Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता पूर्ण करा...

प — प्राजु, Wed, 04/01/2009 - 15:37

प्रतिक्रिया द्या
6629 वाचन

💬 प्रतिसाद (36)
ल
लिखाळ Wed, 04/01/2009 - 15:53 नवीन
अश्रू पुसू पहातो तो कृष्ण हाळवा जाणून घ्यावया ते गूज आतले सांगे विभोर नयनी कंपित या स्वराने नवे घेतले ते कॉन्टॅक्ट लेन्स खुपले !! -- (वृत्त मात्रा न जाणणारा) लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 04/01/2009 - 15:58 नवीन
अश्रू पुसू पहातो तो कृष्णमेघ हळवा जाणून घ्यावयाला मम गूज अंतरीचे सांगे विभोर नयनी कंपित या स्वराने नवनवीन घेतले ते कॉन्टॅक्ट लेन्स खुपले !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
संदीप चित्रे Wed, 04/01/2009 - 16:32 नवीन
कवितेचं काहीही होवो पण तुम्ही भेटलात की प्राजु तुम्हाला पिटणार हे नक्की !!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्राजु Wed, 04/01/2009 - 18:09 नवीन
:| - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रमोद देव Wed, 04/01/2009 - 18:16 नवीन
अश्रू पुसू पहातो तो कृष्णमेघ हळवा जाणून घ्यावयाला मम गूज अंतरीचे सांगे विभोर नयनी कंपित या स्वराने डोळ्यात घातले ते नेत्रस्पर्शी भिंग खुपले !! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ल
लिखाळ गुरुवार, 04/02/2009 - 12:03 नवीन
मुक्तराव आभारी आहे. आता लेन्स खुपत नाहिये :) देवकाकांनी लेन्सला मराठी मुलावा चढवल्याने आता तिचे डोळे अभिमानाने चमकत वगैरे आहेत. संदीपराव, प्राजूताई पिटणार हे नक्कीच बहुधा. आता जरा चांगल्या दोन ओळी सुचल्या तर बरे होईल :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
परिकथेतील राजकुमार Wed, 04/01/2009 - 16:02 नवीन
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? नयनांच्या तिरळेपणाचे प्रदर्शन अवघड झाले.... ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 04/01/2009 - 16:05 नवीन
नवे घेतले ते कॉन्टॅक्ट लेन्स खुपले खुपले म्हणुन डोळे लाल लाल झाले..!! वाटले आईस मा़झ्या, मा़झे डोळेच आले, त्या मुळे त्याला भेटण्यास मना केले.!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/01/2009 - 16:12 नवीन
खेकडा तव खरडी येऊनी बसला पाहुन त्याला मोर पळाला !!! (टारगट मुलगा) मदनबाण..... मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी जालावरुन सभार...
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 04/01/2009 - 16:33 नवीन
प्राजु पिटेल अशा लोकांची यादी वाढतच चालली आहे. तरी अजून चतुरंग, केसु, बेसनलाडू वगैरे मंडळी मैदानात यायची आहेत ;)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 04/01/2009 - 16:42 नवीन
भर श्रावणात मजला खुपतो तुझा अबोला मन विंधण्यास माझे, तुज हेच अस्त्र दिसले? पुसता धरून हाता, रुसलीस का सखे तू? विसरून राग लटका, कुणि गोड गोड हसले! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 04/01/2009 - 19:05 नवीन
छान.. आवडले! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
प
प्राजु गुरुवार, 04/02/2009 - 15:23 नवीन
वा! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
म
मराठमोळा Wed, 04/01/2009 - 17:33 नवीन
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? अश्रूंना सखे असे का गं बांध घातले विरहाचे सुर मनी असे ते भिडले धरिणी कंपिली, आकाश दुभंगले पैलतीरी सखा, आर्त साद घाले अनावर भाव, व्याकुळ मन झाले.... ................................ कुणीतरी रिपेअर करा..... आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Wed, 04/01/2009 - 17:42 नवीन
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? जरि खिन्न कातळाला, ही पालवी फुटावी तरिही सुक्या झर्‍याची, का अश्रुधार ओली.. ? -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/01/2009 - 18:10 नवीन
सुरेख!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
अ
अनामिक Wed, 04/01/2009 - 19:02 नवीन
सहज प्रयत्न केला आहे. वृत्त, मात्रा, व्याकरण या सगळ्याची जाण तशी कमीच, तेव्हा काही सुधार करता आला तर जरुर करा. ************************** या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? ओठांवरी हास्याची खुलता कळी खुलेना मम अंतरात आता वसंतही फुलेना मज भेट घेण्या ये तू - वार्‍याच्या वेगाने वाट पाहते सख्या मी - चातकाप्रमाणे ऐकून साद माझी, तो मेघदूत आला चाहूल तू येण्याची, हलके सांगून गेला उघडता नील नयन, दृष्टीस तू पडावा अन् ग्रिष्मात वळिवाचा पाऊस बरसावा ************************** -अनामिक
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/01/2009 - 19:13 नवीन
ओठांवरी हास्याची खुलता कळी खुलेना मम अंतरात आता वसंतही फुलेना मस्तच.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ब
बेसनलाडू Wed, 04/01/2009 - 22:48 नवीन
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या! (कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले) (ठार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 04/02/2009 - 00:41 नवीन
मस्त बेला! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
प्राजु गुरुवार, 04/02/2009 - 15:24 नवीन
वाह!! बेला.. जबरदस्त शेर आहे.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
च
चतुरंग गुरुवार, 04/02/2009 - 00:40 नवीन
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? वाजे तरी कुणाचे पाउल कुणास ठावे? नवजात प्रेमिकांचे हितगूज चाललेले! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/02/2009 - 15:26 नवीन
खूपच सुंदर!! चतुरंग... तुमच्या या ओळी वाचून आता ५-६ दिवसांत मधुशालाचा पुढचा भाग वाचायला मिळेल अशी आशा वाटू लागली आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
S
sanjubaba गुरुवार, 04/02/2009 - 07:20 नवीन
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? हा दाटून कंठ आला, मन हळवे हे झाले..... का व्यक्त करताना व्यथा, दु:ख मज हसले...! संजूबाबा
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/02/2009 - 15:27 नवीन
संजूबाबा.. लगे रहो! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sanjubaba
व
वैशाली हसमनीस गुरुवार, 04/02/2009 - 07:40 नवीन
या गर्द नील नयनी दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले, आठवले का दिस सोनेरी,गाभुळलेले तुझ्या नि माझ्या हसर्‍या बागडण्याचे ?
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/02/2009 - 15:28 नवीन
वैशालीताई.. आवडल्या ओळी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस
र
राघव गुरुवार, 04/02/2009 - 09:28 नवीन
या गर्द नील नयनी दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले, रागे हळूच बघतो मुडपून ओठ थोडा, इवलेसे हात त्याचे गालांवरून फिरले.. एकेक थेंब झरतो मोती जणू टपोरा कैसे मनास रोधू, कोमेजतो फुलोरा रुसला गं रामचंद्र हाकेस ओ मिळेना, उचलून घेतले पण त्याची कळी खुलेना.. उगाच रागले मी, बाळा नको रडू रे.. तुझिया हसूत माझा आनंद साठलाहे! राघव
  • Log in or register to post comments
श
शेखर गुरुवार, 04/02/2009 - 12:04 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
प
प्राजु गुरुवार, 04/02/2009 - 15:29 नवीन
तुमची प्रतिभा अफाट आहे... उद्या रामनवमीच्या मुहूर्तावर हे काव्य म्हणजे... हॅट्स ऑफ! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
ज
जागु गुरुवार, 04/02/2009 - 10:44 नवीन
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? सोसवेना भार मेघांचा, पापणीतून दुभंगले अश्रुंच्या पाझराने, पंख डोहात डुंबले.
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत गुरुवार, 04/02/2009 - 12:16 नवीन
हा माझा एक प्रयत्न- या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? केला असता अभ्यास, झाले नसते नापास ऊरी माझ्या जळते, मित्र-मैत्रिण पुढे गेले..
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/02/2009 - 15:30 नवीन
जागु.. तुझाही प्रयत्न आवडला.. सर्वांचे मनापासून आभार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित गुरुवार, 04/02/2009 - 16:13 नवीन
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर प्रतिभेचे छाटून पंख बसले? होती तळपती ती, वीज प्रतिभाशाली का काव्यपीठ पाडता, अवसान ते गळाले? कधी असो कृष्णलीला, वा प्रेमाची नव्हाळी विषय नाही वर्ज्य कुठला, वाक्‍यावाक्‍याला टाळी! शब्दप्रभू म्हणे कुणी, कुणी - काव्यविदुषी कुबेरावर का भासावी, चणचण शब्दांची अशी? `ती' म्हणे वाटले कधी, द्यावी संधी इतरांही का कुण्या `हलकटा'ने, खावे शेण तिथेही?
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/02/2009 - 16:29 नवीन
झालं तर मग.. ;) धन्यवाद म्हण मला.. तुझी सो कॉल्ड काव्यप्रतिभा जगी झाली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 04/02/2009 - 18:10 नवीन
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..? तुझ्या आठवणीने,मन माझे विभोर झाले कसे आडवु आसवांना,नयनि पुर बघ आले., त्या प्रेम पावसाने,अशी मी पुरती भिजले नाहि मी विझले,आत आत जळत राहिले घेतले होते रे मिठित, चमकुन गेलि दामीनि रान वारा उफाळला, या नाजुक बिलोरी यौवनि अंग अंग गात्रांग,प्रीत रंगात नहाले नेत्री आनंद आसवे,देहात चांदणे झळाळले ऎकता अनंग कथा,सहन हो‌ईना मदन चाळे त्या काम दाहात, शरीर नाजुक हे होरपाळले तु रमता धुंद यौवनि. मी तुझीच रे झालें नाहि नाहि म्हणता तुला, सर्वस्व अर्पिलें आठवता हे सारे ,नयनी दाटून मेघ आले का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा