Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अक्षय तृतियेचा आणी आंबे खाणे याचा काय संबंध आहे??

न
निशिगंध
Mon, 04/27/2009 - 19:22
🗣 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5652 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ए
एक Mon, 04/27/2009 - 20:21 नवीन
अक्षयतृतीयेला केलेली गोष्ट अक्षय रहाते. त्या दिवशी आंबे खाल्ले तर आंब्यांचा पुरवठा "अक्षय" राहिल हा विश्वास असावा. हा अंधविश्वास-अंधश्रद्धा नाही. मी मे १९९९ ला अक्षयतृतीयेला आंबा खाऊ शकलो नाही. तेव्हा पासून १० वर्ष होत आली एकदाही सीझन मधला हापूस खाता आलेला नाही. :(
  • Log in or register to post comments
र
राजा Tue, 04/28/2009 - 09:39 नवीन
अहो आंबा नाहि खाल्ला मग माझा प्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
ब
बाकरवडी Tue, 04/28/2009 - 10:50 नवीन
माझा आणा...... आं s s s ब्याची तहान भागवा....... :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजा
अ
अनंता Tue, 04/28/2009 - 11:34 नवीन
पण अक्षय तृतीयेआधी माझा, मँगोला पिण्याबाबत धर्मशास्त्र काय सांगते? हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजा
ब
बाकरवडी Tue, 04/28/2009 - 14:33 नवीन
पण अक्षय तृतीयेआधी माझा, मँगोला पिण्याबाबत धर्मशास्त्र काय सांगते? मी माझा बद्दल बोललो, मँगोलाचे नाही. ते काय ते तुम्ही बघून घ्या. अवांतर :-हा माणूस माझ्या प्रतिसादांच्या मागे लागलाय. माझ्या प्रत्येक प्रतिसादामागे ह्याचा प्रतिसाद असतो. :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
ट
टारझन Wed, 04/29/2009 - 20:48 नवीन
मग तुम्ही पण लागा .. त्यांच्या प्रतिसादांच्या मागे हो ;) =)) अन्यथा "बाकरवडा" असं नामकरन करा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाकरवडी
ह
हर्षद बर्वे Mon, 04/27/2009 - 20:54 नवीन
अरेरे..दहा वर्षात आंबा खाल्ला नाहीत....म्हणजे ती दहा वर्षे न मोजण्याच्या रकान्यात लिहून टाका.... एच.बी.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 04/28/2009 - 08:03 नवीन
धार्मिक पेक्षा अनुभवसिद्ध ठोकताळे हे कारण असू शकेल. अनुभवसिद्ध ठोकताळे हे स्थानिक अनुभवांवरून बांधलेले असतात. कदाचित कोकणातील हवामानानुसार व ऋतुचक्रानुसार, तेथील स्थानिक आंबा खाण्यायोग्य होण्यास अक्षय्य तृतीया यावी लागत असेल. त्यापूर्वी आंबा कोवळा असल्याने चवीला चांगला लागत नसेल व असे आधी तोडलेले आंबे फुकट जात असतील. म्हणून हा नियम प्रचलित असेल. हा नियम अर्थातच तत्कालीन तंत्रज्ञानानुसार असेल. आता खते घालून लवकर फळे आणण्याच्या तंत्रामुळे किंवा बाहेरून आलेल्या आंब्यांसाठी हा नियम व्हॅलिड असेलच असे नाही. (मी यातला ज्ञानी नाही. फक्त कन्सेप्ट सांगितली). खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/28/2009 - 10:32 नवीन
अक्षय तृतियेचा आणि आंबे खाण्याचा काही संबंध नसावा, फुला-फळांचा हा बहरण्याचा काळ असल्यामुळे त्याचा आस्वाद घ्यावा. अक्षय तृतियेला शास्त्र अर्धा सण मानते, तेव्हा उत्सवाबरोबर मृत पितरांचे स्मरण करुन दान-धर्म केले पाहिजेत, हा अक्षय तृतीयेचा सोपा अर्थ असावा असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 04/28/2009 - 10:35 नवीन
अक्षयतृतीयेचा आणि आंबे खाण्याचा तोच संबंध आहे जो लग्नानंतर ऋतुशांती आणि सत्यनारायणाचा आहे. असे रिवाज पाळणारे पाळत असतात, न पाळणारे .... हरी हरी !! --अवलिया
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 04/28/2009 - 11:14 नवीन
तिकडे प्रतिसादातून संस्कृत श्लोक, इकडे रिवाज न पाळणार्‍यांच्या नावाने बोटे मोडणे. नाना लवकरच भटजीगिरी सुरू करतायतसे दिसते. =)) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 04/28/2009 - 11:29 नवीन
मंदी आली हो... साईड बिझनेसचा विचार नको का करायला ? ;) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Tue, 04/28/2009 - 12:01 नवीन
मंदीला ठेवून घ्यायची म्हणजे जास्त खर्च आलाच. मग बरोबर आहे. अवांतरः मला वाटले 'कु. मंदी' हाच नानांचा साइड बिझिनेस आहे. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सुनील Tue, 04/28/2009 - 11:26 नवीन
अक्षय तृतियेचा आणि आंबे खाण्याचा काही संबंध असतो हेच मला ठाऊक नव्हते! सुरुवातीला अव्वाच्या सव्वा असणारे आंब्याचे भाव जरा परवडणार्‍या पातळीवर आले की, मनसोक्त आंबे हादडायचे, हेच काय ते आम्ही करतो!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 04/28/2009 - 11:33 नवीन
अक्षय तृतियेचा आणि आंबे खाण्याचा काही संबंध नसावा, आंब्यांचा खप होण्यासाठी मला हा आंबेवाल्यांनी केलेला डाव वाटतो.;)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 04/28/2009 - 11:58 नवीन
आंब्यांचा खप होण्यासाठी मला हा आंबेवाल्यांनी केलेला डाव वाटतो =)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी
व
विनायक प्रभू Tue, 04/28/2009 - 15:12 नवीन
आंब्याच्या बाबतीत मिळाला तर मिळेल तेंव्हा 'चवलिया' नाही मिळाला तर.....
  • Log in or register to post comments
अ
अनंता Tue, 04/28/2009 - 15:22 नवीन
वरील प्रश्न बाकरवडीला उद्देशून नव्हे, तर इतर सन्माननीय मिपाकरांना आहे. खुलासा संपला. हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments
न
निशिगंध Tue, 04/28/2009 - 18:51 नवीन
मला काही उत्तर मिळालेच नाही..... असो पण मी तरी असले काही मानत नाही व भरपूर आंबे खातोय.......... _______ निशिगंध_________ मी शोधत आहे स्वत:हाला!!!! सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 04/28/2009 - 20:24 नवीन
मी आई बाबा आधी पासूनच आंब्यांच्या पेट्या आणायचो.. (खायचोही) पण आज्जी कायम अक्षयतृतीयेसाठी थांबायची! आणि गम्मत म्हणजे नंतर डायबेटीस इत्यादी झाल्यावरही ती शास्त्र म्हणून अर्धा तुकडा का होईना अक्षयतृतीयेला खातेच.. कारण तिलाही माहीत नाही! नेहेमीचंच कारण सांगते ती, शास्त्र आहे.. पूर्वीपासून चालत आले आहे.. ते मी करते.. :) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
न
निशिगंध Wed, 04/29/2009 - 11:25 नवीन
खुप लोक तसे करतात पण त्यांना कारण विचारले की, मग मात्र कुणालाच ते माहीत नसते. ______ निशिगंध_________ मी शोधत आहे स्वत:हाला!!!! सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
द
दवबिन्दु Wed, 04/29/2009 - 20:01 नवीन
आबां केवापन खातात पन तो खोटा खोटा पिकवला नसला तरच. नायतर खायच टालतात. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा