कलादालन

कुण्या नावाचं हे पाखरु???

Primary tabs

खालील छायाचित्रे कॅनन पॉवरशॉट एस एक्स १० आय एस (Canon Powershot SX10 IS) कॅमेर्‍याने काढली आहेत. Image removed. (सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) Image removed. (सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) Image removed. वरील तिन्ही पक्षी .... 'मैना' (Mynah) जातीतील वाटतात... कुणाला नाव माहित आहे का?(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) ___________________________________________________________________________________ Image removed. सर्वांना परिचित असलेले.....चिमणराव..(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) ___________________________________________________________________________________ Image removed.\ आमच्याकडे या पक्ष्याला 'कवडी' म्हणतात...(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) ___________________________________________________________________________________ Image removed. हा तर सुतारासारखा वाटत आहे..(बराच दूर होता त्यामुळे छायाचित्र बरोबर आले नाही)(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) ___________________________________________________________________________________ Image removed. हा तर सर्वपरिचित कावळा(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) --अथांग सागर
धनंजय

पहिली तीन चित्रे - अमेरिकन रॉबिन (हा युरोपातल्या "रॉबिन"पेक्षा वेगळा आहे).

चिमणा युरेशियातला (म्हणजे भारतात दिसतो त्याच जातीतला) आहे. साधारण या रंगाच्या खूप जातीचे पक्षी अमेरिकेत आहेत, पण युरोपियन लोकांबरोबर हे "तिकडचे" चिमणा-चिमणी आले, त्यांनी अमेरिका बळकावली.

शेवटचे चित्र "मोर्निंग डोव्ह" (शोक करणारा पारवा) याचे आहे. याचे गाणे कूऽऽ कूऽऽ कूऽऽ असे अवरोह आहेत, आणि विलाप केल्यासारखे वाटते.

प्राजु

चित्रेही (संदीप चित्रे नव्हे)सुंदर आणि धनंजय यांचा प्रतिसादही छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सँडी

पक्षी/पक्षिणी आवडल्या.

अवांतरः शिर्षक जर "अमेरिकन पक्षिणी" किंवा "अमेरिकन पाखरु" असते तर या धाग्यावर अजुन 'भरघोस' उड्या पडल्या असत्या... ;)

- सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

पाषाणभेद

पक्षांकडे फारच पेशंन्स होता बुवा. ह. घ्या.
मस्तच.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

मदनबाण

सुंदर फोटो.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

फोटु आणी माहिती दोन्ही संग्रही ठेवण्यासारखे.
आमच्या पक्षीबांधवांची ओळख करुन दिल्याबद्दल आभार.

परा चा कावळा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अथांग सागर

सर्वांचे मनापासून धन्यवाद!!! :)

(अवांतर- धनंजय आणि सँडी यांचे अनुक्रमे पक्ष्यांची नावे सांगितल्याबद्दल आणि शीर्षक सुचवल्याबद्दल मनापासून आभार :) )

--अथांग सागर

धनंजय

तुरा असलेल्या पक्ष्याचे चित्र - कार्डिनल पक्ष्याची मादी.

(कावळा तर कावळाच!)

चित्रे स्पष्ट आणि सुंदर आहेत.

ramjya

सागर मस्त फोटो आहेत्.......तुझ्याकडे 'सलीम अली' आणी 'bombay natural history society ' बद्दल माहीती आहे का?