Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे : एक शंका.

अ
अनंता
Fri, 05/01/2009 - 07:29
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1780 वाचन

💬 प्रतिसाद (4)
न
नितिन थत्ते Fri, 05/01/2009 - 08:59 नवीन
अविश्वासच दाखवायचा तर आतील प्रोग्रामिंग असे असू शकते की लोकांनी काहीही मते दिली असली तरी मेमरी मधे अ मते काँग्रेस पक्षाला आणि अ-ब मते भाजपला स्टोअर होतील. अ आणि ब हे आकडे रॅण्डमली जनरेटेड असला म्हणजे कोणाला संशयही येणार नाही. हे पक्ष कोणत्या पक्षाच्या कारकीर्दीत यंत्रे खरेदी झाली त्याप्रमाणे वेगवेगळी असू शकतील. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
अ
अडाणि Fri, 05/01/2009 - 20:25 नवीन
निवड्णुका ह काम अजून तरी निवडणूक आयोग करत असल्याने सर्व गोष्टी तपासुन काम होते... आणि त्या यंत्रात ब्लुटूथ आसायचे काही कारण नाहीये... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा Sat, 05/02/2009 - 08:51 नवीन
हे अगदी साधे मशीन आहे. यात अगदी साधे प्रोग्राम करता येतात. उदा. उमेदवारांची संख्या फीड करणे, मतदान बंद (क्लोज) करणे, निकाल बघणे. यात रीड ओन्ली मेमरी असते. ती केवळ डिलीट करता येते, बदलता येत नाही. ही मेमरी ० ते ७० अंश सेल्सियस तपमानापर्यंत शाबूत राहते. चुंबकीय क्षेत्राचा यावर परिणाम होत नाही. दहा वर्षे मेमरी टिकून राहते. एक मत दिल्यानंतर दहा ते पंधरा सेकंद मशीन व्यस्त राहते. म्हणजे `रिगिंग' करण्यासाठी भरपूर वेळ हवा! सरकारी यंत्रणेला थोडा अधिक ताप देण्यासाठी या यंत्रांचे दोन वेळा 'रॅण्डमाय्झेशन' केले जाते. म्हणजे कॉम्प्युटर वर रँडम नंबर जनरेट करून हे मशीन त्या बूथला आणि ते मशीन आणखी तिसरीकडे असे केले जाते. असे दोन वेळा, सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या उपस्थितीत केले जाते. हा फार मोठा उद्योग असतो. सर्व मशीन चार पाच प्रकारे सील केली जातात. मतदान सकाळी सात वाजता सुरू होणार असेल तर सहा वाजता प्रत्येक बूथचा प्रिसायडिंग ऑफिसर सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष 'मॉक पोल' घेतो. म्हणजे मशीन ठीक आहे, अगोदर मते घालून ठेवलेली नाहीत याची शेवटची तपासणी आणि खात्री. त्यानंतर पुन्हा मशीन चार पाच प्रकारे सील होते. या सील्सवर उमेदवारांचे प्रतिनिधी सह्या करू शकतात. मतदान संपल्यानंतर पुन्हा एक सील अधिक लागते. मतमोजणीपर्यंत ही यंत्रे कडेकोट बंदोबस्तात असतात. अनेकांच्या अनेक शंका होत्या म्हणून हे मशीन बनल्यापासून आज व्यापक प्रमाणात वापरात यायला वीस वर्षे लागली. माझ्या मते पुढची वीस वर्षे तरी काही मूलभूत बदल होणे शक्य नाही. मशीन अगदी साधे आहे, म्हणूनच विश्वासार्ह आहे. काही सुधारणांना वाव आहे. त्या आम्ही आयोगाला पाठवल्या आहेत. ( ईव्हीएम ची कसून तपासणी केलेला ) आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments
अ
अमोल खरे Sat, 05/02/2009 - 09:20 नवीन
मस्त लेख.बरीच सुंदर माहिती मिळाली. पण मागील एका निवडणुकीत बिहार मध्ये एका केंद्रावर कोणतेही बटण दाबल्यावर कंदिल ( लालू ची पार्टी ) समोरील दिवा लागत होता. कोणाच्यातरी हे लक्षात आलं आणि निवडणुक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. तेथे पुन्हा मतदान घेण्यात आले. तेव्हा हि मशिन्स आजच्यासारखी फुलप्रूफ नव्हती का ? कोणी खुलासा करु शकेल का ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा