Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सर्वाधिक वेळा पाहिलेले चित्रपट

म
मिसळभोक्ता
Fri, 04/17/2009 - 10:01
🗣 81 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
24523 वाचन

💬 प्रतिसाद (81)
श
शिवापा Sat, 04/18/2009 - 13:20 नवीन
टाका. टाका म्हणजे टाकाचं. एकदा कॉलेजात दुस-या दिवशी प्रयोग परिक्षा म्हणुन सगळे मित्र परिक्षा कशी महत्वाची आहे म्हणुन कट्ट्यावरुन सटकले. थोड्या वेळाने सहाचा शोला सगळे एकमेकांना फसवुन थेटरात हजर. पिच्चरचे नाव मान्सुन. जगमोहन मुन्द्राचा पिच्चर. पण जे पोष्टरात दिसते ते शिनेमात गायब. कट केला असावा म्हनुन प्रयोग परिक्षा संपल्यावर पुन्हा दुस-या दिवशी पाहिला तर पहिल्या दिवसाचे काहि तुकडे पण कट. तिच्यायला! ठरवले आता अभ्यास करायचा आणि सॉफ्टवेअर मधे जायचे. परमेश्वराला ते आवडले. नंतर कट न केलेला आ़ख्खा पिच्चर जालावर मिळाला. किती वेळा पाहिला ते विचारु नका. जालींदर जलालाबादी हे केवळ यामुळेच देवदुत आहेत का? हा प्रश्न पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
S
Suhas Narane Fri, 04/17/2009 - 14:18 नवीन
चांदनी चौक टू चायना,माझा पती करोडपती, शोले, लगान खुप वेला पाहीले. शाम्च्यी आयी सार्के पण कुप पाहीले
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Sat, 04/18/2009 - 10:48 नवीन
सरफरोश - आमीर खानसाठी, मुकेश रिषीच्या त्या संवादासाठी, कथानकासाठी जो जीता वही सिकंदर - सायकल रेस आणि त्या भोवती गुंफलेल्या कथानकासाठी रोजा - कथानक cars - कथानक, फील गुडसाठी शोले - सुज्ञास का.सां.न.ल. अंदाज अपना अपना - सुज्ञास का.सां.न.ल. महेश कोठारे चे पंचा़क्षरी सिनेमे - लक्ष्यासाठी दिलवाले दुल्हनिया... हम साथ साथ है - फील गुड, सलमानने साकारलेल्या नम्र/दयाळू प्रेमसाठी हम आपके है कौन विवाह .. आणि अनेक
  • Log in or register to post comments
व
व्यंकु Fri, 04/17/2009 - 15:49 नवीन
मी सरफरोश नावाचा अमिर खानचा पिक्चर 16 वेळा बघितलाय. आणि अजूनही जाहिरातीँना सहन करुन कितीही वेळा पाहण्याची तयारी आहे.
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 04/17/2009 - 17:31 नवीन
शोले - काऊंट ठेवला नाही - बच्चन , संजीव कुमार , जबरदस्त डॉयलॉग आणि अभिनय, खिळवून ठेवणारे प्रसंग ... एक डाव भुताचा - ४-५ वेळा तरी नक्किच. निखळ करमणूक , अशोक सराफाचे भूत , दिलीप प्रभावळकरचा मास्तर पण छान होता , ठसकेबाज रंजना. टायटॅनिक - लय वेळा - उत्कृष्ट सिनेमा , रंगत जाणारी प्रेमकहाणी , जहाजातले थरारक प्रसंग... मैने प्यार किया- कॉलेजात असताना ४-५ वेळा तरी , नंतर टिव्हीवर - सलमान भाग्यश्री जोडी तेव्हा आवडली होती. अजून असे बरेच सिनेमे आहेत - लगान , जोश , गोलमाल (अमोल पालेकरचा, मराठी गोलमाल नव्हे), अशीही बनवाबनवी , मास्क, लायर लायर , गन्स ऑफ नॉवेरॉन (ग्रेगरी पेक साठी) .....
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Fri, 04/17/2009 - 17:32 नवीन
छोटिसी बात - कारनं द्यायची गरजच नाय
  • Log in or register to post comments
व
वर्षा Fri, 04/17/2009 - 18:33 नवीन
अगणितवेळा पाहिलेले: अशी ही बनवाबनवी: अभिनय आणि संवाद! गंमत जंमतः कथा, अभिनय, संवाद खूबसूरतः रेखा!! गोलमाल (जुना): कथा कथा (सई परांजपेंचा): कथा, अभिनय चष्मेबद्दूर: कथा, अभिनय शांतेचं कार्ट चालू आहे! (नाटक): सर्व कलाकार!
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 04/17/2009 - 19:16 नवीन
असंख्य वेळा नाही पाहिलेले, पण अनेकदा टीव्हीवर लागल्यानंतर हलत नाही मी कुठे! अजूनही कितीही वेळा पाहण्याजोगे ः - अंदाज अपना अपना (बेफाम, निरागस विनोद. आमिरचा विनोद. शक्ती कपूरचा "आँखे निकालके गोटी खेलूँगा' हा डायलॉग, परेश रावलला मारण्याचे प्रसंग आणि अफलातून क्‍लायमॅक्‍स!) - सरफरोश (आमिरची जबरदस्त भूमिका, अफलातून रहस्य, (सोनालीचं ओलेतं गाणं वगळता) भन्नाट वेग, बुद्धिमान क्‍लायमॅक्‍स.) - काय द्याचं बोला! (अजित दळवींचे भन्नाट संवाद, प्रशांत दळवींची पटकथा आणि चंद्रकांत कुलकर्णीचं दिग्दर्शन. आणि हो! मकरंदचा बेफाट अभिनय.) - शोले (का, ते सांगायला नको.) - बिनधास्त (अफलातून रहस्य, मराठीतलं सर्वांत वेगवान सादरीकरण. शर्वरी जमेनीस आणि वेगळी कल्पना.) - सरकारनामा (जबरदस्त सादरीकरण, अफलातून डायलॉग, "कसला ते तुझा बंदोबस्त'सारखी यशवंत दत्त यांची विस्मयकारक शब्दफेक आणि दिलीप प्रभावळकरांची उत्कृष्ट भूमिका.) - आँधी (गुलजार, आर. डी. बर्मन, संजीवकुमार आणि सुचित्रा सेन.) - हम आपके हैं कौन आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (तारुण्यातली क्रेझ!) - शक्ती (अमिताभ-दिलीपकुमार, आणि सलीम-जावेद!!) - टारझन! (किमी काटकर, किमी काटकर आणि किमी काटकर!!! आठवतेय?) - गुंडा (मोहन जोशी, मुकेश ऋषी, शक्ती कपूर, हरीश पटेल वगैरेंचे संवाद!!) (हा मला एकदा तरी थेटरात जाऊन पाहायचाच!!) - जब वुई मेट (करीना-शाहिदची अफलातून केमिस्ट्री, अप्रतिम पटकथा आणि हळुवार सादरीकरण.) - बोट लावीन तिथं गुदगुल्या, पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव, आली अंगावर! (दादा, दादा आणि दादा! शिवाय, अशोक सराफ!!) - धूमधडाका (विखी वाक्‍खू वाक्‍ख्याव!!, शरद तळवलकर, अशोक सराफ आणि "ऍक्‍टिंग शिकवण्यासाठी बलात्काराशिवाय दुसरा प्रसंग मिळाला नव्हता तुला?' शिवाय, सिनेमाची स्टोरी सांगण्याचा प्रसंग. हा प्रसंग मूळ "प्यार किये जा'मधल्या मेहमूद-ओमप्रकाशपेक्षा अप्रतिम झालाय, असा माझा दावा आहे!) ---------- आणि...... झपाटलेला (सर्वांत पहिल्यांदा बघितला, तेव्हा वेडा झालो होतो! बोलक्‍या बाहुल्याचा मराठी चित्रपटातला पहिल्यांदाच भन्नाट वापर, अफलातून विनोदी प्रसंग, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अण्णासाहेब देऊळगावकर (पटकथाकार) सगळ्यांचीच अत्युच्च कामगिरी. "ओम भगभुगे भग्नी भागोदरी' सारखे जबरदस्त डायलॉग आणि प्रसंग) --- अवांतर ः बघायचे राहिलेले असंख्य चित्रपट आहेत... 1. माहेरची साडी (त्या वेळी थेटरला बघायचा राहिला!) 2. हम साथ साथ हैं 3. मिर्च मसाला, आक्रोश वगैरे वगैरे. 4. अछूत कन्या, बंदिनी, ज्वेल थीफ, गाईड, पडोसन, बॉंबे टू गोवा, गुमनाम, तीसरी मंजिल, मेरा साया..... 5. मुगले आझम 6. कुछ कुछ होता है 7. कागज के फूल, साहब बीवी और गुलाम, प्यासा (सीडी आणून ठेवल्याहेत, पण बघणं होईना!) 8. गोलमाल, नरम-गरम, चितचोर, घरौंदा, वगैरे वगैरे. 9. भेजा फ्राय, लाइफ इन अ मेट्रो, मुंबई मॅटिनी... 10. ऐतबार (सुरेश ओबेरॉय नि कोणकोण...) (ऋषी कपूरचा पण एक रहस्यप्रधान कुठलातरी जबरदस्त सिनेमा आहे म्हणे. तोही!!)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 04/18/2009 - 17:04 नवीन
(ऋषी कपूरचा पण एक रहस्यप्रधान कुठलातरी जबरदस्त सिनेमा आहे म्हणे. तोही!!) खोज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
स
संदीप चित्रे Fri, 04/17/2009 - 21:52 नवीन
:)
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Fri, 04/17/2009 - 23:28 नवीन
अरे येथे कोणी नेकेड गन वाले नाहीत का? खालील प्रत्येकी अगणित वेळा... नेकेड गन - १,२,३ (अफाट गिग्ज, विडंबने. प्रत्येक वेळेला बघताना आधी निसटलेले विनोद लक्षात येतात) एअरप्लेन -१ (हीच कारणे) हॉट शॉट्स - २ (हीच कारणे) ड्म्ब ऍन्ड डम्बर - जिम कॅरे, जेफ डॅनियल्स ची धमाल मास्क - जिक कॅरे आणि अफलातून संवाद नीमो, कार्स, लायन किंग, जंगल बुक (डिस्ने चा)- अफलातून ऍनिमेशन, सुंदर कथा वेडिंग क्रॅशर्स - विन्स वॉन चे मोटरमाउथ गेट स्मार्ट (नवीन) - अफलातून संवाद हिंदीत - अमिताभ आणि सलीम जावेद एकत्र आलेले सगळे. तसेच अ.अ.ऍ., मुकद्दर का सिकंदर, नसीब - कारण मुख्य बच्चन मराठीत - धूमधडाका - अशोक आणि लक्ष्या
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 04/18/2009 - 01:09 नवीन
नेकेड गन, पिंक पँथर, मास्क, डंब अँड डंबर, फन विथ डिक अँड जेन, गेट स्मार्ट.. तसेच, ऍनिमेशन मधले श्रेक सगळे भाग, मादागास्कर, कुंग फु पांडा, रॅटटुई इत्यादी पिक्चर्सची पारायणं असतात आमच्या घरी! :) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड
श
श्रीयुत संतोष जोशी Sat, 04/18/2009 - 01:57 नवीन
मी अमिताभचे जवळजवळ सगळे चित्रपट किमान २/३ वेळा पाहिलेले आहेत. कारण सांगायची गरज नाही. त्यातही शोले ; दीवार आणे अग्निपथ ३० / ४० वेळा. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 04/18/2009 - 03:23 नवीन
मोजणं सोडून दिलं, पण पहाणं नाही सोडलं. पाकीजा - मीनाकुमारी आणि गाणी पडोसन, अंगूर, जुना गोलमाल, खट्टामीठा, खूबसूरत [रेखा] - डोक्याला ताप नाही, हसा आणि हसत रहा! गाईड - २४ तास पहायला तयार. अभिनय, गाणी, कथा, दिग्दर्शन सगळंच खास. शेवटच्या एका सीनमधली एकेक दागिना रस्त्यावर टाकत वाळवंटातून उन्हात येणारी वहिदा ग्रेट! डोर - खास! सवत माझी लाडकी - धमाल. मटिल्डा, होम अलोन, बेबीज डे आउट, डॉ. डूलिटल - मस्त! शक्यतो टीव्हीवरच जास्त चित्रपट पाहिले जातात. तेही जमेल तसे, आणि लागतील तसे. यादी बरीच मोठी आहे, सध्या एवढीच पुरे!क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sat, 04/18/2009 - 06:48 नवीन
अगणित वेळा पाहिलेले (आणि परत पाहीन असे) चित्रपटः १. स्वदेस: माझ्या मते आशुतोष गोवारीकरचा हा चित्रपट हवा तेवढा चालला नाही. शाहरूखची कुठेही ओव्हएक्टिंग नाही. विषय मनाला भिडणारा, सुंदर गाणी आणि गायत्री जोशी अप्रतिम. परत तिचा कुठलाही चित्रपट आला नाही. २. अंगूरः शेक्सपिअरच्या comedy of errors वर आधारीत गुलजरचा चित्रपट. संजीव कुमार आणि देवेन वर्माचा डबल रोल अगदी धमाल आणतो. उत्तम comedy, कुठेही ओढूनताणून विनोद निर्मितीचा प्रयत्न नाही. मौशुमी पण एक नंबर. ३. लगानः पहिल्यांदा पाहिला तेव्हा जरा निराशा झाली. स्टोरी वेगळी असेल अशी अटकळ होती पण मध्यंतरानंतर एकदम क्रिकेट सुरु होतं. पण दुसर्‍यांदा जेव्हा पाहिला तेव्हा जाम आवडला. रेहेमानचं संगीत नेहेमीप्रमाणेच अत्युच्च. कथेतून सामाजिक संदेश देण्याची आशुतोषची स्टाईल आवडली. ४. आंखे: गोविंदा, कादर खान आणि राज बब्बरचा डबल रोल. फूल टू मसाला मूव्ही. ५. साजन चले ससुराल, हिरो नं १, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी, राजा बाबू: गोविंदाची जबरदस्त comedy ६. गर्दिशः प्रियदर्शनचा अप्रतिम चित्रपट. jacky shroff आणि अमरीश पुरीचा अत्युच्च अभिनय. ७. परिंदा: उत्तम अभिनय आणि कथा. ८. अंदाज अपना अपना: केव्हाही आणि कुठुनही पाहा, धमाल चित्रपट. ९. सवत माझी लाडकी: मोहन जोशी १ नंबर १०. मासूम, मिस्टर इंडिया: शेखर कपूरचे नितांत सुंदर चित्रपट. ११. चश्मेबद्दूर, कथा: सई परांजपेचे अप्रतिम चित्रपट. १२. तिसरी मंझिल, अंदाजः शम्मीचे आवडलेले चित्रपट १३. शिवा, रात, रंगीला: रामूचे आवडलेले चित्रपट. १४. घायल, घातक, अर्जुन, जिद्दी: सनीचे आवडणारे action चित्रपट. १५. अग्नीपथ, काला पथ्थर, त्रिशूल, नमकहलाल, मि. नटवरलाल, जंजीर, दिवार, शोले, शराबी, शक्ती: अमिताभचे आवडलेले चित्रपट. १६. जो जिता वही सिकंदर, सरफरोश, दिल चाहता है, तारे जमीं पर, हम है राही प्यार के: आमीरचे आवडणारे चित्रपट १७. द लिजंड आफ भगतसिंगः अप्रतिम. १८. मुन्नाभाई: दोन्ही भाग मस्त. १९. आनंद, बावर्ची, अभिमान, चुपके चुपके, गोलमालः ह्र्षीदांचे अप्रतिम चित्रपट. २०. डीडीएलजे, हम आपके है कौन: अप्रतिम. २१. रजनीगंधा: साधा सरळ असल्यामुळे आवडला. २२. मेरे अपने, आंधी: गुलजारचे क्लासिक चित्रपट. Finally I will be so matured that I will react to nothing.
  • Log in or register to post comments
J
jenie Sat, 04/18/2009 - 07:35 नवीन
रंग दे बसंती - १५ वेळा सिनेमा पाहील्यावर एक जोश येतो असे वाटते य वढत्या करप्शन साठी आपणही काही तरी केले पाहीजे ..,अमिर सवत माझी लाडकी -य वेळा नीना नं १
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 04/18/2009 - 08:32 नवीन
गुळाचा गणपती -- पु. ल. परिचय - जया भादूरी खूबसुरत - रेखा, अशोक कुमार बावर्ची - जया भादूरी , राजेश खन्ना आनंद - राजेश खन्ना अभिमान - जया भादूरी दिल तो पागल है - माधुरी दिक्षीत (नवरंग, झनक झनक पायल बाजे, अनारकली, मुघले आझम, पाकिजा चित्रलेखा, आम्रपाली इ. चित्रपटां मधील गाणी खूप आवडतात पण त्या साठी ते चित्रपट परत बघावेसे नाही वाटत) गॉन विथ दि विंड माय फेअर लेडी दि साउंड ऑफ म्युझिक
  • Log in or register to post comments
अ
अनमिका Sat, 04/18/2009 - 16:24 नवीन
हम आपके है कौन - १० जब वी मेट - ६ मै हु ना - नेहमी केबल वर असतो शादि करके फस गया यार - नेहमी केबल वर असतो रोजा - ४ हेरा फेरी - ४ वेलकम - ३ मैने प्यार किया - ५ मैने प्यार क्यु किया - नेहमी केबल वर असतो पहेली - नेहमी केबल वर असतो हम दिल दे चुके सनम - ६
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sun, 04/19/2009 - 01:35 नवीन
शोले : मोजणे थांबवले. आता तोंडपाठ आहे. पण एक अप्रतिम जमलेली भट्टी. शिरिष कणॅकरांच्या शब्दात सांगायचे तर एक घट्ट विणीची कथा, सगळ्यांचे उच्च अभिनय, संगीतही वाईट नाही. डाकू या जुन्या कल्पनेला सोडून एक वेगळ्याच प्रकारचा, मिलिटरी कपडे घालणारा, क्रूर, धाडसी दाखवला आहे. ग्रेट. छोटी सी बातः ५-६ वेळा. उत्तम दिग्दर्शन, भावणारी कथा, अशोक कुमार, अमोल पालेकर, असरानी यांचे अभिनय उत्तम. विद्या सिन्हाही छान. ३५-४० वर्षापूर्वीची, बरीच कमी गर्दी असणारी मुंबई बघायला बरे (नॉस्ट्याल्जिक)वाटते. ड्युअल : स्पीलबर्गचा एक जुना सिनेमा. चित्तथरारक, गूढ, पण तरी पुन्हा पुन्हा बघावासा वाटणारा सिनेमा. ३-४ वेळा बघितला. अजून मिळाला तर बघेन. एक ट्रक एका कारवाल्याच्या मागे लागतो. आणि पिच्छा सोडत नाही. बर्‍यापैकी निर्मनुष्य रस्ता, वाळवंटी, ओसाड. मनुष्य हैराण होतो. आणि बरेच काही घडते. मिळाला तर बघाच.
  • Log in or register to post comments
क
कळस Sun, 04/19/2009 - 07:52 नवीन
अनेक वेळा.. शराबी - नशेमे कौन नही है ? आखरी रास्ता - डबल रोल करावा तर असा !! लगे रहो मुन्नाभाई - दि.प्र. कळस !!
  • Log in or register to post comments
अ
अदित्य Sun, 04/19/2009 - 12:02 नवीन
मालामाल विकलि. कारण निखळ मनोरनजन, शेवट चान्गला आणि सर्वात मह्त्वाचे घरातिल सर्व सद्स्यना सोबत पाह्ण्या लायक. बाकि म्हणाल तर श्याम चि आई, आज पर्यन्त अनेकदा बघुनहि पुर्ण चित्रपट (शेवट पर्यन्त) पाह्ण्यचि हिम्मत आज पावेतो आलेलि नाहि.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 04/20/2009 - 10:25 नवीन
अनेक आवडलेले व अनेकदा पाहिलेले चित्रपट वर लिहिले आहेत सगळ्यांनी. बनवाबनवी, धुमधडाका, सिंहासन, वास्तुपुरुष, बनगरवाडी, प्रीटी वुमन, शॉशँक रिडम्प्शन, शॅल वी डान्स, स्पॅंग्लिश, रॅटाटुई, अंदाज अपना अपना, शोले, छोटी सी बात, गोलमाल, नरम गरम, कथा, चश्मेबद्दूर (हा विशेष आवडता - काली घोडी द्वार खडी आणि टुटि फ्रुटी), दिल चाहता है, मुन्नाभाई, जाने भी दो यारो, सरफरोश, स्वदेस, आनंद, बावर्ची , चुपके चुपके, हेरा फेरी, हंगामा, इतर काही - मॅकनाज गोल्ड - ग्रेगरी पेक ... व्हेअर इगल्स डेअर - क्लिंट इस्टवूड फ्युजिटिव्ह - हॅरिसन फोर्ड खूप वेळा पाहिलेला - परस्युट ऑफ हॅपीनेस... विल स्मिथ... नितांत सुंदर चित्रपट. एक क्षणही सोडत नाही. जबरदस्त... शेवटी त्याला जॉब मिळतो त्या क्षणी जे त्याने काम केले आहे ते अशक्य आहे... एक खूप आवडलेला - फाइंडिंग नीमो - अनेकदा पाहिला आहे. आजवर पाहिलेला सर्वोत्कृष्ट ऍनिमेशनपट. बनगरवाडी - विलक्षण आवडलेला चित्रपट वास्तुपुरुष - मनावर गारूड करणारा. थोडा सुन्न करणारा अनुभव. तू तिथं मी - अप्रतिम... खूप छान गाणी आहेत. सगळ्यांची कामं उत्तम आहेत. कथा पटकथा संवाद - सगळंच बेस्ट. सगळ्यात छान - सुहास जोशी... कळत नकळत, चौकट राजा - स्मिता तळवलकरचे बहुतेक सर्वच चित्रपट मुक्ता - ना धो महानोरांच्या कवितांना आनंद मोडकांनी दिलेल्या चाली, सोनाली, जब्बारचा चित्रपट. सरकार - बॅकग्राउंड म्युझिक (गोविंदा गोविंदा .....), पटकथा, संवाद, अमिताभ, केके, .. असे अनेक आहेत. आठवले तेवढे लिहिले..
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Wed, 04/22/2009 - 11:50 नवीन
वरच्या सर्व प्रतिसादांत न आढळलेले माझे आवडते - मराठी - दोघी, ध्यासपर्व हिंदी - उत्सव इंग्रजी - डॉ. झिवागो
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Wed, 04/22/2009 - 11:50 नवीन
वरच्या सर्व प्रतिसादांत न आढळलेले माझे आवडते - मराठी - दोघी, ध्यासपर्व हिंदी - उत्सव इंग्रजी - डॉ. झिवागो
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE गुरुवार, 09/24/2009 - 11:53 नवीन
हम आपके है कौन..........! हम आपके है कौन..........! हम आपके है कौन..........! हम आपके है कौन..........! हम आपके है कौन..........!
  • Log in or register to post comments
ग
गुंड्या गुरुवार, 09/24/2009 - 13:42 नवीन
इंद्रा - द टायगर... इंद्रा - द टायगर... इंद्रा - द टायगर... इंद्रा - द टायगर... इंद्रा - द टायगर... रोजच असतो.....
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 09/25/2009 - 11:30 नवीन
इंद्रा - द टायगर हा चित्रपट सेट मॅक्सवर मी दररोज बघतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंड्या
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 09/25/2009 - 11:30 नवीन
इंद्रा - द टायगर हा चित्रपट सेट मॅक्सवर मी दररोज बघतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंड्या
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 09/24/2009 - 18:50 नवीन
गाईड - ५ वेळा ज्वेल थीफ - ४ वेळा कारण मी नास्तिक असलो तरी देव(आनंद)भक्त आहे. चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Fri, 09/25/2009 - 05:24 नवीन
खालील सर्व पैसे देऊन थेटरात वो भी जब हम जवान थे तबकी बात है! पेइंग गेस्ट (७ वेळा, "हाय हाय हाय ये निगाहें" हे गाणं फार आवडते!) My Fair Lady (5) Sound of Music (4) टीव्हीवर लागलेले असताना चकटफू पाहिले असे या आकड्यात जोडलेले नाहीत. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
न
निशांत५ Fri, 09/25/2009 - 08:03 नवीन
१)वास्तुपुरुष २) चुपके चुपके ३) हम आपके है कौन - फक्त माधुरीसाठि-भयान आवडायला लागली ति ह्यो फिल्म बघित्ल्यावर ४) टायटनिक ५) School of Dance ६) झंकार बीट्स ७) जब वूई मेट
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा