जनातलं, मनातलं

साय्लेंट मोड

Primary tabs

रस्त्यावर चालत असताना सतत फोनवर बोलणारे काही आनंदि चेहरे आणि पाळीव कुत्र्याला मैत्र बनवलेले काही चेहरे.. प्रत्येकामागे एक कारण असते..प्रत्येकाला सतत बोलायला आणि ऐकायला कुणीतरी हवे असते.. आपण काय केले ..आज काय झाले कुणाला तरी सांगायचे असते.... ---------------------------------------------------------------------------------------- काय हे किती वेळा फोन केला उचलत का नव्हतीस. अरे १० मिनिटापुर्वीच तर आपण बोललो होतो.. ते काही नाही तु माझा फोन पहील्या रिंग ला उचलायला हवा.. हो का?? हो मला सतत तुझ्याशी बोलायचं असतं. कंटाळा नाही क येत तुला ? नाही.. पण का नाही उचललास तु फोन? अरे मैत्रिणीच्या घरी होते.. फोन साय्लेंट मोड वर ठेवला होता.. ---------------------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------------------- तू एक कुत्रा पाळ आणि बस त्याच्याशी बोलत, मला आता वेळ नाही तुझ्याशी बोलायला. आधी तर खुप वेळ असायचा.वेळ नाहिय की बोलायची ईच्छा नाही.. तसेही आपण ज्या विषयावर बोलतोय तो आता संपलाय.. पण माझ्याजवळ खुप प्रश्न आहेत .. तुझ्या प्रश्नांची उत्तर मी कधीच दिलियत.. आता आपल्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत.. वेगळ्या झाल्या नाहीत तू मुद्दाम केल्यायस.. मी सगळा दोष परिस्थिती ला देतो.. मला नाही असे वाटत.. तुला जे वाटायचे ते तुझ्यावर आहे.. हो ना तशीहि तुला काय काळजी आता.. काळजी नसती तर अजुन तुझा फोन उचलला नसता.. नको उचलुस काही फरक नाही पडत.. इतका वाइट वागलायस तर अजुन थोडं. पण तु किती वेळा रिंग देतेस.. शेवटी कंटाळुन उचलावा लागतो.. सतत फोन साय्लेंट मोड वर ठेवावा लागतो.. ----------------------------------------------------------------------------------------
अनंता

फुस्स...

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)