Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विक्षिप्त नायिका...मूर्खाचा बाजार.

प
प्राजु
Tue, 04/28/2009 - 16:51
🗣 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5555 वाचन

💬 प्रतिसाद (22)
न
नितिन थत्ते Tue, 04/28/2009 - 17:04 नवीन
मालिकेतिल खलनायिक मनोरूग्ण असणं ठिक आहे असल्या मालिका पाहणारेही मनोरुग्णच असतात. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 04/29/2009 - 05:58 नवीन
असल्या मालिका पाहणारेही मनोरुग्णच असतात.
सहमत पण गंमत म्हणजे जर त्या बघितल्या नाहीत तरी ते अधिक मनोरुग्ण होण्याची शक्यता असते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चन्द्रशेखर गोखले Tue, 04/28/2009 - 17:05 नवीन
मला तर ब-याच मराठी मालिका मनोरुग्ण लोकांनी काढल्या असाव्यात असं वाटतं..!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/28/2009 - 17:09 नवीन
आपोआपच गाजावाजा होणार. पेपरात उलटसुलट बातम्या. शेवटी, 'लोकांच्या भावनांचा आदर करुन आम्ही झाड जाळणार नाही' असे म्हणायचे झाले! टीआरपी वाढायला किती वेळ लागतो! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Tue, 04/28/2009 - 17:38 नवीन
वास्तविक बातम्या बाहेर न काढता अशा गोष्टी चालू असतील, नंतर कधीतरी ह्या प्रसिद्ध होतात. पण ह्या वेळी वेगळेच काहीतरी. नंतर निर्माते म्हणतील, आम्ही असे काही ठरवलेच नव्हते. आणि जरी त्यांनी ठरवले असेल तर त्याला विरोध हा राहिलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चकली Tue, 04/28/2009 - 17:11 नवीन
मी हि मालिका बघितलेली नाहि. पण बहुतेक मालिकांचे कथानक, पात्र, लेखन, संवाद काहिच रिअलिस्टीक नसते. झाड जाळणे वैगरे मात्र एक्दम खरे वाटायला पाहिजे. असो. हि बातमी आली म्हणजे टी आर पी पण वाढणार ! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/28/2009 - 17:23 नवीन
कधी लागते, कोण कोण आहे.. काहीही मला माहीत नाही. पण ही बातमी मात्र खरंच विक्षिप्तपणा वाटली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
उ
उमेश कोठीकर Tue, 04/28/2009 - 17:43 नवीन
तसे झाड जाळता येत नाही आणि तोडता पण येत नाही परवानगीशिवाय विनाकारण. शिवाय मराठी मालिकांपैकी एक दोन मालिका जर सोडल्या तर बाकीच्या मालिका काढणारे बिनडोक, आणि त्यामधे काही नाही हे माहित झाल्यावरही पाहणारे तर त्याहीपेक्षा बिनडोक. झी टी व्ही वरच संसार नावावरून कोणती तरी एक अशीच बिनडोक मालिका अव्याहतपणे सुरू आहे. त्यातला मूळ विषय जरा बरा वाटला होता म्हणून सुरूवातीला काही भाग बघितले.पण मूळ कथानकाचे दळण संपले आणि मग केवळ मालिकेची तिरडीच अखंड चालू आहे. प्रेक्षकांना हे लोक मूर्ख समजतात आणि प्रेक्षक तसे बनतात हे जास्त चीड येण्यासारखे आहे. सद्ध्या शिवाजी महाराजांवरील मालिका मात्र खरेच छान आहे. प्राजु, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 04/28/2009 - 18:10 नवीन
हा विक्षिप्तपणा काहीच नाही .. मी तर ह्या पेक्षा मेंदूचा "फालूदा" झालेले प्रकार अनुभवलेत =)) -
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 04/28/2009 - 18:41 नवीन
हिशोब पटकन सांगता येत नाही. खोटे झाड बनवायचे तर लाकडाचे किंवा जळाऊ प्लास्टिकचे बनवावे लागेल. त्यामुळे खरे किंवा खोटे झाड - कुठले जाळणे बरे-वाईट त्याचा हिशोब सहज लागत नाही. :-)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/28/2009 - 18:53 नवीन
खोटे झाड बनवायचे तर लाकडाचे किंवा जळाऊ प्लास्टिकचे बनवावे लागेल. त्यामुळे खरे किंवा खोटे झाड - कुठले जाळणे बरे-वाईट त्याचा हिशोब सहज लागत नाही.
जाळपोळ कशाला? संगणक, ऍनिमेशन इत्यादी गोष्टी अजूनतरी शिल्लक आहेत. जाळा काय आणि किती जाळायचंय ते आणि तेवढं! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ल
लिखाळ Tue, 04/28/2009 - 18:59 नवीन
हेच म्हणतो.. डायनासोर बनवले.. एक झाड बनवायला काय ! :) हे सगळे प्रसिद्धी वाढवण्याचे उपाय वाटतात .. आता त्या मालिकेचे नाव तरी माहित होईल लोकांना. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ध
धनंजय Tue, 04/28/2009 - 19:25 नवीन
भविष्यात बहुधा सेट बनणार नाहीत, आणि ऑन-साइट प्रवास करून चित्रण तर होणारच नाही. प्रत्येक कलाकार आपल्या घराजवळच्या एखाद्या स्टूडियोमध्ये जाऊन, किंवा घरातच, आपल्या ओळी म्हणेल. मग संगणकावर त्यांच्या हालचाली एकत्र केल्या जातील. पण संक्रमण काळात सेट बनतील आणि ऑन-साईट चित्रणही काही काळापर्यंत चालेल. सध्यातरी एखादाच सेट बनवण्यासाठी कित्येक झाडे तोडली जातात, कागद (पापियेर माशे) चा हिशोब लावता-लावता अनेक झाडे तोडली जातात, रंगरंगोटी मध्ये काही घातक रसायने वापरली जातात. भविष्याच्या संगणक-ग्राफिक चित्रपटांमध्ये केवळ संगणकासाठी सिलिकॉन खाणी/प्लास्टिके/वीजनिर्मिती हाच पर्यावरणाच्या दृष्टीने खर्च राहील. शंका : आजच्या चित्रपटनिर्मितीत अशी बरीचशी झाडे वापरली जातात - एक जाळून-न-जाळून हिशोब फारसा बदलत नाही. आंब्याचे झाड जाळणार म्हणजे खाद्यनिर्मिक झाड नष्ट करणार असा काही विचार मनात येऊन शहारा येत आहे काय? पूर्वी कोणी मला आंब्याच्या आणि फणसाच्या लाकडाचे सुतारकाम दाखवले तेव्हा मला असाच शहारा आला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आनंदयात्री Wed, 04/29/2009 - 06:42 नवीन
भविष्यात बहुधा सेट बनणार नाहीत, आणि ऑन-साइट प्रवास करून चित्रण तर होणारच नाही. प्रत्येक कलाकार आपल्या घराजवळच्या एखाद्या स्टूडियोमध्ये जाऊन, किंवा घरातच, आपल्या ओळी म्हणेल. मग संगणकावर त्यांच्या हालचाली एकत्र केल्या जातील. कलाकार्स बर्‍यापैकी ऑब्सोलेट होतील !! हि बघा इमेज मॅट्रिक्सची एमिली .. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विकास Wed, 04/29/2009 - 02:16 नवीन
>>>खोटे झाड बनवायचे तर लाकडाचे किंवा जळाऊ प्लास्टिकचे बनवावे लागेल. त्यामुळे खरे किंवा खोटे झाड - कुठले जाळणे बरे-वाईट त्याचा हिशोब सहज लागत नाही. आंब्याच्या झाडाबद्दल असं म्हणतात की झाड आजोबा लावतात आणि फळं नातवंडे खातात. त्यातील अचूक कालगणना सोडली तरी इतके नक्की की आंब्याचे झाड रोपट्यापासून वृक्ष होण्यासाठी काही वर्षे लागतात. प्लॅस्टीकचे झाड फारतर फार २४ तासात होईल असे वाटते. अर्थात त्यामुळे ते जाळणे योग्य असे म्हणायचे नाही कारण त्याचे म्हणून काही "प्रॉब्लेम्स" असणार... म्हणून संगणकीय उपयोग व्हावा असे वाटते. तसेच वर चतुरंगने म्हणल्याप्रमाणे हे सगळे टिआरपी वाढवायचे उद्योग आहेत हे वेगळे सांगायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
मराठमोळा Tue, 04/28/2009 - 19:36 नवीन
एकच काय अशी दररोज आपल्याला माहीत नसलेली कितीतरी झाडे तोडली/जाळली जातात. माणसांच्या पोटी जनावरे जन्माला यायला लागली आणी हे सर्व प्रकार सुरु झाले. बाकी ह्या बातमीतला प्रकार टीआरपी वाढवण्याचाच दिसतो. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
क
काळा डॉन Wed, 04/29/2009 - 06:54 नवीन
आयला एकट्या होळीला हजारो झाडे जाळतात.. कुठल्यातर चिल्लर मालिकेत झाड जळताना दाखवले तर त्याची बातमी काय आणि त्यावर इथे चर्चा काय..आनंदी आनंदच आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 04/29/2009 - 07:02 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा डॉन
व
विकास Wed, 04/29/2009 - 18:16 नवीन
>>>आयला एकट्या होळीला हजारो झाडे जाळतात.. कुठल्यातर चिल्लर मालिकेत झाड जळताना दाखवले तर त्याची बातमी काय आणि त्यावर इथे चर्चा काय..आनंदी आनंदच आहे.<<< हे म्हणजे, "आयला काश्मीर, आसाम मध्ये सारखे दहशतवादी हल्ले होतात, तर एका मुंबईच्या हल्ल्याची बातमी काय आणि चर्चा काय... आनंदी आनंदच आहे" असे म्हणण्यातला प्रकार झाला. एक गाढव आहे म्हणून दुसरा आपोआप घोडा होत नाही... दोन्ही गाढवेच असू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा डॉन
व
विसोबा खेचर Wed, 04/29/2009 - 07:03 नवीन
मालिकेतिल खलनायिक मनोरूग्ण असणं ठिक आहे .. पण त्यासाठी खरे झाड जाळणारे सुद्धा मनोरूग्णच असले पाहिजेत. सहमत आहे. अत्यंत संतापजनक प्रकार आहे. आंब्याचे झाड जाळणार्‍यांनादेखील तसेच जाळून मारले पाहिजे! तात्या.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 04/29/2009 - 07:13 नवीन
=)) मनोरुग्ण म्हणा, फालतुपणा म्हणा नाहीतर अजुन काही... येव्हड्या मोठ्या प्रमाणावर सुशिक्षीत लोकांनी घेतली का नाही दखल त्या मालिकेची ? हिच तर गंमत आहे. ती बातमी 'उठवली' नसती तर आज आपल्यापैकी कित्येकांना अशा प्रकारची मालीका सुरु आहे हे कळले देखील नसते ;) एका दगडात (झाडात) किती पक्षी मारले गेले बघा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Wed, 04/29/2009 - 22:56 नवीन
एरंडाचे झाड जाळणार असतील बहुतेक नाहीतरी सध्या पुण्यातली काही वाहने एरंडाच्या जिवावरच धावतायत. एक तर या एरंडांना कोणी वाली नाही. शिवाय त्यांना जाळले म्हणून त्यांच्या नावाने कोणी गळेही काढणार नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा