Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सर्वाधिक वेळा पाहिलेले चित्रपट

म
मिसळभोक्ता
Fri, 04/17/2009 - 10:01
🗣 81 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
24523 वाचन

💬 प्रतिसाद (81)
ब
बाकरवडी Fri, 04/17/2009 - 10:04 नवीन
रामू की - आग :-४० वेळा , कारणे :- मला आगी लावायला आवडते ! :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
स
सुहास Fri, 04/17/2009 - 20:00 नवीन
रामू की फून्क -२ वेळा... कारणे :- मला आग विझवायला आवडते !!! ;) सुहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाकरवडी
ट
टारझन Sun, 04/19/2009 - 07:30 नवीन
काही पिक्चर अणंतवेळा पहाण्यात आलेले आहेत... पण खाली कोणीत उल्लेख केलेला दिसत नाही ,, म्हणून आम्ही गप्प बसतो ..( आणि आता त्याची कारणे काय द्यावी बरं ?) (मांसाहारी) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास
ब
बाकरवडी Mon, 04/20/2009 - 07:56 नवीन
(मांसाहारी) टारझन मांसाहारी म्हण्जे णॉण्व्हेज ना ओ टारझण ? आपणांस असेच आवडनार! कारणे द्यायला लाजू नका. ;) ;) :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
च
चिरोटा Fri, 04/17/2009 - 10:10 नवीन
टी.व्ही. चॅनेल्स्चे पीक आले नव्हते तेव्हा चित्रपट एकदाच बघायला मिळायचा.चुकून दूरदर्शनवर दुसर्‍यांदा लागला तर परत बघता यायचा.नाहीतर कुठल्यातरी टॉकीजमधे. मैने प्यार किया(२) शोले(२) चॅनेल्स्चे भरघोस पीक आल्यावर चित्रपट अनेक्वेळा बघता येऊ लागले. कयामत से-(४),हेराफेरी (३),अमर्,अकबर..(४),राजू बन गया(४),ऍतराज(३),हन्गामा(३),वास्तव्(३),दिलवाले दुल्हनिया(३). भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 04/17/2009 - 10:20 नवीन
कयामतसे (५), कारण - जुही चावली हेराफेरी - (२) - कारणे - परेश राव - तेरेको गाना आता हैक्या ? क्योंकी संडास की कडी टूटी है, आणि विहिरीला वॉलपेपर अमर अकबर (२) - कारणे - बच्चन ऐतराज ?? मला ऐतबार (सुरेश ओबेरॉय, डिंपल, राज बब्बर) जास्त आवडला. "डायल एम फॉर मर्डर" ची सुंदर प्रत ! बाकी डीडीएलजे - एक वेळा खूप. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
म
मेघना भुस्कुटे Fri, 04/17/2009 - 10:10 नवीन
हम हैं राही प्यार के: आधी मुलांची मस्ती, मग आमीर-आमीर-आमीर, मग आमीर-जूहीचा रोमान्स, मग त्यातलं संगोपनशास्त्र, मग नॉस्टाल्जिया... किती वेळा पाहिला त्याला गणतीच नाही. मुगल्-ए-आझम: गाणी-गाणी-गाणी, मग कितीतरी वेळा 'ये कनीझ मुहम्मद जलालुद्दीन अकबर को अपना खून मुआफ करती है', मग कितीवेळा नुसती 'मधुबाला'... खूपच वेळा पाहिला. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे: अर्थात शाहरुख-काजोलची केमिस्ट्री-फ्रेशनेस-रोमान्स, मग गाणी, एकदा तर सिनेमाची आठवण आली म्हणून, कधी सोबत म्हणून. अक्षरश: अनंत वेळा. प्रीटी वुमनः लहान असताना ज्युलिया आवडायची म्हणून, मग रिचर्ड गिअर आवडायला लागला म्हणून कधी पाहायला लागलो कळलंच नाही, मग एकदा तिच्या उत्फुल्ल सुंदर ड्रेसेससाठी. अनेक-अनेक-अनेकवार शेवटच्या सीनकरता दबा धरून बसून. शॅल वी डान्सः आतापावेतो निव्वळ रिचर्ड गिअर हेच पुरेसं कारण होतं, मग गाणी खूप आवडली, मग त्यातलं ते 'आनंदात जगा, स्वतःला आवडतं ते करा' सूत्र खूप आवडलं म्हणून, शिवाय त्यातल्या डिटेक्टिव्ह नि त्याच्या असिस्टंटसारखी बिनमहत्त्वाची पात्रंही खूप गोड नि ठसठशीत रेखाटलीयेत म्हणूनही. पण हे कारण तसं वरच्या बर्‍याच सिनेमांनाही लागू होतं. चुपके चुपके, गोलमाल, खूबसूरतः कारण सांगायला हवं? निव्वळ प्रसन्न होण्यासाठी, मूड सुधारण्यासाठी. किंवा खरं तर कारण तरी कशाला हवं? आणि असे खूप खूप सिनेमे. पुस्तकांच्या इतकेच. पण एका वेळी चारच एण्ट्रीजचं बंधन घालून थांबते.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 04/17/2009 - 10:22 नवीन
हम है राही प्यार के, ३ वेळा, कारणे - जुही चावली. प्रिती वुमन, २ वेळा, कारणे - जुलिया राबर्ट -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
भ
भाग्यश्री Fri, 04/17/2009 - 17:49 नवीन
आईग.. तुलाही शॅल वी डान्स आवडतो??! \:D/ मला भयंकर आवडतो तो पिक्चर.. रिचर्ड गीअरही खूप आवडतो! :) तुझी आख्खी लिस्टच पटली! www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
M
milindrasal Sat, 04/18/2009 - 09:00 नवीन
मला हि हा पिक्च्र्र आवड्तो कारण दिलिप कुमार , मधुबाला,प्रुथ्विराज कपूर्,नाना पल्शिकर्,दुर्गा खोटे, आणि गाणि सर्वच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 04/17/2009 - 10:20 नवीन
टर्मीनेटर २ - एकूण ४७ वेळा पहिल्यावर नंतर काउंट ठेवला नाही. शोले - ३४ वेळा पहिल्यावर नंतर काउंट ठेवला नाही. मुन्नाभाई एम. बि. बि. एस. - २२ वेळा. ह्यावर आम्ही स्पूफ करून एका क्लायंट साठी ए. व्ही. बनवली होती. ऑस्टीन पॉवर्स चे सगळे पार्ट्स - किमान १८-२० वेळा प्रत्येक पार्ट पाहिला आहे. भयानक विनोदी आहे. द मेट्रिक्स - १४ वेळा. फंडा पूर्ण समजायला ३-४ वेळा पहावा लागला. मग समजल्यावर नंतर बघायला अजूनच मजा जायला लागली. ३०० - थेटर मधे आठवडाभर जाऊन रोज बघायचो. मग सि. डी. घेतली. टोटल किमान २० वेळा तरी पाहिलाय. मोटरसायकल डायरीज - किमान १२-१४ वेळा पाहिलाय. क्युबन रिवॉल्यूशनीस्ट 'अर्नेस्टो शे ग्वारा'चा मोटरसारकवरून प्रवास नी त्यातून त्याची झालेली मानसीक जडण घडण. भन्नाट सिनेमा. द वर्ल्ड्स फास्टेस्ट इंडीयन - १०-१२ वेळा पाहिलाय. रिटायर व्हायच्या वयात आपल्या 'इंडीयन' बाईक वर लँड स्पीड रेकॉर्ड बनवायला निघालेल्या माणसाची कथा. अँथनी कॉपकीन्स च्या अभिनयाला सलाम. अशी ही बनवाबनवी - असंख्य वेळा (अजून खूप सिनेमे आहेत. सवडीने लिहेन.)
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 04/17/2009 - 10:26 नवीन
मुन्नाभाई एकदाच, कारण ती हिरोईन, सगळे गोड गोड, गुळाच्या पाकासारखे, डोक्यात जाते. सर्किटचे पार्ट वेगळे काढून सिनेमा बनवला, तर बघण्यासारखा सिनेमा. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
ह
हरकाम्या Fri, 04/17/2009 - 18:13 नवीन
अरे मिसळ्भोक्त्या, लेका तुला एचढे सिनेमे बघायला वेळ कसा मिळतो आणि पैशांचे काय ? तु थेटरवर डोअरकीपर म्हणून काम करत नाहीस ना ???????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
श
शिवापा Sat, 04/18/2009 - 13:07 नवीन
मी ऑफिसात अर्धा टाइम पिच्च्रर विषयीच बोलतो. इन्स्पायर करण्यासाठी दुसरा चांगला मार्ग नाहि. बुद्ध, गिता, गांधी, क्रिकेट आणि बॉलिवुड शिवाय भारत पुर्ण होत नाहि असे माझे पर्सनल मत आहे. झोडा.... झोडा... हवं तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
स
सुधीर काळे Fri, 09/25/2009 - 05:31 नवीन
काय राव! दोन्ही "मुन्नाभाई"त सर्किट (अर्शद वारसी)च फक्त जान आणतो! दुसरा हिरो म्हणजे बोमन इराणी-डीन व बिल्डरचे काम केलेला!! बाकी सारे मिथ्थ्या! संजय दत्त तर एकदम भंकस. त्याचा रोल कुणीही केला असता!! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विशाल कुलकर्णी Fri, 09/25/2009 - 06:47 नवीन
१००% सहमत ! मी तर म्हणेन संजय दत्त सोडला तर बाकी सगळीच पात्रे सुरेखच होती. एक ती हिरोइन (दोन्ही चित्रपटातली) सोडली तर. बाकी आमचा काऊंट... शोले : गब्बरसिंग : २७ वेळा पाहिल्यावर मोजणे सोडुन दिले. जंजीर : बच्चनच्या डोळ्यातला अंगार :किती वेळा पाहीला ते आठवत नाही. दीवार : मै आज भी फेके हुये पैसे नही उठाता .... गणना नाही तसे खुप चित्रपट आहेत.... लिस्ट मोठी आहे.........:-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
ह
हर्षद बर्वे Fri, 04/17/2009 - 11:11 नवीन
बरेच जण आत्यंतिक, कल्पनातीत ई. म्हणावयाचे असते त्या ठिकाणी भयानक, भयंकर असे शब्द वापरतात.... भयात्कारी शब्दप्रयोग असेल तेंव्हा ठिक आहे....पण भयंकर आनंद झाला, बासुंदी भयानक गोड होती....अशी वाक्ये रुचत नाहीत. त्या ठिकाणी योग्य शब्दप्रयोग व्हावेत असे मला वाटते. हर्षद बर्वे(एच.बी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/17/2009 - 12:08 नवीन
बर्वे, तुमचा प्रतिसाद भयानक अवांतर आहे, तुम्हाला भयंकर आवडलेले चित्रपट कोणते हो? (ह. घ्या) मला एकदा पिच्चर पाहून समजतं, आपल्याला हा(ही) पिच्चर समजणार नाही, मग उगाच का वेळ फुकट घालवा? पण कधीकधी आशा असते हा (तरी) पिच्चर समजेल मग बघते पुन्हा पुन्हा! उदा: शॉशँक रीडंप्शन, सिंहासन, सामना (सगळ्यात खत्तरनाक अभिनय आणि सशक्त कथा). इतर बरेचसे आवडते कॉमेडी सिनेमांबद्दल अनेकांनी लिहिलं आहेच. दिलवाले ... आवडला नव्हता, पण भडकमकर मास्तरांनी मिपावर लिहिलेलं "परीक्षण" वाचून पुन्हा एकदा पाहिला, आणि तुफान हसले. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद बर्वे
घ
घाटावरचे भट Fri, 04/17/2009 - 10:31 नवीन
मायला, आत्तापर्यंत 'अंदाज अपना अपना'चं नाव कसं नाय आलं? आपण य वेळा पाहिलाय तो सिनेमा.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 04/17/2009 - 10:39 नवीन
अंदाज अपना अपना मी पण दोनदाच पाहिला. मला खरा तर तो खूप आवडलेला सिनेमा, पण ज्या काळात तो सिनेमा आवडला, तो काळ माझ्याकरता जरा कठीण काळ होता, म्हणजे मी कामात व्यग्र होतो, अन्यथा अधिक वेळा पाहिला असता, नक्कीच. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
र
रामदास Fri, 04/17/2009 - 14:59 नवीन
मी पण आणि य टेंड्स टू इन्फिनीटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
म
मैत्र Mon, 04/20/2009 - 09:53 नवीन
जवळजवळ सगळे संवाद पाठ झाले !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
न
नंदन Fri, 04/17/2009 - 10:31 नवीन
वरील यादीत न आलेले एक नाव - अंदाज अपना अपना संपूर्ण असा दोनदाच पाहिला. पण कुठलंही पान उघडून वाचायला सुरूवात करावी तसे त्यातले रँडम सीन्स कितीदा पाहिले त्याची मोजदाद नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
र
रम्या Fri, 04/17/2009 - 10:36 नवीन
आम्हाला बाबा एकदाच बघितल्यावर सिनेमा समजतो =)) आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 04/17/2009 - 10:51 नवीन
असे तुला वाटते.. :-) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या
म
मेघना भुस्कुटे Fri, 04/17/2009 - 11:39 नवीन
असे तुला वाटते... =)) =)) =)) खतरनाक!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
य
यशोधरा Fri, 04/17/2009 - 10:44 नवीन
हम दिल दे चुके सनम (२५) - :D उत्तरायण (१०) - नीना आणि साटम यांचा अभिनय संत तुकाराम - अगणित. दर वेळी तेवढाच भावतो. रोमन हॉलिडे - हा सिनेमा म्हणजे केवळ नजाकत आहे! अगणित वेळा. शोले (१५) - सिर्फ नामही काफी है! अंदाज अपना अपना (१०) - अख्खा सिनेमा मस्त आहे म्हणून! लिस्टमधे नंतर अजून भर टाकते.
  • Log in or register to post comments
श
शिवापा Sat, 04/18/2009 - 13:09 नवीन
रोमन हॉलिडे - हा सिनेमा म्हणजे केवळ नजाकत आहे! सहमत. म्हणजे एकदम स-ह-म-त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 04/17/2009 - 10:52 नवीन
१) डाय हार्ड-३ ====२५ २)द गर्ल एन्ड बॉ॑य थि॑ग=====३८ वेळा ३)द फर्म====१० वेळा ४)लॉर्ड ऑफ द रि॑ग ====डि व्ही डी रिलीज झाल्यापासुन दर आठवड्याला एकदा ५)बिहा॑ईड द एनिमी लाईन्स.====१५ ते २० वेळा ६)एलियन्स ==१० ते १५ वेळा ७)ग॑गाजल===१५ ते २० वेळा ८)कायद्याच बोला=======५० ते ६० वेळा(डायलॉ॑गस पाठ आहेत) ९)ग॑गा जमुना(दिलीप कुमारचा)....३० ते ४० वेळा १०)हम साथ साथ है.......१० ते १५ वेळा सुहास मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 04/17/2009 - 11:03 नवीन
हा प्रतिसाद बाद ठरवला आहे, कारण कारणे दिलेली नाहीत. फर्म विषयी बोलायचे, तर कादंबरी अधिक सुंदर आहे. तसेच लॉर्ड ऑफ द रिंगचे. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 04/17/2009 - 11:55 नवीन
१) डाय हार्ड-३ ====२५(व्हिलन रिडल्स घालतो म्हणुन,थेट पहिल्या सीन पासुन) २)द गर्ल एन्ड बॉ॑य थि॑ग=====३८ वेळा(स्त्री च्या शरीरात पुरषाच मन आनी वाईस वर्सा) ३)द फर्म====१० वेळा(टॉम क्रुस चा डेब्यु) ४)लॉर्ड ऑफ द रि॑ग ====डि व्ही डी रिलीज झाल्यापासुन दर आठवड्याला एकदा(खतरनाक अनिमेशन) ५)बिहा॑ईड द एनिमी लाईन्स.====१५ ते २० वेळा(एकट्या माणसाची शत्रुदेशात जगण्यासाठी आणी सुटण्याची धडपड ) ६)एलियन्स ==१० ते १५ वेळा(खतरनाक साय-फाय) ७)ग॑गाजल===१५ ते २० वेळा(अजय देवगण आणी ईतर मंडळीचा खरर्नाक अभिनय) ८)कायद्याच बोला=======५० ते ६० वेळा(डायलॉ॑गस पाठ आहेत) कारण द्यायची गरज नाही तरीपण देतो...आपल्या मक्या.. ९)ग॑गा जमुना(दिलीप कुमारचा)....३० ते ४० वेळा...दिलीप कुमारचा अप्रतीम अभिनय तसा मी नया दोर,देवदास आणी मुगले आजम पण बर्‍याच वेळा पाहीला आहे,, १०)हम साथ साथ है.......१० ते १५ वेळा(आम्ही तीन भाउ, मोठ्याच लग्न झाल आणी सगळ्या॑च झाल तरी एकत्र रहाणार्,धानोरीत ब॑गल्याच काम चालु आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
य
योगी९०० Fri, 04/17/2009 - 16:47 नवीन
शोले १५ नंतर गणती थांबवली. अंगूर/गोलमाल २५ नंतर गणती थांबवली. 300/Sound of Music/Charli Chaplin movies/ प्रत्येकी १५ वेळा My cousin Vinny किमान १०० वेळा. (कायद्याचे बोला हा चित्रपट ह्या पिक्चर वरून घेतला आहे. कायद्याचे बोला अतिशय टुकार वाटतो. मक्याला १ % ही भुमिका जमली नाहीये). एकदा हा मुळ चित्रपट बघा. खादाडमाऊ खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
भ
भाग्यश्री Fri, 04/17/2009 - 17:58 नवीन
My cousin Vinny बद्दल अतिशय सहमत! यासारखा पिक्चर होणे नाही! इथे जवळपास दर २ आठवड्यांनी टीव्हीवर लागतो.. बर्‍याचदा संपला की परत सलग दुसर्‍यांदा लागतो..आम्ही तो ही पाहतो! तोड नाही याला! कायद्याचं बोला नुसता बघितला तर चांगला आहे.. पण पैला नंबर माय कझिन विनी! www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
स
सँडी Fri, 04/17/2009 - 11:03 नवीन
बॉम्बे : संपुर्ण - एकदाच. मध्यंतरापर्यंत - अंदाजे १५०-२००वेळा, कारणे - (मिळती जुळती) प्रेमकथा. रोजा : १५-२० वेळा (कथानक) हेरा फेरी : ८-१० वेळा (संवाद) वास्तव : ५-६ वेळा (कथानक) भेजा फ्राय: ५-६ वेळा (कथानक) ओशिएन्स-११,१२ ४-५वेळा(कथानक) ओशिएन्स-१३ एकदा (कथानक) ट्रॉय : ४-५वेळा (कथानक) इतर अनेक... -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 04/17/2009 - 11:31 नवीन
ग्रेव्ह ऑफ द फ़ायर फ़्लाईज हा अप्रतिम सिनेमा एकदा बघितला तर परत बघावासा वाटणार नाही. कारण काय आहे हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. किती वेळा ते नक्की आठवत नाहित पण बर्‍याचवेळा पाहिलेले... अशीही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, अष्टविनायक आणि गंमत जंमत... शोले, गोलमाल, आनंद, छोटीसी बात, अर्धसत्य, सरफ़रोष,चुपके चुपके, दिवाना मस्ताना, हम आपके है कौन, जो जीता वही सिंकदर आणि अंदाज अपना अपना.. बिहाइन्ड एनिमी लाइन्स, रेंबो (सगळे भाग), एन्टर द ड्रॅगन, ३००, डार्क नाईट्स... सध्या एवढेच आठवतात....
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 04/17/2009 - 11:18 नवीन
शोले : ३ वेळा (कारण सांगण्याची काही गरज नाही) बेताबः ६ वेळा (कारण काहीही नाही. नटराजला लागला होता. जातायेता पाहिला आहे) जमाने को दिखाना है: ५ वेळा (बेताब प्रमाणेच) सत्ते पे सत्ता: ३ वेळा (राहणीमान होस्टेलमधील आमच्या राहणीशी मिळतेजुळते होते. जवळचा वाटला) चष्मेबद्दूरः २ वेळा दीवार, त्रिशूल, चुपके चुपके, वगैरे अनेकः मोजले नाहीत हे थेटरात पाहिलेल्या सिनेमाविषयी असावे. (पवन ट्रॅवल + घाटगे पाटील ट्रान्स्पोर्ट च्या कृपेने मुंबई रत्नागिरी मुंबई प्रवासात तेच तेच सिनेमे अगणितवेळा) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Fri, 04/17/2009 - 11:58 नवीन
अवांतर प्रतिसादः ट्रॅव्हल्स वरुन आठवले . प्रवासात गदर सिनेमा (|: साधारण १० वेळा तरी पाहिला असेन ! -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
घ
घाटावरचे भट Fri, 04/17/2009 - 12:03 नवीन
गंमत....मी वर अंदाज अपना अपना विषयी लिहिलं आहे. तो सिनेमा मी शाळेत असताना जळगाव-पुणे बशीत प्रथम पाहिला. आवडला. घरी आणून व्हिडीओवर पुन्हा पाहिला. अजून आवडला. मग त्यानंतर आजतागायत अनेक वेळा पाहिला आहे. त्यातल्या विनोदाची लेव्हल उच्च आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Sat, 04/18/2009 - 16:59 नवीन
सुहास मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
म
मराठमोळा Fri, 04/17/2009 - 11:29 नवीन
चांगला धागा आहे. माझे काही आवडते आणी पुन्हा पुन्हा पहावेसे वाटणारे (काऊंट ठेवलेला नाही )सिनेमे (कारणे अनेक आहेत, समीक्षण लिहावे लागेल त्यामुळे लिहायचे टाळतोय) मराठी १. पिंजरा २.अशी ही बनवा बनवी ३. सातच्या आत घरात ४. रात्रारंभ ५.वास्तुपुरुष ६. सरकारनामा हिंदी १. गाईड २. जुएल थिफ ३. मै चुप रहुंगी ४. मदर ईंडिया ५. पडोसन ६. पेज थ्री ७. दिल चाहता है ईंग्रजी १. फेस ऑफ २. पे-चेक ३. कॅच मी ईफ यु कॅन ४. द लास्ट समुराई ५. सायको ६. स्केरी मुवी सगळे भाग ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 04/17/2009 - 12:45 नवीन
येनारा परतेक शिणुमा मी लई येळा पघतो. त्या मुले आसे कौल मन्जे लय भुक्क्ड हायती माझ्यासमुर. म्या फुकट पास पन द्येतो. कुणाला पायजे आसल तर व्य. नी. करा, नाय तर थेटरवर येवून, "पाषाण्या कुठे आहे ? ", हे कोनालाबी ईचारा. कोनबी सांगन. "अरे ए राम्या, माझी बॅटरी कुठे हाय रे ल्येका? सालं लोग पन ना शिनेमा चालु व्हायच्या आधी येत न्हायत" मी दादा कोंडकेंचे सिनेमे कमीतकमी ३ / ३ वेळा बघीतले आहेत. बाकी हिंदी सिनेमावर दोन दोनदा पैसे खर्च करत नाही, आणि डोक्याला ताण पण करुन घेत नाही. अशी ही बनवाबनवी -२ धमाल - ९ (माझ्या मुलाबरोबर) एक डाव भुताचा -२ बाल शिवाजी -२ मुन्नाभाई -२ शोले -४ सौदागर -२ (लागोपाठ शो कॉलेज बुडवुन) कश्मीर की कली -२ आपण थेटरातच सिनेमा बघतो त्यामुळे एश करुन चालत नाही. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Fri, 04/17/2009 - 12:01 नवीन
मी हिंदी चित्रपटांमध्ये अंगूर ५० वेळा तरी बघितला असेल. त्यात संजीव कुमार आणि देवेन वर्माचा डबल रोल पोट धरधरून हसायला लावतो. कितीही वेळा बघितला तरी तेवढेच हसायला येते. मराठीमध्ये कायद्याचे बोला. मकरंद अनासपुरे चा आवाज आणि शैली नवीन असताच्या काळात असाच ३०-४० वेळा बघितला असेल.आजही त्याचे संवाद आठवतात. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 04/17/2009 - 12:07 नवीन
यस. अंगूर कसा विसरलो मी.... बारावीत असताना प्रथम पाहिला. मग कुठूनतरी व्हीसीडी मिळवून पारायणं केली. आजही कंटाळा आला की अंगूर पाहातो, छान वाटतं. -भटोबा 'चलो इंपीरियल हॉटेल. लेकिन हम वहां ठहरने वाले नहीं हैं. वहां उतरकर हम कहीं और चले जाएंगे' इति संजीवकुमार फ्रॉम अंगूर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ज
जागु Fri, 04/17/2009 - 12:16 नवीन
मी किती वेळा पाहीले ते मोजले नाहीत पण बर्‍याच वेळा पाहीलेले. शोले मैने प्यार किया हम दिल दे चुके सनम दिल वाले दुल्हनीया ले जायेंगे हम है राही प्यार के हम साथ साथ है गम्मत जम्मत कर्ज बॉबी मेरा नाम जोकर हरीयाली और रास्ता. अजुन असतील बरेच. पहीला खुप बघायचे आता वेळ नसतो . एखादा पण मुश्किलीने पाहाते.
  • Log in or register to post comments
ख
खालिद Fri, 04/17/2009 - 13:18 नवीन
१. गुंडा: - (मिथुन, इर्शाद अली, मुकेश ऋषी,कांति शाह, शक्ती कपूर, दीपक शिर्के या सर्व कंपनीसाठी आणि आत्तापर्यंत मी ऐकलेल्या सर्वात परिणामकारक संवादांसाठी)...५० नंतर गणती सोडली. २. लोहा: - (गुंडाप्रमाणेच...तसे बघायला गेल्यास गुंडा हा लोहाचा छोटा भाऊच आहे.).........५० नंतर गणती सोडली. ३. डॉन मुथ्थुस्वामी.: ----(फक्त मिथुन साठी) ----५ वेळा. ४. दो अंजाने ( मनिषा कोईराला, अतुल परचुरे आणि संजय कपूर यांची ऑस्करविजेत्यांच्या तोडीचा अभिनय पाहायला):-- २ वेळा ५. चांदनी चौक टू चायना (कोण म्हणतं की कराटे , कुंग फू फक्त चिनी, जपानी चित्रपटांमध्ये असतात? आपण भारतीय त्यातही मागे नाही अशी मनाची समजूत घालण्यासाठी) ......२ वेळा ६. टायटॅनिक (चित्रपटविषयक सौंदर्यमूल्ये कळायच्या आधी १० वेळा आणि चित्रपट कशाशी खातात हे कळल्यावर २० वेळा)..... ७. सरकारनामा (आमदार मालविका पटेल यांचे अभिनय कौशल्य पाहण्यासाठी आधी, दिग्गज मंडळींसाठी नंतर) ... ७० नंतर गणती सोडली. ८. थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला, धूमधडाका, पछाडलेला....(फक्त "डॅम इट!!" हे ऐकण्यासाठी)......४० वेळा मिनिमम ईच ९. रेहना है तेरे दिल में ( पहिला अर्धा तास फक्त...प्रत्येक वेळी सिनेमा पाहिला तेव्हा.....फक्त मॅडी, सॅम आणि त्याचं कॉलेज; बासं!!!!! नंतर मुलीची येंट्री आणि सिनेमा बाराच्या भावात)........५० नंतर ग. सो. १०. नाथा पुरे आता ( सहनशक्तीची परिक्षा घेण्यासाठी ) २-वेळा तूर्त एवढेच जसे लक्षात येतील तशी भर घालीन म्हणतो.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 04/17/2009 - 13:24 नवीन
संत तुकाराम ! अनेक वेळा चित्रपटातील सर्व पात्रांचा अभिनय अतिशय आवडतो. संवाद, भजने अतिशय आवडतात. वातावरण निर्मिती आवडते. कितीही वेळा पाहिला तरी पुन्हा पहावा असा वाटतो. भागवत धर्माचे म्हणणे काय हे सांगणारा प्रसंग, शिवाजीचा नजराणा आव्हेरतानाचा अभंग, धान्याने भरलेले घर गोरगरीबांना खुले करतानाचा प्रसंग फार उत्तम वाटतात. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 04/17/2009 - 13:58 नवीन
कितीवेळा ते मोजले नाही... पण एकापेक्षा जास्तंवेळा पाहीलेले खाली दिलेत... अशी ही बनवा बनवी माझा पती करोडपती सिलसिला शोले लगान जब वुई मेट यु हॅव गॉट अ मेल सेरेंडीपिटी नॉटींग हिल स्लीपलेस इन सियाटल वन फाईन डे डाय हार्ड १, २, ३ प्रिटी वुमन एरिन ब्रोकोवीच ब्युटीफुल माईंड शॉशँक रिडेम्प्शन गॉडफादर मेन ऑफ ऑनर सायलेंस ऑफ द लँब्स् आणि भरपूर आहेत..... -अनामिक
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 04/17/2009 - 14:09 नवीन
प्रामाणीक उत्तरे दिल्यास आपला हा धाग आणी आमचा प्रतिसाद दोन्ही गायब व्हायची शक्यता आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Fri, 04/17/2009 - 14:21 नवीन
सहमत परा...... ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सँडी Fri, 04/17/2009 - 17:46 नवीन
प्रामाणीक उत्तरे दिल्यास आपला हा धाग आणी आमचा प्रतिसाद दोन्ही गायब व्हायची शक्यता आहे. =)) =)) लै भारी! आकाशातले तारे मोजणारा जन्माला यायचाय अजुन! 8} -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा