बाकीचे अत्यंत वाईट. पण जसजसे डोळे उघडत गेले. भारतीय सैन्यात वशिलेबाजी, भ्रष्टाचार, बेपर्वाईचा बळी ठरलेले अनेक लोक भेटले. आणि जमिनीवर आलो. सगळेच सैनिक आपापल्या देशाकरता जीव धोक्यात घालत असतात. प्रत्येकाला आपापल्या देशाविषयी भक्ती असते. त्या त्या देशाला आपल्या सैन्याविषयी आदराची, कौतुकाची भावना असते हे जेव्हा जाणवले तेव्हा भारतीय सैन्य हे एकमेवाद्वितीय नाही हे उमजू लागले. पुढे सैन्य हे नेसेसरी इव्हिल अर्थात आवश्यक पण त्रासदायक लोढणे आहे अशीच भावना बनत आहे. एखाद्याला दुसरे काही जमत नसल्यास सैन्यात जावे असे वाटू लागले आहे. वयाचा परिणाम.
  • Log in or register to post comments
अ
अमित खोजे Wed, 02/26/2014 - 18:45 नवीन
परवाच प्रशांत दामलेची "खुपते तिथे गुप्ते" कार्यक्रमात मुलाखत पाहिली. कविता लाड सुद्धा त्या कार्यक्रमात होती. तिची आठवण आली म्हणून "एका लग्नाची गोष्ट" (कविता लाड वालं) शोधायला गेलो पण गुगल बाबाला पण ते मिळाले नाही. मग "गेला माधव कुणीकडे" आणि "चल काहीतरीच काय" पाहत होतो. त्यावरून अगदी प्रकर्षाने जाणवले कि प्रशांत दामले ची कलाकारी तेव्हा जरी आवडत असली तरीही आता ती काहीशी बावळट वाटते. शिवाय प्रत्येक नाटकात तेच एक ध्यान. नाविन्य काही नाहीच. हे एक झाले नाटकांचे. पूर्वीचे जुने पिक्चर जरी पहिले तरी ते झाडाभोवती फिरणे वगैरे वेगळे वाटतेच कि. (आत्ताचे नाचही काही फार चांगले आहेत अशातला प्रकार नाही). पण नाच सोडले तर त्यांना काहीतरी ष्टोरी तरी असायची. आत्ता तीच गायब होत चाललीये.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/27/2014 - 06:11 नवीन
मला स्वतःमधे झालेले बदल म्हणजे मी तुलनेने अधिक मवाळ व व्यापक झालो आहे. अच्युत गोडबोलेंचे मनात, सुबोध जावडेकरांचे मेंदुतल्या मनात, डॉ आनंद जोशी व सुबोध जावडेकरांचे मेंदुतला माणुस या पुस्तकांमुळे विचारात काही बदल झाले.अंधश्रद्धेची कारणे ही केवळ अज्ञान व अगतिकता ही नसून मेंदु विज्ञानातील जैविक कारणे देखील आहेत हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद हा मानसिक आरोग्य चांगले ठेवायला मदत करतो हे जाणवल. श्रद्धेच्या सकारात्मक बाजूचा एका वेगळ्या कोनातुन नव्याने विचार या पुस्तकांनी मिळाला. सश्रद्ध लोकांशी तडजोड अधिक सुलभ झाली. आपण स्वतःच आपल्या प्रतिमांमधे अडकत चाललो आहे की काय याचे भय वाटू लागल्याने आत्मपरिक्षण नव्याने चालू केल.......
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 02/28/2014 - 05:16 नवीन
अंधश्रद्धेची कारणे ही केवळ अज्ञान व अगतिकता ही नसून मेंदु विज्ञानातील जैविक कारणे देखील आहेत हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले. हे अगदी एक हजार टक्के पटले. उच्च शिक्षित म्हण्जे तो अंधश्रद्ध नसणार असे काही नाही. हे अनेक नातेवाईकानी मला पटवू दिलेय आपल्या वर्तणुकीने !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मारकुटे गुरुवार, 02/27/2014 - 08:35 नवीन
विचारवंतांबद्दल पूर्वी आदर वाटायचा. आता त्यांच्या थोबाडात पायताण मारावं वाटत !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा