जनातलं, मनातलं
मैत्रीण माझी.
By विवेकवि
·
Primary tabs
मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी
वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी
हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख
मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख
आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी
मनातील वादळांना मनातच थोपवणारी
भासते कधी आकाशातील चांदणीसारखी
तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी
तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर
तरीही अंतःरात रुतलेली खोलवर
तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे
हरलो जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे
माझा अनुभव मी मान्ड्त आहे.
वाचावा हि विनती.
चांगला प्रयत्न आहे. पु.ले.शु.
- प्राजु
छान! तुम्ही मैत्रीदिन साजरा करताय की काय?
असो... चालू ठेवा.
मैत्रीणीला छान उपमा दिल्यात.
प्रयत्न छान आहे.
अशाच तुमच्या कविता येऊ देत.