जनातलं, मनातलं
धम्माल पिक्चर बोक्या सातबंडे
Primary tabs
कालच मस्त पिक्चर पाह्यल. बोक्या सातबंडे. घरच्या सर्व लोकान्ला घेउन मुद्दाम होउन पाहन्यासारखा पिक्चर आहे तो. बच्चे कंपनीला तर फारच आवडेल पण मोठ्या माणसान्ला पन आवडेल. आरयन नार्वेकरचा बोक्या एकदम झकास आनि आलोक राजवाडेचा विजु पन धमाल.एकदम फ्यामिलि पिक्चर.
http://www.loksatta.com/daily/20090419/lr04.htm
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4416013.cms
http://www.indianshowbusiness.com/wp-content/uploads/2009/03/dsc_0050-medium.jpg
http://www.indianshowbusiness.com/wp-content/uploads/2009/03/dsc_0101-medium.jpg
http://www.dilipprabhawalkar.com/v1/books/bkBokyaEditions.jpg
आत्ताच बघून आली हा चित्रपट.एक आठवड्यापूर्वीच बोक्या सातबंडेचा २ रा भाग वाचला होता.तेच पडद्यावर बघताना मजा आली.आर्यन नार्वेकरने ऊत्तम बोक्या साकारलाय.आलोक राजवाडेचा विजयेंद्र आणि (देवेन बेलवंडेही :)) ) झक्कास होता.बेलवंडे आजोबांनी आबांची आठवण करून दिली.तसेच भाव,हातांच्या हालचाली.
सर्वांनी आवर्जून बघावा असा चित्रपट आहे.
त्यातले काही संवादही मनाला भिडणारे,विचार करायला लावणारे आहेत.उदा.बोक्या जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत गरीब मुलांना मदत करण्याची योजना मित्रांना सांगतो,तेव्हा तो म्हणतो,"शक्यतो मोठ्या माणसांकडे या योजनेबद्दल बोलू नका.उगीच मोडता घालतील.माझा अनुभव आहे.त्यांना अशा कल्पना सुचत नाहीत आणि आपल्याला सुचल्या तर त्यांना आवडत नाही." :?
बोक्या जेव्हा बेलवंडे आजी-आजोबांना चिकन,पापलेट,आईसक्रीम घेऊन जातो,तो प्रसंगही हळवा आहे.
चित्रपटातली गाणीही सुंदर आहेत. 8>
Official site of Bokya Satbande पाहा,
http://www.maanbindu.com/showMovie.do?name=Bokya-Satbande
Lovely movie Yaar. Superb.
नक्की पाहणार! :)