Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निवडणूक आणि ड्राय डे

म
मिसळभोक्ता
Wed, 04/15/2009 - 20:22
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3066 वाचन

💬 प्रतिसाद (13)
व
विसोबा खेचर Wed, 04/15/2009 - 20:41 नवीन
जेव्हा वाटेल तेव्हा सनदशीर मार्गाने दारू पिण्याचा आमचा हक्क निवडणूक आयोगाने हिरावून घेतलेला आहे. त्यांच्या विरोधात बोलायची राजकारण्यांची देखील हिम्मत नाही. सहमत आहे... निवडणूक आयोगाच्या मनमानीचा निषेध म्हणून आम्ही उद्या मतदान करणार नाही ! ठाण्याला मतदान असेल तेव्हाही असाच ड्रायडे असेल त्यामुळे त्याचा निषेध म्हणून मीदेखील मतदान करणार नाही! (ता. क. १३ तारखेला स्टॉक का जमवून ठेवला नाही, असा उद्दाम प्रश्न विचारू नका. कारण प्रश्न तत्त्वाचा आहे.) अगदी खरं! पण एखादा दिवस आमचे निभते. तीन सलग दिवस नाही. विशेषतः बुधवारी तर नाहीच.) सहमत...! ड्राय डे या प्रकाराचा मी तीव्र निषेध करतो. दोन घोट सुखाने पिऊ इच्छिणार्‍यांची ही शुद्ध अडवणूक आहे. आणि याचा निषेध म्हणून मतदान न करणे, हा मिसळभोक्ता यांचा पर्याय मला योग्य वाटतो! आपला, (परवानाधारी मद्यप्रेमी) तात्या. दोन ऑक्टोबरला आपण मारे ड्राय डे साजरा करतो पण बापूंच्या वापरातल्या वस्तू अखेरीस आमच्या दारुवाल्या विजय मल्ल्यानेच भारतात आणल्या आणि बापूंचा मान राखला! तेव्हा कुणी माईचा पुत पैशे घेऊन म्होरं झाला नव्हता! पण आम्ही कपाळकरंटे ते करंटेच! दोन ऑक्टोबरला ड्राय डे साजरा करण्यातच धन्यता मानतो. मला व्यक्तिश: ही अत्यंत शरमेची बाब वाटते! निदान दोन ऑक्टोबरचा ड्राय डे तरी रद्द झालाच पाहिजे! आपला, (विजय मल्ल्या प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Wed, 04/15/2009 - 21:02 नवीन
मला आपल्याबद्दल सहानुभुती वाटते पण मदत करु शकत नाही कारण आपल्याला मदत केल्यास मला ड्राय डे पाळावा लागेल . आपण एखादया घरी चालविण्यात येत असलेला कुटिरोद्योग शोधा. " शोधा म्हणजे सापडेल. " " गरज ही शोधांची जननी आहे. "
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Wed, 04/15/2009 - 21:24 नवीन
कारण आपल्याला मदत केल्यास मला ड्राय डे पाळावा लागेल . अर्धी अर्धी ? म्हणजे दोघेही सेमि-ड्राय ! अर्ध अर्ध मत देऊ.. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
ह
हरकाम्या गुरुवार, 04/16/2009 - 13:22 नवीन
कधी भेटताय बोला ???????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 04/16/2009 - 13:35 नवीन
<<कधी भेटताय बोला ?????>> बा़की काय काम नाही वाटत,बाकी ते पण ठेक आहे म्हणा एकदा दारुच नाव काढले की हरकांम्या पण सर्व काम सोडुन येणारच की.. सुहास मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
म
मराठमोळा गुरुवार, 04/16/2009 - 10:32 नवीन
>>निवडणूक आयोगाच्या मनमानीचा निषेध म्हणून आम्ही उद्या मतदान करणार नाही. असे करु नका. आताचे सरकार पुन्हा आले तर त्या रामडॉसने (आरोग्य मंत्री) म्हंटल्याप्रमाणे खालील गोष्टी होतील. १. ड्राय डे ची संख्या वाढवणार. २. पगाराच्या आणी दुसर्‍या दिवशी ड्राय डे ठेवणार ३. वाईनशॉप आणी बारच्या वेळांवर बंधने आणणार. ४. परवान्यांचे कायदे कडक करणार. बघा पटते का? मतदान करा आणी अशा नेत्यांचे दुष्ट कट उधळुन लावा. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 04/17/2009 - 10:32 नवीन
नुकत्यच हाती आलेल्या वृत्तानुसार संघाचे लोक संध्याशाखेनंतर थकून जातात, आणि मग घरी किंवा शाखामैदानाजवळच्या पाणवठ्यात क्षुधाशांतीसाठी जातात. रामडॉस सारखे लोकांवर बंदी टाकून घरी आतल्या खोलीत पीत नाहीत, त्यामुळे आम्ही जरी मतदानावर बंदी घातली तरी, पुरोहीतला मत देण्यास अनेकांना प्रवृत्त केले. विलास मुत्तेमवार मुर्दाबाद. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
च
चिरोटा गुरुवार, 04/16/2009 - 10:44 नवीन
सध्या राजकारणी दारू प्यायल्यासारखे गेला एक आठवडा प्रचार सभांमधे बडबडत होते. फक्त हातात समोर प्याल्याऐवजी माईक होता.सगळ्या लोकाना त्याची लागण नको म्हणून आयोगाने तीन दिवस ड्राय डेज जाहीर करून टाकले.नाहीतर पंज्याऐवजी कमळावर शिक्का,कमळाऐवजी घड्याळावर शिक्का बसायचा.!! उन्हाळा आहे-ऊसाचा रस,पन्हे,लिंबू सरबत्,शहाळे प्यायचे दिवस हे!! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 04/16/2009 - 10:57 नवीन
पण आम्ही कोटा ठेवला आहे काळजी नसावी.. सुहास मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
म
मिसळभोक्ता Fri, 04/17/2009 - 10:34 नवीन
हत्तीवर शिक्का मारा ! (इतका मोठ्ठा हत्ती असल्याने, शिक्का मारताना चूक होणार नाही !) आणि, बोनस म्हणजे, मायावतीकाकू स्वतःही पितात, आणि इतरांनाही पाजतात ! जय हो ! -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
च
चिरोटा Fri, 04/17/2009 - 10:54 नवीन
त्या दारू दिल्याचा आव आणतात पण प्रत्य्क्षात पाणी पाजतात. :D भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Fri, 04/17/2009 - 11:00 नवीन
आमचा अनुभव वेगळा आहे. माणिकरावांनी आम्हाला अख्खी ब्लेंडर्स प्राईड पाजली काल ! -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
च
चिरोटा Fri, 04/17/2009 - 11:35 नवीन
हे कोण माणिकराव?राजकारणी की कुठल्या बारचा मालक? क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा