मिसळपावची जडण घडण !
💬 प्रतिसाद
(68)
अ
अवलिया
Wed, 04/01/2009 - 12:51
नवीन
१) कुठलाही धागा उघडला की त्याच लेखकाचे इतर लेख सुद्धा एखाद्या ब्लॉक मधे दिसले तर बरे
२) मु़ख्यपृष्ठावरील स्वागत, सुचना, जडणघडण हजर सभासद हे ब्लॉक लेखाच्या धाग्यात नाही दिसले तरी चालेल
३) हजर संपादक असा ब्लॉक दिला तर (किंवा सध्याचे सगळे संपादक ) बरे होईल
अजुन जसे वाटेल तसे टंकतो
--अवलिया
- Log in or register to post comments
द
दशानन
Wed, 04/01/2009 - 12:54
नवीन
छान प्रस्ताव !
१. सर्च काम करत नाही आहे रे, रिइंडेक्स कर ना प्लीज ;)
२. एखाद्या लेखा बरोबर त्याच लेखकाचे अथवा त्या लेखा संबधीत माहीतीशी योग्य असे दुवे त्या लेखाच्या खाली अथवा डाव्या समासामध्ये भेटावेत अशी व्यवस्था जी गरजेची आहे.
३. मिपा तर्फे सुचना / नियम व्यनी द्वारे मिळावेत अथवा ईमेल द्वारे.
४. बेस मेनू (मार्गदर्शन) खालील जागी पण असावा.
५. भाषा बदल शॉर्ट कि काम करत नाही आहे त्या बद्दल काही तरी करा.
६. अनुक्रमेद्वारे लेखन मिळू शकेल अशी सुविधा.
७. नवीन सदस्य हा ब्लॉक काढला तरी चालेल असे वाटते, नवीन कोण आले हे पाहणे गरजे नाही.
८. नवीन सदस्य च्या जागी सर्वात जास्त पाहिले गेलेले / प्रतिसाद दिले गेलेले लेख दिसले तर उत्तम.
जसे जसे आठवत जाईल तसे तसे लिहीत जाइनच.

- Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२
Wed, 04/01/2009 - 12:56
नवीन
मिसळपाव. कॉमवर नोंदणी करतांना काय अडचणी जाणवल्या? त्यात काही बदल सुचवायचे आहेत का?
आमचे एक स्नेही यांनी मिसळ पाव वर नोंदणी केली पण खात चालु व्हायला चार दिवस लागले तर हा वेळ कमी करावा
जेणे करुन नविन सदस्यांना त्रास होणार नाहि
फक्त एक सुचना जर एखादा धागा काहि कारणामुळे अप्रकाशित झाला असेल तर त्याची सर्व ठिकाणा वरुन हकालपट्टी व्हावी तो कोठुन ही सदस्यांच्या नजरेस पडु नये
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
- Log in or register to post comments
आ
आनंद घारे
Wed, 04/01/2009 - 17:44
नवीन
जर एखादा धागा काहि कारणामुळे अप्रकाशित झाला असेल तर त्याची सर्व ठिकाणा वरुन हकालपट्टी व्हावी . तो कोठुन ही सदस्यांच्या नजरेस पडु नये
"तुम्हाला येथे येण्याची मुभा नाही " असे काहीतरी सध्या येते ते अपमानास्पद वाटते.
******
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Wed, 04/01/2009 - 13:05
नवीन
आर्.एस्.एस. सेवा(Really Simple Syndication) असली तर उत्तम.
मोठे लेख्,लघु कथा(साधारण ३/४ ए-४ पाने) ह्याना save as pdf पर्याय.
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
न
नरेश_
Wed, 04/01/2009 - 13:07
नवीन
१ दिनांक, वार देता आल्यास उत्तम.
२ दररोजच्या मराठी वृत्तपत्राच्या लिंक्स देता आल्यास उत्तम.
३ .अशी सूचनापेटी कायमस्वरूपी मुख्यपानावर असावी जेणेकरून मिपाकर वेळोवेळी त्यात आपले बहुमूल्य अभिप्राय / मते/सूचना व्यक्त करतील .
इतरांनी केलेल्या सूचनापेटीतील सूचना गोपनीय ठेवल्या तरी चालतील , किंबहूना गोपनीयच ठेवाव्यात.
४. विषयानुरूप पार्श्वरंग उदा. काव्य असलेल्या ठिकाणी गुलाबी बॅकग्राऊन्ड दिल्यास ते शोभून दिसेल.
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 04/01/2009 - 13:18
नवीन
शोधामधे एखाद्या लेखकाचे सर्व लेख दिसण्याची सुविधा असावी.
शोधकरताना लेखाच्या विषयावरून, लेखकावरून, गटवारीवरून शोधण्याची सुविधा असेल तर चांगले होईल. उदा. चतुरंगरावांची मधुशाला शोधताना लेखकाचे नाव 'चतुरंग' आणि विषय 'मधुशाला' अशा दोन्ही विषयांची गाळणी लावता आली तर उत्तम. म्हणजे चतुरंगरावांची मधुशाला ही सापडलेल्या निकालात सर्वात वरती दिसेल.
तसेच सर्वात गाजलेल्या चर्चा ज्यात प्रतिसाद आणि वाचने यांची संख्या सर्वाधिक आहे ते दिसण्याची वेगळी सोय हवी.
विषयातील प्रतिसाद नवीन पानावर गेल्यास म्हणजे ५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यास नवीन प्रतिसादापर्यंत पोचण्यासाठीचा मुख्यपृष्ठावरचा दुवा काम करीत नाही. त्यावर काहीतरी उपाययोजना व्हावी.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
- Log in or register to post comments
श
शक्तिमान
Wed, 04/01/2009 - 13:19
नवीन
पूर्वी एका काथ्याकुटात मी दोन सूचना केल्या होत्या.
त्या परत येथे मांडत आहे.
१. मिपावरील लेखसूची मधील लेखांचा क्रम हा प्रतिक्रियेप्रमाणे ठरतो. ज्या लेखावर काहीच वेळापूर्वी प्रतिक्रिया आली आहे.. तो लेख सर्वात वर येतो. ही व्यवस्था चांगली आहे.
यात अधिक भर म्हणून 'सॉर्ट लेख बाय नंबर ऑफ रीप्लायज्' (प्रतिसाद-संख्याअनुक्रमे लेखक्रम लावणे) असा पर्याय पुरवता येईल का?
म्हणजे ज्या लेखावर (साहित्यप्रकारावर) सर्वात जास्त प्रतिक्रिया असतील तो सर्वात वर येईल. यामुळे जुने उत्तम लिखाण शोधणे सोपे जाईल....
२. बर्याचदा असे आढळते की लेखाची वाचने ५०० च्या वर जातात पण लेखावर प्रतिसाद ५-६च असतात. यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे प्रतिक्रिया लिहिण्याचा कंटाळा... (पुरावा: कुठ्ल्याही कौलाला १०-१५ मतं नक्कीच मिळतात.. कारण एका क्लिकमध्ये मत नोंदवता येते.. पण प्रतिक्रियेचे तसे नाही.) यावर उपाय म्हणून प्रत्येक लेखावर (कवितेवर..इ.) 'लेख आवडला ' अशा स्वरूपाचे बटण्/लिंक पुरवता येईल का? एखाद्याला लेख आवडला तर तो त्यावर क्लिक करून तसे दर्शवू शकतो. एका सदस्याला एकदाच क्लिक करता येईल.
म्हणजे मग आपण जशी वाचन संख्या दाखवतो तसेच लेख आवडणार्यांची संख्याही दाखवता येईल. याची पुढची पायरी म्हणजे १ ते ५ अशी रेटींगची व्यवस्थाही करता येईल (जसे यूट्युब व्हिडीयोज् ला असते. ). आणि मग यावरही सॉर्टींग चा पर्याय दिला तर उत्तमोत्तम लेखन झट्क्यात सापडवता येईल..
- Log in or register to post comments
न
नया है वह
Wed, 04/01/2015 - 12:05
नवीन
'लेख आवडला ' अशा स्वरूपाचे बटण्/लिंक पुरवता येईल का? एखाद्याला लेख आवडला तर तो त्यावर क्लिक करून तसे दर्शवू शकतो. एका सदस्याला एकदाच क्लिक करता येईल.
म्हणजे मग आपण जशी वाचन संख्या दाखवतो तसेच लेख आवडणार्यांची संख्याही दाखवता येईल. याची पुढची पायरी म्हणजे १ ते ५ अशी रेटींगची व्यवस्थाही करता येईल (जसे यूट्युब व्हिडीयोज् ला असते. ). आणि मग यावरही सॉर्टींग चा पर्याय दिला तर उत्तमोत्तम लेखन झट्क्यात सापडवता येईल..
- Log in or register to post comments
द
दिपक
Wed, 04/01/2009 - 13:27
नवीन
१)"लेखन करा" ह्या लिंकवर टिचकी मारल्यानंतर "मिपाचे धोरण" पहिले दिसायला हवे.
२) एकाच लेखकाचे लेखन(फक्त त्याने सुरु केलेला धागा) अनुक्रमे दिसु शकेल काय.?
३)संपादक,नीलकांत आणि तात्या ह्यांच्या व्यक्तीरेखांची लिंक मुखपुष्ठावर दिसु शकेल का? (काही अडचणी आल्या तर मदतीसाठी).
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 04/01/2009 - 14:03
नवीन
१.कोणत्याही लेखकाला जसे.. "माझे लेखन" मध्ये स्वतःचे लेख पहाता येतात तसेच.. त्याला इतर लेखकांचे लेखनही पाहता यावे. म्हणजे शोधत बसावे लागणार नाही.
एखाद्याच्या नावापुढे टिचकी मारल्यावर त्याच्या वाटचालीत त्याचे फक्त लेखन, आणि दुसर्या टॅग मध्ये (जसे आता आहे) त्याच्या प्रतिक्रियांसहीत त्याचे लेखन दिसावे.
२. एखाद्या लेख उघडला की, त्याच प्रकारातले इतर लेख (हे ही वाचून पहा) या टॅग खाली दिसावेत.. मग ते त्याच लेखकाचे असावेत असे काही नाही..
३. फोटो चढवताना ती फ्लिकर किंवा पिकासावर चढवून मग इथे चढवण्यापेक्षा डायरेक्ट हार्डडिस्क वरून चढवता यावी यासाठी एखादा ब्राऊसर असावा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ढ
ढ
Sat, 04/18/2009 - 09:02
नवीन
प्राजू ताई,
इतर लेखकांचे लेखन पाहता येते.
जर मला तुम्ही लिहिलेले सर्व लेखन पहावयाचे असेल तर
www.misalpav.com/tracker/121/121
असं नवीन खिडकीत लिहून एंटर केले की आपले सर्व लेखन दिसेल.
ज्या लेखकाचं लेखन पहावयाचे असेल त्याचा बिल्ला नं आपल्याला माहिती असला की झालं.
याविषयी तात्यांनी इथं सविस्तर लिहिलं आहे.
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 04/01/2009 - 14:11
नवीन
लेखन अप्रकाशित स्वरूपात साठवून ठेवण्याची सेवा ही गेले कित्येक दिवस काम करत नाहीये. ती चालू करावी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Wed, 04/01/2009 - 16:43
नवीन
प्राजु आणि राजे ('सर्च' आणि 'भाषा बदल शॉर्ट की'बाबत) यांनी मनकवडे असल्याप्रमाणे लिहून माझे टायपायचे कष्ट वाचवले... त्यांना धन्स :)
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 04/01/2009 - 15:52
नवीन
पाककृती विभागात पेये ;) , मधल्यावेळचे खाद्यपदार्थ, पक्वान्ने, भाज्या असे उपविभाग केले तर पदार्थ शोधायला सोपे पडेल.
पाककृतीसंबंधी प्रश्न विचारायचे असल्यास वेगळा उपविभाग हवा; नाहीतर धाग्याचे नाव भारदस्त पदार्थाचे असते म्हणून
तो धागा उघडला की फक्त कृती हवी असल्याचे दिसते (आणि हिरमोड होतो ;)).
रेवती
- Log in or register to post comments
न
नरेश_
Wed, 04/01/2009 - 16:57
नवीन
त्यापेक्षा एक स्वतंत्र ब्लॉक तयार करा, वाचकांना कोणत्या विषयावर लेख , पाकृ , माहिती किंवा कविता हवी या संदर्भात. त्या ब्लॉकला आपली आवड असे साजेसे नाव देता येईल. म्हणजे मागणी तसा पुरवठा करता येईल ;)
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
- Log in or register to post comments
अ
अदि
Mon, 06/01/2015 - 09:59
नवीन
वाखू का बंद केल्य??? माझे वांदे झाले की राव... :( :( :(
- Log in or register to post comments
अ
अदि
Mon, 06/01/2015 - 13:10
नवीन
वाखू परत आल्या... धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 04/01/2009 - 17:26
नवीन
मिपाच्या वेगवेगळ्या थिम्स बनवून त्या सदस्यांना निवडण्याची सोय करता येऊ शकेल काय?
नाही, आहे ती थिम लय भारी आहेच, पण होतं काय ना, की भर हापिसात मिपा उघडलं की सतरा टाळकी वळून वळून पाहतात. ती लालभडक रंगसंगती लक्ष खेचुन घेते (हा फायदा असला तरी आमच्यासारख्या हापिसातून चोरुन मिपा खेळणार्यांचा तोटाच की हो!)
तर काही न्युट्रल (मराठी?) थिम्स (पुन्हा मराठी?) मिपाला जोडून त्या ज्याला हव्या त्याने त्यातील एखादी निवडून वापरता येऊ शकेल काय?
-(हापिसातला चोरटा जालभटक्या) ध मा ल.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
- Log in or register to post comments
न
नाटक्या
Wed, 04/01/2009 - 18:44
नवीन
तात्या/निलकांत,
काल आपल्या चर्चेचा सारांश मी येथे देत आहे.
१. 'हॉटेलात आलेली माणसं' या एवजी 'खानावळीत आलेली माणसं' कसं वाटतं?
२. तसेच हजर सभासदांच्या ठिकाणी एक scroll-bar ठेवता आला तर सगळे हजर सभासद दिसू शकतील अशी व्यवस्था करता येवू शकेल.
३. लिहीण्याची पध्दत बदलण्यासाठी हॉट-की ठेवता येतील का? जसे म्हणजे इंग्रजी आणि म्हणजे मराठी. मोठ्या लेखाच्या शेवटी प्रतिक्रिया देताना याचा खुप उपयोग होइल..
४. मुख्य पान जर फ्रेमस वापरून केले तर वरचा भाग आणि डावी बाजू जेथे हजर सभासद, लिहीण्याची पध्दत वगैरे गोष्टी आहेत ते स्थिर ठेऊन बाकीचा भाग खाली-वर सरकवता येईल. तसेच जर आपण मुख्य पानावर असलो तर मधला भाग आपोआप रिफ्रेश (पहा सी.एन.एन ची वेबसाइट) करता येवू शकेल. त्यामुळे सभासदाला स्वताहून पान रिफ्रेश न करावे लागता आपोआपच नवीन पान दिसू लागेल.
५. सभासदाला निरोप द्यायचा असेल तर व्य.नि. आणि ख.व. असे दोन पर्याय आहेत. ह्या दोन्ही साठी सर्व्हर मधील डेटाबेसची जागा लागते आणि दिवसेंदिवस जास्त सभासदांमुळे डेटाबेस फुगत जाईल/जातो आहे. ह्या मुळे मिपावर अतिरिक्त ताण येतो आहे. तसेच या डेटाबेसचा backup घेणे वगैरे कामे वेळखावू आणि जिकीरिची होतील. मी लोकांच्या खरडी पाहील्यात त्या बर्याचदा इतक्या फुटकळ असतात कि विचारू नका (अर्थात त्यात मी सुध्दा आलोच). नमुन्या दाखल:
--- काय ग/रे जेवलास का?
--- काय म्हणताय!!
--- आज बर्याच दिवसांनी?
--- विकांताला काय केलेस?
--- शुभप्रभात..
या असल्या फुटकळ खरडी आणि व्यनि साठी मिपाची डेटाबेसवरची ७०-८०% जागा व्यापली असावी. त्या पेक्षा खरडवही आणि व्यनि या दोन्ही सुविधा जर काढुन टाकल्या आणि त्या ऐवजी जर याहू/स्काईप सारखे IM/CHAT चे पर्याय वापरता येतील का? याचे अनेक फायदे होतील:
===> डेटाबेस लागणार नाही. निरोप एकडुन तिकडे पाठवला कि काम संपले. ज्याला हवा असेल त्याने तो निरोप त्याचा संगणकात जपून ठेवावा.
===> निरोप तात्काळ पोहोचवल्यामुळे ताबडबतोब त्याचा प्रतिसाद सुध्दा मिळू शकेल. त्यामुळे कार्यवाही करण्यासाठीचा वेळ वाचवता येईल.
===> व्यनि पाठवला तर तो त्या व्यक्तीने सभासद नोंदणी करताना दिलेला ई-संपर्काच्या पत्त्यावर (जो काही याहू, हॉट-मेल, जी-मेल, रेडिफ असेल तो) फॉरवर्ड करावा. त्या मुळे मिपाचा सर्वर फक्त फॉरवर्डींग एजंट म्हणून काम करेल. ज्याने त्याने आपआपला मेलबॉक्स सांभाळावा, मिपाचा सर्वर हा फक्त कविता/लेख/पाककृती इ. आणि त्यांना येणार्या प्रतिक्रिया एव्हढ्याच गोष्टी डेटाबेस मध्ये ठेवेल.
===> मोकळी झालेली जागा मिपाच्या आगामी प्रकल्पांसाठी वापरता येतील. (जसे सध्या चित्रे बाहेर ठेऊन त्याची लिंक टाकावी लागते त्या एवजी चित्रे मिपावरच साठवता येतील. उद्या जर पिकासा/ऑर्कुट बंद झाले तर मिपाच्या कार्यावर त्याचा परिणाम होणार नाही).
जर माझ्या कडुन काही मदतीची अपेक्षा असेल तर निसंकोचपणे कळवावे. बाकी निलकांत आणि तात्या समर्थ आहेतच.
- नाटक्या
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Wed, 04/01/2009 - 20:24
नवीन
सगाळ्यांच्या मोलाच्या सूचनांबद्दल ऋणी आहे..
तात्या.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Wed, 04/01/2009 - 23:28
नवीन
(आहे तसे मिपा आवडतेच तरीही) विचारल्या आहेत तर काहि वाहत्या गंगेत माझ्याहि काहि सुचवण्या
१. व्यनी पाठवताना "रिप्लाय टु ऑल" पर्याय देता येईल का?
२. ख.व. म्हणजे आमच्या सारख्या (सद्धया कामाच्या व्यापामुळे असलेल्या)धुमकेतुंसाठी वरदान आहे. ते तसेच असु द्या
३. 'लेख आवडला ' अशा स्वरूपाचे बटण्/लिंक अथवा रेटिंगची सोय या "शक्तीमान" प्रस्तावाला अणुमोदन
४. रंगसंगती बदलावी (कारण हि साईट ऑफीसात उघडली रे उघडली की सगळ्यांच्या नजरेत भरते ;) )
५. "एखाद्या लेखा बरोबर त्याच लेखकाच्या अन्य लेखनाचे दुवे त्या लेखाच्या खाली अथवा डाव्या समासामध्ये भेटावेत अशी व्यवस्था जी गरजेची आहे." --> राजेंशी सहमत
६. प्रतिक्रियांवर सहमत/ +१ ऐवजी प्रतिक्रीयेच्या खाली "सहमत" अशी लिंक द्यावी व पुढे सहमत सदस्यसंख्या द्यावी.
७. काही अडचणी आल्या तर मदतीसाठी संपादकांची अथवा हजर संपादकांची लिंक असावी या सुचनांशी सहमत
८. कौल टाकताना ५० अक्षरांची प्रस्तावना सक्तीची करता येईल का?
९. वाचनखुणा साठवता याव्यात हि अपेक्षा.
१०. कोणत्याही लेखकाला जसे.. "माझे लेखन" मध्ये स्वतःचे लेख पहाता येतात तसेच.. त्याला इतर लेखकांचे लेखनही पाहता यावे. म्हणजे शोधत बसावे लागणार नाही ... प्राजुच्या सुचनेशी सहमत
-ऋषिकेश
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/02/2009 - 06:56
नवीन
२. ख.व. म्हणजे आमच्या सारख्या (सद्धया कामाच्या व्यापामुळे असलेल्या)धुमकेतुंसाठी वरदान आहे. ते तसेच असु द्या
पण त्याबरोबरच सगळ्या खरडी किंवा एका पानावरच्या खरडी एकदम उडवायची सोय असेल तर उत्तम! आमच्यासारख्या पडीक लोकांना नीलकांतला त्रास न देता संस्थळ इतिहासासाठी असणार्या निरुपयोगी खरडी एकदम उडवता येतील.
'लेख आवडला' आणि 'सहमत' यांचे काउंटर्स उपयुक्त ठरतील.
८. कौल टाकताना ५० अक्षरांची प्रस्तावना सक्तीची करता येईल का?
अगदी. शिवाय, एक-दोन ओळींचे काथ्याकूट आवरायलाही काही उपाय करता येईल का?
१०. कोणत्याही लेखकाला जसे.. "माझे लेखन" मध्ये स्वतःचे लेख पहाता येतात तसेच.. त्याला इतर लेखकांचे लेखनही पाहता यावे. म्हणजे शोधत बसावे लागणार नाही ... प्राजुच्या सुचनेशी सहमत
सध्या युआरएलमधे 'newtracker' असा शब्द 'user'च्या जागी टाकला तर लेखन दिसतं, पण सभासदाच्या 'वाटचाली'बरोबर आणखी एक टॅब देता येईल तर उत्तम!
alt+tab बटण दाबून खिडक्या बदलल्या किंवा फाफॉमधे ctrl+page up किंवा ctrl+page down वापरून टॅब्ज बदलल्या तर मिपाची लिपी रोमन होते. (तीन फ्लेवर्सचे लिनक्स आणि विण्डोज व्हिस्टाचा अनुभव) त्यासाठी लिपी बदलण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट मिळाला तर उत्तम!
मधे कोणीतरी सुचवलं होतंच, पानाच्या खालीसुद्धा 'स्वगृह'ची लिंक आली तर page up किंवा alt+back, refresh करण्याचा त्रास वाचेल.
(माझ्या बाबतीत फरक पडला नाही तरी) रंगसंगतीचा मुद्दाही कळीचा वाटतो; पण कृपया कवितांना गुलाबी रंग वगैरे नका हो ठेवू! एकतर तो रंग डोकं उठवतो आणि काही कविता 'गुलाबी' नसतात, उदा: ही एक सुंदर कविता.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
गुरुवार, 04/02/2009 - 12:11
नवीन
मिपावर मराठी म्हणी, वाक्प्रचार, ग्राफिटी आणी मराठी शब्दकोष, मराठी लेखक, कवी आणी त्यांची ओळख यासाठी एक विभाग उघडता येईल का?
त्याने मराठी भाषेच्या ज्ञानात भर पडण्यास मदतच होईल.
आपला मराठमोळा
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
गुरुवार, 04/02/2009 - 16:12
नवीन
प्राजुशी सहमत, विशेषतः फोटोसाठी.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/03/2009 - 07:09
नवीन
खरडवहीत स्वागताचा मजकूर अजूनही मला हव्या तशा रंगात एचटीएमल च्या काही अपूर्ण सुविधामुळे करता येत नाही असे वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Fri, 04/03/2009 - 09:04
नवीन
मि.पा वरील काही लेख अप्रतीम आहेत ते स्वतःच्या संग्रही असावे असे वाटते . कृपया हे लेख .pdf (Read Only) format मध्ये डाउनलोड करायची सुवीधा असावी त्यावर मि.पा आपले Copyrights आणी Publishing rights निर्विवाद पणे ठेवू शकते.
शोध हा प्रकार मि.पा वर अवघड जातो . उदा. जर फक्त प्रवासवर्णनांचा शोध घ्यायचा असेल तर तो कसा घ्यावा कळत नाही . कृपया याचा विचार व्हावा .
~ वाहीदा
- Log in or register to post comments
M
Meghana
Fri, 04/03/2009 - 13:00
नवीन
मिपा वर लॉगइन केल्यावर जर लॉगआउट न करता खिडकी बंद केली आणि दुसर्या दिवशी पुन्हा मिपा उघडले
तर तसेच लॉग इन दाखवते. ह्या ठिकाणी खिडकी बंद केल्यावर शक्य असल्यास ऑटो लॉगआउट करण्यात यावे.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sun, 04/05/2009 - 14:14
नवीन
मला असे वाटते कि..थोडा मेक अप/मेक ओव्हर करायला हवा..लूक एकदम आकर्षक असा हवा..मुलगी दिसातला चांगली आहे..मेक अप ने अधिक सुंदर वाटेल..बाकि लेख वगैरे तर छान असतात..
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Sat, 04/18/2009 - 21:25
नवीन
मिपा ही ईतकी Attractive site आहे की उघडल्या उघड्ल्या लगेच नको त्या लो़कांच्या नजरेत भरते त्या मुळे Firewalls लागले आहेत त्यावरही office मध्ये
नजर लागेल site ला ईतकी नको Attractive !!
It is truly fascinating and captivating already
~ वाहीदा
- Log in or register to post comments
N
Nile
Sat, 04/18/2009 - 06:15
नवीन
मी पुर्वी काही ईथे मुद्दे मांड्ले होते: http://www.misalpav.com/node/6868#comment-105792
याशिवाय, य.व. व व्य. नि. सुरु करायला ईतका वेळ लागतो हे पाहुन आश्चर्य वाट्ले! number of posts वगेरै अट आहे का?
++ for the chat suggestion.
Other that that if we could introduce "ranking" (informal)/status to members it would be a good idea.
Thanks,
Nile
- Log in or register to post comments
N
Nile
Fri, 05/01/2009 - 03:10
नवीन
जर उशीर झाला नसेल तरः
माझ्या असं लक्शात आलं आहे की ५० प्रतिसादांनंतर "क्ष नविन" ची लिंक काम करत नाही.
जर सभासदाच्या वाट्चालीत असे दोन पर्याय असतील तर फार सुरेख होईल: क्ष चे लेखन आणि क्ष चे प्रतिसाद (मुळात आहे का?) एखाद्याचे लेखन, प्रतिसाद शोधण्यात याचा फार उप्योग होईल.
तसेच प्रतिसाद दाखवताना जर त्याची snippet दाखवता आली तर क्या बात है.
मला कल्प्ना आहे की काही गोष्टी अमलात आणणे शक्य नाही पण सुचना द्या म्हणतायं म्हणुन. ;)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 03/31/2015 - 16:17
नवीन
स्वसंपादनाची सुविधा दिल्याबद्दल आभार !!
उपप्रतिसाद आल्यानंतरही प्रतिसाद स्वसंपादित करता येत आहे :)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/31/2015 - 13:57
नवीन
=))
आता बघं करुन
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 03/31/2015 - 14:06
नवीन
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 04/01/2015 - 12:35
नवीन
याला बूच मारणं म्हणतात ना??
लई दिवसात मिपावर बूच मारणे हा प्रकार पाहिला/ऐकला/वाचला नव्हता..
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 03/31/2015 - 14:05
नवीन
हया जुन्या लेखात दिसणारे आय डि आता मिपावर सक्रिय नाहित, आणि तात्या अभ्यंकरानी सुद्धा बरेच वर्ष झाले काहि लिहिलेले नाहि
- Log in or register to post comments
स
संग्राम
Tue, 03/31/2015 - 14:21
नवीन
सध्या फक्त पानाच्या शेवटी पेजिनेशन किंवा पुढच्या पानांच्या लिंक्स दिसतात ...हीच सुविधा जर धागा संपल्यावर पण दिलीत तर प्रतिक्रिया वाचणे सोपे होईल.
या बरोबरच
अशीही सुविधा द्या

- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 03/31/2015 - 14:21
नवीन
स्वसंपादन! आगं बने! खरंच का?
------------
स्वसंपादितः खरंच की!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 04/01/2015 - 13:25
नवीन
ए ईईई धत्तड तत्तड स्वसंपादण दिल्या गेले आहे! धण्यवाड!
अन हे घ्या उपप्रतिसादोत्तर स्वसंपादन! लयच कचकूण धण्यवाद!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 03/31/2015 - 14:35
नवीन
ठेंकूऊऊऊऊऊऊऊऊऊ
आता सही पण जिवंत करा.
- Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू
Wed, 04/01/2015 - 13:17
नवीन
बघू बघू..
अय्या... खरच की... :)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 03/31/2015 - 14:52
नवीन
स्वसंपादन??? ट्राय करते!!!
_____________ खरंच की! पण आता लोक शब्द फिरवणार... ;)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 04/08/2015 - 19:04
नवीन
+ १
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 04/01/2015 - 08:49
नवीन
जर प्रतिसाद खुप असतील (एका पेक्षा जास्त पानावर) आणि नंतर काही नविन प्रतिसाद आले जे वेगवेगळ्या पानावर आहेत तर , पहील्या पानावरचे नविन प्रतिसाद "नविन" असे लाल अक्षरात दिसतात पण मग पुढल्या पानवरचे मात्र असे टॅग केलेले नसतात. मग त्या पानावरचे नविन कुठले आणि जुने कुठले ते कळत नाहीत.
- Log in or register to post comments
ट
टीपीके
Wed, 04/01/2015 - 10:38
नवीन
मलाही हा प्रश्न खूप दिवस पडला आहे. हि बग असावी बहुतेक
- Log in or register to post comments
भ
भिंगरी
Wed, 04/01/2015 - 12:01
नवीन
हेच म्हणते
- Log in or register to post comments
व
विजय_आंग्रे
Wed, 04/01/2015 - 12:44
नवीन
मला वाटते, प्रतिसादाखाली असलेले, "उत्तर द्या" हा ऑप्शन काढुन टाकल्यास ही समस्या येणार नाही.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 04/01/2015 - 12:54
नवीन
कसे काय ?
- Log in or register to post comments
म
मंदार कात्रे
Wed, 04/01/2015 - 09:19
नवीन
मिसळपाव ने जाहिराती स्वीकाराव्यात असे मनापासुन वाटाते . इतके दर्जेदार सन्स्थळ कसे चालते ,याचे आर्थिक गणित मला ज्ञात नाही. पण जाहिरातीच्या माध्यमातून संस्थळ आर्थिक द्रूष्ट्या अधिक स्वयंपूर्ण होइल व अधिक चान्गल्या सोयीसुविधा देवू शकेल असे वाटते.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »