Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मतदान करा आणि राष्ट्रीय पक्षालाच करा !

म
मैत्र
Tue, 04/21/2009 - 03:54
🗣 68 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
35157 वाचन

💬 प्रतिसाद (68)
द
दशानन Tue, 04/21/2009 - 04:02 नवीन
अनुमोदन ! वर जे मैत्र ह्यांनी लिहले आहेत त्याला मी १००% सहमत आहे, राष्ट्रीय पक्षालाच मत द्या. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 04/21/2009 - 04:04 नवीन
मोराला मतदान कसे करायचे?
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 04/21/2009 - 04:15 नवीन
=)) तो पक्षी आहे आम्ही पक्षाबद्दल बोलत आहोत ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
म
मराठी_माणूस Tue, 04/21/2009 - 04:16 नवीन
अराजक टाळण्यासाठी ज्या पक्षाना तुम्ही मतदान करायला सांगता आहात , ही परिस्थीती उदभवण्या साठी त्यांचे उत्तरदायीत्व काहीच नाही का ? आपण काहीही विधायक काम केले नाही तरी काहीच फरक पडत नाही, सत्ता आपल्यालाच मिळते हा गैरसमज दुर व्हायला नको का ?
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 04/21/2009 - 04:29 नवीन
जर माझ्या इथुन लढणारे दोन्ही राष्ट्रिय पक्षाचे उमेदवार भ्रष्ट आहेत्....त्यांना मिळालेल्या संधीत त्यांनी काहिच केलेले नाही. आणी एक सामाजीक कार्याची चांगली जाण असलेला नेता अपक्ष म्हणुन उभा आहे. तेव्हा फक्त स्थिर सरकारा साठी राष्ट्रिय पक्षाला मतदान करणे अयोग्य वाटाते... ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 04/21/2009 - 06:16 नवीन
तेव्हा फक्त स्थिर सरकारा साठी राष्ट्रिय पक्षाला मतदान करणे अयोग्य वाटाते... हे नुसतेच अयोग्य नसुन स्वतःवर अन्याय करण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
म
मैत्र Tue, 04/21/2009 - 06:36 नवीन
मला स्वतःला विचाराल तर मी पुण्यात अरूण भाटियांना मतदान करा सांगेन. ते निवडून नाही आले तरी त्यांना मिळणारी काही हजार कदाचित एखाद लाख मते त्यांचे बळ वाढवतील. अचानकपणे कोणी अपक्ष खासदार होत नाही. पण त्यातून साध्य काय होते - तात्विक समाधान? की मला कलमाडी किंवा शिरोळे नको आहेत मग मी एका स्वच्छ आणि चांगल्या माणसाला मत देईन... देशातले स्थैर्य, चांगले केंद्र सरकार यापेक्षा तुमच्या घराजवळचे रस्ते / थोड्या किरकोळ सुधारणा आणि मी माझ्या मनाप्रमाणे केले असा भाबडा आनंद. त्यात गैर नाही. पण जरा लांबचा विचार केलात तर १९९५ पासून गेल्या सर्व निवडणूका आणि सरकारे यांची एकच मोठी डोके दुखी राहिली आहे - राज्य पातळीवरचे पक्ष आणि अपक्ष... भारताची सुरक्षितता, आर्थिक सुधारणा, सध्याच्या मंदीतून स्थिरपणे बाहेर पडणे आणि विकास दर पूर्ववत करणे तुमच्या आमच्या समाधानापेक्षा / स्थानिक प्रश्नांपेक्षा खूप महत्त्वाचे आहे... आणि त्यासाठी विधानसभा आहे ना! तुम्ही नगरसेवक चांगला निवडून आणा. तुमच्या गल्लीतले डांबरीकरण, कचरा, शहर वाहतूक, शहर सुधारणा आणि रचना, पाणी, वीज या अनेक गोष्टी ज्या जिव्हाळ्याच्या आहेत त्या बहुतेक नगरसेवक आणि आमदार या स्तरावर होतात. तिथे चांगला उमेदवार आणा. पण केंद्रात पक्षाला मतदान करा. हे नुसतेच अयोग्य नसुन स्वतःवर अन्याय करण्यासारखे आहे. हे कसे? कसला अन्याय होतो आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
क
कपिल काळे Tue, 04/21/2009 - 14:32 नवीन
तुमच्या लाड्क्या अरुण भाटियांकडे २२ कोटीची मालमत्त्ता कशी आली. साधी आय पीएस अधिकारी होते ते. नोकरी सुद्धा मध्येच सोडली. २२ कोटीची मालमत्ता ही त्यांनी जाहिर केलेली आहे. भाटियांचा पगार ५०,००० रु महिना होता असे मानले तर त्यांनी २५ वर्षे नोकरी करुन किती पैसे कमावले असतील?? मी म्हणतो राजकारण्यांकडे ह्यापेक्षा जास्त असेल/ असते. पण ते भ्रष्ट असतात हे तुम्हीच म्हणताय. मग तुमच्याच भाषेत सांगाय्चे तर "एका स्वच्छ आणि चांगल्या माणसा कडे" इतकी माया कशी आली? सब्बब: भाटिया काय किंवा कलमाडी सगळे चढती एकच माडी त्यांची आणि आपली कशी जमावी जोडी? मी पुण्यात राहतो तरी माझा राहता भाग जोडला गेला बारामती. मतदार संघात.. मी मत देउन , काय फरक पडणार? तरी मी माझा हक्क बजावणारच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मैत्र Wed, 04/22/2009 - 06:33 नवीन
हा मालमत्ता दडवून ठेवणे आणि स्वतःची वडिलोपार्जित इस्टेटसुद्धा जाहीर करणे यातला फरक आहे. जर तुम्हाला २२ कोटीची मालमत्ता माहीत आहे तर ती कुठे कुठे आहे हे पण माहीत असायलाच हवे. त्यातली बरीचशी किंमत ही त्यांच्या सैन्यात असलेल्या वडिलांना मिळालेल्या जागांची किंवा तिथे बांधलेल्या घराची बाजारभावाप्रमाणे किंमत आहे. मालमत्ता ही स्वतःच्या बेसिक मधूनच मिळवायला हवी असे नाही ना? http://phorum.arunbhatiaelect.com/read.php?3,236,236 My father received a gallantry award in the Second World War. In those days such acts were honoured by the government. As a reward the government gave him land. Much later this land was sold and my father built a house in Delhi in Green Park. The house was built before I joined the IAS. Another house in Diplomatic Enclave in Delhi was built by my grandfather and given to my mother before I joined the IAS. The house in Diplomatic Enclave came to my share in the family partition after my mother died. This house has been valued at Rs. 20 crores. I have no black money or benami property. तुमचे लाडके अरूण भाटिया यातला खोचकपणा अनाठायी आहे. २६ वेळा बदली झालेला, चीफ सेक्रेटरी वर सुद्धा भ्रष्टाचारासाठी खटला भरणारा, पुण्यातील नगरसेवकांची अतिक्रमणे काढल्यामुळे जनतेच्या विरोधात जाउन सभागृहाने ज्यांना जायला लावले, नंतर या निर्णयाविरोधात लोकांनी मुंबईत खटला भरला व जिंकला. हे सर्व वृत्तपत्रात जगजाहीर असताना सरळ सरळ आपली पोळी भाजणारे नेते चांगले, का एक बुद्धिमान आणि आयुष्यभर भ्रष्टाचाराविरुद्ध लढलेला आय ए एस चांगला? स्पष्ट दिसणार्‍या गोष्टीला नजरेआड करून उगाच शरसंधान करण्यात काहीच हशील नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
क
कपिल काळे Wed, 04/22/2009 - 08:07 नवीन
भाटिया बोलले आणि तुम्ही विश्वास ठेवला. वानवडी शिवाय दुसरी कोणतीही मते त्यांना मिळणार नाहीत. राष्ट्रीय पक्षालाच मत द्या असा तुमचाह विषय असताना, तुम्हीच भाटीयांना का मत देणार? अवांतर : सामंत काकांचा "प्रत्येक प्रतिसादां देइन मी उप प्रतिसाद" हा वसा मैत्राने घेतलेला दिसतोय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मैत्र Wed, 04/22/2009 - 08:18 नवीन
तसं असेल तर कोणावरही आणि कसलाही विश्वास ठेवता येत नाही! असो तुम्हाला डिटेल माहिती असेल असे वाटते त्यांनी कसे गोळा केले २२ कोटी किंवा त्यांनी कसे खोटे लिहिले आहे. त्यामुळे ती शेअर केल्यास उत्तम.. आणि मी भाटियांना मत दिलेले नाही. आत्ताही देणार नाही याच मुद्द्यामुळे. काल डेली मिरर मध्ये भाटियांनी कलमाडींवर आरोप केला एक जमीन व तिची किंमत जाहीर न केल्याबद्दल. त्यावर उत्तर काय द्यावं -- भाटियांकडे पुराव्याचे पेपर्स नाहीत!! दुसरं उत्तर - ती जमीन मीरा कलमाडी यांनी मुलगा व सुनेला भेट दिली आहे ! म्हणून ती जाहीर केलेली नाही!! लोकांची मुक्ताफळे वाचून स्वस्थ बसवत नाही. उत्तर द्यावेच लागते. असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
च
चिरोटा Tue, 04/21/2009 - 06:44 नवीन
स्थैर्य महत्वाचे आहेच पण त्यापेक्षा स्वतःची तुंबडी न भरता चांगला कारभार करणार्‍या लोकांची देशाला गरज आहे.राष्ट्रीय पक्ष केवळ नावालाच राष्ट्रीय असतात.ह्या पक्षाच्या नेत्यांचे वागणे आणि ईतर पक्षाच्या नेत्यांचे वागणे ह्यात फार फरक नसतो.
स्थानिक प्रश्न हळूहळू सुटू शकतील
स्थानिक प्रश्न सुटतील तेव्हाच हळूहळू राष्ट्रीय प्रश्न सुटू लागतील.स्थानिक प्रश्न कमी महत्वाचे मानले म्हणून तर एवढे पक्ष तयार झाले.तेव्हा मत देताना उमेद्वाराची लायकी ,स्थानिक प्रश्न सोडवण्याची कुवत लक्षात घ्यावी. शिवाय आर्थिक ,सुरक्षा वगैरे राश्ट्रीय प्रश्न केवळ राष्ट्रीय पक्षानाच कळू शकतात हा गैर्समज आहे.समजा तिसरी आघाडी सत्तेवर आली तरी पुढची निवडणूक पाचच वर्षानी यावी म्हणून पक्ष प्रयत्न करतीलच.शिवाय भा.ज्.पा. काय काँग्रेस काय ,त्याना ईतर पक्षांच्या कुबड्यांची गरज लागतेच. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 04/21/2009 - 06:46 नवीन
स्थानिक प्रश्न सुटतील तेव्हाच हळूहळू राष्ट्रीय प्रश्न सुटू लागतील.स्थानिक प्रश्न कमी महत्वाचे मानले म्हणून तर एवढे पक्ष तयार झाले.तेव्हा मत देताना उमेद्वाराची लायकी ,स्थानिक प्रश्न सोडवण्याची कुवत लक्षात घ्यावी. तुमच्या शहरातील प्रश्न सुटल्याने भारतावर होणारा छुपा किंवा उघड हल्ला हा कसा परतवून लावता येईल? मतदारसंघातील दयनीय रस्ते गुळगुळीत झाल्याने आर्थिक सुधारणांना कसा वाव मिळेल? दुसरे - कोण्या खासदाराने स्थानिक प्रश्न सुधारण्याकडे संपूर्ण लक्ष दिले आहे? त्यापेक्षा स्वतःची तुंबडी न भरता चांगला कारभार करणार्‍या लोकांची देशाला गरज आहे. हे तर आदर्श म्हणून खरं आहे पण २ % तरी उमेदवार हे स्वतःची तुंबडी न भरणारे आहेत काय? स्थानिक पक्ष तेवढे स्वच्छ चारित्र्याचे, गुणसंपन्न आहेत काय? आणि चांगला कारभार करायचा असेल तर फक्त स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून काहीच उपयोग नाही... पुन्हा तेच सांगतो की स्थानिक पातळीवरील गोष्टींसाठी स्थानिक स्तरावर - नगरसेवक / आमदार इथे विचार करा... खासदार संसदेत निर्णयात मतदान करणार, कायदे बनवणार, देशावरील संकटांमध्ये निर्णयात भाग घेणार... तिथे सरकारची कोंडी करणारे लोक असून काय फायदा? अस्थिर सरकारमुळे मध्यावधी निवडणूका झाल्यास किती प्रचंड आर्थिक नुकसान होईल याचाही विचार केला पाहिजे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
च
चिरोटा Tue, 04/21/2009 - 07:35 नवीन
तुमच्या शहरातील प्रश्न सुटल्याने भारतावर होणारा छुपा किंवा उघड हल्ला हा कसा परतवून लावता येईल? मतदारसंघातील दयनीय रस्ते गुळगुळीत झाल्याने आर्थिक सुधारणांना कसा वाव मिळेल?
स्थानिक प्रश्न म्हणजे केवळ रस्ते,संडास नव्हे तर बेरोजगारी सोडवणे,नवे उद्द्योगधंदे आणणे,मतदार संघाचे योग्य प्रतिनिधित्व करणे हे पण .हे सगळे सोडवायचे तर स्थानीक जाण हवीच.(तसे बघितले तर स्थानिक आणि राश्ट्रिय असा फार फरक नसतोच). भारतावर होणारे हल्ले हा राश्ट्रिय सुरक्षेचा विषय.फारच कमी खासदाराना त्यातले समजते.गेल्या पाच वर्षात स्थिर सरकारच होते.शिवराज पाटील हे 'खंबीर' ग्रुहमंत्री होते. काय झाले? त्या आधी खुद्द 'पोलादी पुरुष' अडवाणी ग्रुहमंत्री होते.तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येतो तेव्हा पक्षापेक्षा सत्तेवर असणार्‍या माणसात धमक आहे की नाही हे महत्वाचे.
खासदार संसदेत निर्णयात मतदान करणार, कायदे बनवणार, देशावरील संकटांमध्ये निर्णयात भाग घेणार... तिथे सरकारची कोंडी करणारे लोक असून काय फायदा?
बरेचसे खासदार संसदेत जावून केवळ खुर्च्या गरम करतात.सरकारला होणारा विरोध म्हणजे कोंडी नव्हे. कुठल्याही पक्षाचा उमेद्वार असो, स्थानिक आणि राश्ट्रिय जाण पाहिजेच.जर एखादा खासदार एखाद्या विषयात प्रविण असेल- अर्थ्,संरक्षण तर गोष्ट वेगळी. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मैत्र Tue, 04/21/2009 - 07:59 नवीन
बेरोजगारी सोडवणे,नवे उद्द्योगधंदे आणणे,मतदार संघाचे योग्य प्रतिनिधित्व करणे यात तुमच्या खासदाराचा सहभाग किती असतो? बेरोजगारी कमी करण्यासाठी खासदार काय करू शकतो? नवीन उद्योग हे सहसा करसवलती, स्वस्त जमीन, वीज आणि पाण्याची उपलब्धता, इतर कच्चा माल आणि कामगार, आणि मालवाहतूकीच्या सोयी या आधारावर येतात. त्याचे बरेचसे निर्णय हे राज्य सरकारकडे असतात किंवा काही ठिकाणच्या नैसर्गिक गरजा किंवा आत्तापर्यंत झालेल्या औद्योगिक वाढीमुळे मिळणारा फायदा याने ठरतात. त्यात मुख्यमंत्री आणि कररचना नवीन उद्योग आणायला उपयोगी ठरु शकते. यात खासदारांचा सहभाग किती असतो? आणि योग्य प्रतिनिधित्व हा खूप संदिग्ध मुद्दा आहे. बहुतेक खासदार हे फक्त खुर्च्या गरम करतात आणी भत्ते घेतात ही वस्तुस्थिती आहे. ते एकमेव कारण असू शकत नाही. हा दबाव आणि विरोध तेव्हा चांगला जेव्हा काही एका मताचे स्थिर सरकार असते. अनेक असंबद्ध आणि असंलग्न पक्षांचे कडबोळे सरकार एकमतावर काम करु शकत नाही. आणि अडवाणींच्या काळातले हल्ले किंवा शिवराज पाटील यांच्या कारकीर्दीतही अनेक गोष्टी घडल्या. सुरक्षा म्हणजे फक्त हे टाळणेच नाही तर अशा हल्ल्यांनंतर खंबीरपणे उभे राहणे. कोणीही नेते, उद्योगपती, अभिनेते, खेळाडू यांना स्थानिक किंवा राष्ट्रीय प्रश्नांची जाण असते म्हणणे धाडसाचे ठरेल. जर सर्वत्र गोंधळच आहे तर किमान चांगले सरकार तरी बनावे. जरी इतर पक्षांची मदत घ्यावी लागली तर संख्याबळ चांगले असल्यास जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
म
मराठी_माणूस Tue, 04/21/2009 - 06:41 नवीन
१९९५ च्या आधि काय परिस्थीति होती, तेंव्हा काय केले ह्यानी?
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 04/21/2009 - 06:50 नवीन
अशा सरकारांनी तरी काय केले? १९९५ च्या आधी व्ही पी सिंग आणि चंद्रशेखर यांची अल्पायुषी सरकारे वगळता काँग्रेसनेच चाळीस वर्षे राज्य केले. पण कडबोळे सरकार आल्यापासून राजकीय अस्थिरता आलेली आहे त्याचे काय? कोणी काहीच केले नाही असे असते तर आजही आपण आपल्या आजोबांच्या काळातल्या परिस्थितीत असतो... तसे तर नक्कीच नाही... या मताचे कारण या वेळी अतिशय त्रिशंकू परिस्थिती येण्याची शक्यता आहे. ती टाळली पाहिजे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Tue, 04/21/2009 - 07:41 नवीन
कोणी काहीच केले नाही असे असते तर आजही आपण आपल्या आजोबांच्या काळातल्या परिस्थितीत असतो जे काही केले त्यात सिंव्हाचा वाटा सामान्य लोकांचा जास्त आहे, राजकरण्याचा नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मैत्र Tue, 04/21/2009 - 07:46 नवीन
जे काही केले त्यात सिंव्हाचा वाटा सामान्य लोकांचा जास्त आहे, राजकरण्याचा नव्हे. या विधानाचा अर्थ कळाला नाही... सर्व औद्योगिक, आर्थिक, आणि सामाजिक सुधारणा सामान्य लोकांनी केल्या असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Tue, 04/21/2009 - 07:50 नवीन
सरकार न चालवणारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/21/2009 - 07:07 नवीन
आपले मत मात्र मनसे ला. कमीतकमी, तरुण उमेदवार देण्याचे धाडस तरी त्यांनी दाखवले आहे. आणि मनसेचे नेते तरी नक्कीच सोनिया मॅडमनी पंतप्रधान व्हावे म्हणून त्यांची विनवणी करणार नाहीत....... पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 04/21/2009 - 07:12 नवीन
हे मान्य की त्यांचे उमेदवार तरूण आहेत.. पण त्याचा लोकसभेत आत्ता काय उपयोग आहे? त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले तरी त्याचा काय फायदा होणार आहे? काँग्रेस - सोनिया -- राष्ट्रवादी - पवार, शिवसेना - भाजप -- सगळ्यांच्याच विरोधात असलेल्या पक्षाचा लोकसभेत काय उपयोग? काँग्रेस किंवा भाजप हे काही खूप उत्तम किंवा स्वच्छ आहेत असे नाही पण एका पक्षाचे बळ हे जास्त असलेच पाहिजे. आपले स्थानिक हित महत्त्वाचे ( आणि तेही घडेल याची काहीही शाश्वती नाही) का देशाचे? पुढच्या पाच वर्षात तालिबान आणि पाकिस्तानचे असंख्य छूपे आणि कदाचित उघड हल्ले होतील ... त्याला तोंड द्यायला समर्थ सरकार हवे. अस्थिर लोकसभेमुळे मध्यावधी निवडणूका झाल्या तर तोपर्यंत मजबूत झालेले तालिबान नक्कीच संधीचा फायदा घेईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/21/2009 - 07:29 नवीन
>>हे मान्य की त्यांचे उमेदवार तरूण आहेत.. पण त्याचा लोकसभेत आत्ता काय उपयोग आहे? का उपयोग का नाही. राजच्या आंदोलनाच्या समस्त भैय्ये पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्राच्या नावाने बोंब मारत होते तेव्हा ४८ खासजदारांपैकी कोणाचेही थोबाड उचकटले का तिथे? नंतर शिवसेनेने थोडे उचकटले होते. पण भाजप अगदीच होपलेस. अशात राष्ट्रीय पक्ष असले आणि नसले सारखेच, आपले विचार राष्ट्रीय पातळीवर तिथे संसदेत व्यक्त करण्यासाठी कोणतरी पाहीजे म्हणून मनसे. >>पुढच्या पाच वर्षात तालिबान आणि पाकिस्तानचे असंख्य छूपे आणि कदाचित उघड हल्ले होतील ... त्याला तोंड द्यायला समर्थ सरकार >>हवे. अस्थिर लोकसभेमुळे मध्यावधी निवडणूका झाल्या तर तोपर्यंत मजबूत झालेले तालिबान नक्कीच संधीचा फायदा घेईल... ते कदाचित कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाचे असले तरी ते बळकट असेल याची खात्री काय? पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 04/21/2009 - 08:15 नवीन
राजच्या आंदोलनाच्या समस्त भैय्ये पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्राच्या नावाने बोंब मारत होते तेव्हा ४८ खासजदारांपैकी कोणाचेही थोबाड उचकटले का तिथे? एक हि माईचा लाल काहिहि बोलला नाहि मैत्र तुमच्या माहिती करता सांगतो एकनाथ गायकवाड सारखा माणूस पाच वर्षात संसदेत फक्त २ वेळा बोलला गोविंदा एकदाही नाही बोलला आमच्या ईकडचे मोहन रावले ५ वेळा खासदार झाले अजुन म्हणतात गिरणी कामगारांच भल करायचय अहो आता काय हे भल करणार त्यांचे साला गिरणी कामगार तर कधीच देशोधडीला लागला. परप्रांतियासाठी छातीचा कोट करु सांगणारे तेल लावलेले बारामती कर पैलवान आता फक्त मराठी पंतप्रधान म्हनुन बोंबलतात तेव्हा ह्यात यांना प्रांतवाद दिसत नाहि का? भाजप अगदीच होपलेस. अहो ह्यांच्या बद्दल बोलुच नये कॉग्रेसने पन्नास वर्षात जेव्हडे देशाचे वाटोळे केले नसेल तेव्हडे ह्यांनी ६ वर्षात केले जॉर्ज फर्णाडीस सारख्या संरक्षण मंत्र्याच्या काळात जवानांच्या टोपीपासुन तर पायातल्या बुटापर्यंत प्रत्येक सौद्यात भ्रष्टाचार आणी भ्रष्टाचार केला गेला संसदेत प्रश्न विचारायला ह्यांचे खासदार पैसे मागतात तहलका मधे पैसे खातात कबुतरबाजी मधे ह्यांचेच खासदार नं १ आहेत राष्ट्रीय पक्ष असले आणि नसले सारखेच, आपले विचार राष्ट्रीय पातळीवर तिथे संसदेत व्यक्त करण्यासाठी कोणतरी पाहीजे म्हणून मनसे. एकदा मत द्यायला काय हरकत आहे राजला तरुण आहे तडफदार आहे मुख्य म्हणजे जे बोलतोय तेच करतोय अहो १५३ अ सारखे कलम ह्या देशात ३६ वेळा लावले जाणारा एकच राजकारणी ह्या देशात आहे तो म्हनजे राज ठाकरे हा एक विक्रम आहे तो ह्या नालायक कॉग्रेस राष्ट्रवादी मुळे राज ठाकरेंच्या नावावर जमा झाला आहे ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मैत्र Tue, 04/21/2009 - 08:30 नवीन
भाजप / राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे मनसे किंवा इतर राज्याचे स्थानिक राजकारण करणार्‍यांपेक्षा चांगले असे काही माझे म्हणणे नाही.. लोकसभेच्या संस्थळावर प्रत्येक खासदार किती दिवस उपस्थित होता, किती प्रश्न विचारले, काय विचारले, महत्त्वाची भाषणे, सर्व माहिती उपलब्ध आहे आणि हे आकडे धक्कादायक आहेत. पण मंत्रिमंडळ कोणाचे असावे आणि धोरणे काय असावीत हे जास्त महत्त्वाचे नाही का? इतर सर्व पक्ष हे कोलांट्या उड्या मारण्यातच पटाईत आहेत आणि आजवर त्यांनी कधीही एक भूमिका घेतलेली नाही... (अर्थात हा निकष लावला तर राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर येईल कोलांट्या उड्या मारण्यात) भाजपाच्या काळात संरक्षण खात्यात भ्रष्टाचार झाला. पण तो बोफोर्स मध्येही झाला, जर्मन पाणबुड्यांमध्येही झाला, लालूच्या चारा घोटाळ्यातही झाला, आत्ता बिहार पूरमदतीमध्येही झाला, सुवर्ण चौकोन योजनेतही झाला... सर्वात मोठे प्रकरण - मुद्रांक घोटाळ्यातही झाला. उडदामाजी काळे गोरे .... यात भाजप किंवा काँग्रेस इतरापेक्षा चांगले आहेत असा माझा मुद्दा अजिबात नाही... चांगले सरकार येण्यासाठी या १० - १५ ते ३०-४० जागा असणार्‍या संकुचित पक्षांची ताकद कमी व्हावी हा आहे... मनसे एकूण १२ जागा लढवत आहे. सगळ्या जरी जिंकल्या जादू होऊन तरी त्यांचा काय उपयोग आहे? बसपा ने राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी कंबर कसून सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. पण मायावती पंतप्रधान होण्यापेक्षा काँग्रेस / भाजप नक्की परवडेल. म्हणून त्यांची धोरणे पाहता बसपा हा उप्र पुरता मर्यादित प्रादेशिक पक्षच गणला पाहिजे. मनसेच्या जाहीर नाम्यात मराठी मुद्दा सोडता विकासाचे कोणतेही ठोस मुद्दे नाहीत. स्थानिकांना रोजगार मिळाला की सर्व प्रश्न सुटतील का? महाराष्ट्र मुंबई / कोकण इतकाच नाही... असो तो आत्ता मुद्दाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
म
मैत्र Tue, 04/21/2009 - 08:37 नवीन
दोनदा आल्याने काढून टाकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
अ
अडाणि Tue, 04/21/2009 - 21:29 नवीन
राज ठाकरे सारखा होपलस माणूस नाहीये असे माझे वैयक्तिक मत आहे. किणी हत्याकांड लोक फार लवकर विसरले आहेत असे वाटते. काही वैयक्तिक संपर्कातून असे समजले होते की दारू, छानछौकी हे सोडून काहीही न करणार्‍यापैकी एक म्हणजे राज ठाकरे.... मनसे आणि राज ह्यांचे उद्दीष्ट हेच मुळी चुकीचे आहे असे मला वाटते.. त्याच्या कार्यपद्धतीबद्दल तर बोलायलाच नको..मराठी माणसाचा एवढा कळवळा आला आहे तर सामाजीक कार्य करा ना !! बाबा आमटे, हजारे ह्यांच्या सारखे कार्य करा... राजकारणातच जायला पाहीजे असे काही नाही... मनसे वैगेरे हे सर्व लोकांना मुर्ख बनवून स्वताची पोळी भाजून घेण्याचे प्रकार आहेत... मैत्र यांचा विचार पटला.. स्थानीक प्रश्न नगरसेवक, आमदार ह्या वेळी बघावेत... लोकसभेच्या निवड्णूकीत नाही... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
म
मराठी_माणूस Wed, 04/22/2009 - 03:19 नवीन
बाबा आमटे, हजारे ह्यांच्या सारखे कार्य करा... हे तर सर्वच नेत्याना लागु आहे , पण दुर्दैवाने असे कोणीच राष्ट्रिय पक्षात नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडाणि
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 04/22/2009 - 03:38 नवीन
>>काही वैयक्तिक संपर्कातून असे समजले होते की दारू, छानछौकी हे सोडून काहीही न करणार्‍यापैकी एक म्हणजे राज ठाकरे.... कदाचित म्हणूनच छानछौकी आणि दारूची आवड असलेले तरुण मनसेचे समर्थक असतील. >>मनसे आणि राज ह्यांचे उद्दीष्ट हेच मुळी चुकीचे आहे असे मला वाटते.. असो ज्याचे त्याचे मत. शेवटी भाषेचा अभिमान वगैरे मनात असावा लागतो. >> त्याच्या कार्यपद्धतीबद्दल तर बोलायलाच नको हो बरोबर आहे. एकतर काँग्रेससारखी घोंगडे भिजत घालायची कार्यपद्धती त्याने स्वीकारली पाहीजे, किंवा सरळ सरळ बंदूकधारी टोळ्या ठेवण्याचा मुलायममार्ग स्वीकारला पाहीजे ना, किंवा भाजप सारखा कावेबाजपणा शिकला पाहीजे! >>मराठी माणसाचा एवढा कळवळा आला आहे तर सामाजीक कार्य करा ना !! बाबा आमटे, हजारे ह्यांच्या सारखे कार्य करा... हो का बरं बरं... पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडाणि
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 04/22/2009 - 07:01 नवीन
अफाट जगातील एक अडाणि. खरच तुम्ही अडानीच हो अहो चालु द्या चालु द्या तुमचे अहो भाषेचा अभिमान असणे म्हणजे गाढवपणाचे लक्षण असेल तर तुम्ही बुध्दीमान आहात आणी तुमच्या बुध्दीला सलाम हॅटस ऑफ टु यु मिस्टर अडाणी मनसे आणि राज ह्यांचे उद्दीष्ट हेच मुळी चुकीचे आहे असे मला वाटते.. तुमची तरी काय चुक म्हणा कारण त्यांचे मुद्दे समजायला तुमची बुध्दी मानत नाहि त्याच्या कार्यपद्धतीबद्दल तर बोलायलाच नको मग नका देउ तुम्ही तुमचे मत त्याना मराठी माणसाचा एवढा कळवळा आला आहे तर सामाजीक कार्य करा ना !! बाबा आमटे, हजारे ह्यांच्या सारखे कार्य करा... हो बरोबर आहे तुमचे अहिंसा स्वीकारावी त्यांनी आणी टाळ घेउन उदो उदो करावा अहो वारकर्याना पण डाउ केमीकल्सच्या विरोधात हिंसा करावी लागली होती असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मैत्र Wed, 04/22/2009 - 07:09 नवीन
एकदम मान्य कोतवाल - भाषेचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा आदर हा असलाच पाहिजे! पण त्यापलिकडेही काही काम असतं ना? हा मनसेचा जाहीरनामा त्यांच्या संस्थळावरचा https://www.manase.org/manifesto.pdf त्यात चार पानांची प्रस्तावनाच आहे भाषणवजा ज्यात आत्ताचा परप्रांतीयांचा मुद्दा, इतर पक्षांवर हल्ला इ. शिवाजी पार्कवर बोलावं अशा स्वरुपाची वाक्यं आहेत. एका पानाचा जाहीरनामा आहे ९ कलमी त्यात फक्त एका मुद्द्यात शेतकर्‍यांचा विचार आहे आणि तोही संदिग्ध आहे, आणि मूलभूत सुविधांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी मराठी अस्मितेचेच मुद्दे आहेत ... हा जाहीरनामा वाचल्यानंतर मात्र मनसे मराठी बाण्याच्या पलिकडे जात नाहीये असं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 04/22/2009 - 07:24 नवीन
फक्त एका मुद्द्यात शेतकर्‍यांचा विचार आहे आणि तोही संदिग्ध आहे, आणि मूलभूत सुविधांचा महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी मराठी अस्मितेचेच मुद्दे आहेत ... मग राष्ट्रीय पक्षाने काय दिवे लावलेत अहो ईन मीन तीनच वर्ष झालीत मनसे स्थापण होउन अजुन ते बाळच आहे पन भल्या भल्या प्रस्थापितांच्या छातीत धडकी भरवली आहे त्यांनी जरा थांबा वेट ऍन्ड वॉच आता लोकांना झटपट हव असत फास्ट फुडचा जमाना आहेना ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मराठी_माणूस Wed, 04/22/2009 - 07:24 नवीन
बाकिच्यांचे जाहीरनामे हे फक्त कागदावरच असतात त्यातले कीती ते खरे करतात हा संशोधनाचाच भाग आहे. कित्येक मुद्दे आधिच्या निवडणुकीतलेच असतात. ह्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवणे हे भाबडे पणाचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मैत्र Wed, 04/22/2009 - 07:26 नवीन
कलमाडींच्या जाहीरनाम्यात आत्ताचा धरून गेल्या तीन निवडणूकांमध्ये तेच मुद्दे होते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
अ
अडाणि Wed, 04/22/2009 - 18:46 नवीन
ह्याचा मनसे ने मक्ता घेतला आहे क? आणि भाषेचा अभिमान म्हणजे नक्की काय हो? मराठी भाषेच्या वाढीसाठी मनसेने नेमके काय केले आहे? मराठी भाषेसाठी म्हणाल तर संपूर्ण मनसे पेक्षा जास्त चांगले काम हे तात्यांनी केले आहे... मला स्वतःला अडाणी म्हणून घेण्यात लाज वाटत नाही कारण मला बरेच गोष्टी नाही समजत!! पण स्वतःला काय समजत नाहीये हे मात्र मला समजते.. उगाचच खोटा आव आणून मलाच सर्व काही समजते हा माझा अर्विभाव नाही... परप्रांतीय म्हणजे नक्की कोण? ठाकरे यांचे घराणे मुळचे कुठले? मुंबईचे नक्कीच नाही.. मग ते जाणार का पहीले त्यांच्या गावाला ? अनेक खेड्यातून मराठी लोक शहरात जातात कामाला.. त्यांन्नी जावू नये का? ते का बरे परप्रांतीय नाहीत ? आजकाल काँग्रेस / भाजपा विरूद्द बोलायची जणू फैशन झाली आहे... भारत ज्या परीस्थीतीतून वरती आला आहे आणि जेवढी प्रगती आपण केलेली आहे त्याला आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाचा फार मोठा हातभार आहे... चांगल्या नेतॄत्वाअभावी काय होते ह्या साठी झिंबाब्वे / इंडोनेशिया हि उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
म
मिसळभोक्ता Wed, 04/22/2009 - 19:05 नवीन
मराठी भाषेसाठी म्हणाल तर संपूर्ण मनसे पेक्षा जास्त चांगले काम हे तात्यांनी केले आहे... बरोबर. त्यामुळे एकतर राज ठाकर्‍यांनी तात्याला मनसेचा अध्यक्ष करावे, किंवा तात्याने राजला मिसळपावचा संचालक करावे. नाही तर, राजने लाईन बदलून, मराठी भाषेच्या शुद्धलेखनासाठी काम करावे, म्हणजे एक काही विशिष्ट मुद्दा तरी मिळेल त्याला. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडाणि
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 04/23/2009 - 07:59 नवीन
परप्रांतीय म्हणजे नक्की कोण? ठाकरे यांचे घराणे मुळचे कुठले? मुंबईचे नक्कीच नाही.. मग ते जाणार का पहीले त्यांच्या गावाला ? अनेक खेड्यातून मराठी लोक शहरात जातात कामाला.. त्यांन्नी जावू नये का? ते का बरे परप्रांतीय नाहीत जे जे उत्तर प्रदेशातुन आले ह्या शहरात राहिले जे ह्या शहराला आपले मानतात ते मुंबईकर पन जे लोक तिकडुन ईकडे येतात ईकडच्या नोकर्‍या पटकावतात इथल्या लोकांच्या पोटावर पाय देतात ते सर्व परप्रांतिय आनि राज म्हणतात कि आता खरच मुंबईची क्षमता संपली आहे लोकांना सामावुन घेण्याची उत्तर प्रदेश आणि बिहार मधुन ईकडे या अनधिक्रूतझोपड्या बांधा कोठेहि बांधा महाराष्ट्र शासन फुकटच घर देतेच आहे पण जरा ५० / ५० वर्ष बी डी डी चाळीत बी आय टी चाळीत राहणार्‍या लोकांची अवस्था पहा सरकार त्यांना एफ स आय देत नाहि आहे पोलिसांना हक्काच्या निवास्थानासाठी झगडाव लागते आहे आज मुंबईचा क्राईम रेशो पहा ७०% युपि बिहारी गुन्हेगार आहेत तिकडच्या लोकांना बंदुकिचे परवाने मिळतात त्या परवान्यावर हे लोक ईक्डे सुरक्षा रक्षक म्हनुन भरती होतात आणि गुन्हे करतात प्रमाण ३०% आहे याचे ८०% रिक्षा / टॅक्सी चालकांना ह्या शहरातील रस्त्यांची माहिती नाहि आहे कायदा नियम धाब्यावर बसवुन हे लोक आपली मग्रुरी करतात ह्यांना राजचा विरोध आहे बाकि आपणास सागंणे उचीत नोहे ************************************************************** कोणी ऐकल तरच सांगायला अर्थ आहे , कोणी ऐकल तरच सांगायला अर्थ आहे , गाढवा समोर गीता गायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडाणि
म
मराठी_माणूस गुरुवार, 04/23/2009 - 09:03 नवीन
राष्ट्रीय नेतृत्वाचा फार मोठा हातभार आहे काही उदाहरणे आहेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडाणि
अ
अडाणि गुरुवार, 04/23/2009 - 17:41 नवीन
भरपूर आहेत... पण ह्या सर्व गोष्टी आपल्याला बसल्या जागेवर मिळाल्या आहेत त्यामुळे त्याचे मोल कळत नाही... स्वातंत्र्यानंतर उद्योग धंद्याची वाढ... आय. आय टी स्थापन करणे.. विविध धरणे, अणुविज्ञान चालू करणे ह्या सर्व बाबतीत पंडीत नेहरूंचा मोठा वाटा होता... जरा त्रटस्थ व्यक्तीने लिहीलेली पुस्तके वाचा .. e.g Freedom at midnight by french author - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
न
नितिन थत्ते Tue, 04/21/2009 - 07:31 नवीन
मतदान करा पण उमेदवार पाहून मतदान करू नका. पक्ष पाहून करा. ज्या पक्षाची धोरणे तुम्हाला मान्य नाहीत त्या पक्षाच्या चांगल्या उमेदवाराला मतदान करू नका. (पक्षीय लोकशाही मानणारा) खराटा
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 04/21/2009 - 07:48 नवीन
हो राज्य पातळीवरील पक्षांना काही करून सत्तेत वाटा हवा असतो असे चित्र अनेकदा दिसते.त्यामुळे कोणाचेही सरकार आले तरी त्याला पाठिंबा द्यायला ते मागेपुढे बघत नाहीत. आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे राज्य पातळीवरचे पक्ष राज्यात ६-७ जागा जिंकतात आणि लोकसभा निवडणुकीत देशात १% पेक्षा कमी मते मिळवतात पण देशाचा पंतप्रधान कोण हे ठरविण्यात महत्वाची भूमिका वठवतात. २००४ मध्ये काँग्रेस आघाडीला २१७ तर भाजप आघाडीला १८५ जागा मिळाल्या.तामिळनाडू आणि पाँडेचेरी मधील ४० जागांची भूमिका यात मोठी होती.कारण २००४ च्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला तामिळनाडूतील द्रमुक-मद्रमुक-पी.एम.के या राज्य पातळीवरच्या पक्षांनी भाजप आघाडी सोडून काँग्रेस आघाडीत प्रवेश केला. तसे घडले नसते तर काँग्रेस आघाडीच्या ४० जागा भाजप आघाडीला मिळणे सहज शक्य झाले असते.त्या परिस्थितीत भाजप आघाडीला २२५ आणि काँग्रेस आघाडीला १७७ अशी परिस्थिती निर्माण झाली असती.तरीही मनमोहन सिंह पंतप्रधानपदी असते का?वाटत नाही. तरीही द्रमुक-अण्णा द्रमुक हे पूर्ण तामिळनाडूत अस्तित्व असलेले पक्ष आहेत.पण सध्या राज्यातील राजकारणाची जी खिचडी झाली आहे त्यात मद्रमुक आणि पी.एम.के ना बरोबर घेऊनच द्रमुक किंवा अण्णा द्रमुकला यश मिळू शकते. १९९८,१९९९ आणि २००४ च्या निवडणुकांमध्ये असेच झाले आहे. यावेळीही वेगळे काही होईल असे वाटत नाही.आणि या पक्षांचे वर्चस्व राज्याच्या काही भागापुरतेच सिमीत आहे. आणि असे छोटे पक्ष देशाचा पंतप्रधान कोण हे ठरवितात ही लोकशाहीची थट्टा नाही का? याविषयीची अधिक माहिती मी लिहिलेल्या या लेखात. तेव्हा राज्य पातळीवरच्या पक्षांचे महत्व कमी होईल तितके चांगले.पण ते करायचे कसे यासाठी कोणतीही जादूची छडी उपलब्ध नाही. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 04/21/2009 - 08:03 नवीन
तसे बघितले तर १९५२ पासून काँग्रेस काय्,भा.ज.पा. काय ५०% टक्क्यांपेक्षा जास्त मते राष्ट्रिय पातळीवर कधीच मिळवू शकले नाहीत्.मग त्यांच्या पक्षाचा पन्तप्रधान हे पण विचित्र वाटते.थोडक्यात हे पक्ष केवळ नावालाच राश्ट्रिय आहेत.भारत असंख्य समुहांचा/प्रदेशांचा बनल्यामुळे मतदार स्थानिय अस्मिता पण तेवढीच महत्वाची मानतात ही वस्तुस्थिती आहे.अमेरिकेचे द्विपक्षिय मॉडेल इकडे चालु शकणार नाही. आज मोदीना मिळणारा पाठींबा ते मोदी आहेत म्हणून आहे,भा.ज.पा.चे आहेत म्हणून नाही.गुजरातची अस्मिता जागवण्यात त्यांचा महत्वाचा हात आहे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 04/21/2009 - 08:49 नवीन
>>काँग्रेस काय्,भा.ज.पा. काय ५०% टक्क्यांपेक्षा जास्त मते राष्ट्रिय पातळीवर कधीच मिळवू शकले नाहीत्.मग त्यांच्या पक्षाचा पन्तप्रधान हे पण विचित्र वाटते मान्य. पण १% कमी मते मिळविणारे पक्ष पंतप्रधान कोण हे ठरवितात हे त्याहूनही अधिक विचित्र आहे. देवेगौडा सरकारचा पाठिंबा काँग्रेसने काढून घेतल्यानंतर देवेगौडांनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता. तेव्हा त्या ठरावावरील चर्चेत भाषण करताना प्रमोद महाजनांनी ते भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाबरोबर चीनला गेले होते तेव्हाचा अनुभव सांगितला.त्या शिष्टमंडळात त्यांच्या बरोबर काँग्रेसचे पी.जे.कुरीयन, माकपचे सोमनाथ चॅटर्जी आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे रमाकांत खलप हे खासदार होते. खलप त्यावेळी देवेगौडा सरकारमध्ये कायदा राज्यमंत्री होते. भारतीय लोकशाहीचे कामकाज कसे चालते याची उत्सुकता चीनमध्ये पत्रकारांच्यात होती.तेव्हा महाजनांनी सांगितले-- " मी प्रमोद महाजन. मी संसदेतील सगळ्यात मोठ्या पक्षाचा खासदार आहे. आणि मी विरोधी पक्षात आहे. हे आहेत पी.जे.कुरीयन. हे संसदेतील दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाचे खासदार आहेत.हे सरकारमध्ये नाहीत आणि सत्ताधारी आघाडीतही नाहीत.पण त्यांच्या पक्षाचा सरकारला बाहेरून पाठिंबा आहे.त्यानंतर हे आहेत सोमनाथ चॅटर्जी. हे संसदेतील तिसर्‍या मोठ्या पक्षाचे नेते आहेत.हे सरकारमध्ये सामील नाहीत पण सत्ताधारी आघाडीत सामील आहेत.आणि त्यानंतर हे आहेत रमाकांत खलप. हे त्यांच्या पक्षाचे एकमेव खासदार आहेत आणि हे मात्र सरकारमध्ये सामील आहेत इतकेच नव्हे तर मंत्री पण आहेत." मी त्या भाषणाचे थेट प्रक्षेपण बघितले होते आणि आठवेल तसे इथे लिहिले आहे. पण सांगायचा मुद्दा म्हणजे महाजनांनी भारतीय लोकशाहीत गोष्टी कशा घडू शकतात हे सांगितले. आता ही गोष्ट त्यांनी चीनमध्ये सांगून आपल्याच व्यवस्थेची लक्तरे मुद्दामून चव्हाट्यावर आणणे योग्य नव्हते असे मला वाटते पण त्यांनी मांडलेला मुद्दा चुकीचा नक्कीच नाही. त्यानंतर १२ वर्षे उलटून गेली आहेत.आणि या काळात आपल्या देशातील राजकारणाची अजूनच खिचडी झाली आहे ही मात्र वाईट गोष्ट आहे. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
न
नितिन थत्ते Tue, 04/21/2009 - 08:30 नवीन
प्रादेशिक पक्षांची वाढ होण्यात ७० - ८० च्या दशकांतील काँग्रेसेतर पक्षांचा मोठा वाटा आहे. हे पक्ष स्वतः राष्ट्रीय पक्ष होते आणि त्यांना चांगला जनाधार होता. पण काँग्रेसची सत्तेवरील पकड ढिली करणे त्यांना जमत नव्हते. त्यावेळी त्यांनी अशा पक्षांना उत्तेजन देण्याचा उद्योग सुरू केला. अशा प्रादेशिक पक्षांची मुख्य मोठी उदाहरणे तेलगू देसम, शिवसेना आणि अकाली दल तसेच माकप ही होत. शिवसेनेची "मुंबई -ठाणे या मर्यादित क्षेत्रात प्रभाव असलेला गुंडांचा पक्ष" ही प्रतिमा पुसून राज्यव्यापी आणि प्रभावी पक्ष बनण्यात भाजपने त्यांच्याशी केलेली युती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. (अवांतरः तेलगू देसम आणि द्रमुकच्या प्रभावाला नाके मुरडणारे आपण शिवसेनेबद्दल हेच मत बाळगून आहोत का? म्हणजे काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना असेल तर काँग्रेसला मत द्यावे असे या धाग्याच्या लेखकाचे खरोखरच मत आहे काय) (अतिअवांतरः लालूंचा राजद, नितिशकुमारांची समता पार्टी, मुलायमसिंगांची समाजवादी पार्टी, देवेगौडांचा जनता दल, नवीन पटनायकांचा बिजू जनता दल हे पक्ष प्रादेशिक पक्ष मानायचे की एकाच पक्षाची शकले मानायची?) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 04/21/2009 - 08:34 नवीन
म्हणजे काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना असेल तर काँग्रेसला मत द्यावे असे या धाग्याच्या लेखकाचे खरोखरच मत आहे काय धाग्यात लिहिलं आहे - जिथे यांचे परंपरागत साथीदार आहेत जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा. हे प्रादेशिक आहेत पण भाजप / काँग्रेसचे परंपरागत साथीदार आहेत जे विरोधात जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सरकार स्थापनेत ते एकच संख्या म्हणून गणता येतील. मत काँग्रेसला द्यायचे का शिवसेनेला हा वैयक्तिक निर्णय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 04/22/2009 - 07:03 नवीन
जिथे यांचे परंपरागत साथीदार आहेत जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा. उद्या तेल लावलेल्या बारामतीकर पैलवानाना वाटले कि आपण पंतप्रधान व्हावे आणी शिवसेने त्यांना पाठिंबा दिला तर काय करणार अहो तुम्ही तर सरळ सरळ प्रचार करीत आहात असा सुध्दा ह्या धाग्याचा अर्थ होतो ना!!! ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
प
प्रदीप Tue, 04/21/2009 - 09:26 नवीन
लोकसभेच्या निवडणूकात स्थानिक प्रश्नांचे निकष लावून मतदान करू नये (थोडक्यात मतदारांनी (आता तरी) थोडीशी प्रगल्भता दाखवावी) हे मैत्र ह्यांच्या चर्चाप्रस्तावाचे उद्दिष्ट आहे हे समजले व पटलेही. पण
......जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा. पण बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट / अपक्ष अशा कुठल्याही पक्षाला नको.
हे मात्र अगम्य आहे. बसपा/सपा/कम्युनिस्ट हे स्थानिक पातळीवरील पक्ष नाहीत, त्यातील काही (उदा. कम्युनिस्ट) सुरूवातीपासूनच अखिल भारतीय पातळीवर कार्यरत आहेत. मला वाटते हे वाक्य मूळ चर्चाप्रस्तावाशी असंबंधित आहे. ते केवळ मैत्र ह्यांचे वैयक्तिक मत प्रदर्शित करते.
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 04/21/2009 - 10:00 नवीन
प्रदीप तुमचे मुद्दे बरोबर आहेत. माझे मत : कम्युनिस्ट पक्षाचा मुद्दा मान्य आहे. त्यामुळे तो मागे घेतो. वैयक्तिक पातळीवर मी विरोधच करतो -- कम्युनिस्ट राज्ये केरळ आणि प. बंगालमध्ये गेल्या साठ वर्षात काय घडलं ते तर स्पष्ट आहेच. पण सरकार मध्ये असताना अणुकरारावरुन आता काँग्रेस विरोध करणारे कम्युनिस्ट हे संधिसाधू आहेत. आता अचानकपणे ते पवार / मायावती आदिंना मनमोहनसिंगांपेक्षा चांगले म्हणायला लागले आहेत. सरकारला अडचणीत आणणारे काम करणे इतकेच त्यांचे ध्येयधोरण वाटते. सोमनाथ चटर्जी प्रकरणानंतर त्यांनी त्यांची तत्त्वेही गुंडाळून ठेवली आहेत. बसपा / सपा - थोड्या जागा लढवल्या म्हणजे अस्तित्व आहे असे होते म्हणून ते राष्ट्रीय पक्ष म्हणता येत नाहीत. बसपा ला जास्त जागा मिळाल्या तर दलित की बेटी चा निराधार मुद्दा लावून मायावती पुढे येतील जे धोकादायक आहे. सपाचा जाहीरनामा वाचल्यावर त्यांना एकही जागा मिळायला नको. देशविरोधी विचार असलेला पक्ष आहे. त्यामुळे यांनाही निवडून आणणे योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
व
विकि Tue, 04/21/2009 - 19:56 नवीन
कोणत्याही राजकीय पक्षाचे अंतिम उद्दीष्ट हे सत्ता मिळवणे हेच असते त्यामुळे कम्युनिष्ठ पक्षांबद्दल बोलताना आधी तुमचे काँग्रेस, भाजपावाले काय करतात ते आधी पाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
म
मैत्र Wed, 04/22/2009 - 06:39 नवीन
कॉ. विकि, भाजपाने वेळेला मायावती, जयललिता, कोणाचीही साथ घेतली आहे तत्त्वे सोडून आणि काँग्रेसला तर तत्त्व नाहीतच म्हणावे लागेल आत्ताच्या सरकारमधले पूर्ण वेगळी विचारसरणी असलेले पक्ष पाहता. पण कम्युनिस्ट पक्ष तर साम्यवादासाठी जनतेसाठी आहे ना? कोणत्याही राजकीय पक्षाचे अंतिम उद्दीष्ट हे सत्ता मिळवणे हेच असते हे जर कम्युनिस्टांनाही लागू असेल तर त्यांच्यात आणि इतर पक्षांमध्ये फरक काय? मग त्या तत्त्वांना, विचारसरणीला आणि पक्षसंघटनेला काहीच अर्थ नाही. त्यांनी आपल्या तत्त्वांचे ढोल वाजवणे आणि सत्तेत राहून तात्विक विरोध करणे सोडून द्यायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा