Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पैशाची कहाणी भाग १: वस्तूविनिमय पध्दती

क
क्लिंटन
Fri, 04/03/2009 - 18:57
🗣 19 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8310 वाचन

💬 प्रतिसाद (19)
स
सोनम Fri, 04/03/2009 - 19:22 नवीन
तुम्ही लिहिलेला लेख छान आहे. ही माहिती अर्थशास्त्रातील पुस्तकात सुद्धा थोड्या फार फरकाने अशीच आहे. पुढचा लेख लवकर डकवा. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 04/03/2009 - 19:26 नवीन
शाळेत असताना बरंचंस वाचलं होतं यातलं. सगळं पुन्हा ब्रशप झालं. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नाटक्या Fri, 04/03/2009 - 19:43 नवीन
छान विवेचन केले आहे. पुढच्या भागाची वाट पहातो आहे.. - नाटक्या
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 04/04/2009 - 01:40 नवीन
मस्त... पुढच्या भागाची वाट पाहतोय. (मनी प्लान्ट मधुन मनी मिळत नाही तरी त्याचे नाव मनी प्लान्ट का बरं? :? ) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Sat, 04/04/2009 - 01:53 नवीन
लेख आवडला.... अश्याच प्रकारचा लेखस्तंभ अच्युत गोडबोले मागील वर्षी लोकसत्तामध्ये लिहीत होते. विद्याधर
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 04/04/2009 - 01:59 नवीन
Evolution of Money वर छान लिहिले आहे. मीनल.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 04/04/2009 - 03:37 नवीन
आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.अशा प्रोत्साहनातूनच मिपावर अधिकाधिक आणि चांगल्या दर्जाचे लिखाण करायची प्रेरणा मिळते. लेखमालेचा दुसरा भाग तयार आहे. तो परत एकदा तपासून गरज असल्यास काही बदल करून आजच्या दिवसात नक्कीच प्रकाशित करतो. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sat, 04/04/2009 - 03:43 नवीन
वस्तुविनिमय पूर्वीपासून होत होताच, पण वस्तूंइतकेच किंवा जास्तच महत्व सेवांना होते. बारा बलुतेदार गावकर्‍यांच्या आवश्यकतेच्या सर्व वस्तू तसेच सेवा पुरवीत आणि त्यांच्या आवश्यकता बाकीचे बलुतेदार आणि इतर नागरिक पुरवीत असत. त्याचा हिशोब रुपये, आणे, पैसे यात होत नसे. ते कदाचित पुढील भागात येणार असेल. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Sat, 04/04/2009 - 04:01 नवीन
क्लिंटन साहेबांनी वस्तुंचा विनिमय कसा व का करण्यास सुरुवात झाली ह्याचे मोजक्या शब्दांत उदाहरणे देऊन समजावून सांगितले आहे. अशा विनिमयांच्या काळात आणखी एका विनिमयाबद्दल बोलणे आवश्यक ठरते. ज्याकाळी फ्युडल ईकॉनॉमी उदयास आली त्यावेळेस वस्तू ह्या गुलामांच्या बदल्यात देण्याची प्रथा अस्तित्वात आली. क्लिंटन साहेब हे त्यांच्या पुढील भागात घेणार असतीलच ह्याची खात्री वाटते. खरे म्हणजे मानवाचा हा प्रवास खूपच रोचक आहे व त्यामुळे पृथ्वीवर सोशल सायन्स हे मानवाभोवती फिरत राहते कारण ही प्रगती त्याने अत्यंत कमी कालावधीत घडवून आणली. [आता ती विनाशाकडे चालली आहे असे काही जणांचे म्हणणे असेलही व ते बर्याच अंशी खरेही आहे]
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sat, 04/04/2009 - 07:49 नवीन
आनंद घारे आणी अजय भागवत यांच्याशी सहमत. बारा बलुतेदार पद्धती अजुन सुद्धा काही प्रमाणात खेड्यापाड्यात पहावयास मिळते.(विशेषतः खान्देशात) जसे शेतकरी चांभार आणी न्हावी यांना पैसे न देता दरवर्षी ठराविक वजनाचे धान्य देतो. आपला मराठमोळा कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत
न
नरेश_ Sat, 04/04/2009 - 06:38 नवीन
छान, विवेचन आहे. मौलिक माहितीबद्दल आभार. बाकी अर्थशास्त्राची नि माझी कधीच गाठभेट झाली नाही ! या जगात सासू-सुन वाद हा आद्य वाद होय. समाजवाद, प्रांतवाद, भाषावाद हे अगदी अलिकडचे..
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 04/04/2009 - 07:42 नवीन
बारा बलुतेदार सेवा पुरवत असत आणि त्यातही वस्तूविनिमय पध्दती एका परिने वापरात होती.उदाहरणार्थ लोहाराला लाकडी वस्तू विकत घ्यायच्या असतील तर तो स्वत: बनविलेल्या लोखंडी वस्तू सुताराला देऊन त्या बदल्यात लाकडी वस्तू घेत असे.एका अर्थी याला सेवाविनिमय पध्दती म्हणा पण त्याचे नियम वस्तूविनिमय पध्दतीसारखेच होते. गुलामांचा व्यापार मात्र मी विचारात घेतला नाही.पण गुलाम म्हणजे व्यापार करण्याजोगी वस्तू असे मानल्यास वस्तूविनिमय पध्दतीचे नियम त्याही व्यवहाराला लागू होतील. सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sun, 04/05/2009 - 03:17 नवीन
वस्तूविनिमयामध्ये त्या वस्तूची मागणी आणि पुरवठा यावरून तिची किंमत ठरते. बलुतेदारी पद्धतीत साम्यवादाप्रमाणे गरजेनुसार पुरवठा आणि उपलब्धतेनुसार वाटप (उदा. पिकांची आणेवारी) होत असे. एकाद्या वर्षी लोहाराची गरज पडली नाही तरी त्याला धान्य दिले जातच असे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 04/04/2009 - 09:26 नवीन
क्लिंटन, पुढच्या लेखाची वाट पहात आहे. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 04/04/2009 - 11:14 नवीन
छान माहिती. आता सर्व भाग आल्यावरच प्रतिक्रिया देईन. पण वाचत आहे याची खात्री असु द्या ! --अवलिया जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे, उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sat, 04/04/2009 - 13:57 नवीन
चांगला लेख... वस्तूविनिमयाबद्दल थोडी माहिती होती... पण आता आपल्या लेखातून सविस्तर वाचायला नक्की आवडेल. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत... -अनामिक
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/04/2009 - 14:14 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sat, 04/04/2009 - 15:32 नवीन
सर्वांच्या अनुकूल प्रतिसादांबद्दल आभारी आहे.थोड्या वेळापूर्वीच तिसरा भाग प्रकाशित केला आहे. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 04/05/2009 - 12:52 नवीन
तांदूळ देऊन सुके मासे, सोलें, काजू वगैरे वस्तु मिळतात. खास करून छोट्या, दुर्गम गांवांत. त्यांना तांदळाचा दर ठाऊक असतो आणि छोट्या दुर्गम गांवात त्यांना गिर्‍हाईक मिळणें विकणें तसें कठीणच असतें. खासकरून कोळी, गाबीत वगैरे लोकांची शेती वगैरे नसल्यामुळें डाळ, तांदूळ वगैरे विकत घ्यायला व स्वतःचे पदार्थ विकायला दूर जावें लागत नाहीं. बार्टर सिस्टीम की जय. छान, शिस्तबद्ध, नीटनेटका लेख. आतां २रा व ३राहि भाग वाचतों. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा